आपण काही उत्साहानं सांगायला जावं आणि सहधर्मचारिणीनं फोनच उचलू नये, हा कित्ती आनंददायी अनुभव नाही? मग काही मिनिटांनी/तासांनी तिचा पुन्हा फोन आल्यावर "सांगत नाही ज्जा!' म्हणून फणकाऱ्यानं फोन न उचलण्यानं अस्सा काही भडका उडतो म्हणून सांगू!
=)) =)) =))
फ्लॅट-फ्लॅट मधे एल.पी.जी.च्या शेगड्या
- टारझन
आपल्याला 'रसिक व्हायचंय' ? ,"तात्या आगे बढो" म्हणून धागा काढा.
मला घरात प्रत्येक ठीकाणी पुस्तके हवी असतात. हीला ती आवरून ठेवायची असतात.
नातेवाईक हा आणखी एक मह्त्वाचा घटक असतो भांडणात.
सगळे मुद्दे संपले की मग एकदम बीनतोड मुद्दा म्हणून हीच्या भावाचा स्वभाव हा विषय काढायचा.
मग तुमच्या बहीणींचे स्वभाव काढले जातात. मॅच एकदम रंगात येते.
(अवांतरः ह्या मॅचेस शक्यतो दिवसाच्या दुसर्या प्रहरापर्यन्त उरकून घ्याव्यात. धमाल्या अनुभव लक्षात घे रे.)
आणखी एक्.........मला अजुनपर्यन्त हा योगायोग कळालेला नाहिय्ये.
मी बासरी वाजवायला लागलो की ही अगदी प्रेमळपणे काहितरी खायला नाहितर चहा घेउन येते.
भांडण शब्दच मुळी भांड्यापासुन आला. भांडण शब्दाला बौद्धिक परिमाण द्यायचे असेल कि त्याला मतभेद म्हणायची सोय आहे. संतुलन बिघडु नये म्हणुन स्वतःशीच किती संघर्ष करावा लागतो नाहि? मग वाद नको म्हणुन संवादच नको अशी भुमिका पुढे येते. पण आंतरिक किडा स्वस्थ बसु देत नाही. मग चालु होतो अंतर्नाद ! असो
मौनीप्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
नक्की वाच! तेव्हढाच होमवर्क होईल :P
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
धम्या आज तारीख किती? उद्या किती? परवा किती? काही आठवतंय का?
अवांतर - हे प्रश्न अवांतर, वैयक्तिक गप्पा-टप्पांचे वाटतील. पण तसे नाही. त्यांचा या धाग्याशी नितांत जवळचा संबंध आहे.
मी पण वाट पहातो!
पण प्रतीसादांची संख्या पाहता मिपा च्या सुन-जावयांमध्ये, आपली भांडणं या धाग्यावर टाकायची की नाही? कोणती टाकायची? यावरुन भांडण लागले असेल तर नवल नाही. ;)
भांडं तापावं लागतं.
टिपेला पर्फेक्ट लागलं की मजा येते.
बाकी टापटीप म्हणाल तर माझ्या बायकोला फोल्डींगचा नवरा मिळाला असता तर फारच आनंद झाला असता,छत्रीसारखा हवा तेव्हा उघडायचा .
हा हा .. फोल्डिंगचा नवरा ही कल्पना एकदम आवडली.
कल्पनेतच ती बरी..प्रत्येक्षात नको :(
अभिजीतराव,
लेख छान आहे. माझ्याकडून भर घालण्यासारखे अद्याप काही नाही.
(असे लिहावे हेच बरे ;))
तुम्ही धाडसी आहात.
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
लेख छान आहे. माझ्याकडून भर घालण्यासारखे अद्याप काही नाही.
(असे लिहावे हेच बरे )
हो असेच म्हणावे नाहीतर ताबडतोब भर घालण्यासारखे काही घडायचे! :D
(अनुमोदक)चतुरंग
अनुमोदनासाठी आभार !
प्रपंच म्हणजे बुद्धीबळाचा पटच आहे. राणीला सर्वाधीकार असतात तर राजा नुसताच नामधारी.
--(येता जाता जीवनावर भाष्य करणारा) लि. खु. काळे ;)
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
राणीला सर्वाधिकार असले तरी राजाखेरीज राणीला महत्त्व नाही आणि राणीखेरीज राजाचा निभाव लागणे अवघड, त्यामुळे कधी हत्तीची सरळ, कधी उंटाची तिरकी तर कधी घोड्याची दुडकी चाल खेळावी लागतेच आणी तरीही शेवटी आपण नियतीच्या हातचे प्यादेच असतो हे विसरता कामा नये!!!
(खुद के साथ बातां : हे वाक्य उगीचच लई भारी झालं आहे असं नाही वाटत रंगा तुला?टाळ्या! टाळ्या!! ;) )
(प्यादे)चतुरंग
वा वा.. तुमच्या या वाक्याची नोंद आम्ही आमच्या आगामी पुस्तकात जरूर घेऊ !
पुस्तकाचे नाव आहे
बुद्धीबळातून प्रपंचविज्ञान
प्रपंचाची घडी नीट बसवण्यासाठी बुद्धीबळाचा पट उघडा
-- लि. खु. काळे
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
वेगळं काय लिहु?
वरचे लेख+प्रतिक्रियेतले सगळे मुद्दे जसेच्या तसे उतरवून काढावे लागतील :)
रामदासकाका, फोल्डिंगचा नवरा??? ख्यॅ ख्यॅ ख्यॅ!!! मला टॉम & जेरीमधल्यासारखं फोल्डींगचा माणूस नजरेपुढं आला. :)
बाकी, घरोघरच्या चुलींची ठेवण, मांडणी, अगदी मातीसुध्दा इतकी कशी सारखी ह्या आश्चर्याच्या धक्क्यातूनच अजुन सावरलो नाहीय्ये :(
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
आमच्याकडे दोघंही तितकेच 'कष्ट-टाळू' असल्याने टापटीपीवरून वगैरे भांडणे होत नाहीत..
जमेल तितका पसारा घालायचा व एकदा दोघांनी मिळून आवरून टाकायचा असा सोपा कारभार!
भांडणाची - सभ्य भाषेत चर्चेची - कारणे अशी असतात..
मुव्ही कुठला पाहायचा..
फ्रायडे इव्हीनिंग जेवणाचा मेनू काय? आणि सगळ्यात महत्वाचे 'कोणी' बनवायचा! :) ..
विकेंडला कुठे भटकायचे..
मला पुस्तक विकत घ्यायचे असते तर याला मुव्हीज किंवा गेम्स! ?
विकेंड जास्त मिळावा म्हणून तो तेव्हा भल्या पहाटे ८ला वगैरे उठतो !! :|
अशी काही गंभीर कारणं असतात चर्चेची फेरी झडायला! :)
http://www.bhagyashree.co.cc/
आमच्याकडे दोघंही तितकेच 'कष्ट-टाळू' असल्याने टापटीपीवरून वगैरे भांडणे होत नाहीत..
वा वा हेच सुत्र आम्ही वापरावे म्हण्तो. सारख आपल पडदे बदल, उश्यांचे आभ्रे बदल्,चादरी बदल, रोज पाणी प्यायची भांडी घासायला टाक.यातच कष्ट वाया जातात. खरतर रोज रोज अंघोळी करण्यात देखील पाणी आणि कष्ट वाया जातात असे आमचे मत आहे. शेवटी आपल्यासाठी घर कि घरासाठी आपण?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
खणखणाट तर होतो, पण नक्की सुरुवात कशी होते त्याचा गेली ५ मिनिटे विचार करते आहे पण अजून लक्षात आलेले नाही. बहुतेक भांडणाचा होण्याचा मूड असल्यावर काहीही बोलल्यावर (किंवा न बोलल्यावर) ते होत असणार.
वरची निष्फळ चर्चा वाचली. सौ. भाग्यश्रीने त्यात भर घालायचा छोटा पण प्रामाणिक प्रयत्न केला त्याबद्दल तिचे अभिनंदन! बहुतेक सगळेजण रणछोडदास असावेत असा अंदाज (नक्की माहित नाही)!
मंडळी, आमच्याकडे मला भांडायची खुमखुमी असली तरी नवर्याला अजिबात इंटरेस्ट नसतो असल्या गोष्टीत! तरी उकरून मी भांडण काढतेच. निमित्त म्हणाल तर्...........कोण म्हणतं भांडायला निमित्त लागतं? माझी बडबड सुरू झाली की नवरा ठार बहिरा होतो........तात्पुरता! ;)
समोर ल्यापटॉप ठेवून त्यावर कुड्कुड असं टंकत असतो. मधूनच 'माझं चुकलं', किंवा 'असं झालं होय?' असं म्हणत असतो. दोनचार वेळा 'माझं चुकलं' असं ऐकल्यावर तो नाटकं करतोय हे लक्षात न येण्याइतकी मी काही निर्बुद्ध नाही. हे त्याच्या लक्षात येताच तो प्रतिसाद बदलतो. नंतर सुरू होतं 'तुझं बरोबर आहे'. साधारण पंधरा ते वीस मिनिटांनी मी बोलून दमते......हा फ्रेश! आजकाल नवर्याचा विचार चाललाय्.......क्लासेस काढण्याचा...........'तात्पुरता बहिरेपणा कसा आणावा?' तसा आमचा संसार सुरळीत चाललाय म्हणायला हरकत नाही.
(सुरळीत)रेवती
अहो युनिवर्सल आहे तर काहीतरी तथ्थ असेल हो. विचार करण्यासारखा मुद्दा आहे, बोलून बोलून प्रॅक्टिसने बायकांच्या बोलण्याला एक धार चढते पण ऐकुन ऐकुन आम्हा नवर्यांचे कान खरेच पार बधीर होतात. बघा तुमची तयारी असेल तर एक महिना प्रयोग करा उलटा. कोणाचेही चुकले तरी तुमच्या मिस्टरांना सांगा तुम्ही बोला मी ऐकते. (बाय द वे, ह्या प्रयोगाच्या साइड इफेक्ट्सला मी जबाबदार नाही. )
अवांतर- लिखाळकाकांच्या पुस्तकातुन / नवमानसशास्त्राला अनुसरुन लग्न झाल्यावर बायकोला सहजीवनात माझ्याकडून काय अपेक्षा आहेत असे हौसेने (हौसेने =सांग सांग विचारले असता, बर बुवा तुम्ही म्हणताय म्हणुन हो. बघा जमेल का? मी=अग हो ग. तु मनमोकळेपणाने बोल. अश्या संवादानंतर) बायकोने केलेली पहीलीच चाल अर्थात संसारात मला शिकवलेला पहिला धडा "मला बोलायचे नाही."
पुतण्यांनो नोंद घेतलीत का?
गंमत सांगतो, लेकरु ही स्ट्रटेजी वापरायला लागले आहे.
काहीतरी गडबड केली व बोलायला जावे तर एका सेकंदात उत्तर येतं, सॉरी माझं चुकलं. मी पुन्हा असं नाही करणार. केल तर मला शिक्षा करा.
झालं मी कितीही चांगला वागलो असेन त्या दिवशी तरी लेकराच्या ह्या उत्तराने परत मीच दोषी ठरतो, बोलणी खातो. लो प्रोफाइल ठेवणे / अंडर द रडार हे शिकण्यामागे अनुभव आहे हो.
पुतण्यांनो नोंद केलीत का?
>> माझी बडबड सुरू झाली की नवरा ठार बहिरा होतो........तात्पुरता! समोर ल्यापटॉप ठेवून त्यावर कुड्कुड असं टंकत असतो.
रेवती,
आमच्या घरातला सीन तू कसा काय लिहिलास ? बायको शेवटी म्हणते, "अरे ! मी काय भिंतीशी बोलतीय का? " !! :)
आम्ही महिन्यातून एकदाच ३-४ दिवस घरी जातो. त्यामुळे बहुधा नवरा घरी आल्याचे थोडे कौतुकच असते. त्यामुळे जास्त अनुभव नाही.
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
बहुतेक प्रतिक्रिया लिहीणार्यांची मुलं बाळं अजून बाळंच आहेत.
मुलं मोठी झाल्यावर एक मोठ्ठा वाद अस्तो तो म्हणजे..
"तुम्ही मुलांचीच बाजू घेता. नाहीतरी आजकाल बघत्येय मी तुम्हाला नकोशीच झालेय.मी एकदा मरतेच मग घाला गोंधळ हवा तेव्हढा. नंतर हाक मारलीत तरी येऊ शकणार नाही वगैरे वगैरे."
हा वाद सर्वसाधारणपणे मुलं आईच्या सोबत बारशाला किंवा तत्सम समारंभाला जाण्यासाठी नकार देतात त्याच्या दुसर्या किंवा तिसर्या दिवशी होतो.
"यावेळी अगं यावेळी नाही तर नाही दुसरं मुल होईल तेव्हा मी येईन तुझ्यासोबत असं उत्तर दिलं तर उपाशी रहावं लागतं ."
डिप्लोमसीचा जास्तीत जास्त वापर करून उत्तर द्यावे.
आमच्याकडे नवर्याचे टिव्ही बघणे (त्यात फूट्बॉल चा सिझन असेल तर आणखीनच भर) आणि माझे आंतरजालावर भ्रमण करणे ह्यावरून एकमेकांना टोमणे मारले जातात.
बा़की बारिक सारीक गोष्टींवरून भांडण नाही पण हलके वाद व्हायचे अधूनमधुन (आता होत नाही कारण एकमेकांचे स्वभाव आणि सवयी अंगवळणी पडल्याने) उदा.
चहा केला तर गाळणीत चहा पावडर तशीच ठेवून भांडे नळाखाली भिजत न घालणे (वाळून गेल्यावर नंतर घासायला किती त्रास होतो), भाज्या चिरणे, खोबरे किसणे अशी कामात मदत केलीच तर काम झाल्यावर हातासरशी ते सामान उचलून न ठेवणे, किचन मधील कॅबिनेट मधून काही सामान काढले तर दारे तशी च उघडी ठेवणे, एखादी गोष्ट सांगत असताना आधी लक्ष न देणे आणि मग नंतर काय म्हणत होतीस असे म्हणून तीच गोष्ट रिपीट करायला लावणे......वगैरे ह्या त्याच्या गोष्टी
आणि माझ्या म्हणाल तर्...उशिरा उठणे, मोबाईल फोन जागेवर न ठेवणे , शॉपिंग ला भरपूर वेळ घेणे .... :)
एका मैत्रिणीच्या घरी गेले होते.. नवरा-बायको दोघेही माझे चांगले मित्र... त्यांच्या घरी कामाची वाटणी म्हणजे.. मी पसारा करतो.. तू आवर.. तू स्वयंपाक कर.. मी खातो या प्रकारातली.. चहा कुणी बनवायचा याचा चेंडू एकमेकांवर फेकून फेकून शेवटी मी हार पत्करली अन चहा केला.. चहा झाल्या झाल्या नवरोबा आले नि त्यांनी समोरच्या भरल्या कळशीवरची झाकणी उचलली नि चहाच्या पातेल्यावर ठेवली...
मी भडकले त्याच्यावर.. "अरे जरा तरी अक्कल वापर... पाण्यात काही पडलं म्हणजे?? हजारो प्लेट्स असतील अजून घरात.. चार पावले चालून एखादा खण उघडून दुसरी झाकणी ठेवायची ना... नि सारखा मारे बायका कशा अक्कलशून्य अशा बाता मारत असतोस.. आता सांग कोण माठ आहे ते!!!"
माझी मैत्रीण स्थितप्रज्ञासारखी शांत.. नवर्याच्या या वागण्यावर मुळीच रागावली नाही.. फक्त म्हणाली.. "काही अडचण नाही. लग्न होऊन एखादे वर्ष झाले.. की कळेल.. अशा त्राग्याचा काही उपयोग नसतो ते..!!!"
परवाच मी तीला गुजरातीत रिकामटेकड्या माणसाला "नवरा" म्हणतात म्हणून सांगितलं... तर ती तितक्याच शांतपणे म्हणते कशी.. "त्यात काय विशेष? समानार्थी शब्दच तर आहे!!!"
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
परवाच मी तीला गुजरातीत रिकामटेकड्या माणसाला "नवरा" म्हणतात म्हणून सांगितलं... तर ती तितक्याच शांतपणे म्हणते कशी.. "त्यात काय विशेष? समानार्थी शब्दच तर आहे!!!"
सलाम या स्थितप्रज्ञतेला. :)
मटाच्या हसा लेको मध्ये वाचलेला नवराबायको वरचा विनोद..
नवर्याची तक्रार आहे की कसेही वागले... तरी बायको चिडायची ती चिडतेच...
**गप्प बसलं तर.... मुखदुर्बळच आहेस.. जरा तोंड उघडून बोलत जा.. चारचौघात घुम्यासारखं बसत जाऊ नकोस...!!
**बोलत राहिलं.... जरा इतरांना पण बोलू देत जा.. किती स्वतःचाच शहाणपणा पाजळायचा तो... लाज आणतोस चार लोकांत...!!!
**भेटवस्तू आणल्या नाहीत तर.. घरात बिनपगारी मोलकरीण मिळालीय ना... इतकं राब राब राबायचं... एखादी वस्तू न सांगता आणली तर सगळी इस्टेट्च जणू संपून जाणार आहे...!!!
***आणल्या तर.... कुठंतरी शेण खाऊन आला असाल.. चुकीचं परिमार्जन म्हणून बायकोला काहीतरी आणलं असेल...!!!
** प्रेमानं बोललं नाही तर... बाहेर कुठंतरी लफडं चालू असेल... बायकोशी चार शब्द बोलायला वेळ कसा असेल???
** प्रेमानं बोललं तर... "दुसरं" काही सुचतच नाही का?? इथं बायको मरमर मरतेय कामानं... पण यांना काय!!!!
बिच्चारा (विनोदातला) नवरा!!!
अवांतरः:: हे असले विनोद नेहमी स्त्रियांवरच का असतात??? बायकांनी नवर्यावर केलेले विनोद सहसा वाचनात येत नाहीत...
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
"मांजर आणि नवरा, कुठेही नेऊन सोडले तरी संध्याकाळी बरोब्बर घरी हजर"
काय हो अभिजीतराव तुमच्या ग्रॅफिटीची झाईरात केली, काही मोबदला देताय की नाही? ;)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
अवांतरः:: हे असले विनोद नेहमी स्त्रियांवरच का असतात??? बायकांनी नवर्यावर केलेले विनोद सहसा वाचनात येत नाहीत...
काँप्लेक्स नंबरचे दोन भाग असतात एक रिअल आणि दुसरा इमॅजिनरी नवर्यांनी बायकांवर केलेले विनोद हा त्यातला रिअल पार्ट असतो आणि बायकांनी नवर्यांवर केलेले विनोद हा इमॅजिनरी; त्यामुळे तसे विनोद दिसणे अवघडच! :B :D
(काँप्लेक्स)चतुरंग
एक कुठेतरी वाचलेले.............
नवरा : एका सर्व्हे नुसार पुरुष सर्वसाधारणतः दिवसातून २००० शब्द बोलत असतील तर स्त्रीया ६००० शब्द बोलतात.
बायको: खरे आहे हो. तुम्हाला एकच गोष्ट तीनतीनदा सांगावी लागते तेंव्हा कुठे डोक्यात उतरते
प्रतिक्रिया
अभिजितराव,
हाहाहा !!
मला घरात
त्यात योगायोग कसला विजूभाऊ
भांडण
मस्त धागा
ह्म्म...वाच वाच!
उद्या...
होमवर्क साठी...
मी पण वाट
सूरात लागण्यासाठी
हा हा ..
हा हा!
अनुमोदनास
टाळ्या!प्रचंड टाळ्या!
वा वा! जीवनभाष्य आवडले!!
नियतीच्या
ते तुला लग्न झाल्यावर कळेल!
हे तुमचं
अरे, तुला ते वाक्य माहीत असेलच
छे हो!
वा वा..
फोल्डींगचा नवरा
हे राम!
चर्चा
आमच्याकडे
वा वा
कारण
वरची
छे हो!
रेवती हा
निषेध
रणछोडदास की नाना फडणवीस तुम्हीच ठरवा
श्री
तात्पुरते बहिरेपण
ज्ञानदेवांनी भिंत चालवली
कानाने बहिरा...
मजेशीर
असेच म्हणतो !
आम्ही
मला वाटतं की
हा हा हा! कसलं जबराट निरीक्षण आहे!
आमच्याकडे
एक अनुभव...
परवाच मी
आणखी एक..
आहे ना!
व्वा!
हॅ हॅ हॅ
एक कुठेतरी