ही कल्पना चांगली आहे. तसे करता येऊ शकेल. असा इंटरअॅक्टिव्ह नकाशा गुगल मॅप्स वापरून चांगला करता येऊ शकेल असे वाटते.
http://swinemap.org/ हा जागतिक नकाशा पहा. येथे पण माहीती घालता येऊ शकेल...
खरे म्हणजे मिडीयाला अशा विष्लेषणाची खूप गरज आहे. भडकपणे बातम्या देण्यापेक्षा काही साधार बातम्या दिल्यातर बरे.
एकीकडे म्हणायचे की, "घाबरु नका, हा संसर्ग बरा होतो.." आणि लगेच दुसरी वाईट बातमी असे प्रकार एका लोकप्रिय मराठी वाहीनीवर काल होत होते. त्यावरुन मला वरील सुचले.
इलेक्षनच्या काळात त्यांना विष्लेशणावर खर्च करण्यासाठे बजेट मिळत असेल व आत्ता ते नसेल, तयारी नसेल, प्रणाली नसेल, तज्ञ नसतील तर ते अशा उथळ बातम्या न देता भीती पसरवू नये म्हणून अधिक जागरुकपणे काय करता येईल म्हणजे योग्य परीणाम होईल ते पहावे असे वाटते.
कल्पना स्तुत्य आहे.
अजून एक मुद्दा ह्यात राहतोय तो म्हणजे अशा संशयित रुग्णांच्या इतर व्याधींचा इतिहास.
स्वाईन फ्लु प्रकार इतर रोगांपेक्षा भिन्न असल्यामुळे व एकंदरीतच प्रकाराची क्लिष्टता ध्यानात घेता हे सर्व विश्लेषण करून देखील निश्चित वा सरासरी निष्कर्ष काढणे धाडसाचे ठरेल.
अभिज्ञ.
स्वाईन फ्लु प्रकार इतर रोगांपेक्षा भिन्न असल्यामुळे व एकंदरीतच प्रकाराची क्लिष्टता ध्यानात घेता हे सर्व विश्लेषण करून देखील निश्चित वा सरासरी निष्कर्ष काढणे धाडसाचे ठरेल.
मान्य. परंतू कोणत्याही आधाराशिवाय आता जर निर्णय घेतले जात असतील तर ते अधिक धाडसाचे ठरतील.
अशा स्टाटेस्टीकचा उपयोग कोणत्या शहरात कधी आणी किती प्रमाणात उद्रेक होईल (होऊ शकेल) हे ही बरेच कळेल. औषधे/ टेस्टींग किट त्याप्रमाणे पाठवता येतील.
रीसोर्स मोबीलीटीची सुसंगताही ह्यातून साधता येऊ शकते.
पण हा गूगलचा नकाशा जम्मू आणि काश्मिर व अरुणाचल प्रदेशच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषा तुटक दाखवतो आहे त्याबद्दल गूगलचा निषेध!!!
तुमचा मुद्दा मान्य आहे आणि बरोबरही आहे फक्त हा नकाशा गुगलचा नसून टेली अॅटलास कंपनीचा आहे :-) अर्थात गुगलचा पाहीला तरी वेगळा दिसणार नाही. डॉटेड लाईन्स हा वादग्रस्त भाग म्हणून दाखवतात... चीन आजही अरूणाचल प्रदेशला त्यांचा भाग समजतो.. अरूणाचलींना चीनमधे जाताना व्हिसा लागत नाही ~X(
बहुतेक वेळेस सर्व आंतर्राष्ट्रीय उद्योग हे युनोमान्य आंतर्राष्ट्रीय नकाशे वापरतात. (हे समर्थन म्हणून सांगत नसून, केवळ त्यांचे व्यवहार कसे चालतात हे सांगण्यासाठी लिहीत आहे).
प्रतिक्रिया
चांगली कल्पना
खरे म्हणजे
कल्पना
स्वाईन
ट्विट ट्विट
चांगला
अशा
बाकी जाऊ देत...
दुरूस्ती
सीडीसी
ग्रेट.
पुणे