मोठ्या रकमेच्या दंडापेक्षा अल्पकाळाकरीता तुरुंगवास, ही शिक्षा अधिक परिणामकारक ठरावी!!!
मद्यपान करून वाहन चालविणार्यांवरदेखिल अशाच प्रकारच्या शिक्षेचा बडगा उचलला गेला होता, हे आठवले.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
एखादी गोष्ट करावी लागू नये अशी व्यवस्था केल्यानंतरही ती गोष्ट केली जात असेल तर शिक्षा करणे समर्थनीय.
परंतु ती न करता शिक्षा करणे असमर्थनीय.
ठाणे स्थानकावर ६ प्लॅटफॉर्म होते तेव्हाही पुलांवर प्रचंद गर्दी होत असे. गेल्या काही वर्षांत १० प्लॅटफॉर्म झाले, वाशी नेरूळ कडे जाणार्या गाड्या सुरू झाल्या. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांना ठाण्याला नव्याने थांबे देण्यात आले. को़कणात जाणार्या गाड्या सुरू झाल्या पण पुलांची संख्या जेवढी १९८० मध्ये होती तेवढीच आहे. तेव्हा पुलांवर आणि त्याही पेक्षा पुलांवरून प्लॅटफॉर्मवर उतरणार्या जिन्यांवर जी मरणप्राय स्थिती असते ती 'अनुभवली' तर या दंड करण्याचे समर्थन केले जाऊ शकणार नाही.
तसेही ठाण्याला प्लॅटफॉर्मच्या टोकाकडून रूळ ओलांडण्याची शक्यता दूरपर्यंत फेन्सिंग घालून बंद केलेली आहे. पुलावरूनच मरत मरत जाण्यावाचून पर्याय नाही.
(पूर्वी एकदा गाडीच्या दरवाजात उभे राहून प्रवास केल्याबद्दलही दंड करण्याची घटना घडली होती. सुदैवाने ती पुढे घडली नाही).
खराटा
(रंग माझा वेगळा)
या विषयातील आणखी वाईट भाग म्हणजे असे खटले ज्या न्यायालयांत चालतात तेथे आरोपीने गुन्हा मान्य केला नाही आणि तोंड उघडले तर दंडाची रक्कम वाढते असे म्हणतात.
(वरील माहिती ऐकीव आहे. प्रत्यक्ष अनुभव नाही)
म्हणजे खरेतर आरोपीला आपली बाजू मांडण्याची संधी न देताच शिक्षा ठोठावली जाते. (कसाबला मात्र वकील मिळाला नाही तर किती भयंकर अन्याय होईल याची चर्चा होते).
खराटा
(रंग माझा वेगळा)
या विषयातील आणखी वाईट भाग म्हणजे असे खटले ज्या न्यायालयांत चालतात तेथे आरोपीने गुन्हा मान्य केला नाही आणि तोंड उघडले तर दंडाची रक्कम वाढते असे म्हणतात.
(वरील माहिती ऐकीव आहे. प्रत्यक्ष अनुभव नाही)
खरे आहे. त्याला "अडाणी कोर्ट" असे म्हणतात. मुलुंडला असे एक कोर्ट होते (अद्याप आहे?). मी स्वतः अनुभवले आहे (प्रेक्षक म्हणून - उगाच गैरसमज नको!).
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
पण पुलांची संख्या जेवढी १९८० मध्ये होती तेवढीच आहे
आणखी जादा पूल बांधण्यासाठी तिकडे जागा आहे का? महानगर पालिकेच्या/राज्य्/केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे लोकसंख्या काही ठराविक परिसरात बेफाम वाढते.ठाणे शहराचेही तेच झाले असावे.रेल्वेकडून वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा करणे योग्य नाही असे मला वाटते.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा कोण करतंय.
फक्त त्यामुळे लोक रूळ ओलांडत असतील तर दंड करू नये एवढेच म्हणणे.
(मी रोज गाडीने प्रवास करत नाही पण ठाण्याला स्टेशनात शिरल्या पासून प्लॅटफॉर्मवर पोचायला जितका वेळ लागतो तितक्या वेळात तीन गाड्या येऊन निघून जातात. यावर असेही म्हणता येईल की मग लोकांनी तीन गाड्यांएवढा वेळ आधी निघावे. )
खराटा
(रंग माझा वेगळा)
खराटाशेट, यावर माझा उपाय म्हणजे ठाण्याला पूर्वेच्या बाजूला जायचं. अर्थात तिकीट काढायला कमी वेळ लागतो असं नाही, पण गर्दी थोडी कमी असते.
सॅटीस, भरमसाठ लोकसंख्या वाढ, शिवाय ट्रेन्स, प्लॅटफॉर्म यांच्याही वाढीमुळे ठाणे स्टेशन आणि आजूबाजूचा भाग, रोजच्यारोज कुंभमेळ्यासारखा दिसतो.
रेल्वे पोलिसांनी हे असले उद्योग करण्यापेक्षा माणसांनी तुडुंब भरलेले फलाट आणि पूल जलद ड्रेन कसे होतील, फलाट/ पुलावर जागा अडवून बसलेले विक्रेते/ भिकारी तिथून नाहिसे कसे होतील, 'मदत' या पाटीखाली एकतरी पोलिस कायम कसा उपस्थित असेल, याची चिंता करणं जास्त जरूरीचं आहे....
एक गोष्ट ऐकून आनंद वाटला की या निमित्ताने का होईना, रेल्वे पोलिस फलाटावर जास्त वेळ असतील जेणेकरून लोकांना त्यांची मदतच होईल.. ;)
बाकी खराटा साहेबांशी सहमत.
अवांतरः पश्चिम रेल्वे वर फिरताना एक गोष्ट लक्षात येते की येथे कुठेही अपंगांसाठी/वयस्कर लोकांसाठी ramp ची सोय नाहीय.. ईथल्या फलाटांची ऊंची फूटबोर्डाच्या ऊंचीपेक्षा इतकी कमी आहे की एखादा ३०-३५ वयाचा माणूस चूकून गाडीतून पडला की गाडीखाली जातोच.. असे अपघात टाळण्यासाठी रेल्वे काय करतेय?
--- सुहास
रेल्वे पोलिसांचा असाही एक पराक्रम.....
http://www.mumbaimirror.com/article/2/200906262009062602043783781508705/Robbers-stab-constable-minutes-after-he-handed-them-over-to-RPF.html
प्रतिक्रिया
योग्यच
उत्तम
व्यवस्था आणि शिक्षा
सहमत. हा
सहमत
हम्म..
आणखी
अवांतरः अडाणी कोर्ट
जादा
वाजवीपेक्
+१
मी पुलावर
सहमत आहे!
एक गोष्ट
रेल्वे पोलिसांचा असाही एक पराक्रम.....