कायधाचे उल्लधंन केल्यास तेथे गुन्हा घडतो ही झाली गुन्ह्याची सर्वसाधारण व्याख्या. चार ,पाच जण किंवा त्याहून अधिक यांनी एकत्र पणे येऊन केलेला गुन्हा म्हणजे संघटीत गुन्हा. पण हाच सघटित गुन्हा अनेक जण येऊन म्होरक्यामार्फत करतात तेव्हा टोळी निर्माण होते. या टोळीतून फुटुन अनेक टोळ्या निर्माण होतात आणि त्यांच्यात अस्तित्वासाठी,हुकूमतीसाठी लढाई,खुनखराबा निर्माण होतो .अशीच लढाई मुंबईत सुरु होती. टोळ्या त्यांचे टोळीयुध्द यांचा भडका उडाला होता सामान्यजनांनाही त्याची झळ बसत होती. त्या गुन्हेगारी प्रवृतीच्या टोळ्यांचा थोडक्यात घेतलेला हा आढावा. प्रस्तुत लेखाचा त्या गँगवारचा उदात्तीकरण करण्याचा मुळीच हेतू नाही.
मुंबईच्या गुन्हेगारी जगताचा इतिहास रक्तरंजित आहे हे आपण जाणतोच पण त्या इतिहासाला तेव्हाचे सामाजिक स्वरुपही जबाबदार होते. बंद झालेल्या कापड गिरण्या ,एकत्र कुटूंब पध्द्ती,सिनेमा,राजकीय पक्ष,चाळ संस्कृती या सर्वांचा थोड्या फार प्रमाणात परिणाम किंवा प्रभाव तेव्हाच्या गुन्हेगारी जगतावर होता. हाजी मस्तान ,युसूफ पटेल,करिम लाला या तस्करांपासून सुरू झालेला हा प्रवास वरदाराजन, दाऊद,अरुण गवळी,छोटा राजन,गुरू साटम,बाबू रेशीम,अमर नाईक ,मंचेकर इथपासून ते अगदी छोटा शकील,अबू सालेम इथपर्यंत कुप्रसिध्द आहे.प्रत्येक गुन्हेगारी टोळ्यांचे मुंबईतील शहर,उपनगरात वर्चस्व होते. या टोळ्यांत मराठी कनिष्ट वर्गातील तरुणांचे प्रमाण जास्त होते. नाक्यानाक्यावर उभा राहणारा तरूण त्यात शि़क्षीत वा अशिक्षीत दोन्ही यांच्यावर त्या गुन्हेगारी टोळ्यांचा प्रभाव तेव्हा होता हे नक्की. हा या कंपनीचा तो ह्या कंपनीचा .तो कंपनी टच आहे या चर्चा तेव्हा सरस घडत. काही वाट चुकलेले तरूण योगयोगाने म्हणा वा भाई बनण्याच्या इर्षेने,परिस्थितीमुळे, बेरोजगारी, झटपट पैसा मिळविण्याच्या नादात तेव्हा गुन्हेगारी टोळ्यांना सामिल झाले आणि आयुष्याचा खेळखंडोबा करुन बसले.मिळालेला काळा पैसा मग वेश्यावस्ती,लेडीज बार,जुगार किंवा कोणाला मदत लागल्यास त्याला दे असे होऊ लागले. एकदा येथे आले की परतीचा मार्ग बंद हे आपण अलि़कडेच आलेल्या सत्या,वात्सव या सिनेमांतून पाहीलेलेच आहेगँगवार(साधारण १९९३ हे वर्ष) जेव्हा जोरात होते तेव्हा यापैकी अनेक जण मारले तरी गेले कींवा यांनी कोणाचा तरी गेम तरी केला.पुढे अनेक राजकीय नेते, कामगार पुढारी यांच्या गुन्हेगारी टोळ्यांकडून सुपारी घेऊन हत्या झाल्याने(यांचा बोलाविता धनी कोणी वेगळाच) तसेच या टोळ्यांनी घातलेल्या हैदोसाला(खंडणी,धमकीसत्र) पाहून अखेर मुंबई पोलीसातील बहादुर अधिकार्यांनी त्यांना मिळालेल्या एन्काऊंटरच्या आदेशामूळे अनेक गुंडाना टिपले व गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडले.त्यासाठी त्यांनी ठराविक गुन्हेगारी टोळीच्या म्होरक्यांच्या खास म्हणजेच डावा हात उजवा हात यांना टिपून म्होरक्यांना एकटे पाडले व व टाडा,रासुका,मोक्का या कडक कायद्यांमुळेया टोळ्यांना थोड्याफार प्रमाणात का होईना नेस्तनाबूत केले. पोलीस कारवाईच्या भितिने अनेक जण भारतातून परागंदा झाले यातील अनेक जणांनी आपला काळा पैसा बांधकाम व्यवसाय,चित्रपट निर्मिती यांमध्ये गुंतविला.पुढे एन्काउंटर बाबत पोलीसांवर संशय व्यक्त झाल्याने पोलीसांनीही एन्काऊंटर थांबवले.
आज जवजवळ गुन्हेगारी टोळ्या शहरातून हद्दपार झाल्या आहेत हे चांगलेच झाले तरी त्यांचे अस्तित्व शिल्लक आहे कारण आजही मध्येच एखादी चकमकीची बातमी आल्यास अथवा एखादा गुन्हेगार सुटल्यास खळबळ निर्माण होते.मग या संघटीत गुन्हेगारी टोळ्यांना अंत आहे का ? हा प्रश्न निरुत्तरच राहतो.
तसे पाहील्यास आज गुन्ह्याची पध्द्त बदलली आहे आजचे युग हे संगणक युग आहे त्यामुळे सध्या व्हाईट कॉलर गुन्ह्यांचा जमाना आहे.जास्त व्याज देतो,लोन मिळवून देतो म्हणून कंपन्या संघटीत पणे स्थापन करणे आणि योग्य वेळ मिळताच पसार होणे, ,क्रेडीड कार्डाद्वारे पैसे काढणे,संगणक हॅक करणे त्यातून माहीती चोरणे अश्या प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची सध्या चलती आहे तसेच मोटार सायकली,अलिशान गाड्या चोरणे.या बदललेल्या गुन्ह्यांत शिक्षीत व उच्च मध्यम वर्गातील तरुण जास्त करून आढळताना दिसतात. बदलती जिवनशैली,डिस्को पब्ज,मॉल्स,अलीशान मोटारी,सिनेमातील श्रीमंती,पाश्चात्य राहणीमान यांचे आकर्षण याला कारणीभूत आहे. जो पर्यंत माणसात खुनशी वृत्ती ,लालसा,कपटी मनोवृती शिल्लक आहे तो पर्यंत हे बदलणार तरी कसे व गुन्हे घडतच जाणार.
वाचने
8033
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरेरे
अहो मास्तर
In reply to अरेरे by विनायक प्रभू
सर्व माणसे
In reply to अहो मास्तर by अवलिया
वा! मस्त
ह्म्म्म्म
In reply to वा! मस्त by अवलिया
अवलियांनी
सहमत
In reply to अवलियांनी by कपिल काळे
आवडला
तिरशिंगराव
In reply to आवडला by तिमा
असा दुहेरी
In reply to तिरशिंगराव by विकि
खर आहे
चांगला आढावा...
आधुनिकीकरण
पण
त्या बद्दल पण येउ द्या की
In reply to पण by मेथांबा
कुणी लावला
In reply to पण by मेथांबा
कपिल काळे
In reply to कुणी लावला by कपिल काळे
अरेरे !! च्च
In reply to कपिल काळे by विकि
चांगला लेख
भेन्डी बाजार
मानवी मनोव्रुत्ती
In reply to भेन्डी बाजार by विकि
सर्वांचे आभार
अस का?
आता तुम्ही
In reply to अस का? by वेताळ
हम्म...