अहो मास्तर काय कलयुग अन सत्ययुग ?
कुठल्या १०००० वर्षांपुर्वी मरुन बेपत्ता झालेल्या देशातील कल्पना घेवुन बोलत आहात ?ऑ !!!
अहो इथे माणसांची फिकीर नाही तुम्हाला अन संस्कृतीच्या गप्पा मारता आहात?
अहो माणुसकी पायी तुमच्या संस्कृतीला लग्नाआधी चार पोरे झाली? आता तिने काय करायचे ? सांगा? घेता जबाबदारी?
आणि सोन्याचा धुर जरा एकाच घरात असेल तर बाकी घरातील लोकांनी काय ठसके द्यायचे फक्त? आता नाही त्यांच्या पाशी तुमच्यासारखा समुपदेशक मग काय करणार ? बंदुकाच घेणार ना हातात?
समजुन घ्या हो तुम्ही!
आपलीच माणसे आहेत !
सर्व माणसे समान असेच आपले म्हणणे ना ? मग सोन्याचा धुर प्रत्येक घरातुन नाही निघु शकत तर बंदुकीचा तरी निधु द्या !!
आपल्याला काय? धुर पाहिजे ! आणि सगळीकडे पाहीजे... समानता !! बास !!!
--अवलिया
सर्व माणसे समान असेच आपले म्हणणे ना ? मग सोन्याचा धुर प्रत्येक घरातुन नाही निघु शकत तर बंदुकीचा तरी निधु द्या !!
सिगारेटचा/गांजाचा निघाला तरी हरकत नाही... ;)
आपल्याला काय? धुर पाहिजे ! आणि सगळीकडे पाहीजे... समानता !! बास !!!
तालिबानला जावं लागेल. :P :?
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
वा! मस्त लेख !!
तशा टोळ्या कॉर्पोरेट जगात पण असतात त्यांना टीम म्हणतात.
संकेतस्थळावर पण असतात (मराठि विशेषतः) त्यांना कंपु म्हणतात.
या कंपुचे पण अनेक प्रकार आहेत जागृत, निद्रिस्त अन मृत.
पण यावर नंतर कधीतरी ..... :)
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
विकि, तुमचा लेख आवडला. या राजकीय खुनांचा बोलविता धनी कोण यावर पण लिहिले असते तर वाचायला नक्कीच आवडले असते.
प्रतिक्रियेत लालगढचा उल्लेख कोणीतरी केला आहे म्हणून लिहावेसे वाटते.
ते लालगढचे घोषणा देणारे आदिवासी बघितले की त्यांचा राग येत नाही. तर त्यांना वर्षानुवर्षे गरीबीत ठेवणार्या राज्यकर्त्यांची चीड येते. आज जर नक्षलवादी वा माओवादी यांचे प्राबल्य वाढले असेल तर त्याला हे नालायक राज्यकर्तेच जबाबदार आहेत. अगदी केंद्रापासून राज्यांपर्यंतचे सर्व!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
या राजकीय खुनांचा बोलविता धनी कोण यावर पण लिहिले असते तर वाचायला नक्कीच आवडले असते. या विषयी लिहायला आणि वाचायला मलाही आवडेल.पण पुराव्याशिवाय कोणिही यावर लिहू शकत नाही. छोटा शकील टोळीने यापुर्वी केवळ प्रसिध्दीसाठी शिवसेना पदाधिकार्यांच्या हत्या केल्या होत्या. तसेच बहुतेक राजकीय खुनांच्या मुळ मारेकरी कधीही पोलीसांच्या हाती लागत नाही हे ही तितकच वास्तव आहे.
प्रतिक्रियेत लालगढचा उल्लेख कोणीतरी केला आहे म्हणून लिहावेसे वाटते. याचे उत्तर- मिपावरील वातावरण तापावे व वरील लेख मिपाप्रशासनाने नष्ट करावा असा कपिल काळेचा दुहेरी हेतू आम्ही हाणून पाडला त्याने लेखावर प्रतिक्रीया न देता मुद्दामहून लालगढला मध्ये आणले आणी सभासदांची दिशाभूल केली. मिपा प्रशासनच त्याबाबत त्याला योग्य ते शासन घडवेल अशी आपण आशा बाळगुया.
असा दुहेरी हेतू आमचा नसून, आदिवासींना प्रगती पासून वंचित ठेवणे आणि ते बंड करुन उठले की थयथयाट करणे असा तो खराखुरा दुहेरी हेतू आहे.
त्यामुळे लालगढचा उल्लेख , ह्या लेखाच्या अनुषंगाने केल्यावर विकी तुझी फार पंचाइत झाली.
आपलाच मुद्दा योग्य हा टिपिकल कम्युनिस्टी हेकेख्रोरपणा आहे, दुसरे काय?
जो पर्यंत माणसात खुनशी वृत्ती ,लालसा,कपटी मनोवृती शिल्लक आहे तो पर्यंत हे बदलणार तरी कसे व गुन्हे घडतच जाणार.
खर आहे! पण तीव्रता कमी करता येईल. बरेचसे गुन्हे हे न्याय मिळवण्यासाठी होतात. न्या चपळगावकरांचे कायदा आणि माणुस हे पुस्तक (पुर्वीची सकाळमधील लेखमाला) उत्तम आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
चांगला आढावा आहे. "जो पर्यंत माणसात खुनशी वृत्ती ,लालसा,कपटी मनोवृती शिल्लक आहे तो पर्यंत हे बदलणार तरी कसे व गुन्हे घडतच जाणार." हे वाक्य चांगले आणि पटणारे आहे.
विकीराव असेच लिहते रहा. लेख चांगला आहे.
"जो पर्यंत माणसात खुनशी वृत्ती ,लालसा,कपटी मनोवृती शिल्लक आहे तो पर्यंत हे बदलणार तरी कसे व गुन्हे घडतच जाणार."
प्रो-अॅक्टीव्ह / प्री-एम्प्टीव्ह / दोन पावले पुढे रहाणे ह्या गोष्टी महत्वाच्या होत आहेत. गाफील राहून चालत/चालणार नाही.
बाकी तेवढ लालघर, बंगाल मधे काय घडले ते लिव्हा की राव.
बाकी तेवढ लालघर, बंगाल मधे काय घडले ते लिव्हा की राव.
नक्षलवाद सर्वत्र आहे. आज तो छत्तीसगढ, महाराष्ट्र, आंध्र मध्ये पण आहे. तिथे तर कम्युनिस्टांचे राज्य नाहीये ना?
आज जे लालगढ मध्ये घडलय ते महाराष्ट्रात पण घडु शकत होतेच
ना. गेल्या महिन्यात महाराष्ट्रात १६ पोलिस शहीद झाले ते येव्हढ्यात विसरलात का? उगाच बंगाली राज्यकर्त्यांना का बोल लावता?
^^^^
किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल हे रान
कुणी लावला बंगाली राज्य्कर्त्यांना बोल?
पण मेथांब्या ह्यांनी ही कविता आठवून दिली. साने गुरुजींची हे कविता आम्ही १५ ऑगस्टला म्हणत होतो शाळेत असताना.
आता उठवू सारे रान
आता पेटवू सारे रान
किसान मजूर उठतील
कंबर लढण्या कसतील
एकजूटीची मशाल घेउन पेटवतील हे रान
स्वातंत्र्याचे रान.
कोण आम्हां अडवील
कोण आम्हा रडवील
अडवणूक करणारयांची उडवू दाणादाण
उडवू दाणादाण
खाउ न आता लाठ्या
खाउ न आता काठ्या
शेतकरी कामकरी
मांडणार हो ठाण, मांडणार हो ठाण
अशी थोडीफार आठवते. पूर्ण कोणाकडे असल्यास द्यावी.
१५ ऑगस्टल- भर पावसात ही कविता म्हणताना रान कसं काय पेटणार असा प्रश्न पडायचा.
यांना विनंती आहे की कृपया लेखावर प्रतिसाद लिहा. उगाच लालगढला मध्ये आणू नका. सभासदांची दिशाभूल करू नका.
मिपा प्रशासनाला विनंती आहे की कपिल काळे सारख्या व्यक्तिची त्वरीत दखल घ्यावी. माझ्या मते मिपावरील वातावरण तापावे असाच कपिल काळे चा हेतू दिसत आहे.
जो पर्यंत माणसात खुनशी वृत्ती ,लालसा,कपटी मनोवृती शिल्लक आहे तो पर्यंत हे बदलणार तरी कसे व गुन्हे घडतच जाणार.
असहमत्.असे असते तर टोळी युध्धे सगळ्या देशात असली पाहिजेत.पण तसे नाही. सरकारी यंत्रणा जिकडे जास्त किडलेली असते,प्रशासन्,पोलिस प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचारी असतात अश्या ठिकाणी टोळी युध्धे जास्त पहावयास मिळतात.काही वर्षापुर्वी एका मुंबईच्या माजी पोलिस अधिकार्याने म्हंटले होते की मनात आले तर सरकार आणि पोलिस चोविस तासात सगळे टोळीयुध्ध संपुष्टात आणू शकतात पण तसे न करणे त्यांच्या व्यक्तिगत फायद्याचे आहे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
अश्या प्रकारची मनोव्रुत्ती जगभर सगळीकडेच असते.अगदी पुढारलेल्या देशातही. सरकारी यंत्रणा,पोलिस्,प्रशासन ह्यानी असल्या व्रुत्तीना जाती-धर्म्,पैसा ह्यांचा विचार न करता आटोक्यात आणायचे असते.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
आम्ही पण तुमचा लेख वाचलाच आहे की. आम्हा वाचकांचे पण आभार मानायला हवे होते.त्याबद्दल आपला सर्व वाचकांकडुन जाहिर निषेध.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
प्रतिक्रिया
अरेरे
अहो मास्तर
सर्व माणसे
वा! मस्त
ह्म्म्म्म
अवलियांनी
सहमत
आवडला
तिरशिंगराव
असा दुहेरी
खर आहे
चांगला आढावा...
आधुनिकीकरण
पण
त्या बद्दल पण येउ द्या की
कुणी लावला
कपिल काळे
अरेरे !! च्च
चांगला लेख
भेन्डी बाजार
मानवी मनोव्रुत्ती
सर्वांचे आभार
अस का?
आता तुम्ही
हम्म...