१. संगीतकार इंदिवर उमेदवारीच्या काळात एका स्टुडिओ मधुन घरी चालले होते. घरी जाण्यासाठी अर्थातच स्वःताची गाडी वगैरे नव्हती. बस मध्ये बसले आणि त्यांना नेमकी अशी जागा मिळाली की जी उलट्या दिशेने (ड्रायव्हरच्या मागे) असते. थोड्या वेळाने समोरच एक अतिशय सुंदर तरुणी येऊन बसली. तिला पहाताक्षणी इंदिवर यांना एक कविता सुचली ज्याचे नंतर गाणे झाले. ते गाणे आहे "पास बैठो तबियत बहल जायेगी, मौत भी ऑ गयी है तो टल जाएगी..". चित्रीत केलं आहे जगदीप आणि अमितावर.
गीतकार :इंदिवर
गायक :मोहम्मद रफी
संगीतकार :सी. अर्जुन
चित्रपट :पुनर्मिलन - १९६४
२. गीतकार शैलेन्द्र बर्याचदा गायक हेमंतकुमार यांच्याकडे गप्पा मारायला जात. हेमंतकुमारांना सात मेव्हण्या होत्या आणि त्या हेमंतकुमारांबरोबरच रहात, त्यामुळे त्यांना सगळे 'सालीवाहन' म्हणत. संध्याकाळी हेमंतकुमार पत्नी, मुलं आणि या सात मेव्हण्यांबरोबर बंगल्याच्या गच्चीवर गप्पा मारत बसायचे. एकदा संध्याकाळी हेमंतदा असेच बसले होते आणि शैलेन्द्र तिथे गेलेते. जाताना शैलेन्द्रांनी बरीच ढोसली होती. गाडीतून उतरताना शैलेन्द्रचा तोल गेला आणि हेमंतदांच्या सगळ्या मेव्हण्या हसायला लागल्या. ते बघुन शैलेन्द्रना एक गाणे सुचले. ते त्यांनी तसेच लिहून काढले. ते गाणे होते, "जंगलमे मोर नाचा किसने ना देखा, हम जो थोडीसी पिके जरा झुमे हाय रे सबने देखा.."
गाणं चित्रीत केलं आहे बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर यांच्यावर, चित्रपट आहे मधुमती (१९५४) आणि गायक आहे मोहम्मद रफी...
३. हसरत जयपुरी, राजकपूर हे लंडनला गेले होते. एका कॅब्रे बार मध्ये बसून मदिराप्राशन करत असताना एक मदनिका अंगावर चांदण्यांसारखा चमचमणारा ड्रेस घालून समोर नाचत आली. राजकपूरने जयपुरींना विचारले, "काय काही काव्य सुचते का हिला बघून?". त्याक्षणी हसरत जयपुरींनी सिगारेटचा कागदी बॉक्स फाडला आणि त्याच्यावर एक कविता लिहीली: "बदन पें सितारे लपेटे हुए, न जाने तमन्ना किधर जा रही हो। जरा पास आओ तो चैन आ जाये".. नंतर हे गाणं प्रिन्स (१९६९) या चित्रपटासाठी मोहम्मद रफींनी गायलं आणि शम्मीकपूरवर चित्रीत करण्यात आलं. संगीतकार होते शंकर-जयकिशन.
असे बरेच किस्से आहेत. नंतर सवड मिळाली की आणखी लिहीन...
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
फक्त एक सुधारणा:
'न जाने तमन्ना किधर जा रही हो' असं नसुन 'ओ जान-ए-तमन्ना किधर जा रही हो' असावं असं वाटतं...चु.भु.दे.घे.
विकासरावांचे किस्से पण सही आहेत.
वा छान! विकासपेक्षा नाटक्याचे किस्से जास्त आवडले.
विकासचे किस्सेही बरे आहेत पण ते काहीसे घिसेपिटे बर्याचदा ऐकलेले आहेत त्यामानाने नाटक्याचे किस्से एकदम फ्रेश वाटले.
सगळेच किस्से मस्त.
मी डोलकर दर्याचा राजा बद्दल ऐकलेला किस्सा. कोणी सांगितला आठ्वत नाही, खरा आहे की खोटा ते ही माहीती नाही. जाणकरांनी प्रकाश टाकावा.
किस्सा असा..
शांताबाई शेळक्यांनी "मी डोलकर दर्याचा राजा " गाणं लिहिलं. पं. हृदयनाथ मंगेशकर त्याला चाल लावत असताना, "मी डोलकर ,डोलकर, डोलकर.. दर्याचा राजा" ही ओळ कोणत्याही चालीत नीट बांधता येईना. त्यांनी शांताबाईंना ही ओळ बदलण्याची विनंती केली. पण शांताबाईंनी "अरे हृदयनाथ, इतका मोठा तू पंडीत्..इतक्या अवघड गाण्यांना चाली लावल्यास आणि डोलकर डोलकर.. या साध्या दोन शब्दांना तुला चाल लावता येत नाही??? ते काही नाही, मी त्या ओळी बदलणार नाही..." अशी कान उघडणीच केली जणू. हृदयनाथांपुढे चाल लावली... आणि डोलकर दर्याचा राजा गाणं अजरामर झालं आणि मराठी माणसाला त्या गाण्यानं वेड लावलं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
एकदा ग. दि. मा. , पु. भा. भावे व इतर गप्पा मारीत बसले होते. पु. भा. भावे माडगुळकरांना म्हणाले "अण्णा तुमची इतकी गाणी ऐकली, कविता वाचल्या पण त्यात कुठे ळ हे अक्षर मला दिसले नाही". ताबडतोब अण्णांनी कागद मागविला व गाणे तयार झाले: "घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा"; कागद दुसर्या अण्णांकडे देऊन म्हणाले "मोजा यात किती ळ आहेत ते."
नितीन
अवांतरः आणखी जन्मकथा ऐकायच्या असतील तर सध्या झी मराठीवरील सा रे ग म प मधील किस्से ऐका.
किस्से आवडले.
ते पहाटेच्या प्रहरी पुण्यनगरीत शिवाजीनगरच्या वगैरे भागात फिरायला म्हणून निघाले आणि त्यांनी नगरपालीकेचे रस्त्यावरील दिवे विझताना पाहीले आणि त्यांना एकदम "विझले रत्नदीप नगरात, आता जागे व्हा यदुनाथ" हे गाणे सुचले!
पुलं बरोबर पहाटे फिरायला गेले असता असे पुलंच्या गदिमा साइट वर उपलब्ध असलेल्या भाषणातून समजते.
स्वाती
आम्रपाली या चित्रपटातील 'जाओ रे जोगी तुम जाओ रे' या गाण्याचा मुखडा लतादीदींनी गीतकार शैलेन्द्र यांना सुचवला होता, आणि अंतरे शैलेन्द्र यांनी लिहिले होते, असा किस्सा या गाण्याच्या संदर्भात ऐकला होता. बरेचदा विविधभारतीवर देखिल काही कार्यक्रमांमध्ये असे किस्से ऐकायला मिळतात. अलिकडे 'उजाले उनकी यादों के' हा दर रविवारी लागणारा कार्य्क्रम अशा माहितीचे भांडार आहे.
वरचे सगळेच किस्से मस्त आहेत.
क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com
पंचमदा चाली बसवत होते 'चुरा लिया हैं तुमने जो दिल को' ह्या गाण्यासाठी काही केल्या समर्पक सुरुवात सुचेना. असेच एकदा जेवायला बसताना ग्लासवर ग्लास आपटून विशिष्ठ किणकिणाट झाला, पंचमदांनी पुन्हा आवाज काढून बघितला आणि एकदम चाल सुचली. गाण्यात सुद्धा सुरुवातीला ग्लासांची किणकिण दाखवली आहे! :)
चतुरंग
प्रतिक्रिया
आणखी काही...
मस्त किस्से
वा छान!
बदन पे सितारें किस्सा
मस्त
किस्से
सहमत आहे.
सर्वच
जन्मकथा
सुंदर चर्चा!
वाह ! मस्तच
किस्से
आम्रपाली
हा
किस्से आवडले
यादों की बारात सिनेमासाठी
मस्त लेख. वाचनखूण म्हणून
किस्से आवडले, वाचताना शिरिष