मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इजराईल इराण युद्ध : स्वतंत्र धागा

विवेकपटाईत · · काथ्याकूट
इजराईल आणि इराण यांच्यातील युद्ध दीर्घकाळ चालणार आहे. युद्ध आणि त्याचे परिणाम याबाबत सर्व प्रतिक्रिया एकाच ठिकाणी याव्यात म्हणून हा स्वतंत्र धागा. इराण हा कट्टर इस्लामी देश आहे. इस्लामी जगाचे नेतृत्व मिळवण्यासाठी इजराईलचा संपूर्ण नाश करण्याची त्याची मंशा आहे. काश्मीर प्रश्नावर इराणने नेहमी पाकिस्तानचे समर्थन केले असले तरी व्यापक आर्थिक हितासाठी भारताशी संबंध दृढ केले आहेत. भारताचा मध्य आशियाशी होणारा व्यापार प्रामुख्याने इराणमार्गे होतो. इजराईलने नेहमीच भारताला मदत केली आहे. कारगिल युद्ध जिंकण्यात इजराईलची मदत झाली होती. विविध क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, युद्धास्त्रे इत्यादी भारताला इजराईलकडून मिळतात. नुकतेच इजराईलने पंतप्रधान मोदींना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मानही दिला आहे. या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसणार आहे. पेट्रोलच्या किंमती वाढल्याने जगभरात महागाई वाढेल. इराणमध्ये सत्ता परिवर्तन न होता युद्ध थांबले तर खाडी देशांत अमेरिकेची प्रतिष्ठा कमी होईल. सुरक्षेसाठी खाडी देश चीन किंवा रशियाकडे पाहू शकतात. इराण अणुबॉम्ब निश्चितपणे तयार करेल आणि त्याचा उपयोगही करेल. पुढील २० वर्षांत इजराईलचे अस्तित्व नामशेष होऊ शकते. त्यामुळे हे युद्ध अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनले आहे.

वाचने 13236 वाचनखूण प्रतिक्रिया 182

ईराण अजुन तरी अमेरिकन सैन्य तळांवर किवा तेल प्रकल्पावर हल्ले करत आहे. पण अमेरिका/ईस्त्रएल मात्र ईराणच्या शाळा/घरांवर हल्ले करताहेत. एका शाळेवरील हल्यात १६० का कायतरी मुली मारल्या गेल्या. शाळॅच्या आवारातच त्यांना पुरण्यासाठी खड्डे खणलेत. त्यामुळे कोणाला टेररीस्ट म्हणावे? असा प्रश्न पडलाय. अमेरिकेला कायमच जगाच्या तेलावर हक्क सांगायचा असतो. आतापावेतो हे वेळोवेळी दिसुन आलेय. ईराक असो, सिरिया , व्हेनेझुएला किवा आता ईराण. त्यामुळे नॅरेटिव्ह काहीही असो, मूळ मुद्दा तेलच आहे. दुसरे म्हणजे लॉकहीड मार्टीन सारख्या शस्त्र उत्पादक कंपन्यांच्या फंडींगवर अमेरिकी सरकार चालत असल्याने (किवा त्या लॉबीमुळे म्हणा) जगात कुठे न कुठे युद्ध चालु राहणे अमेरिकेला हवे असते. नाहीतर धंदा कसा होणार? तिसरे म्हणजे दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिकेने मध्य आशियात ईस्त्राएल निर्माण करुन अरब राष्ट्र्रांना कायमची डोकेदुखी करुन ठेवली आहे. आणि त्यांचा ईस्त्राएल ला कायमच पाठिंबा असतो. आताही ईस्त्राएल चा लाँच पॅड म्हणुन वापर होत आहे. चौथा मुद्दा- हळूहळू २ न्ही बाजु अक्रमक होत आहेत. ईराणने सौदी अराम्कोवर हल्ला करुन तेल उत्पादन बंद पाडलेय आणि होर्मुझ खाडी बंद केली आहे. अमेरिकेत एरिआ ५२ प्रदेशात भुकंप सद्रुश धक्के बसलेत आणि अणू चाचणी झाल्याचा संशय आहे. ईराण शियाबहुल असल्याने अजुन तरी कोणीही मुस्लिम देश त्यांच्या बाजुने बोलत नाहीये का? माहीत नाही. पण अमेरिकेच्या भ्याड हल्ल्याने खामेनी हुतात्मा बनला त्याचे सॉफ्ट बेनिफिट ईराण उचलणार असे वाटतेय. अजुन काय काय होणार माहीत नाही.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

साहना Wed, 03/04/2026 - 02:17
सामान्य जनतेला आणि विशेषतः लहान मुलांना आणि संपूर्ण कुटुंबाला टार्गेट करणे हे इस्राएल चे खूप जुने धोरण आहे. त्यामुळे ह्यांत आश्चर्य काहीच नाही.

ह्या युद्धच्या काही दिवस आगोदर इराण मध्ये खेमेणी आणि हिजाबच्या विरोधात मोठं आंदोलन झालं होत. त्यात पाच ते तीस हजार इराणी नागरिक मेल्याच्या बातम्या आहेत. तर आत्ताही खेमेणी मेल्या नंतर नागरिकांनी जल्लोष केल्याच्या रील्स फिरत आहेत. युद्धनंतर खेमेणी समर्थक आणि विरोधक यांच्यात संघर्ष होऊन यादवी माजाण्याची शक्यता आहे.

खामेनी धुतल्या तांदळासारखा होता असे म्हणायचे नाहीये, पण तसा तर ट्र्म्प किवा नेतन्याहु पण नाहीयेत. मात्र खामेनीला असा मारल्याने आणि तो शियांचा धर्मगुरु असल्याने त्याला अचानक जगभरच्या शियांकडुन सहानुभुती मिळाली. शियांचे स्लीपर सेल्स जागे झाल्यास लोन वुल्फ सारखे हल्ले होण्याची शक्यता आहे का? म्हणजे कमी श्रमात जास्त नुकसान? या युद्धात गायडेड मिसाईल सोबतच ड्रोनचाही लक्षणीय वापर होतोय हे ही एक निरीक्षण. काहीही असो आणि कोणही जिंको किवा हरो , तेल आणि गॅस महागणार आणि भारतीय जनतेचे कंबरडे मोडणार असे दिसत आहे. मध्यपूर्वेची निर्यातही ठप्प झाली आहे त्यामुळे होणारे नुकसान वेगळेच. अजुनतरी रशिया आणि चीनने प्रतिक्रिया देणे सोडल्यास फार काही केलेले नाही. कदाचित पाठीमागे ईराण ला मदत करत असतील. ते थेट युद्धात आले तर मात्र भयंकर परीस्थिती ओढवेल.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अजुनतरी रशिया आणि चीनने प्रतिक्रिया देणे सोडल्यास फार काही केलेले नाही. कदाचित पाठीमागे ईराण ला मदत करत असतील. ते थेट युद्धात आले तर मात्र भयंकर परीस्थिती ओढवेल.
रशिया आणि/किंवा चीन युध्दात पडल्यास ते तिसरे महायुध्दच होईल. त्यासाठी दोन्ही बाजूंची तयारी असेल असे वाटत नाही. कालपरवा तात्यांनी म्हटले की गरज पडल्यास अमेरिका इराणमध्ये सैनिक उतरवेल. कदाचित रशिया त्याची वाट बघत असावे. अमेरिकेचे अफगाणिस्तान आणि इराकमध्ये तोंड पोळलेले असताना त्या उपर इराणमध्येही सैनिक उतरवण्याचा विचार असेल तर ते धक्कादायक असेल. तसे खरोखरच झाल्यास अमेरिकाविरोधी तत्वांना सर्व प्रकारची मदत रशियाकडून होईल आणि ४० वर्षांपूर्वी अफगाणिस्तानात झालेल्या मानहानीचा प्रतिशोध घेण्यासाठी रशिया प्रयत्न करेल असे वाटते. तसे व्हावे असे फार वाटते. एकदा त्या अमेरिकेची जोरदार जिरावी असे फार वाटते. जिथे जातील तिथे नाक खुपसून सगळीकडे घाण करून ठेवली आहे अमेरिकनांनी. त्यांची दादागिरी करायची क्षमता कमी व्हावी असे फार वाटते.

अमेरिका जिथे जिथे नाक खुपसायला जाते तिथेतिथे घाण होते. खुद्द इराणमध्ये तसे पूर्वी झाले होते. १९५१-५२ मध्ये मोहंमद मोसादेघ यांच्या सरकारचे ब्रिटिश पेट्रोलिअम कंपनीबरोबर इराणमधील तेलविहिरींमधून बाहेर काढल्या जाणार्‍या तेलाबद्दल सरकारला किती रॉयल्टी द्यावी यावरून वाजले. त्यानंतर मोसादेघ यांनी ब्रिटिश पेट्रोलिअमला इराणमधून हाकलून दिले. त्यानंतर ब्रिटिश-अमेरिकनांनी मोसादेघांना सत्तेवरून खाली खेचायचा चंग बांधला. मग मोसादेघ हे कम्युनिस्ट आहेत असा प्रचार सुरू झाला. वास्तविकपणे इराणमध्ये कम्युनिस्टांचा दुसरा गट होता. मोसादेघ कम्युनिस्ट नव्हते. पण आपण सांगू तसे न करणार्‍या राज्यकर्त्यांना कम्युनिस्ट हे लेबल लावणे अमेरिकनांना सोयीचे होते. मग भारतात शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने 'मॅन्युफॅक्चर्ड विरोध' निर्माण केला गेला आणि त्याला परदेशातून फंडिंग आले तसेच त्यावेळेस इराणमध्ये केले गेले. दुर्दैवाने त्याला यश आले आणि मोसादेघ यांचे सरकार बदलून अमेरिकेला अनुकूल राजा पेहलवींकडे सत्ता दिली गेली. असे दिसते की इराणमधील विविध गटांमध्ये मोसादेघ हे एक बॅलन्सिंग घटक होते. तेच सत्तेतून गेल्यावर आणि अमेरिकेचा उघड हस्तक्षेप झाल्यानंतर हळूहळू कट्टर इस्लामी शक्तींना हातपाय पसरायला संधी मिळाली. त्यातून अयातुल्ला खोमेनी हा क्रूरकर्मा सत्तेत आला. त्यातून कोणाचे भले झाले? इराणमध्ये ब्रिटिश पेट्रोलिअमचे रॉयल्टीच्या प्रश्नावरून सरकारशी फाटले तसेच साधारण त्याच काळात ग्वातेमालामध्ये अमेरिकन फ्रूट कंपनीचे केळीच्या बागांच्या प्रश्नावरून फाटले. तिथेही 'रेजिम चेंज' करण्यात आला. इराक-लिबियामध्येही सद्दाम आणि गद्दाफी यांना सत्तेतून घालविले, सिरीयात असाद रशियाच्या मदतीमुळे बराच काळ- अगदी मागच्या वर्षीपर्यंत सत्तेत राहिले होते पण तिथे पण अमेरिकेने घाण केली होतीच. सगळीकडे आताचे सत्ताधारी घालविले तरी त्यापुढे काय करायचे याचा काहीही विचार केला गेला होता असे वाटत नाही. त्यातूनच मग आयसिसला हातपाय पसरायची संधी मिळाली. त्यातूनही नक्की कोणाचे भले झाले? ग्वातेमालात रेजिम चेंज केला आणि त्यानंतर अनेक वर्षे ग्वातेमाला हा देश अस्थिर होता. आताही इराणचे सरकार अमेरिका आणि इस्राएलच्या संयुक्त सामर्थ्यापुढे फार काळ टिकेल असे वाटत नाही. फक्त प्रश्न आहे की पुढे काय होणार? इराणमध्ये आधी खोमेनी आणि मग खामेनी यांनी बंदुकीच्या धाकावर आपली सत्ता चालवली. पण त्यांना सुध्दा भरपूर अंतर्गत विरोध होता/आहे. त्यातही सगळे विरोधी लोक एकाच कळपातले आहेत असेही वाटत नाही. त्यातून ही सत्ता आता गेल्यावर नंतर वेगवेगळे गट एकमेकांशी भांडून इराण हा दुसरा अफगाणिस्तान नाही झाला म्हणजे मिळवली. जिथे जाऊ तिथे घाण घालायची अमेरिकेची जुनी सवय आहे ते पाहता इराणमध्येही काही फार वेगळे होईल असे वाटत नाही. त्यातून सगळ्या मध्यपूर्वेला धोका उद्भवतो. दुसरे म्हणजे अलीकडच्या काळात इराणमध्ये खामेनीविरोधात आवाज उठत होताच. मध्यंतरी इराणी स्त्रियांनी त्यांच्याविरोधात आंदोलन केले होते. इराणमध्ये मूळच्या पर्शिअन संस्कृतीकडे परत जाऊ आणि इस्लामचा प्रभाव कमी करू अशा प्रकारच्याही चळवळी हळूहळू पुढे येत होत्या. अशा तत्वांना पाठबळ देऊनही खामेनींची राजवट खाली खेचता आली नसती का? त्यातून इराणमध्ये सौम्य तत्वे सत्तेत यायला मदत झाली नसती का? आता धोका असा आहे की समजा खामेनी तिथल्या लोकांना आवडत नसतील पण अमेरिकेने बाहेरून येऊन त्यांना असे ठार मारल्याने निदान काही घटक तरी अमेरिका विरोधी झाले असतील. अशा घटकांना समजा योग्य नेतृत्व नसेल तर ते परत कट्टरपंथीयांच्याच कळपात जातील ही भिती आहे. अफगाणिस्तानात झाले त्याप्रमाणे पहिली काही वर्षे सगळे काही आलबेल झाले असे वाटेल पण आतून कट्टरपंथी बलिष्ठ होत गेले आणि परत नव्या जोमाने परत आले तर आणखी मोठी डोकेदुखी निर्माण होईल. भारताचे आणि इराणचे व्यापारीक संबंध नक्कीच चांगले होते. पण राजकीय संबंधांविषयी तसे म्हणता येणार नाही. मार्च १९९४ मध्ये पाकिस्तानला यु.एन मानवाधिकार आयोगात भारताविरोधात काश्मीर प्रश्नावर ठराव आणायचा होता. त्यावेळेस भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व अटलबिहारी वाजपेयींनी केले होते. त्यावेळेस आयत्या वेळेला इराणने पाकिस्तानला समर्थन द्यायचे नाकारले. पाकिस्तानने शेवटी तो ठराव मतदानाला मांडलाच नाही त्यामागे इराण हे एक मोठे कारण होते. तो एक अपवाद वगळला तर इराणने भारत-पाकिस्तान प्रश्नावर कधीही भारताच्या बाजूने भूमिका घेतलेली नाही. तेव्हा खामेनी या धर्मांध म्हातार्‍याला हाकलले आणि मारले म्हणून आपल्याला फार वाईट वाटायची गरज नसावी. त्यातूनही जे काही नवे सरकार इराणमध्ये येईल त्यांच्याशी संधान बांधून पाकिस्तानला अफगाणिस्तान सीमेवर कटकट निर्माण झाली आहे तशी इराण सीमेवरही निर्माण झाली तर अती उत्तम. अर्थात त्यात बलुच हा अ‍ॅंगल कटकटा आहे कारण बलुच लोक पाकिस्तानात आहेत तसेच इराणमध्येही आहेत. त्यामुळे आपण बलुच लोकांना आतून सगळी मदत करत असलो तरी उघडपणे त्यांच्याशी डील करणे टाळले आहे- जसे पाकिस्तानचे शासक उघडपणे काश्मीरातील फुटिरतावादी हुर्रियत कॉन्फरन्स वगैरेंना भेटायचे त्याप्रमाणे भारताचा कोणीही उच्चपदस्थ बलुच नेत्यांना उघडपणे भेटलेला नाही. त्याचे कारण त्यातून इराणमधील बलुचींनाही उचल मिळाली तर ती डोकेदुखी इराणलाही होईल आणि मग त्यातून आपले व्यापारी संबंध बिघडू शकतील. यातून आपण कसा मार्ग काढणार ते बघायचे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

खामेनी या धर्मांध म्हातार्‍याला अशा पध्दतीने मारल्याने पूर्वी त्याच्या विरोधात असलेली तत्वे अमेरिकेच्या विरोधात जातील आणि त्यातून आणखी गुंतागुंत वाढेल ही भिती वाटते. अमेरिकेने वापरा आणि फेकून द्या या नितीमुळे जगात विविध ठिकाणी शत्रू निर्माण करून ठेवले आहेत. अमेरिकेने ग्वातेमालात घाण घातली हे वर लिहिलेच आहे. त्याप्रमाणे दक्षिण अमेरिका खंडात इतर अनेक देशांमध्येही घाण घातली. त्यातून मग वेगवेगळ्या देशांमध्ये अमेरिका विरोधी अर्थात बर्‍याच अंशी रशियाच्या बाजूची सरकारे सत्तेत आली. तसेच निकाराग्वामध्ये झाले. मग त्या सरकारविरोधात लढणार्‍या 'कॉन्ट्रा' बंडखोरांना रॉनाल्ड रेगन प्रशासनाला मदत करायची होती. पण त्यात एक अडचण होती- अमेरिकन संसदेने कॉन्ट्रा बंडखोरांना कोणतीही मदत द्यायला रेगन प्रशासनाला बंदी केली होती. ही गोष्ट होती १९८५-८६ ची. १९७९ मध्ये खोमेनी सत्तेत आल्यानंतर इराणला काळ्या यादीत टाकून इराणशीही काही घेणेदेणे ठेवायचे नाही हा पण दंडक ठरलेलाच होता. मग काय करा?तर रॉनाल्ड रेगननी एक शक्कल लढवली. तर इस्राएलला मदत म्हणून दिलेली शस्त्रे होती इराणसाठी दिलेली. अमेरिकेकेडून मिळालेली ती शस्त्रे इस्राएलने आपला शत्रू इराणला दिली आणि त्याबद्दल मिळालेले पैसे निकाराग्वातील कॉन्ट्रा बंडखोरांना दिले गेले. म्हणजे निकाराग्वामधील कॉन्ट्रा बंडखोर आणि इराण या दोघांशीही काही घेणेदेणे ठेवायचे नाही या अमेरिकन संसदेच्या दंडकाला असे बायपास केले गेले. ही टाईमलाईन होती १९८५-८६ मधील म्हणजे इराक-इराण युध्द चालू असताना. काही काळ अमेरिका एकाच वेळेस इराक आणि इराण या दोन्ही देशांना शस्त्रे पुरवत होती. असे केल्यावर सगळीकडे शत्रू निर्माण होणार नाहीत का आणि सगळीकडे घाण होणार नाही का? इराणमध्ये परत असलाच काहीतरी गेम खेळला जात असेल तर तात्कालिक फायदा पण दीर्घकालीन तोटा असे व्हायला नको.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

साहना Wed, 03/04/2026 - 09:05
अमेरिकेचे सैन्य धोरण नेहमीच थोडे खाया पिया कुछ नाही ग्लास तोडा बारा आणा ह्या धाटणीचे राहिले आहे. पण मर्कटस्य सुरापानं न्यायाने ट्रम्प सरकारची आत्ममुग्धता, सभोवताली एकत्रित केले चाटुकार पण अकार्यक्षम लोक, एपिस्टिन संचिका आणि त्यातून बहुतांशी होणारे भयोपादान (ब्लॅकमेल) ह्यांच्या मिश्रणाने सध्या अमेरिकन सैन्य धोरण आणि परराष्ट्र धोरण एके वेगळ्याच दिशेने भरकटत गेलेले आहे. सध्या ट्रम्प ऍडमिन मध्ये जे लोक कॆमेरावर दिसतात ते सर्व उत्सव मूर्ती असून प्रत्यक्ष निर्णय हे बीबी आणि ट्रम्प ह्यांचे खास "स्टीफन मिलर" सर्व निर्णय घेत आहेत. जुनी निर्णय प्रक्रिया ज्यांत सर्व सरकारी निर्णय भेटी ह्या ठराविक कार्यक्रमानुसार होत, त्यांत अनुभवी लोकांचा समावेश असे, त्यानंतर प्रत्येक भेटीचे "minutes" (सार) हे प्रकाशित होत असे आणि इतर लोकांना उपलब्ध होते असे. ते सर्व जाऊन त्या जागी DoJ, DoS ह्यांचे निर्णय स्टीफन मिलर हे तोंडी बैठक घेऊन करतात. ह्या निर्णयाचा काहीही पेपर ट्रेल ठेवला जात नाही. इस्राएल ने गाझा मध्ये अत्यंत अमानुषता दाखवली आहे किमान ५०,००० लहान मुले ठार किंवा गंभीर जखमी झाली आहेत. जे भाग आणि ज्यांचा काहीही संबंध युद्धाशी नव्हता त्यांची घरे आणि सर्वस्व नष्ट केले आहे. सार्वजनिक रित्या अनेक देशांनी ह्यावर मौन पाळले असले तरी खाजगीत बराच असंतोष आहे. इंग्लंड पासून, सौदी पर्यंत आणि चीन पासून नॉर्वे पर्यंत इस्राएल ची अमानुषता सर्वांना ठाऊक झाली आहे. पण त्याच वेळी इस्रायली हस्तकांनी अमेरिकन सरकारच्या सर्व स्तरांत घुसखोरी करून आपले बस्तान सुद्धा बनवले आहे हे सुद्धा सर्वश्रुत आहे. इस्राएल विरोध सगळीकडे वाढत आहे. कधी नाही ते अमेरिकन पंडित इस्राएल च्या विरोधांत थेट बोलत आहेत. MGT, थॉमस मेसी सारखे रिपब्लिकन थेट इस्राएल वर टीका करत आहेत. हे सर्व काही वर्षे मागे होत नव्हते. टकर कार्लसन, निक फुयेन्ट्स हि मंडळी तर १००% इस्राएल विरोधी बनली आहेत. एकूणच इस्राएल साठी अमेरिकन मुलांनी आपला जीव धोक्यांत घालावा, अब्जावधी डॉलर्स व्यर्थ करावेत, राष्ट्रीय व्यापार मोडकळीस आणावा, तेलाच्या किमती गगनाला भिडाव्यात, सर्व अमेरिकन मित्रांच्या मनात अमेरिकेविषयी साशंकता निर्माण व्हावी ह्याला अमेरिकेत कुठल्याच राजकीय भागांत जास्त सपोर्ट असलेला दिसत नाही त्यामुळे ट्रम्प साहेबांसाठी येणारे मध्य निवडणुका सुपडा साफ करणारे असतील. ट्रम्प ह्यांना विशेष फरक पडत नाही, तरी सुद्धा मला वाटते ट्रम्प चे चाटुकार हे स्वतःची सत्ता ठेवण्यासाठी मध्य निवडणुका कॅन्सल करण्याचा प्रयत्न करतील. एकूणच हे पराभव नाम संवत्सर खरोखर पराभवाचे असणार आहे !

In reply to by साहना

मर्कटस्य सुरापानं न्यायाने ट्रम्प सरकारची आत्ममुग्धता, सभोवताली एकत्रित केले चाटुकार पण अकार्यक्षम लोक, एपिस्टिन संचिका आणि त्यातून बहुतांशी होणारे भयोपादान (ब्लॅकमेल) ह्यांच्या मिश्रणाने सध्या अमेरिकन सैन्य धोरण आणि परराष्ट्र धोरण एके वेगळ्याच दिशेने भरकटत गेलेले आहे.
सध्या जगभर प्रमुख देशांच्या नेतृत्वामधे 'आत्ममुग्धतेचा' आजार पसरत चाललेला दिसत आहे. काहीही झालं तरी, पालख्या उचलणा-यांचा वाढता फाफटपसारा हे तर, त्यांचं तर खास गुणवैशिष्ट्य आहे. चाटूकार हे या जगताचं विशेष आहे. आपण या सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहोत 'गंभीर चिंताअ' व्यक्त केली आहे. बाय द वे, ब्लॅकमेलसाठी भयोपदान शब्द आवडला. मराठी भाषेत भर घातल्याबद्दल आभार. मराठी भाषेच्या संवर्धनसाठी शब्द सातत्याने वापरण्यात येईल. धन्स. -दिलीप बिरुटे

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कॉमी Tue, 03/03/2026 - 21:02
रजा पहेलवी सुद्धा क्रूर शासकच होता. त्यानेही अनेक आंदोलकांना ठार केले होते. एकूण मोसादेघ सरकार पाडणे हे दुर्दैवी होते. ह्यावर फॉल ऑफ हेवन नामक पुस्तक आहे पण ते जास्तच पेहलवी धार्जिणे आहे. तरी वाचनीय आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

साहना Wed, 03/04/2026 - 09:18
> अशा तत्वांना पाठबळ देऊनही खामेनींची राजवट खाली खेचता आली नसती का? त्यातून इराणमध्ये सौम्य तत्वे सत्तेत यायला मदत झाली नसती का? प्रगत, शांत आणि समृद्ध इराण हा इस्राएल च्या हिताचा आहे कि नाही हा प्रश्न आहे. त्याचे उत्तर नाही असे आहे. मध्यपूर्वेंत तुर्की, इजिप्त आणि इराण हि तीनच राष्ट्रे लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी आहेत. त्यांत तुर्की आणि इराण ह्या दोन्ही देशांत अत्याधुनिक अस्त्रे निर्माण करण्याची शक्यता आहे. इराण मधील अभियंते, वैज्ञानिक अनेकदा विदेशांत जाऊन नाव कमावतात. समृद्धी आणि शांती आल्यास ह्या देशात जास्त प्रगती होईल आणि पेलेस्टिन लोकांची बाजू घेणारा एक प्रमुख देश म्हणून इराण पुढे येऊ शकतो. आपल्या आजूबाजूच्या देशांत अराजकता माजवून आपली व्याप्ती वाढवणे हे इस्राएल चे धोरण आहे. त्यांत इराण मध्ये अराजकता माजवणे हेच इस्राएल ला हवे आहे. इस्राएल ने फक्त खोमेनी ह्यांची हत्या नाही केली तर इतर प्रमुख नेते जे देशाला नेतृत्व देऊ शकत होते त्यांची सुद्धा हत्या केली आहे. अमेरिका सध्या कर्डीश लोकांना हत्यारे पुरवत आहे त्यातून फक्त गृहयुद्ध होणार आहे आणि इराण चा इराक होण्याची भीती आहे.

गामा पैलवान Tue, 03/03/2026 - 22:39
हे ट्रंप आणि नेतान्याहू यांचं खाजगी युद्ध आहे. ट्रंपने काँग्रेसची परवानगी न घेताच युद्ध सुरू केलं आहे. ट्रंपच्या गळ्याशी आलेल्या एपस्टीन धारिका आणि नेतान्याहू यांच्या गळ्याशी आलेला भ्रष्टाचार यांच्यावरनं लोकांचं लक्ष उडवण्यासाठी या दोघांनी इराणवर हल्ला केला आहे. आता लवकरंच रशिया-युक्रेन युद्ध थंड पडेल. इराण म्हणजे इराक नव्हे. इराक हा कृत्रिम रीत्या सीमा आखून निर्माण केला गेलेला देश आहे. इराणचं तसं नाही. हा प्राचीन काळापासून एकसंध संस्कृती असलेला देश आहे. अरबी मुस्लिमांनी फारसी साम्राज्याशी लढाया करून ते कोसळवलं. त्यातनं पुढे प्रथम सरदारांचं व कालांतराने हळूहळू जनतेचं पंथपरिवर्तन झालं. या काळांत ( इ.स. ६५० ते इ.स. १५वे शतक ) मध्यवर्ती इराणी सत्ता नव्हती. अनेक छोटीछोटी राज्ये नांदंत होती. त्यांना सफावींनी एकत्रित करून इराणी साम्राज्य पुनरपि उभारलं. त्यामुळे इराणमध्ये राजधानी ( म्हणजे मध्यवर्ती सत्तेचं स्थान ) सतत बदलंत आलेली आहे. इराकमध्ये अमेरिकेने काहीही लक्ष्य प्राप्त केलं नाही. इराणच्या बाबतीत त्याहून वेगळं काहीही होणार नाहीये. उलट अमेरिकेचं नुकसान जास्त होईल. छोट्याश्या व्हियेतनामात अमेरिकेस नामुष्कीने मोहीम सोडावी लागली होती. इथे आकाराने आणि लोकसंख्येने प्रचंड मोठा इराण आहे. बघूया किती दिवस उत्साह टिकतो ते. -गा.पै.

In reply to by श्रीगुरुजी

रविवारी रात्री पासून महाराष्ट्रातील दुबई, अरब अमिरातीत अडकलेल्यांची सुटका सरकार करीत आहे. महाराष्ट्रात ही जवाबदारी गिरीष महाजन यांच्याकडे दिलेली आहे, ट्वीट करा किंवा आपणास हवा असल्यास गिरीष महाजनांशी संपर्क करता येईल अशा साधन व्यक्तींकडून फोन क्रमांक मिळवून देईन. आवश्यकता असल्यास व्य.नी करा. काळजी घ्या. -दिलीप बिरुटे

In reply to by श्रीगुरुजी

का़ळजी घ्या. सुरक्षित राहा. तुम्ही लवकरात लवकर तिथून सुटून परत याल ही अपेक्षा आणि तशी सदिच्छा.

साहना Wed, 03/04/2026 - 02:14
इराणी नेतृत्व हे कट्टरवादी असले तरी इस्रायली नेतृत्व सुद्धा अत्यंत भ्रष्ट, अनैतिक आणि हिंसक आहे. इराण मध्ये यादवी माजवून आपल्या सीमा वाढवणे, गाझा पट्टीतील आपली अमानुष हिंसा लपवून जागी नजर इतर ठिकाणी वळवणे. अमेरिकन राजकारण्यांना ब्लॅकमेल करून आणखीन पैसे आणि हत्यारे उकळणे हे बीबी ह्यांचे कारस्थान आहे. इराणी युद्ध लवकर संपणार नाही. बहुसंख्य इराणी हे इस्लामी असले तरी आपल्या "दक्षिण आशियाई" इस्लामिक समाजाप्रमाणे धर्मांध नाहीत. त्यांचे स्वातंत्र्य महत्वाचे आहे पण बीबी आणि ट्रम्प हे इराणी उद्धारक नाहीत. इराण हे शिया राष्ट्र आहे., काश्मीर मध्ये शिया मुस्लिमांचे प्रमाण जास्त असल्याने नेहमीच त्यांनी काश्मिरी फुटीरता वादाला प्रोत्साहन दिले आहे. हे प्रोत्साहन खरोखरीचे होते कि फक्त दिखाव्याचे होते हे ठाऊक नाही. इराण मधील राज्यकर्ते बदलले आणि त्या ठिकाणी ट्रम्प हे सांगकामे आले तर त्याची काश्मीर विषयी जी भूमिका आहे त्याला आपोआप ट्रम्प चे सामर्थ्य सुद्धा मिळू शकते. इराण मध्ये यादवी माजली तर रशिया चीन आणि अमेरिका तिन्ही राष्ट्रें विविध बाजूनी तिथे हत्यारे ओततील. त्यातील काही पाकिस्तान मध्ये पोचतील किंवा अमेरिका पाकिस्तान मधील बेस मधून त्यांचा पुरवठा करेल. अमेरिकन सैन्य पाकिस्तानी बेस वर राहील तर तिथे हल्ला करणे भारताला जड जाईल. त्यामुळे भारतांत विविध आतंकवादी हल्ले होण्याची शक्यता जास्त आहे. इराण आण्विक अस्त्रें निर्माण कण्याच्या जवळपास सुद्धा नाही. इराण ने कुणावरही विशेष हल्ला करण्यात रस दाखवलं नाही. ऑपेरेशन Midnight हॅमर नंतर सुद्धा इराण ने काहीही हालचाल केली नव्हती. विश्व शांतीला इराण पासून धोका होता हे व्यक्तव्य इराक युद्धाच्या कारणांच्या इतकेच मूर्खपणाचे वाटते. ये युद्ध तात्काळ संपो हि प्रार्थना !

In reply to by साहना

आपल्याला जागतिक दादागिरीचं राजकारण कळत नाही. पण, कोणत्याही देशाचे पंतप्रधान -राष्ट्रप्रमुख अन्याय करणारे असतील किंवा त्यांचे इतर काही दोष असतील. एकीकडे चर्चा करायची आणि युद्धाची कल्पना न देता राष्ट्रप्रमुखांना मारणे काही योग्य वाटले नाही. उद्या आपलं धोरण आणि अनुषांगिक गोष्टीमुळे अमेरिकेशी पटलं नाही तर....? जागतिक राजकारणात एक अत्यंत धोकादायक पायंडा पडला आहे. जर आज महासत्तांनी राष्ट्रप्रमुखांना मारणे सामान्य केले, तर भविष्यात इतर देशही त्यांच्या सोयीनुसार याचे अनुकरण करू शकतील असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"कोणत्याही देशाचे पंतप्रधान -राष्ट्रप्रमुख अन्याय करणारे असतील किंवा त्यांचे इतर काही दोष असतील. एकीकडे चर्चा करायची आणि युद्धाची कल्पना न देता राष्ट्रप्रमुखांना मारणे काही योग्य वाटले नाही" सहमत. नेत्यान्याहु हा एक नंबर भ्रष्टाचारी आहे. ईस्रायल म्हंटले की 'हुशार पण बिचारे ज्यु' अशी प्रतिमा तयार होते. २००६ पासुन हा म्हातारा "ईराण दोन आठवड्यात अणुबाँब बनवणार आहे" असे सांगत फिरत होता.जगात आजवर अनेक युद्धे झाली. पण देशप्रमुख आणि त्याच्या कुटुंबालाच टार्गेट करण्याचे हे पहिले उदाहरण.भारत-पाकिस्तान युद्धे झाली पण ना भारताने शरीफ ह्यांना मारले ना पाकिस्तानने वाजपेयी ह्यांना. खेमेनी ह्यांच्या हत्येवर भारत मौन पाळणार ही अपेक्षा होतीच. प्रतिक्रिया दिली तर ईस्राय्ल्/अमेरिका रागावतील असे नाही पण प्रतिक्रिया न देण्यामागे काहीतरी वेगळे कारण आहे. भारत अमेरिका/ईस्रायलच्या मागे फरफट्त जात आहे असे चित्र तयार झाले आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस गुरुवार, 03/05/2026 - 05:31
अध्यक्ष ट्रंपच्या कृतीचे समर्थन कॉन्ग्रेसकडून अजून झालेलं नाही. पुढच्या आठवड्यात. देशाचा आणि आंतरराष्ट्रीय कायदे मोडणारे युद्ध आहे असे कायदेपंडीत व्यक्त करत आहेत.

काही लोक द्वेष उभे करण्यात पटाईत असतात. कायम हिंदू-मूस्लीम यज्ञकुंडात आहुत्या ओतत असतात. इराण हा कट्टर मुस्लीम देश आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अशा देशांचा कडकडून विरोध करुन असे देश मातीत घातले पाहिजे अशी मांडणी असते या चर्चाप्रस्तावाचे प्रास्ताविक वाटले. प्रत्येक देशाची आपली धोरणे आहेत. स्त्री-पुरुष समानतेपासून ते अभिव्यक्ती, शिक्षण, राष्ट्राची धोरणे ही अधिक सर्वसमावेशक प्रगतीची असली पाहिजेत यात काही वाद नाही, तसे असलेच पाहिजेत. एक मुद्दा प्रास्ताविकात दिसला की, काश्मीर प्रश्नावर इराणने नेहमी पाकिस्तानचे समर्थन केले असले तरी वगैरे.......भारताचे इराणशी दीर्घकाळापासून संबंध निव्वळ धोरणात्मक नसून ते सांस्क्रुतिक देखील आहेत. काश्मीरबाबत १९९४ मधे संयुक्त राष्ट्र्राच्या मानवाधिकार आयोगात भारताविरुद्ध ठराव मांडण्यात आला तेव्हा तेहरानने या प्रयत्नांना रोखले होते. या नाजूक प्रश्नाचं अधिक आंतरराष्ट्रीयकरण होण्यापासून रोखले होते. इराणने चाबहार बंदर उभारण्यास सहकार्य केले. दहावर्षीय करार केला. आपल्याला इराणकडून काय काय फायदे होते वगैरे इत्यादि. ( दुवा ) एप्रिल २००१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या इराण दौऱ्यात भारत आणि इराणमध्ये ऐतिहासिक 'तेहरान घोषणा' करण्यात आली. या अंतर्गत, चाबहार बंदर विकासासह, ऊर्जा, व्यापारातील सहकार्य आणि अफगाणिस्तानमध्ये शांतता राखण्यासाठी संयुक्त धोरण आखण्याबाबत सहमती दर्शवली वगैरे. इस्त्रायलीशीही आपले शेती, संरक्षण, तंत्रज्ञान इतर असे संबंध आहेत वगैरे. सारांश असा की, आपले दोन्ही देशाशी राजनैतिक संबंध आहेत, अशा वेळी आपल्या देशाचं 'मौन' आपल्या आंतरराष्ट्रीय छबीला सर्वांपासून अलिप्त करणारी आहे, असे वाटायला लागते. जाणकारांनी माहितीत भर घालावी. सोनिया गांधी (राज्यसभा सदस्य ) यांनी आजच्या लोकसत्तात 'नैतिक वारसा जपू या..संसदेत बोलू या' सविस्तर लेख लिहिला आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस Wed, 03/04/2026 - 09:54
लोकसत्तामध्ये आलेले लेख लिंक मधून पूर्ण उघडत नाहीत. असो. पण विषय समजला. खोमेनी हत्येचा निषेध पंप्रधानांनी शेवटी काल केला असं समजलं. बाकी राहुलबाबा अमेरिकेत जाऊन भारत सरकारविरोधी भाषणं ठोकतात याबद्दलही सोनिया गांधींनी समर्थन द्यावे. त्यांचे सरकारही तीन वर्षांनी सत्तेत येणार आहे तर जनमत तयार करणे, भूमिका स्पष्ट करणे हेसुद्धा कामच आहे. अमेरिकेविरोधी आहे तर अशी भाषणे अमेरिकन जनतेला कशाला ऐकवतात.

धर्मराजमुटके Wed, 03/04/2026 - 09:46
काही भारतीयांना जगात कुठेही युद्ध सुरु झाले की भारताचा स्टँड काय आहे हे लगेच जाहिर करायची फार उत्सुकता लागून राहते. सध्याचे जिओपॉलीटीक्स कधी नव्हे ते गुंतागुंतीचे झाले आहे. यात काळे पांढरे भाग कमी आहे राखाडी भाग जास्त प्रमाणात आहे. घरात आईचे आणि बायकोचे भांडण झाले की एक नवरा म्हणून आणि एक मुलगा म्हणून कोणाची बाजू घ्यायची असा प्रश्न उभा राहतो तेव्हा आपले तोंड बंद ठेवणे हेच जास्त फायद्याचे असते असे अनेकवेळा सिद्ध झालेले आहे. एवढे करुनही बायकोचा बैल आणि आईच्या ताटाखालचं मांजर ह्या उपाध्या मिळतातच. अशा भांडणात शादीशुदा बंदा ना घर का ना घाटका ही अवस्था न टाळता येण्याजोगी आहे. मला वाटते एवढा कॉमन सेन्स प्रत्येक लग्न झालेल्या भारतीय पुरुषाचे ठायी असावा(च). कधी कधी कोणतीही भुमिका न घेणे हीच सर्वोत्तम भुमिका असते असे पी.व्ही. नरसिंह राव यांनी म्हटल्याचे कोणीतरी दुसर्‍या धाग्यावर लिहिले होते. रावांबद्द्ल आदर होताच, हे वाक्य वाचून तो दुणावला. चीन आणी रशिया डिंगा हाकतील पण प्रत्यक्ष युद्धात कधीही उतरणार नाहीत. पडद्यामागे मदत जरुर करतील. इस्त्रायलने पुन्हा इराणमधे 'प्रेअर' अ‍ॅप हॅक करुन आपले संदेश योग्य जागी कसे पोहोचविले याच्या सुरस कहाण्या जालावर वाचता येतील. उद्या भारतात व्हॉटसअ‍ॅप सारखे अ‍ॅप हॅक करुन अनागोंदी माजणार नाही याची खात्री देता येत नाही. उद्या देव न करो पण अमेरिका आणि भारत यांचे युद्ध झाले (शक्यता अशक्य कोटीतील असली तरी नाकारण्यासारखी नक्कीच नाही ) तर इस्त्रायल मदतीला येऊ शकणार नाही. त्यामुळे भारताने आतापासूनच धडा घेऊन संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता आहे. यंदाच्या बजेटमधे मागील कित्येक वर्षांपेक्षा जास्त भरघोस तरतुद केली आहे पण संथ गतीने चालणारी R&D ची कासवचाल बदलावी लागेल. चीनच्या HQ-9 या भरवश्याच्या म्हशीला इराणमधे पुन्हा एकदा टोणगा झालेला आहे. त्यामुळे जगात अमेरीका, चीन सोडून शस्त्रांसाठी तिसरा पर्याय नक्कीच शोधला जात आहे. भारताने ही संधी साधली पाहिजे. अमेरीकेच्या कुरापती पाहून लवकरच चीन तैवान ला घशात घालेल असे वाटते. बलोच योद्यांनी / अफगाणांनी पाकीस्तानला भंडावून सोडले आहे. त्यांना पडद्यामागून योग्य मदत मिळाली तर पाकीस्तानचा इलाज होऊ शकतो कारण दोन मांजरांचे भांडण अगोदरच चालू आहे. बोक्याने लोण्याचा गोळा पळवता आला तर बघावा. पाकीस्तानमधे अमेरीकी दुतवासावर हल्ला झाला आणी अमेरीकी सैन्याने पाकड्यांनाच गोळ्या घातल्या. शाहबाज शरीफ आणी आसिफ मुनीरची काय प्रतिक्रिया आली ? सगळ्यात जास्त वाईट ज्यूं बद्द्ल वाटते. जर्मन, ब्रिटीश आणि युरोपने ज्यूंवर केलेल्या अत्याचारांतून आपली मान अलगद सोडवून घेतली आणि धर्मवेड्या ज्यूंना पवित्र भूमी चे गाजर देऊन त्याबरोबर मुस्लिम शत्रु कायमचे गळ्यात बांधले. तुमच्याकडे कितीही सुबत्ता असू द्या, रात्री जर सुखाने झोप येणार नसेल तर त्या पवित्र भुमीचा काय फायदा ? ट्रंप कदाचित निवडणूकीत पराभूत होईल देखील पण जे नुकसान व्हायचे ते होऊन गेलेले असेल. शेवटी जिसकी लाठी उसकी भैस हेच खरे ! देवाच्या दुनियेत न्याय नाही हेच खरे ! स्वर्ग आणि नरक खोट्या कल्पना आहेत झालं !

In reply to by धर्मराजमुटके

सुबोध खरे Fri, 03/06/2026 - 12:12
@ धर्मराज मुटके कधी कधी कोणतीही भुमिका न घेणे हीच सर्वोत्तम भुमिका असते बऱ्याच भंपक प्रतिसादात तुमचा प्रतिसाद सर्वात समतोल आहे असं जाणवतं. ट्रम्प तात्यांनी टेरीफ लावल्यावर सुद्धा हीच माणसं असाच भुभु : कर करत होती बाकी इस्रायल आणि ज्यू द्वेषाने भरलेले प्रतिसाद आणि त्याला मोदीद्वेशाची फोडणी पाहून त्यांच्या वाचनाबद्दल कल्पना येते. त्याचा सहज प्रतिवाद करता येईल पण आकाशातील ग्रहांची शांती करता येते दुराग्रहाची नाही या वचनाची आठवण झाली. असो

धर्मराजमुटके Wed, 03/04/2026 - 09:47
इराणच्या सर्वोच्च पदी मोजतबा खामेनी? अयातुल्ला खामेनींच्या निधनानंतर मुलाकडे देशाची सूत्रे आली आहेत यातच इराण कोणत्या दिशेने जाणार हे स्पष्ट झाले.

श्रीगुरुजी Wed, 03/04/2026 - 12:28
मिपाकर कुंदन चौधरी दुबईत भेटले. त्यांची खूप मदत होतेय. दुबईत तसे सर्व काही सुरळीत आहे. रविवारी आम्ही रहात असलेल्या हॉटेलसमोर ५०० मीटर अंतरावर एक इंटरसेप्ट केलेले ड्रोन पडले. पडल्यानंतर खूप काळा धूर बराच वेळ दिसत होता. रात्री दोन वेळा फोनवर क्षेपणास्त्र हल्ल्याचे सरकारी ॲलर्ट कॉल आले. कालच येथील अमेरिकेच्या दुतावासावर रॉकेट/ड्रोन आदळून इमारतीला मोठी आग लागली. अमेरिकने तेथील सर्वजण आधीच बाहेर काढल्याने काही हानी झाली नाही. परंतु त्यामुळे परत जाणाऱ्या विमानसेवेवर परीणाम झालाय जी प्रायोगिक तत्वावर अत्यल्प प्रमाणात सुरू केली होती. काही जण चार्टर्ड विमानाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करताहेत, परंतु त्याचे परतीचे तिकीट ९५,००० - १,२०,००० सांगितले आहे. एकंदरीत अत्यंत अनिश्चितता आहे.

विवेकपटाईत Wed, 03/04/2026 - 18:41
तेल ही काळी लक्ष्मी आहे. लक्ष्मी सांभाळायची असेल तर सुदर्शन चक्रधारी विष्णू बनावे लागते. तसे नसेल तर शक्तिशाली विष्णूला फल पुष्प अर्पित करावे लागते. ज्यांना दास्यभक्ती आवडत नाही आणि स्वतःही शक्तिशाली नाही अशांचा विनाश हा होतोच. हीच जगाची रीत आहे. ज्या घटकेला सर्वात प्रसन्न रशिया असेल. वाढत्या तेलाच्या किमती रशियाच्या युक्रेन विरुद्ध युद्धाचा खर्च भरून काढेल. युक्रेनला मदत मिळणे आता कठीण झाले आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीनही प्रसन्न असेल. इराणचे जेवढे नुकसान होईल ते दुरुस्त करण्याचे कॉन्ट्रॅक्ट चायनीज कंपन्यांनाच मिळेल. दोन्ही देश कधीही प्रत्यक्ष मदत इराणला करणार नाही. पण युद्ध सुरू राहिले पाहिजे त्यासाठी अप्रत्यक्ष शस्त्रांची मदत करत राहतील. अमेरिका ही महाग तेल विकून युद्धाचा खर्च काढेल. भारताला रोज 40 ते 50 लक्ष बॅरल तेल लागते. युद्ध अधिक काळ लांबले तर युरोपियन देशांप्रमाणे भारतातील तेलाच्या किमती दीडशेच्या वर जातील. भारतीय शस्त्रांची मागणी ही जगभरात वाढेल. बहुतेक पुढील वर्षातच लक्ष कोटी पेक्षा जास्त शस्त्रांचा निर्यात भारत करेल.

In reply to by विवेकपटाईत

अभ्या.. गुरुवार, 03/05/2026 - 22:23
भारतीय शस्त्रांची मागणी ही जगभरात वाढेल. बहुतेक पुढील वर्षातच लक्ष कोटी पेक्षा जास्त शस्त्रांचा निर्यात भारत करेल.
अरे हो काका, ते एक सांगा ना. आता २३ हजार कोटीची शस्त्रे निर्यात एक लक्ष कोटीपेक्षा जास्त होईल सोबतच आत्ता ४० हजार कोटीची बीफ निर्यात दोन लक्ष कोटीपर्यंत जाईलच ना. . ती शस्त्रे चालवायला सैनिकांना ताकद नको का? शिवाय अमेरिका ही महाग तेल विकून युद्धाचा खर्च काढेल. भारताला रोज 40 ते 50 लक्ष बॅरल तेल लागते. युद्ध अधिक काळ लांबले तर युरोपियन देशांप्रमाणे भारतातील तेलाच्या किमती दीडशेच्या वर जातील. मग आपल्यालाही खर्च काढावाच लागेल हा लाखभर कोटीचा. . "अमूल दूध पिता है इंडीया" सोबतच हे पण "इंडीया की बीफ खाती है दुनिया".

गामा पैलवान गुरुवार, 03/05/2026 - 02:32
इराणने तेल अविव मधील हाकिरीया विभागातील इस्रायलच्या संरक्षण खात्याच्या इमारतीच्या आसपास क्षेपणास्त्र डागले आहे : https://www.ndtv.com/world-news/video-moment-iranian-missile-breaches-israels-iron-dome-hits-tel-aviv-8664536 ही बातमी खरी आहे का? -गा.पै.

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 03/05/2026 - 11:29
काही महिन्यांपूर्वी अमेरिकेने वेनेझ्युएलाचे अध्यक्ष मादुरोंना राजधानी कॅराकासमधून उचलून अमेरिकेला नेले. त्यावेळेस भारत सरकारने त्या घटनेचा निषेध केल्याचे ऐकिवात नाही. तेव्हा नाही ते सोनिया गांधींनी पेपरात भारत सरकारचे परराष्ट्रधोरण कसे चुकते आहे यावर लेख नाही लिहिला. आता इराणमध्ये खामेनी या अत्यंत धर्मांध म्हातार्‍याला अमेरिका-इस्राएलने ठार मारल्यावर आणि मुख्य म्हणजे भारतात त्याविरोधात शांतीदूतांनी निदर्शने केल्यानंतर मात्र सोनियांना लेख लिहायचे सुचले. एका देशाच्या प्रमुखाला दुसर्‍या देशाने असे ठार मारणे निषेधार्ह असेल तर मग एका देशाच्या प्रमुखाला दुसर्‍या देशाने असे उचलून नेणे समर्थनार्ह आहे का?की भारतात शांतीदूतांनी निदर्शने केल्यानंतर आपली व्होटबँक वाचवायला म्हणून सोनिया पुढे आल्या आहेत?आणि इराणमध्ये तो धर्मांध म्हातारा मेल्यावर इराणी स्त्रियांनी जाहीरपणे आनंद व्यक्त केला त्याचे काय? तरीही तो म्हातारा मेल्याचा निषेध सोनिया करणार? मग इतर वेळेस स्त्रियांचे अधिकार, स्त्रियांचा सन्मान वगैरे बडबड चालू असते ती आता कुठे गेली? सगळ्यात आश्चर्य वाटते भारतातील डापु गँगमधील लोकांचे. सोनिया काहीही म्हटले तरी राजकारणी आहेत आणि त्यांना आपल्या मतांची फिकीर असणारच. पण या डापु गँगच्या लोकांचे काय? मागे अफगाणिस्तानचा परराष्ट्रमंत्री भारतात आल्यावर आणि त्याच्या पत्रकार परिषदेला स्त्री पत्रकार नकोत म्हटल्यावर त्या लोकांनी किती आकांडतांडव केले होते. मग इतकी वर्षे इराणी स्त्रियांना बंधनात जखडून ठेवलेला मेला म्हटल्यावर त्या लोकांना पण आनंद व्हायला होता ना? पण कुठचे काय. ही विसंगती कशी समजावून घ्यायची? अर्थात त्या लोकांचा अजेंडा एकच आहे- हिंदूद्वेष आणि शांतीदूतांचे लांगूलचालन. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी भारतात विधवा स्त्रियांचे केशवपन केले जायचे म्हणून हिंदू कित्ती कित्ती बुरसटलेले असे म्हणणारे लोक आता अगदी २०२६ मध्ये स्त्रियांना बुरखा आणि हिजाबमध्ये कोंडणार्‍या आणि निकाह हलाला सारख्या प्रथा राबविणार्‍या लोकांविरूध्द ब्र ही काढत नाहीत. माणसाने कित्ती कित्ती ढोंगी असावे याचे हे डापु गँगवाले अगदी मूर्तीमंत उदाहरण आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 03/05/2026 - 11:47
त्या पेक्षा एपस्टिन फाईल्सच्या भीतीने अमेरिका इस्राईलचा निषेधही न करणाऱ्या मोदींविरुद्ध काहीही न बोलणाऱ्या अंधभक्तांचा निषेध केला पाहिजे. माणसाने कित्ती कित्ती ढोंगी असावे याचे डापू गँगपेक्षा मोठे उदाहरण म्हणजे हे भाजपचे अंधभक्त आहेत. भाजपेयीना नीतिमत्ता नसते हेच खरे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

रात्रीचे चांदणे गुरुवार, 03/05/2026 - 12:09
एपस्टिन फाईल्स मध्ये असं कांय लिहिलं आहे म्हणून भाजपा घाबरत आहे? कांय माहिती असेल तर लिहा.

In reply to by रात्रीचे चांदणे

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 03/05/2026 - 19:35
खरोखरच काहीतरी आहे अन्यथा भारत एवढा झुकणार नाही ईस्रायल/अमेरिकेपुढे. आपण एवढे अगतिक नाही की देशप्रमुखाच्या हत्येवरही प्रतिक्रिया देण्याची आपणास भीती वाटावी. आता खूपच टीका होउ लागल्यावर लोकलज्जेस्तव प्रतिक्रिया दिली.(परराष्ट्र खात्याने.. पंतप्रधानांनी नाही)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Fri, 03/06/2026 - 12:15
माजलेल्या सांडाशी टक्कर घेण्याची आपली क्षमता आहे का? आणि असली तरी ते शहाणपणाचे ठरेल का ? इतका मूलभूत विचार मोदिरुग्ण करू शकत नाहीत?

In reply to by सुबोध खरे

ते ठिकाय हो, माजलेल्या सांडाशी पंगा घ्यायचं नाहीये. पण एपस्टिन फेल मधले आपले काळे कारनामे उघडू नये म्हणून अख्खा देश माजलेल्या सांडाच्या मागे फरपटवत नेण्यात काय अर्थ? इतका साधा विचार गोबरभक्त उर्फ अंधभक्त का करू शकत नाहीत?

In reply to by धनावडे

ब्लॅकमेलिंग करणारा गोष्टी लपवून ठेवत असतो म्हणूनच ब्लॅकमेलिंग होत असते, उघड करून a i ला सांगून मग ब्लॅकमेलिंग शक्य आहे का? थोडा विचार करा!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/05/2026 - 18:24
राष्ट्राध्यक्ष खामेनीच्या हत्त्येने इकडच्या गोबरपंथीय जमातीत सध्या आनंद आहे, या आनंदाचं पहिलं कारण असतं की मूस्लीम कट्टरवाधी धर्मांध मरण पावला. गोबरपंथीयांना ट्रंम्प आपला वाटतो आणि त्या अँगलने यांचं गुलाबजामून खाणं चालू असतं. डोक्याचा पत्ताच नाही, त्यामुळे यांच्या लॉजीकपुढे जगातले सगळे तर्कशास्त्र थकलेलं असतं. एखादा धार्मिक 'बुवाच्या' डोक्यावर जर जगात कुठे क्षेपणास्त्र पडलं असतं तर, परदेशात आमच्या धर्माला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आहे, अशी कोल्हेकुई सुरु झाली असती. इकडे, धार्मिक अजेंड्याचे मुद्दे कायदेशीर आणि संसदीय प्रक्रियेतूनच मार्गी लावले जात आहेत, ही अशावेळी 'धर्मांधता' नसते. कायदेशीर आम्ही धर्मांध देवभोळ्या आणि गोबर लोकांचे प्रतिनिधी आहोत, हे स्पष्ट सांगता येत नाही पण ते ठासविण्यासाठी सद्य सरकारला काय काय करावे लागते ते देशभर माहिती आहे. देश संसदीय मार्गाने चालतो नाही तर, 'धर्मशाही' नावाच्या एखादी व्यवस्था यांनी चालवली असते. आणि एखादा धर्मग्रंथ आदर्श मानून ही व्यवस्था चालवायला तयार झाले असते. कोणत्याही धर्माची कट्टरता आणि धार्मिक आंधळेपणा विनाशाकडे घेऊन जातो. आज महत्वाकांक्षी जागतीक दादागिरी करीत असलेल्या राष्ट्राचं क्षेपणास्त्र तिकडे पडल्याचं आनंद असेल पण त्या क्षेपणास्त्राचं तोंड कुठेही वळु शकतं हे भक्तांना कळले असे म्हणत असाल तर आनंद आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 03/05/2026 - 18:46
त्यात त्या यु-ट्युबी पत्रकारांबद्दल बोलायलाच नको. ते भाउ तोरसेकर आणी त्यांच्या पत्नी स्वाती तोरसेकर. ! "ईराणने जगाला युद्धात ढकलले" ह्या असल्या त्यांच्या विधानावर हसायचे की रडायचे कळत नाही. ५/६ वर्षपुर्वी गिरीश कुबेरांनी भाऊ तोरसेकरांचा उल्लेख 'juvenile journalist" अल्पवयीन पत्रकार केला होता.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/05/2026 - 18:59
अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराण विरोधात युद्ध पुकारले. त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्य झाला. आज लाजे-काजे सहा दिवसानंतर भारताने आज त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सरकारच्या वतीने नवी दिल्लीतील इराणी दूतावासाला भेट दिली. याठिकाणी त्यांनी खामेनी यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या पुस्तकावर स्वाक्षरी केली. आता सर्वांनी दोन मिनिट डोळे मिटून उभं राहिलं पाहिजे, असं वाटतं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti गुरुवार, 03/05/2026 - 19:45
आता सर्वांनी दोन मिनिट डोळे मिटून उभं राहिलं पाहिजे, असं वाटतं. का?? मला खामेनीचा प्रचंड राग होता. त्याच्या धर्मान्धपणाचा पहिल्या बळी इराणी स्त्रियाच होत्या. जरा जरी बुरखा हलला की थेट फाशी दिली जायची. तो अमेरिकाविरूद्ध लढत राहिला असा समज करत एका धर्मान्ध नेत्याला मोठं पाहण्याची अजिबात इच्छा नाही. हल्लेखोर इस्त्राइलचा निषेध!!
इराणच्या दक्षिण भागात असलेल्या होर्मोजगानमधील मिनाब शहरात २८ फेब्रुवारी रोजी एका शाळेवर हल्ला झाला. या हल्ल्यात १६५ विद्यार्थिनींचा मृत्यू झाला
सर्वांनी दोन मिनिट डोळे मिटून उभं राहिलं पाहिजे, असं वाटतं.

In reply to by Bhakti

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/05/2026 - 19:54
इराणच्या दक्षिण भागात असलेल्या होर्मोजगानमधील मिनाब शहरात २८ फेब्रुवारी रोजी एका शाळेवर हल्ला झाला. या हल्ल्यात १६५ विद्यार्थिनींचा मृत्यू झाला
या युद्धातील सर्वात दुर्दैवी आणि दुखद घटना. लहान मुलांचा काय दोष होता. त्या कबरीची रांग पाहिली. पण देशाची काय प्रतिक्रिया येते त्यावर या देशात श्रद्धांजलीचे कार्यक्रम ठरताहेत असे म्हणावे लागते. लेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

In reply to by आग्या१९९०

आग्या१९९० Fri, 03/06/2026 - 09:29
लगे हाथ, हाथरस, मणिपूरमधील आपल्या भगिनींवर अत्याचाराचा निषेध म्हणून दोन मिनिटे डोळे बंद करूया. बलात्कार्यांना ओवाळणाऱ्याचा निषेध करूया. बरेच निषेध पेंडिंग आहेत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विवेकपटाईत गुरुवार, 03/05/2026 - 21:47
भारतीय व्यापारांनी गोबर विकून 500 कोटी पेक्षा जास्त विदेशी मुद्रा कमवली आहे. बाकी एका क्रूर शासकाने त्यांच्या देशातील विरोध करणाऱ्या हजारों लोकांची हत्या केली आहे. त्या नौसैनिक जहाजातील प्रत्येक सैनिकाला माहीत असेल ते इराण पर्यंत जिवंत पोहचू शकत नाही. पण ते इराणकडे गेले नसते. शरणागती पत्करली असती. तर तिथे त्यांच्या परिवारावर अत्याचार झाले असते. मरण स्वीकार करण्याशिवाय त्यांच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कांदा लिंबू गुरुवार, 03/05/2026 - 22:31
मला खामेनीचा प्रचंड राग होता. त्याच्या धर्मान्धपणाचा पहिल्या बळी इराणी स्त्रियाच होत्या. जरा जरी बुरखा हलला की थेट फाशी दिली जायची.
असं प्रामाणिकप्रमाणे लिहिणाऱ्या (ज्यांनी अध्यात्म, तत्वज्ञान, पाकृ, सामाजिक-राजकीय लिखाण केलाय अश्या) मिपाकरांबद्धल याच मिपावर
राष्ट्राध्यक्ष खामेनीच्या हत्त्येने इकडच्या गोबरपंथीय जमातीत सध्या आनंद आहे, या आनंदाचं पहिलं कारण असतं की मूस्लीम कट्टरवाधी धर्मांध मरण पावला
असं लिहिलं जातंय व त्यांना गोबरवादी* ठरवलं जातंय हे पाहून एक मिपाकर म्हणून शरम वाटली! राष्ट्राध्यक्ष खामेनीच्या हत्त्येने इकडच्या गोबरपंथीय जमातीत... कुणाला कशाचं बोड्कीला केसाचं! लढाईची करणारे देश अमेरिका, इस्राईल, इराण व इतर आखाती देश आणि इथले डापू गोबरवाद्यांच्या नवे खडे फोडताहेत! धन्य आहे ! *गोबरवादी म्हणजे नेमकं काय ते तुमचं कारलं मार कसं (Karl Marx) जाणे!

रात्रीचे चांदणे गुरुवार, 03/05/2026 - 12:19
भरताने खेमेणीच्या हत्तेचा निषेध केला नाही. ठीक आहे. पण कालच अमेरिकेने इराणच्या एका नौदल जाहजा वरती भारतीय उप सागरात हल्ला केला आहे. विशेष म्हणजे ते भारतातच सरवासाठी आलेलं. मोदी नाहीतर कमीत कमी सरकारकडून कोणीतरी ह्यावर बोललं पाहिजे.

In reply to by रात्रीचे चांदणे

विवेकपटाईत गुरुवार, 03/05/2026 - 21:34
ते जहाज भारतातच थांबून राहिले असते तर वाचले असते. पण परत देशात गेल्यावर त्यांच्या सैनिकांना फासावर निश्चित चढवला गेले असते. बाकी भारताच्या नाही श्रीलंकेच्या ही दक्षिणे शंभर किलोमीटर दूर गेल्यानंतर खुल्या समुद्रात हल्ला झाला आहे. भारताचे आक्षेप घेण्याचे काहीही कारण नाही. बाकी इराणच्या सरकारने नेहमीच युद्धात पाकिस्तानचा पक्ष घेतला आहे. भारताचे संबंध फक्त आर्थिक कारणांनी ठेवले आहे. सरकारी स्तरावर भारताने त्यांच्या मृत्यू वर संवेदना प्रगट केली आहे.

In reply to by विवेकपटाईत

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 03/05/2026 - 22:40
ट्विटरवर आज जे काही वाचले त्याप्रमाणे ते जहाज एक आठवडा आधी निघाले होते- म्हणजे युध्द सुरू होण्यापूर्वी. त्या जहाजावर हल्ला केला गेला भारताच्या सागरी सीमे अंतर्गत नाही तर त्या पलीकडे. मग भारताने याविषयी काय करणे या मंडळींना अपेक्षित होते समजत नाही.

In reply to by धनावडे

युद्ध अमेरिका-ईस्रायलने सुरु केले आहे. भारतापुरता मुद्दा हा की अजून किती लाचारी करायची?मिठ्या मारायच्या? हे दोन्ही देश भारतिय नेत्रुत्वाला फाट्यावर मारतात आणि पाहिजे तसे वाकवतात असे चित्र समोर दिसते.नेत्रुत्वाची लाचारी एवढी की ज्या देशप्रमुखाची हत्या झाली त्याला आदरान्जली वाहण्याची देखील भीती वाटते.लाचारी एवढी की ईराणी जहाजावरचे ८७ नौसैनिक बुडुन मेले तरीही प्रतिक्रिया येत नाही. आता जबाब्दारी झटकण्यासाठी ते जहाज आमच्या हद्दित नव्हते वगैरे खुलासे चालु आहेत. ज्या देशाला मित्र देश म्हणता तो तुम्हाला फाट्यावर मारतो तुमच्या हद्दीच्या नजिक दुसर्या देशाच्या जहाजाला जलसमाधी देतो.. मग दुसरा देश श्रीलंका मदत करतो.. ह्याच देशाला ईराणला आपण संचलन करण्यासाठी आमंत्रण दिले होते. अमेरिका आमंत्रण आधी स्वीकारतो आणि ऐनवेळी नाकारतो. अमेरिका हेच चीनसोबत करण्याची हिंमत दाखवेल?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

धनावडे Fri, 03/06/2026 - 13:07
माझ्याघरी आलेला पाहुणा पुन्हा त्याच्या घरी जात असताना वाटेत त्याला काय झाल तर त्याला मी कसा जबाबदार? आणि हल्ला श्रीलंकेच्या सागरी हद्दीत झाला म्हणून त्यांनी मदत केली, आणि INS तारांगिनी तिथे काय करतेय या बातम्या वाचल्या नाहीत का की सोईस्कर दुर्लक्ष.

In reply to by धनावडे

पण चुकीच्या पद्धतीने हल्ला केला त्याचा निषेध तर करू शकतो ना? इतकही काय बुळचट रहावं? का ब्लॅकमेलिंग सुरू आहे एपस्टिन च्या नावाखाली? भाजपे युद्धावेळी उघडे पडतात!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

निषेध तर करू शकते ना सरकार? सरकार एवढे अमेरिका/ईस्रायलचे मिंधे असल्यासारखे का वागते? असो . येणार येणार म्हणता पंतप्रधानांची प्रतिक्रिया आलीच शेवटी- Military conflict can't fix any issue': PM Modi's big remark as US-Iran war burns West Asia वा! काय निषेध केलाय. आवडला.! https://www.indiatoday.in/india/story/military-conflict-never-the-answer-pm-modi-calls-for-restraint-as-iran-war-rages-2877697-2026-03-05

In reply to by अमरेंद्र बाहुबली

धनावडे Fri, 03/06/2026 - 15:15
पण ग्रेटर इस्राईल बनवा आणि त्यांनी पाकिस्तान ला ठेचावे याला तुमचा पाठिंबा होता ना एका धाग्यावर मग आता तर तुम्ही खुश असायला हव, की बीजेपी ला शिव्या देण्यासाठी स्वतःच्या भूमिकेला तिलांजली दिली. बीजेपी ला शिव्या देताना काँग्रेसी आपलीच भूमिका बदलतात.

In reply to by धनावडे

ग्रेटर इस्रायल नक्कीच बनावा! पण युद्ध वगैरे घोषित करून ह्या गोष्टी करायला हव्यात, खामेनी मेल्याचे आजिबात दुःख नाही पण क्या पद्धतीने मारले त्या पद्धतीला विरोध आहे. चुकीला आम्ही चूक म्हणतो, प्रत्येक गोष्टीचे आंधळे समर्थन करायला आम्ही गोबरभक्त वाटलो का?

In reply to by सुबोध खरे

गोबरभक्तांच्या नादी लागण्यापेक्षा भुजबळांच्या नादी लागणे कधीही चांगले! भाजपेच पाहा, पक्ष वाढवणाऱ्या गोबरभक्तांना हॅकलिन भुजबळांसोबत सरकारात बसलेत! :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बरं,एपस्टिन फाइल्सच्या तीस हजार दोनशे चाळीसाव्या पानातील एकशे नऊव्या ओळीत मोदींचे कारनामे आहेत. तुमच्यासाठी नाही तर कमीत कमी देशासाठी तरी ते वाचून हिथं लिहा. मग प्रियांका गांधी पंतप्रधान नक्कीच होतील. मग गाझा साठी इस्राएल वर आपण हल्ला करू.

In reply to by रात्रीचे चांदणे

प्रियांका गांधी पंतप्रधान होतील ह्याची आतापासून जळजळ होण्याचे कारण नाही! :)

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुबोध खरे Sat, 03/07/2026 - 11:32
मोरू लोक इतक्या वेळेस तोंडघशी पडले तरी सुधारण्याचे नाव घेत नाहीत. इराणची एक युद्धनौका भारताच्या कोची बंदरात सुरक्षित आहे. IRIS LAVAN IRIS Dena बद्दल भारताने काहीच केले नाही पासून भारताने इराणला वाऱ्यावर सोडले पर्यंत सर्व बोंबा मारून झाल्या. काहीही करून केवळ श्री मोदींवर राळ उडवायची एवढाच अजेंडा असलेले लोक सध्या जास्तच वैफल्यग्रस्त होऊन लिहीत असल्याने तोंडघशी पडताना दिसत आहेत.

संदिप एस गुरुवार, 03/05/2026 - 12:45
श्रीगुरूजी, आणी ईतर कोणीही अडकले असाल आणी काहीही मदत लागली तर नक्की संपर्क करा, मी पण ईथेच आहे - ०५५११२४५३६

कर्नलतपस्वी गुरुवार, 03/05/2026 - 14:24
कडक सॅल्युट. श्रीगुरूजी काळजी घ्या,लवकरच सुरक्षित परत याल. रिस्ट्रिक्टेड ऑपरेशन आहे.फुल स्केल वाॅर मधे बदलण्याची शक्यता कमीच आहे.

श्रीगुरुजी गुरुवार, 03/05/2026 - 21:56
सर्वांना धन्यवाद! परतीचा प्रयत्न सुरू आहे. रविवारचं एअर इंडियाचं तिकीट मिळालंय. परंतु आताच क्षेपणास्त्र हल्ल्याचा ॲलर्ट संदेश आलाय. अजून एस्केलेशन झाले नाही तर रविवारी संध्याकाळी भारतात पोहोचू.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी Fri, 03/06/2026 - 09:57
रविवारचे एअर इंडियाचे उड्डाण रद्द झाल्याचा आज पहाटे संदेश आलाय.‌ आता अनिश्चित काळासाठी अडकलोय. काल संयुक्त अरब अमिरातीत वेगवेगळ्या ठिकाणी १३१ ड्रोन हल्ले व ७ क्षेपणास्त्र हल्ले झाले. त्यातील १२५ ड्रोन हल्ले व ६ क्षेपणास्त्र हल्ले निकामी केले. परंतु उर्वरित हल्ल्यांमुळे ९४ नागरिक किरकोळ जखमी झाले व काही ठिकाणी मालमत्तेचे नुकसान झाले. त्यामुळे पुन्हा एकदा विमाने रद्द झाली आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

स्वधर्म Fri, 03/06/2026 - 19:33
गुरूजी काळजी घ्या. अशा परिस्थितीत भारत सरकार/ विमान कंपन्याना पैसे देते की प्रवाशांनाच अधिकचे पैसे भरून आपआपले तिकीट मिळवावे लागते?

In reply to by स्वधर्म

श्रीगुरुजी Fri, 03/06/2026 - 20:26
विमान कंपन्या प्रचंड लूटमार करताहेत. आमची परतीची २ तिकिटे २३,००० मध्ये मिळाली होती. स्पाइसजेटने सर्व उड्डाणे रद्द केली व नवीन उड्डाणे जाहीर केली ज्याचे प्रतिव्यक्ती तिकीट ८८,००० रूपये आहे. इतिहाद प्रतितिकीट ६,४०० दिरहॅम (१,६०,०००) मागत आहे. सुदैवाने (!) आम्हाला २ तिकिटासाठी केवळ (!) ९७,१०४ घडताहेत. केंद्र सरकार, विमान वाहतूक मंत्री ही लुटमार थांबविण्यासाठी कणभरही काहीही करीत नाही. सरकारची मदत शून्य आहे. येथे अडकलेले प्रत्येक जण परतीच्या तिकिटासाठी स्वतःच प्रयत्न करीत आहे. तथाकथित मदतीसाठी अनेक क्रमांक सांगितले गेले ज्यावरून शून्य मदत मिळाली. वीणा वर्ल्ड, केसरी या कंपन्या आपापल्या प्रवाशांना मदत करीत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

वाईट वाटले! संकटकाळी तरी भारत सरकारने मदत करायला हवी! देशात मोदींचा फोटो दाखवण्यासाठी हजारो कोटी फुंकले जातात नी देशाबाहेर अडकेलेल्या नागरिकाना काढायला काडीची मदत नाही!

In reply to by श्रीगुरुजी

Bhakti Fri, 03/06/2026 - 20:45
अरेरे,आपल्या नागरिकांची सुरक्षा सरकारची जबाबदारी आहे. जण परतीच्या तिकिटासाठी स्वतःच प्रयत्न करीत आहे. सर्व जण सुखरूप लवकरात लवकर भारतभूमीवर येवोत.

In reply to by श्रीगुरुजी

स्वधर्म Fri, 03/06/2026 - 21:26
गुरूजी म्हणतायतः >> केंद्र सरकार, विमान वाहतूक मंत्री ही लुटमार थांबविण्यासाठी कणभरही काहीही करीत नाही. सरकारची मदत शून्य आहे. येथे अडकलेले प्रत्येक जण परतीच्या तिकिटासाठी स्वतःच प्रयत्न करीत आहे. तथाकथित मदतीसाठी अनेक क्रमांक सांगितले गेले ज्यावरून शून्य मदत मिळाली. इथे डॉ. खरे म्हणतातः >> कधी कधी कोणतीही भुमिका न घेणे हीच सर्वोत्तम भुमिका असते ... ट्रम्प तात्यांनी टेरीफ लावल्यावर सुद्धा हीच माणसं असाच भुभु : कर करत होती बाकी इस्रायल आणि ज्यू द्वेषाने भरलेले प्रतिसाद आणि त्याला मोदीद्वेशाची फोडणी पाहून त्यांच्या... गुरुजी तुंम्हाला मोदीजी, भारतीय पासपोर्टचे, भारत सरकारचे दुबई व एम बी एस वगैरेंजवळ किती वजन आहे याचा काही अंदाज येतोय का? बाकीच्या देशांचेही नागरिक असाच आधाराचा अभाव अनुभवत आहेत का? जमले तरच उत्तर द्या, तुमची सुरक्षितता व प्राधान्याने परतणे मह्त्त्वाचे.

In reply to by स्वधर्म

जगातील जनतेने आपला गाव खेड्यातलं नेतृत्व असो की, जिल्हा, राज्य आणि देशाचं नेतृत्व, आपला नेता निवडतांना, डोळे, नाक, दात, कपाळ, पोट, लहान आतडे, मोठे आतडे, किंवा छाती किती इंचाची आहे आणि कशी आहे, हे पाहण्यापेक्षा अशा माणसाच्या मेंदूची पूर्ण वाढ झालेली आहे की नाही, हेही किमान पाहिलं पाहिजे, जगभर अशा एका जागतिक सामाजिक सुधारणावादी चळवळीची जगाला गरज आहे, असे वाटले. -दिलीप बिरुटे

In reply to by स्वधर्म

श्रीगुरुजी Fri, 03/06/2026 - 23:19
गुरुजी तुंम्हाला मोदीजी, भारतीय पासपोर्टचे, भारत सरकारचे दुबई व एम बी एस वगैरेंजवळ किती वजन आहे याचा काही अंदाज येतोय का?
हे वजन दिसण्याचे निकष काय आहे? इतिहाद या संअअच्या विमानसेवेने आज ६,४०० दिरहॅम (१,६०,००० रूपये) प्रति व्यक्ती असे शुल्क लावले आहे. इतर भारतीय विमानसेवा संस्था सुद्धा लुटत आहेत. हे शुल्क वाढविण्यात ना मोदी काही हस्तक्षेप करीत आहेत ना दुबई सरकार. अडकून पडलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ना मोदी इंडिगो, स्पाइसजेट, एअर इंडिया यांवर सक्ती करीत आहे ना दुबई सरकार त्यांना दमदाटी करीत आहे. वजन मोजण्याचे काही दुसरे निकष असतील तर सांगा. माझी मुलगी शिकते त्या विद्यापीठात अनेक देशांच्या विद्यार्थिनी - विद्यार्थी आहेत. त्यातील बरेच जण मायदेशी गेले आहेत. परंतु बहुसंख्य भारतीय येथेच आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

अभ्या.. Sat, 03/07/2026 - 20:21
श्रीगुरुजी, तुम्ही निघालात ना सुखरुप? की अजूनही फ्लाईट डिले आहे? . दुबई एअरपोर्टवर ड्रोन चा हल्ला झाल्याने एअरपोर्ट आणि एमिरेटसची फ्लाईटस बंद केल्याची बातमी आहे. प्रवाशाना अंडरग्राउंड नेण्यात आले आहे सेफ्टीसाठी. . काळजी घ्या, काही अजून पर्याय आहेत का परत येण्यासाठी?

खेमिनीच्या हत्तेचा आपण निषेध केला नाही, जहजावरील हल्ल्यावरही आपण प्रतीक्रिया दिली नाही. तर आपण स्वतःलाच विश्वगुरू, महागुरू बोलणही बंद केलं पाहिजे. जागतिक राजकारणात आपण नक्कीच महत्वाचे आहोत पण एवढेही नाही की ही असली विशेषण आपल्याला शोभतील. उगाच आपल्या विकतच्या मीडियाला सांगून स्वतःच स्वतःचे गुणगान करायचे. आणि जिथं ठाम भूमिका घ्यायची तिथं मात्र शांत बसायचे.

आनंदाची बातमी To enable oil to keep flowing into the global market, the treasury department is issuing a temporary 30-day waiver to allow Indian refiners to purchase Russian oil,” the treasury secretary, Scott Bessent, said in a statement posted to social media भारताने रशिया कडुन तेल घ्यायचे नाही असा कडक संदेश अमेरिकेचा होता पण सध्याचे वातावरण पाहता एक महिन्यासाठी तेल आयात करण्याची परवानगी अमेरिकेने भारताला दिली आहे. अभिनंदन !! https://www.theguardian.com/us-news/2026/mar/05/us-waiver-india-russian-oil

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कांदा लिंबू Fri, 03/06/2026 - 19:23
  1. भारताने रशियाकडून तेल घेणे थांबविले होते का?
  2. भारताने, "भारताने रशियाकडून तेल घेणे थांबविले" असे म्हटले होते का?
  3. रशियाने भारताला तेल देणे थांबविले होते का?
  4. रशियाने, "रशियाने भारताला तेल देणे थांबविले" असे म्हटले होते का?
यापैकी कोणत्याही एकाही प्रश्नाचे उत्तर "हो" असे नाही. मग अमेरिकेच्या "तीस दिवस तेल घेऊ देऊ" या किंवा आधीच्या "तेल घेऊ देणार नाही" या वक्तव्यांना काही अर्थ आहे का?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आग्या१९९० Fri, 03/06/2026 - 20:11
रशियाचे तेलाचे जे टँकर सध्या समुद्रात उभे आहे तेच तेल रशिया देणार आहे नवीन नाही. त्यामुळे किती मिळेल याची कल्पना नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

साहना Sat, 03/07/2026 - 00:54
कोबी सिंह पेक्षा ताम्रमुख नेत्याचे चाटुकार आणि भाट जास्त असह्य आहेत. १. भारताने रशियन तेल घेणे कधीच बंद केले नव्हते. भारतांतील अनेक रिफायनरी रशियन क्रूड वर फुल्ल स्पीड कार्यरत आहेत आणि त्यांना अचानक बंद करणे शक्य नाही. २. भारतावर २५% तथाकथित टॅरिफ लावून सुद्धा भारताने रशियन क्रूड घेणे बंद केले नाही. शेवटी जितं मया म्हणून ताम्रमुखाने तथाकथित "ट्रेड डील' घोषित केली आणि स्वतःहून हे टॅरिफ बंद केले. ३. तथाकथित ट्रेड डील मध्ये ताम्रमुखाने तात्काळ टेरीफ्स कमी केले आणि बदल्यांत भारताने सर्व विषयावर "नंतर बघू" असे उत्तर दिले आहे. प्रत्यक्षांत भारत आणि अमेरिका दोन्ही बाजूनी कुठलीही ट्रेड डील केली नाही. बहुतेक विषयावर दोन्ही बाजूंचे एकमत सुद्धा झालेले नाही. कुठल्याही ट्रेड डील चा मसुदा सुद्धा लिहिला गेलेला नाही आणि माझ्या माहिती प्रमाणे किमान २०२६ मध्ये ह्यावर प्रगती होण्याची शक्यता शून्य आहे. लुटनिक आणि बेझेन्ट दोन्ही एक नंबरचे कामचुकार, अकार्यक्षम आणि चाटुकार आहेत. त्यामुळे कुठल्याही मिरवणुकीच्या पुढे आपण उगाच जाऊन मिरवणुकीचे नेत्तृत्व स्वतःच करत आहोत असे दाखविण्याचा प्रयत्न दोन्ही लोक करतात. ताम्रमूख TV आणि X वर प्रचंड वेळ खर्च करतात त्यामुळे दोन्ही माध्यमात आपल्या साहेबांची स्तुती करण्याची जी चढाओढ मंडळी करत आहेत त्यातून हि असली मुक्ताफळे उधळली जातात. भारतीय लोकांना ह्यावर वेळ दवडण्याची गरज नाही. त्याशिवाय ह्यावर मौन पाळणे हे सध्या तरी शहाणपणाचे आहे. टीप: १. ताम्रमुख अध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेने शून्य ट्रेड डील्स केल्या आहेत. मीडिया मध्ये जे काही ऐकू येते ते फक्त बोलबच्चनगिरी. कोबी सिंह ह्यांच्या पेक्षा सुद्धा मोठा दांभिक, खोटारडा, निर्लज्ज आणि धूर्त कोणी राजकारणी असेल असे वाटले नव्हते पण ताम्रमुख तसे आहेत.

In reply to by साहना

स्वधर्म Mon, 03/09/2026 - 15:56
>> कोबी सिंह ह्यांच्या पेक्षा सुद्धा मोठा दांभिक, खोटारडा, निर्लज्ज आणि धूर्त कोणी राजकारणी असेल असे वाटले नव्हते पण ताम्रमुख तसे आहेत. कोबी सिंह यांनाही तसंच व्हायचं आहे बहुतेक. बहुधा म्हणूनच 'अब की बार ट्रंप सरकार' अशी घोषणा देत होते. फक्त त्यांनी नॉन गोदी मिडिया पत्रकारांना घाबरण्याचं बंद केलं तर जमेलही. ताम्रप्रमुख कुठल्याही पत्रकार परिषदेत बिनधास्त बोलतात, कुठेही जातात, पण कोबी सिंह यांचे महिला खासदारांकडून धोका असल्याने संसदेत येण्यापासूनही संरक्षण केले जाते. खरे कारण जनतेला माहित असते, ते वेगळे.

सुबोध खरे Fri, 03/06/2026 - 19:33
मोरू ( मोदी रुग्ण) लोक आजकाल कोणत्याही धाग्यावर आपली जुनी ठसठसती गळवं कुरवाळत बसले आहेत. त्याचा प्रतिवाद करण्यात काहीही हशील होणार नाही. मूळ धागा इस्रायल इराण युद्ध हा आहे. त्याबद्दल चर्चा करायच्या ऐवजी हे केवळ मोदीनि यंव करायला हवं होतं त्यंव करायला हवं होतं याचे रतीब टाकत राहिलेले आहेत. मोदींच्या जागी दुसरा येणार नाही हे त्यांना माहिती झालंय. त्यामुळे आपलं वैफल्य कुठे तरी निचरा करण्यासाठी बाहेर काढणं चालू आहे. सद्य स्थितीत श्री राहुल गांधी पंतप्रधान असते तर काय झालं असतं याचा विचार करून पहा. सुदैवाने असं काहीही नाही यात परमानंद आहे. कुठे वितंडवाद घालायचा.

अभ्या.. Fri, 03/06/2026 - 22:26
इजराईल आणि इराण यांच्यातील युद्ध दीर्घकाळ चालणार आहे. युद्ध आणि त्याचे परिणाम याबाबत सर्व प्रतिक्रिया एकाच ठिकाणी याव्यात म्हणून हा स्वतंत्र धागा. इराण हा कट्टर इस्लामी देश आहे. इस्लामी जगाचे नेतृत्व मिळवण्यासाठी इजराईलचा संपूर्ण नाश करण्याची त्याची मंशा आहे. काश्मीर प्रश्नावर इराणने नेहमी पाकिस्तानचे समर्थन केले असले तरी व्यापक आर्थिक हितासाठी भारताशी संबंध दृढ केले आहेत. भारताचा मध्य आशियाशी होणारा व्यापार प्रामुख्याने इराणमार्गे होतो. इजराईलने नेहमीच भारताला मदत केली आहे. कारगिल युद्ध जिंकण्यात इजराईलची मदत झाली होती. विविध क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, युद्धास्त्रे इत्यादी भारताला इजराईलकडून मिळतात. नुकतेच इजराईलने पंतप्रधान मोदींना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मानही दिला आहे. या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसणार आहे. पेट्रोलच्या किंमती वाढल्याने जगभरात महागाई वाढेल. इराणमध्ये सत्ता परिवर्तन न होता युद्ध थांबले तर खाडी देशांत अमेरिकेची प्रतिष्ठा कमी होईल. सुरक्षेसाठी खाडी देश चीन किंवा रशियाकडे पाहू शकतात. इराण अणुबॉम्ब निश्चितपणे तयार करेल आणि त्याचा उपयोगही करेल. पुढील २० वर्षांत इजराईलचे अस्तित्व नामशेष होऊ शकते. त्यामुळे हे युद्ध अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनले आहे.
. मूळ धागा नऊ ओळीचा. त्यात पाच ओळी भारताबद्दल. त्यातही नुकताच इस्रेलने सर्वोच्च सन्मानही दिल्याचाही उल्लेख. मग मिपावर चर्चा काय कुणी कीती बॉम्ब टाकले आणि कुणाचे कीती वर गेले , आजचा स्कोर काय? इतकीच करायची का? .

विवेकपटाईत Sat, 03/07/2026 - 08:24
आजचा नवीन विनोद तात्या तात्या प्रतिबंध लावून ही मोदी शेट रशियाकडून सर्वात जास्त तेल विकत घेतात. त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे तात्या: आपण असं करू जगाला सांगू आम्ही शेटजीला रशिया कडून तेल विकत घेण्यासाठी एका महिन्याची मुदत वाढवून दिली आहे. बघा कशी जिरेल मोदी शेटची.

In reply to by विवेकपटाईत

मदनबाण Sat, 03/07/2026 - 11:37
आपण आधी जितके तेल आधी घेत होतो त्या पेक्षा आता फार कमी घेतो हे सत्य आहे ना? आता रशियाकडुन तेल घेऊन त्यावर अधिकचा प्रिमियम द्यावा लागतोय का? आधी डिस्काऊंट ने मिळत होते ना? मी वाचलेला तेलसाठ्यांचा आकडा. अमेरिका: २०० दिवस चीनः १०४ दिवस जपानः २६० दिवस दक्षिण कोरिया: २१० दिवस सिंगापुरः २४५ दिवस आपणः २५-५० दिवस. जाता जाता: दिल्लीत सिलेंडरचे भाव ६० रुपयांनी वाढले म्हणे! कोबी जी म्हणे गॅस निर्माण करुन ट्युब मधुन नेउन ती ट्युब शेतात नेउन त्या गॅसवर पाण्याचा पंप चालवायचे हे खरे आहे का? :))) गटारातील गॅसवर चालणारी चहाची टपरी ही अद्भुत गोष्ट यांनीच सांगितली होती ना?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : Nache Nache - 8K Video | The RajaSaab | Prabhas, Malavika Mohan, Nidhhi Agerwal, Riddhi | Thaman S

सुबोध खरे Sat, 03/07/2026 - 11:38
https://www.bloomberg.com/news/articles/2026-03-06/bessent-says-us-may-unsanction-more-russia-oil-post-india-move https://economictimes.indiatimes.com/industry/energy/oil-gas/us-treasury-secretary-hints-at-lifting-more-russian-oil-sanctions-post-india-move/articleshow/129187047.cms?from=mdr भारताला रशियन तेल घेण्याविरुद्ध असलेले निर्बंध अमेरिका हटवणार. उगाच अपनी माँ का दूध पिया है तो सामने आ जा सारखी वक्तव्ये न करता शान्त राहून सरकार काम करत आहे. त्याचा परिणाम दिसून येतो आहे. पण मोरू लोकांचे वैफल्य अजूनच वाढते आहे. सध्या बर्नोलची विक्री जोरदार वाढली आहे असे ऐकतो

In reply to by सुबोध खरे

लिओ Sat, 03/07/2026 - 15:58
एक करार करु यात भविष्यात जर तुम्हाला जर परत लिहावेसे वाटले कि १९७१ इंदिरा गांधीनी कित्येक हजार चौ. की. मी. चा प्रदेश युध्दानंतर परत केला अमुक केले तमुक केले. आणि सर्व तोट्यात व्यापार केला तर ते खुशाल लिहा. पण छप्पनेश्वरांनी २०२५-२०२६ मध्ये सांगितल्यावर रशियाकडुन घेणे बंद केले व सांगितल्यावर रशियाकडुन तेल घेतले (कोणी ते विचारु नका) . यातली एक मेख लपवत आहात. या युध्द परिस्थितीत रशिया सवलती च्या दरात तेल देतच नाही कदाचित महाग देत असेल, ठिक आहे आपली गरज भागत आहे. पण छप्पनेश्वरांची छप्पन इंचाची छाती झुकल्यामुळे हे तेल रशियाकडुन मिळत आहे .(या केस मध्ये कोणाची छाती झुकली हे विचारु नका ). या सगळ्याचा अंधभक्ताना हा व्यापार कळुन पण छप्पनेश्वर सर्वोतम. एकुण या केसमध्ये बुडावर पडलो तर नाक वर आणि नाकावर पडलो तर बुड वर. पण फायद्याचा व्यापार झाला ( गुजराती एकदम एक्सपर्ट ). १९७१ मध्ये सर्व बाजुनी तोट्याचा व्यापार झाला हे सिध्द करायला अंधभक्त एकदम एक्सपर्ट. मुद्दा काय अंधभक्तांनी १९७१ च्या तोट्यातील व्यापाराबद्द्ल लिहायचे. आणि मोरुंनी ( मोदी रुग्ण) २०२५-२०२६ च्या फायद्याच्या व्यापाराबद्द्ल लिहायचे.. ???

थिंक बँक तूनळी वाहीनीवर अविनाश धर्माधिकारी यांच्या मुलाखतीत त्यानी असा उल्लेख केलाय की खामेनी ऑपरेशनसाठी मोसादने किमान १ वर्षभर ईराण्/तेहरानमधील ट्रॅफिक कॅमेरे हॅक करुन खामनी आणि त्यांच्या ईनर सर्कलमधील महत्वाच्या अधिकारी लोकांवर पाळत ठेवली आणि त्यातुन त्यांना हल्ल्याच्या दिवशी सकाळी होणार्‍या मीटींगची जागा कळली. हेजबोल्लावर झालेला पेजर अ‍ॅटॅक असो किवा ही बातमी--मोसाद नेहमीच काहीतरी नवीन युद्धतंत्र वापरत असते जे जगाला तोंडात बोट घालायला लावते. पण वरील मुद्द्यानुसार आपले ट्रॅफिक कॅमेरे कितपत सुरक्षित आहेत? सायबर युद्ध हा आता नवीन युद्धाचा अटळ भाग आहे आणि डेटा प्रोसेसिंग साठी आपण गुगल अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट वर अजुन किती काळ अवलंबुन राहणार आहोत हा कळीचा मुद्दा आहे. हे म्हणजे तुमच्या घरातील प्रत्येक वस्तू कुठे आहे हे चोराला माहीत आहे फक्त त्याचा चोरी करायचा मूड कधी होईल ते बघायचे. ते जाउद्या- बहुतेक चिनी बनावटीचे फोन आपण वापरतो, हुआवे, ओप्पो आणि काय काय , ते आपली माहीती चोरुन तिकडे पाठवत नाहीत कशावरुन? फोनवरील अनेक अ‍ॅप तुम्हाला लोकेशन ऑन ठेवायला भाग पाडतात त्यामुळे बहुतेक सगळ्यंच्या फोनवरील जी पी एस ऑन असते त्याचे काय? म्हणजे तुमचा रोजचा दिवसभराचा ट्रॅफिक पॅटर्न गुगल ला माहीत आहेच. फक्त तो कोणाला आणि कधी विकायचा एव्हढाच विषय आहे. जाता जाता- साले हे मिपावर चकरा मारायचे व्यसन लागलेय. ऑफलाईन मोडवर जगण्यासाठी काय करावे?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

आग्या१९९० Sat, 03/07/2026 - 12:35
मोसादने किमान १ वर्षभर ईराण्/तेहरानमधील ट्रॅफिक कॅमेरे हॅक करुन खामनी आणि त्यांच्या ईनर सर्कलमधील महत्वाच्या अधिकारी लोकांवर पाळत ठेवली आणि त्यातुन त्यांना हल्ल्याच्या दिवशी सकाळी होणार्‍या मीटींगची जागा कळली.
खामेनी हे न समजण्याइतका मूर्ख नव्हता. त्याने ठरवले असते तर इराणमध्ये सुरक्षित स्थळी नक्कीच लपून बसता आले असते. परंतु देशातील विरोधकांना संधी मिळू नये म्हणून त्याने शहीद होणे पत्करले, आणि त्यात तो जिंकलही. आता इराणी जनता एक होऊन अमेरिका आणि त्याच्या मित्रांविरुद्ध एक होऊन प्रतिकार करत आहे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti Sat, 03/07/2026 - 16:35
तुमची ही प्रतिक्रिया आणि आग्या यांचा प्रतिसाद,हाच चर्चेचा आशय फेबु, तूनळीवर अनुभवला आहे. खूप हसू आलं, किती सारखे विचार प्रवाह सोशल मीडिया तयार होतात :) Predictable!!!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti Sat, 03/07/2026 - 16:41
जाता जाता- साले हे मिपावर चकरा मारायचे व्यसन लागलेय. ऑफलाईन मोडवर जगण्यासाठी काय करावे?
मिपाच व्यसन जरा बरंय! ऑफलाईन मोडसाठी -दिवसातून ४ तास मोबाईल / सिस्टिम पासून दूर जा. माळ्यावर टाका. दिसणार नाही असे ठेवा. -लेकरांचा २ तास अभ्यास घ्या. १ तास विदाउट मोबाईल /डिजिटल गोष्टी फिरायला जा. चहा /पेय गॅलरीत पीत जा, सूर्य चंद्र पाहत!!

In reply to by Bhakti

Bhakti Sat, 03/07/2026 - 16:48
एक सांगू का, तुमचं काम इंटिरियस्टिंग असेल तर सिस्टिमवर लॉग इन आलो तरी सोशल मीडिया आठवत नाही. दोन दिवस मी सिस्टिमवरच आहे पण काम नवीन आवडीचं आहे त्यामुळे सोशल मीडिया आठवलंच नाही. WFH म्हणूनच बोर आहे. काहीच माणसं दिसत नाही. रच्यकाने माजगावकर wfo आहे पण इथे माणसं कमी म्हणून बोर होतं :) थोडं तरी स्पर्धात्मक वातावरण हवं ;)

श्रीगुरुजी Sat, 03/07/2026 - 16:47
भारताला अमेरिकेने ३० दिवस रशियन तेल विकत घेण्याची अनुमती दिली हा दावा वाचून हसायला आले. मुळात भारताने रशियाकडून तेल विकत घेणे थांबविले नव्हते ना तेल विकत घेण्यासाठी अमेरिकेची अनुमती मागितली होती. गेले वर्षभर ट्रंप भारताला दरडावत आहे की रशियाकडून तेल घेऊ नका. भारत आपल्या धमक्यांकडे दुर्लक्ष करतोय हे पाहून ट्रंपने चवताळून आयातशुल्क वृद्धी केली. तरीही भारताने लक्ष न देता तेलखरेदी सुरूच ठेवली. आता ट्रंपच्या अधिकाऱ्याने परस्पर घोषणा करून ट्रंपप्रमाणे स्वतःस हास्यास्पद बनवून घेतले. भारताने अत्यंत प्रगल्भपणे ट्रंपच्या कोणत्याही दाव्याचा प्रतिवाद न करता संपूर्ण दुर्लक्ष करून ट्रंपला अदखलपात्र केले आहे. याच विषयावर How India had the last laugh after Trump's Russian oil waiver हा उत्कृष्ट लेख वाचनात आला.

माहीत नाही का? पण मला हे युद्ध तिसऱ्या महायुद्धात बदलेल असे वाटतेय, हे कोरोनासारखे होईल असे वाटतेय, कोरोना आला तेव्हा पहिले एक दोन महिने आपल्याला काही पडली नव्हती कारण तो तिकडे चीनमध्ये होता जसजसा मार्च उलटू लागला तसतसा आपल्याकडे परिणाम दिसू लागला.

तिसरं महायुद्ध वगैरे नाही झालं तर चांगल आहे. उलट जे चालू आहे ते पण लवकरात लवकर बंद व्हायला पाहिजे. लवकरात लवकर ट्रम्पला अमेरिकेने घरी बसवयला पाहिजे. बायडेन अध्यक्ष असतानाच त्याला त्याच्या पक्षाने बदलला असता तर कदाचित ट्रम्प आलाही नसता.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आग्या१९९० Sat, 03/07/2026 - 22:36
इराणमध्ये खामेनी गेल्यावर बंडाळी होईल आणि युद्ध लांबणार नाही अशी स्वप्ने बघणाऱ्या ट्रम्पला पळावे लागणार हे नक्की. रशिया आणि चीनला मध्ये पडावे लागणार नाही.

मला वाटतय नाही, अमेरिकच्या दादगिरीविरुद्ध दुसरे टोक उभे राहण्याची ही योग्य संधी आहव मी चिन ती भूमिका निभावेल, अजूनही चीनच्या गोटातून हालचाल का नाही हे कळत नाहीये. अजून १५ दिवस वाट पाहून मग चिन प्रत्यक्षात मैदानात उतरेल. ह्या सगळ्यात प्रचंड वाट जगाची लागणार आहे!

श्रीगुरुजी Sun, 03/08/2026 - 08:59
दोन वेगवेगळ्या विमान कंपन्यांनी विमान शेवटच्या क्षणी रद्द केल्यानंतर शेवटी तिसऱ्या विमानाने काल मध्यरात्री मुंबईत परतलो. आता पुण्यात यायला निघालोय. मुंबईत एक बदल दिसला. विमानतळापासून दादरपर्यंतच्या बहुसंख्य दुकानांवर दुकानाचे नाव मराठीत लिहिलेले दिसले.

तिता Mon, 03/09/2026 - 07:37
इस्रायलने इराणच्या तेलसाठ्यांवर हल्ला केला आहे. ह्याचा बदला घेण्यासाठी इराण असा हल्ला सौदी, यूएई, बहरैन, कतार, कुवेत मध्ये करू शकतो. असे झाले तर जगावर गंभीर परिणाम होतील. इराणचे अरब जगताशी कित्येक शतकांचे वैर आहे. पण ह्या युद्धात इराण व्यतिरिक्त अरबांचेच मोठे नुकसान आहे. बरे, ते हे युद्ध लढत पण नाही आहेत. सर्व वैर बाजूला ठेऊन अरबांनी ह्या युद्धाचा विरोध केला पाहिजे. हे युद्ध म्हणजे संपूर्ण जगाचे नुकसान आहे.

कोण Mon, 03/09/2026 - 18:56
अमेरिकेने हे युद्ध सुरू करण्याचे कारण काय असू शकते यावर चर्चा करूया. काही काळासाठी मोदी, राहुल, सोनिया आणि तुमच्या सर्व आवडत्या पात्रांना बाजूला ठेवा. मला वाटते की हे युद्ध AI आणि डेटा सेंटर नियंत्रणाबद्दल आहे. डेटा सेंटरला भरपूर ऊर्जेची गरज आहे आणि चीनला इराण आणि बहुधा व्हेनेझुआला येथून खूप स्वस्त तेल मिळत आहे. जर अमेरिका या उर्जेवर नियंत्रण ठेवू शकली तर ते चीनची गती कमी करू शकते. युद्ध सुरू झाल्यानंतर, जटिल परिस्थितीचा हवाला देत चीनने अलीकडच्या काळात आपले वाढीचे लक्ष्य कमी केले आहे. आता आणखी एक चीन समर्थक क्युबा अमेरिकेच्या हाती पडणार आहे. त्यामुळे, मला वाटते की या युद्धात आणि इतर यूएस कृतींमध्ये आणखी बरेच काही आहे कारण त्यांना चीनची गती कमी करायची आहे आणि पृथ्वीवरील दुर्मिळ सामग्रीच्या ब्लॅकमेलिंगला धक्का बसवायचा आहे. तुम्हाला काय वाटते?

In reply to by कोण

साहना Tue, 03/10/2026 - 00:12
तेल आणि अमेरिकन युद्धाचा संबंध नाही. एके काळी होता पण आता नाही. अमेरिकन अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून नाही. तेल कंपन्या पहिल्या दहा मध्ये सुद्धा नाहीत. फ्युजन आणि ते सिद्ध होईपर्यंत साधारण आण्विक ऊर्जा हे प्रमुख ऊर्जेचे स्रोत असणार आहेत. चीन, भारत, अमेरिका ह्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहेत. मोठ्या अमेरिकन कंपन्या जसे मायक्रोसॉफ्ट, गुगल इत्यादींनी आण्विक प्रकल्प विकत घेणे सुरु केले आहे. सध्या अमेरिका तेल निर्यात करते आयात करत नाही. इराण युद्धाने रशियन क्रूड ची डिमांड पुन्हा वाढली हे युरोप आणि अमेरिका साठी भूराजकीय नुकसान आहे. युद्धाचा खर्च आणि तेल ह्यांचे गणित बसत नाही. उदाहरण द्यायचे तर जमिनीतील तेलाची किमंत शून्य. तेल बाहेर काढले तरच त्याला किमंत आहे. ते बाहेर काढण्यासाठी आधी खर्च करावा लागतो. म्हणजे व्हेनेझुएला मध्ये १०० डॉलर्स चे तेल जमिनीत आहे तर ते बाहेर काढण्यासाठी, रिफायिं करण्यासाठी ३० - ४० डॉलर्स खर्च आधी होतात. त्याशिवाय भांडवल खर्च सुद्धा आहे. ते तेल मिळविण्यासाठी युद्ध करायचे तर आधी ५०० बिलियन डॉलर्स खर्च करावे लागतात. ते गणित जुळत नाही. इराक युद्धाचा खर्च हा इराक मधील एकूण तेलाच्या किमतीच्या साधारण ५०% होता. म्हणजे तेल बाहेर काढायचा खर्च धरल्यास एकूण नुकसान होते. अमेरिकन युद्धे हि नेहमीच अनेक कारणासाठी होतात (multi causal). इराण युद्धाचे प्रमुख कारण इस्राएल हे आहे. बीबी ना आपली सत्ता ठेवण्यासाठी देशाला युद्धाच्या खाईत कायम ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी अनेक अमेरिकन राजकर्त्यांनी आपल्या भयोपदानांत अडकवले आहे. ट्रम्प साहेबांच्या अंगावर एप्सटिन प्रकरण शेकत आहे. जनतेचा बुद्धिभ्रम करण्यासाठी काहीतरी इतर प्रकरण आवश्यक आहे. इस्राएल चा साम्राज्यविस्तार, ट्रम्प साहेबाना diversion, आणि त्यातून चीन चे नुकसान झाल्यास आणखीन फायदा हे हेतू आहेत असे वाटते. इराक मधील युद्धासाठी इस्राएल कारणीभूत होता. त्याशिवाय ट्रम्प ऍडमिन मधील लोकांची. भांडणे सुद्धा इथे कारणीभूत आहेत. जे डी वन्स हे ट्रम्प आणि पीटर थील ह्यांनी रस्त्यावरून उचलून आणलेल्या कुत्र्याप्रमाणे आहेत. ट्रम्प साहेबानी भुंक म्हटले कि वन्स त्या दिशेने भुंकतात. हा गुण सध्या त्यांच्यासाठी चांगला असला तरी पुढील निवडणुकीत त्यांच्या अंगाशी येणार आहे. म्हणून रुबिओ आणि हेगशेठ हे आपली फिल्डिंग लावत आहे. युद्धे टाळणे हे वन्स ह्यांचे पालुपद होते. युक्रेन युद्ध अजून चालू आहे, व्हेनेझुएला मध्ये अमेरिकन हस्तक्षेप, आता इराण युद्ध, पुढे म्हणे क्युबा मध्ये हल्ला हे सर्व वन्स ह्यांना डिफेन्ड करणे कठीण जाईल. ह्या उलट हेगशेठ आपण स्वतः राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत उडी घेतील अशी अपेक्षा आहे. त्यासाठी अमेरिकेला युद्धांत भाग घेणे आवश्यक आहे. जेव्हडी युद्धे जास्त तितके हेगशेठ ह्यांना आपला उदो उदो करून घेणे शक्य होईल. त्याशिवाय इस्राएल जे अनेक अमेरिकन नेत्यांना दावणीस बांधून ठेवत आहे त्याचा सुद्धा पाठिंबा त्यांना मिळू शकतो. युद्ध चुकीच्या गृहीतकांवर आधारित आहे. काही विमान हल्ले केल्यास इराण कोसळेल, यादवी माजेल इत्यादी होरा ट्रम्प साहेबांचा असावा. पण तो सपशेल चुकीचा ठरला आहे. खोमिनी ह्यांना मारून सुद्धा काहीही विशेष साध्य झाले नाही. खोमेनी हे इराण आण्विक अस्त्रांच्या विरुद्ध होते. इराण कडे आज आण्विक अस्त्रें नाहीत ह्याचे प्रमुख कारण खोमेनी आहेत. त्यांनाच ठार मारून आण्विक अस्त्रे इराण मिळवणार नाहीत हे तर्कशुद्ध नाही. इस्राएल चे फार नुकसान करण्याची क्षमता इराण कडे नाही. माझी जवळची मैत्रीण IDF मध्ये कार्यरत होती आणि तिचा काही परिवार इस्राएल मध्ये आहे. त्यांच्या मते तेल अवीव वर दिवसाला १०-१५ क्षेपणास्त्रें येतात त्यातील बहुतेक हवेत नष्ट केली जातात पण एखाद दुसरे खाली कोसळते. पण दुबई इत्यादी ठिकाणी मात्र हल्ले जास्त प्रभावी आहेत. इस्राएल प्रमाणे त्यांच्याकडे क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा कार्यरत नाही. ह्या हल्ल्यांनि त्याच्या जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. इस्राएल इराण च्या भांडणात "मुझे क्यू पिटा ?" हाच प्रश्न त्यांची मंडळी विचारात आहेत. पण त्याच वेळी इराण हे एक जुने राष्ट्र आहे. लोकांची संस्कृती जुनी आहे. त्यामुळे हा देश अचानक कोसळेल हि शक्यता कमी आहे. इराण मध्ये सर्वत्र असंख्य क्षेपणास्त्रे जमिनीत ठेवली आहेत. त्याशिवाय इराण असंख्य शाहिद यन्त्रभ्रमर निर्माण करतो. ह्याची किंमत सुद्धा त्यांच्या साठी कमी आहे. त्यामुळे अमेरिका, इस्राएल चे वर्चस्व असले तरी इराण अगदीच अबला नारी नाही. युद्ध जास्त काळ टिकले तर अमेरिका इस्राएल ला अब्जावधींचे नुकसान रोज सोसावे लागते. ३५,००० डॉलर्स च्या यन्त्रभ्रमर साठी १० मिलियन डॉलर्स ची यन्त्रभ्रमर विरोधी अस्त्रे वापरावी लागतात. हे किती काळ टिकू शकते ?

कोण Mon, 03/09/2026 - 19:04
आणखी एक निरीक्षण म्हणजे हवाई दलापेक्षा अमेरिका इराणच्या नौदलाला अधिक लक्ष्य करत आहे. अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवायचे आहे, असे यावरून स्पष्ट होते. जर ते यावर नियंत्रण ठेवू शकले तर कमी-अधिक प्रमाणात ते स्वस्त तेलाच्या स्त्रोतापासून चीनची गळचेपी करू शकतात. "चीन रीअर अर्थ मटेरियल ब्लॅकमेलिंगला हे मोठे काउंटरवेट असेल."

सुबोध खरे Mon, 03/09/2026 - 19:34
इस्रायलला इराणच्या अणुप्रकल्प बंद करायचा आहे आणि हमास, हुती, आणि हिझबुल्लाह च्या मुळावरच कुर्हाड घालायची आहे. याची कारणे मी वर दिलेली आहेतच अमेरिकेचा हेतू चीनवर नियंत्रण ठेवायचे आहे यात व्हेनेझुएला आणि इराण हे दोन चीनला तेल पुरवणारे दोन देश याना वेसण घालायची आहे याशिवाय इराण चीनला युआन चलनात तेल विकत होता. त्यामुळे डॉलरच्या मक्तेदारीवर निर्बंध येत होते. ब्रिक्स देश या डिडोलारायझेशन मध्ये अग्रेसर होते. त्यात रशिया विरुद्ध युक्रेनला उभे करून त्यांनी रशियाच्या तेलावर निर्बंध टाकले आता या युद्धात चीनला शह द्यायचा आहे. कारण चीनने दुर्मिळ धातू वर निर्माण केलेली मतदारी अमेरिकन कंपन्यांच्या गळ्यात एक धोंड झालेली आहे त्यातून मुक्तता करणे हा एक हेतू आहे. तैवान हा चीनच्या अस्मितेचा भाग आहेअमेरिकेला तैवान बद्दल अजिबात प्रेम नाही पण चीनच्या गळ्यात अडकलेले ते हाड ते अजिबात काढणार नाहीत. तैवान मध्ये होत असणाऱ्या अर्धवाहक चिप्स (semiconductor chips) चीनच्या हाती पडू नये इतकाच हेतू आहे. त्यामुळे तैवानला चिप्स च्या बदल्यात शस्त्रास्त्रे विकून अमेरिका आपल्याच कंपन्यांची धन करत असते. राहिला भारत दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील. हे तिन्ही देश सध्या तरी अमेरिकेच्या तुलनेत तसे लहान आहेत पण त्यांनी मोठे होऊ नये म्हणून त्यांच्यावर टेरिफ लावून सध्या तरी त्यांना गप्प बसायला लावले आहे. बाकी अमेरिकेशी दोन हात करण्याची भारताची सध्या तरी स्थिती नाही. त्यांची अर्थव्यवस्था आपल्या अर्थव्यवस्थेच्या सहा पट आहे तर चीनची तिप्पट. तेंव्हा सध्या सुसरबाई तुझी पाठ मऊ म्हणणारे आपल्याला आवश्यक आहे. सा \ध्या अन्नधान्यात स्वयंपूर्ण होऊन आपलयाला जेमतेम ५० वर्षे झाली आहेत. त्यातून आपल्याला अमेरिकेच्या एक तृतीयांश जमीन असून अमेरिकेच्या चौपट लोकसंख्येचे पोट भरायचे आहे. २००३ साली आपली लोकसंख्या १०७ कोटी होती आणि २००८ साली १२० कोटी होती. म्हणजेच गेल्या पाच वर्षात आपल्या लोकसंख्येत १३ कोटी १८ वर्षावरील तरुणांची वाढ झाली आहे आता या १३ कोटी लोकांना रोजगारही पुरवायचा आहे उगाच मीच पाटील म्हणून मिशा पिळून काय साध्य होणार आहे?

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म Mon, 03/09/2026 - 19:53
>> सा \ध्या अन्नधान्यात स्वयंपूर्ण होऊन आपलयाला जेमतेम ५० वर्षे झाली आहेत. त्यातून आपल्याला अमेरिकेच्या एक तृतीयांश जमीन असून अमेरिकेच्या चौपट लोकसंख्येचे पोट भरायचे आहे. २००३ साली आपली लोकसंख्या १०७ कोटी होती आणि २००८ साली १२० कोटी होती. एवढा सगळा विचार तुंम्ही केला आहे पण असे म्हटले जाते की आपल्या सरकारने अमेरिकेसोबत करारामुळे आपली कृषीव्यवस्था उध्वस्त होणार आहे. शेतमालावरील निर्बंध काढून (मका सोयाबीन इ.) त्यांना भारताची बाजारपेठ का मोकळी करून दिली आहे? सरकारमधल्या धुरीणांना हे एवढं सोपं कसं समजलं नाही?

In reply to by स्वधर्म

कोण Mon, 03/09/2026 - 20:42
***************************************************************************************** AI Feedback in US-India trade deal Fully protected items include wheat, rice, maize (corn), millets, pulses, dairy (milk, butter, ghee, cheese), poultry, and meat. The ban on Genetically Modified (GM) corn and soybeans remains strictly in place ***************************************************************************************** शेतमालावरील निर्बंध काढून (मका सोयाबीन इ.) त्यांना भारताची बाजारपेठ का मोकळी करून दिली आहे? --> हि माहिती कुठे मिळेल? खूप दिवस शोधत आहे.

In reply to by कोण

स्वधर्म Mon, 03/09/2026 - 23:02
कोपायलट वरुनः Soybean, Oilseed & DDGS-Linked Losses The most significant negative impact is expected for soybean farmers and domestic oilseed processors. India is expected to allow imports of DDGS, a protein‑rich animal feed ingredient. India already has a surplus, and further inflows will depress demand for domestically produced soymeal. [newsmax.com], [deccanherald.com] Cheaper imports could push farmers to abandon oilseed crops like soybean and groundnut in favour of maize or rice, even though the government has been pushing hard for oilseed self‑sufficiency. [newsmax.com], [deccanherald.com] Duty‑free soybean oil imports (within tariff‑rate quotas) will put downward pressure on domestic edible oil prices, hurting farmers and processors. संदर्भः https://www.newsmax.com/politics/india-us-trade-pact/2026/02/09/id/1245384 https://www.deccanherald.com/india/explained-india-us-trade-pact-and-its-impact-on-millions-of-farmers-3892393#2

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Tue, 03/10/2026 - 09:36
India has approved the import of Distillers’ Dried Grains with Solubles (DDGS) from the United States under a bilateral trade agreement, granting duty concessions to ease domestic feed shortages. The imports are capped at 5 lakh tonnes, representing roughly 1% of total domestic consumption, aiming to support the poultry and dairy sectors without overwhelming domestic corn and soybean farmers

In reply to by स्वधर्म

साहना Mon, 03/09/2026 - 23:02
अन्नाची गरज जास्त तर जास्त अन्न आयात करणे बरोबर नाही का ? कमी अन्न असून फायदा कसला ? भारतीय शेतकरी अत्यंत कामचुकार, अकार्यक्षम आणि अन्नाच्या नावाखाली अक्षरशः विष लिकांच्या उदरांत ढकलत आहेत. आज काल देशांत पनीर, अंडी, दूध सर्वच भेसळ युक्त आहे. अश्यांत विदेशी आयात देशासाठी चांगली आहे. शेतकर्यानी मंडळी मग सबसिडी, लोन माफी आणि त्यासाठी विविध ठिकाणी दंगे, चौकियाच्या बाजूने वाहतूक करून इतरांना ठार मारणे, एकूणच देहाती वागणूक इतरांना देणे हे सर्व काही करत आहेत ते वेगळे आणि तरीसुद्ध सामान्य मध्यमवर्गीय माणसाने कर देऊन आणि भेसळयुक्त अन्न खाऊन ह्यांना पोसावे हि अपेक्षा.

In reply to by साहना

कपिलमुनी Tue, 03/10/2026 - 09:12
भारतीय शेतकरी अत्यंत कामचुकार, अकार्यक्षम आणि अन्नाच्या नावाखाली अक्षरशः विष लिकांच्या उदरांत ढकलत आहेत सध्या ए आय आहे त्यामुळे अभ्यास न करता सुद्धा माहिति मिळते . ती घेण्याचे कष्ट करावे लागतात . रासायनिक खते , कीटकनाशक यांचा वापर जगात कुठे किति अहे ते बघा , आणि शेतकरी भेसळ करतात की व्यापारी हे पण बघा .

In reply to by कपिलमुनी

सुबोध खरे Tue, 03/10/2026 - 09:33
साहना यांची एकंदर मते अत्यंत एकांगी आणि विशिष्ट दृष्टिकोन ठेवून आहेत. त्यामुळे मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो

In reply to by कपिलमुनी

साहना Wed, 03/11/2026 - 01:05
अकार्यक्षम - सर्वच पिकांच्या बाबतीत भारतीय शेतकरी अत्यंत अकार्यक्षम (inefficient) आहेत. प्रति एकर पीक हे अत्यंत कमी आहे. ह्याचे मूळ कारण जमिनीचे छोटे तुकडे, सिंचनाचा अभाव, आधुनिक खते, यंत्रे ह्यांचा वापर न करणे इत्यादी आहे. - मूळ कारण हे आहे कि अकार्यक्षमता हि सरकार सबसिडी देऊन वाढवते त्यामुळे ज्याची शेती करण्याची लायकी नाही तो माणूस सुद्धा शेती करतो. जमीन विक्री आणि खरेदी सुद्धा सरकारने अशक्य करून ठेवले आहे त्यामुळे शेतीतून काढता पाय घेणे सुद्धा कठीण आहे. - तांदूळ ह्या धान्याचे उदाहरण घ्या. भारत १५२ दशलक्ष टन उत्पादन करतो. चीन १४८. पण भातासाठी शेतजमीन भारतांत दुप्पट आहे. इजिप्त, चीन आणि usa भात शेतीत अग्रेसर आहेत. अन्नाच्या नावाखाली अक्षरशः विष लिकांच्या उदरांत ह्याचा पुरावा सोपा आहे. दूध भारतांतील दुधाची संपूर्ण सप्लाय चेन भेसळयुक्त आहे. गुरांना जबरदस्त इंजेक्शन्स आणि अँटी-बीओटीकस दिल्या जातात. ह्यावर कसलेही नियंत्रण नाही. गुरांना चारा नक्की काय दिला जातो हे कुणी पाहायला सुद्धा जात नाही. त्यानंतर हे प्रदूषित दूध घेऊन त्यांत विविध प्रकारची भेसळ केली जाते. [१] [२] पनीर तर म्हणे सगळीकडे सिंथेटिक आहे. [३] अंडी दुधाची जी गत आहे तीच ह्यांची सुद्धा. [४] > रासायनिक खते , कीटकनाशक यांचा वापर जगात कुठे किति अहे ते बघा , वापर किती आहे ह्या पेक्षा कसा आहे हे जास्त महत्वाचे आहे. सर्व भारतीय भाजीपाल्यांत कीटकनाशकांचे प्रमाण फारच जास्त आहे. कोंबड्याना जो खाद्य दिला जातो त्यांत सुद्धा प्रचंड प्रमाणात कीटकनाशके आहेत जी शेवटी तुमच्या शरीरांत जातात. [५] [१] https://gfm.akshayakalpa.org/read/feature-article/the-dangerous-side-effect-of-indias-dairy-boom [२] https://www.ndtv.com/food/gujarat-factory-busted-for-making-milk-with-urea-and-detergent-10969829 [३] https://timesofindia.indiatimes.com/life-style/food-news/how-to-recognize-fake-paneer-at-home/articleshow/109395959.cms [४] https://www.reddit.com/r/Fitness_India/comments/1pgo9mn/everyones_shocked_about_the_eggoz_egg_scandal_but/ [५] https://timesofindia.indiatimes.com/life-style/food-news/8-foods-with-highest-level-of-pesticides/photostory/116438610.cms

In reply to by साहना

स्वधर्म Tue, 03/10/2026 - 16:36
>> अन्नाची गरज जास्त तर जास्त अन्न आयात करणे बरोबर नाही का ? कमी अन्न असून फायदा कसला ? खरंच? १. मागील काही वर्षांपासून आपल्याकडे अन्नधान्याची कोठारे अन्न सडून जाते व त्यासाठी ओरड होत असते. खास करून एफ डी आय ला यासाठी जबाबदार धरले जाते. पण सरकारी व्यवस्था ढिम्म हलत नाही. २. अन्नधान्याचे उत्पादन जास्त झाले की भाव कोसळतात आणि शेतकर्‍याला खर्चाइतकाही भाव मिळत नाही, हमी भाव तर सोडूनच द्या. अशा परिस्थितीत आणखी अन्नधान्य आयात करुन शेतकर्‍यांचे अधिक नुकसानच होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे आपले मत अतिसुलभीकरणावर आधारित आहे असे म्हणावे लागेल. >> भारतीय शेतकरी अत्यंत कामचुकार, अकार्यक्षम आणि अन्नाच्या नावाखाली अक्षरशः विष लिकांच्या उदरांत ढकलत आहेत. आज काल देशांत पनीर, अंडी, दूध सर्वच भेसळ युक्त आहे. अश्यांत विदेशी आयात देशासाठी चांगली आहे. हा उपाय आहे? आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी! भेसळ होऊ नये, अन्न विषारी नसावे यासाठी वेगळे उपाय आहेत, जे आपण सदैव केलेच पाहिजेत. त्यासाठी आयात वाढवा म्हणजे अजब उपाय आहे.

कोण Mon, 03/09/2026 - 20:29
अमेरिका-इराण युद्धात लक्ष न दिलेली आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे झिम्बाब्वेने लिथियम निर्यातीवर बंदी घालणे. चीनची 15-20% लिथियम आयात झिम्बाब्वेमधून आहे आणि वरवर पाहता चीनवर लक्षणीय परिणाम झाला आहे. त्याच दिवशी झिम्बाब्वेने "यूएस हेल्थ एड" प्रस्ताव नाकारला कारण त्यासाठी अमेरिकेला "रीअर अर्थ" खनिजांमध्ये प्रवेश आवश्यक होता. असे दिसते की बऱ्याच गोष्टी वेगाने घडत आहेत जरी त्यांच्या दरम्यान कोणतेही त्वरित सम्न्बध दिसत नाही.

शाम भागवत Mon, 03/09/2026 - 21:31
भारताला अंदमान व निकोबारच्या दक्षिणेला समुद्रात तेल साठे सापडले म्हणतात. त्याचं उत्खनन सुरू झालं पाहिजे. भारत व चीन दोघांनी एकत्र येऊन केलं पाहिजे. याच दोन देशांना सर्वात जास्त तेल लागतय, इतिहासात तरी हे दोन देश कायमच समृध्द राहिले आहेत. जगातला पहिला दुसरा नंबर यांचाच असायचा.अपवाद ब्रिटिश राजवटीचा.

युध्दाच्या दुसर्‍या दिवशीच खामेनी हा धर्मांध म्हातारा मेला हे चांगले झाले. पण त्याबरोबरच अमेरिकेचा निर्णायक विजय व्हायला नको कारण तसे होणे म्हणजे अमेरिका आणखी माजणे असा त्याचा अर्थ होईल. सध्या अमेरिकेला निर्णायक विजय मिळणे सोडाच हे युध्द अधिकाधिक जड जात आहे अशी चिन्हे आहेत. एक तर इराणने गल्फमधील अमेरिकेच्या वेगवेगळ्या देशांमधील तळांवर हल्ले केले आहेत आणि अमेरिकेच्या THAAD या अत्यंत महागड्या संरक्षण रडार प्रणालीचे नुकसान केले आहे. तसेच लो कॉस्ट वॉरफेअरमध्ये इराण अमेरिकेला भारी पडला आहे असे दिसत आहे. दुबई, बाहरेन, सौदी अरेबिया वगैरे ठिकाणी प्रत्येक वेळेस इराणने मोठी क्षेपणास्त्रे सोडली होती असे नाही तर त्या मानाने स्वस्त असलेले ड्रोनही पाठवले. अशा स्वस्तातल्या ड्रोनना इंटरसेप्ट करण्यासाठी अमेरिकेचा मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा वापरला गेला आहे अशाही बातम्या आहेत. समजा अमेरिकेला इराणमधील सत्ता उलथवता आली तरी तो देश इराकसारखा अस्थिर राहिल हे सांगायला कोणा ज्योतिर्विदाची गरज नाही. आणि समजा इराणमधील सत्ता उलथवता न आल्याने अमेरिका पळून गेली तर त्याच सत्तेचे इराणवरील वर्चस्व अधिक घट्ट होईल. वरील एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे इराणमधील धर्मांध राजवट उलथवायचीच होती तर त्या राजवटीविरोधात आवाज उठत होता त्या तत्वांना पाठबळ दिले असते तर अमेरिकेचा हेतूही साध्य झाला असता आणि हे दोन्ही परिणाम झाले नसते. तसाही खामेनी हा म्हातारा ८६ वर्षांचा होता आणि फार काळ राहिला असता असेही नाही. युध्दात तो धर्मांध म्हातारा मेला हे चांगले झाले असले तरी अमेरिकेने हे प्रकरण अशाप्रकारे हाताळल्यामुळे तीच धर्मांध सत्ता नव्या आणि तुलनेने तरूण- म्हणजे जास्त वर्षे सत्तेत राहायची शक्यता असलेल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली अधिक प्रबळ होईल हा धोका आहे. आणि खामेनीचा मुलगा बापाच्या सत्तेविरोधात आवाज उठविणार्‍या आणि बाप मेल्यानंतर जल्लोष करणार्‍या स्त्रियांवर अजून कडकडून अन्याय आणि अत्याचार करेल हा पण धोका आहे. अमेरिकेने इराणमध्ये अजून आपले सैनिक उतरवलेले नाहीत. पण समजा आपले सैनिक उतरवले तर मात्र लिंडन जॉन्सन-रिचर्ड निक्सनचे व्हिएटनाम युध्द आणि जॉर्ज डब्लू बुशचे अफगाणिस्तान आणि इराक युध्द याप्रमाणे ट्रम्पतात्याचे इराण युध्द ठरेल. इराक आणि अफगाणिस्तानात जशी अमेरिकन सैनिकांची ससेहोलपट झाली त्याचीच पुनरावृत्ती इराणमध्ये होईल हे नक्कीच. म्हणजे हे सगळे उपद्व्याप करून तात्याने नक्की काय साध्य केले हा प्रश्न पडतोच. इराण आता तात्याच्या गळ्यातले हाडूक बनणार ही शक्यता जास्त. समजा स्वतःच्या इगोमुळे आपण हरलो हे तात्याला मान्य करायचे नसेल आणि म्हणून कडकडून हल्ला करून इराणमधील सत्ता जरी उलथवली तरी मग नंतर सत्तेत येणारे सरकार अमेरिकेच्या आशीर्वादानेच सत्तेत येणार. अफगाणिस्तानात सुरवातीला बबरक करमाल आणि नंतर महंमद नजिबुल्ला सरकारप्रमाणेच ते सरकारही होणार नाही याची काय खात्री आहे? रशिया आणि चीन अमेरिका अशी चूक कधी करते याचीच वाट बघत बसलेले असतील आणि मग १९८० च्या दशकात अमेरिकेने अफगाणिस्तानात रशियाविरूध्द जे केले तेच रशिया आणि चीन इराणमध्ये अमेरिकेविरूध्द करायचा प्रयत्न करतील ही शक्यता आहेच. मग रशियाने आपल्या कठपुतली सरकारच्या समर्थनासाठी अफगाणिस्तानात सैनिक उतरवले त्याप्रमाणे अमेरिका इराणमध्ये सैनिक उतरवणार का? आणि समजा तात्याने माघार घेतली- म्हणजे माघार घेताना आम्हीच जिंकलो असा दावा करूनच तात्या माघार घेणार पण खरी काय परिस्थिती आहे ती सगळ्यांना समजेलच. त्या परिस्थितीत अमेरिकेचे गल्फमधील मित्रदेश- सौदी अरेबिया, कतार, बाहरेन, युएई वगैरेंना तोंडघशी पाडल्याशिवाय तात्याला पळता येणार नाही. त्यातून अमेरिकेचे त्या भागातील वर्चस्व पण कमी होईल. मग नसते उपद्व्याप करून तात्याने नक्की काय मिळवले?

सुबोध खरे Tue, 03/10/2026 - 19:46
अमेरिकेची अर्थव्यवस्था जगात सर्वात मोठी आहे आणि ती इराणच्या ६० पट आहे. एखादा श्रीमंत माणूस जसा पैसा वाया गेला म्हणून जास्त फिकीर करत नाही तशीच स्थिती अमेरिकेची असते. एखाद्या मर्सिडीझ ने बैलगाडीला ठोकले तर बैलगाडीचे अपरिमित नुकसान होते. पैशात विचार केला तर ते काही हजार असेल पण बैलगाडीच्या मालकाला ते भयंकर जड जाते. या उलट मर्सिडीझ चे चार पाच लाखाचे नुकसान झाले तरी तिच्या मालकाला फार फिकीर नसते गेली १०० वर्षे जगभरात काड्या करून त्यांनी नक्की काय साध्य केले हे समजणे कठीण आहे. पण एक लाख कोटी पाण्यात गेले तर अमेरिकेला फार काही फरक पडत नाही. पण ज्या देशात षडयंत्र करतात त्या देशाची मात्र वाताहत होते. तात्या काही अमेरिकी सैनिक इराण मध्ये उतरवणार नाही. जर त्याने तसे केले तर त्याच्यासारखा मूर्ख तोच कारण कितीही झालं तरी इराणचे लोक त्यांच्यावर केलेला बॉम्बवर्षाव काही विसरणार नाहीत. आणि अमेरिकी सैनिकांचे जीव हे अमेरिकी लोकांचे मत बदलण्यास कारणीभूत होणारा सर्वात मोठा घटक आहे. तात्या इराणमधून नाक कापून बाहेर पडणार पण तो "मीच जिंकलो" म्हणून सगळीकडे टिमकी वाजवत फिरेल. मग बाकी लोक काहीही म्हणोत. काश्मीर प्रश्न १०० वर्षांपासून आहे पासून सिंदूर मध्ये ५ -६-७-८-११ विमान पडली अशी बेताल वक्तव्ये केली. मागे आपण काय बोललो होतो याबद्दल त्याला काही घेणे देणे नसते. इराक लिबिया आगगाणिस्तान निकारागुआ, चिली, व्हेनेझुएला व्हिएतनाम, फिलिपाइन्स अशा अनेक देशांच्या यादीत इराणचे नाव आले एवढंच.

आग्या१९९० Wed, 03/11/2026 - 15:51
Reliance ला अमेरिकेतील मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पात भागीदारी मिळाली. मौन बाळगल्याचे फायदे दिसू लागले. राहुल गांधी उगाच खरी भविष्यवाणी करतात ज्याला गोदी मिडिया फाट्यावर मारतात.

In reply to by आग्या१९९०

स्वधर्म गुरुवार, 03/12/2026 - 19:29
मौन बाळगण्याचे फायदे! फक्त ते फायदे देशाला नसून एका ला़डक्या उद्योगपतीला मिळालेले आहेत. मौन बाळगल्याने देशाचं मात्र कैक पट नुकसान झालेलं आहे. समर्थकांच्या मते हा आणखी एक मास्टरस्ट्रोक असावा.

आग्या१९९० Wed, 03/11/2026 - 17:13
इस्रायलवरील इराणच्या हल्ल्यांचे थेट प्रक्षेपण करण्यास मिडियाला इस्राईलच्या डरपोक सरकारन बंदी घातली आहे. नंतर दृश्य दाखवताना तेथील लोकेशन दाखवण्यास मनाई केली आहे. विश्वगुरुला फॉलो करणारा एक डरपोक सदस्य मिळाला.

सुबोध खरे Wed, 03/11/2026 - 18:35
इस्रायलवरील इराणच्या हल्ल्यांचे थेट प्रक्षेपण करण्यास मिडियाला इस्राईलच्या डरपोक सरकारन बंदी घातली आहे. पुण्यातील जोशी अभ्यंकर हत्याकांडानंतर पुण्यात किती दहशत पसरली होती हे त्यावेळेस सज्ञान असलेल्या लोकांना नक्की आठवत असेल. हि स्थिती दहा लोकांचे हत्याकांड झाले असल्यावर झाली होती. १९७९ साली स्कायलॅब पृथ्वीवर कोसळणार कदाचित भत्ता कोसळणार म्हणून भारतात किती घबराट पसरली होती हेही तेंव्हाच्या लोकांना आठवत असेल. असे असताना आपल्या देशावर होणाया क्षेपणास्त्र हल्लयाचे थेट प्रक्षेपण सार्वजनिक न्यासावर झाल्यास किती भयगंड पसरेल हे देशाच्या नेत्यांना व्यवस्थित माहिती असते तेंव्हा असे प्रक्षेपण करण्यास नकार देणे हा सामान्य प्रक्रियेचा भाग आहे. त्याला डरपोक म्हणणे म्हणजे मूलभूत प्रक्रियेबद्दल टोकाचे अज्ञान आहे. भारताची किती विमाने पडली हे भारतीय वायुदलाने ऑपरेशन सिंदूर ऐन भारत असताना सांगायला नकार दिला होता. याचे कारण त्याचा शत्रूला मनोबलात फायदा होऊ नये यासाठीच असते. हे जगजाहीर करावे हे सांगणारे राहुल गांधी एकतर मूर्ख आहेत किंवा देशद्रोही मणिपूर नागाप्रदेश किंवा कोणत्याही भागात दंगल झाली तर तेथील इंटरनेट बंद करणे हाही सामान्य प्रक्रियेचा भाग असतो कारण समाजकंटक सार्वजनिक न्यासावर अफवा पसरवण्यात पुढे असतात. आणि अशा अफवांमुळे सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेचा पार बट्याबोळ होऊ शकतो इतके मूलभूत ज्ञान आपल्याला नसावे याचे आश्चर्य वाटते.

In reply to by सुबोध खरे

आग्या१९९० Wed, 03/11/2026 - 19:48
शिशुवर्गातील विद्यार्थ्याने माझा पूर्ण प्रतिसाद लाखो वेळा वाचला तरी समजणार नाही. उगाच बालिश हास्यास्पद समर्थन करून हसू करून घ्यायचे असेल तर करा. दुर्लक्ष केले जाईल.

इराणने आता धमकी दिली आहे की गल्फ आणि इस्राएलमधील अमेरिकन टेक कंपन्या- गुगल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅमॅझॉन वगैरेंना लक्ष्य केले जाईल. तसेच इराणमधील एका बँकेवर हल्ला केला गेल्यानंतर दुबई आणि इतर भागातील फायनान्स कंपन्यांनाही लक्ष्य केले जाईल. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने दुबईतील आणि एच.एस.बी.सी ने दोहामधील आपली कार्यालये बंद केली आहेत अशा बातम्या आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही बँका अमेरिकन नाहीत. आता तात्या म्हणाला की इराणमध्ये हल्ला करण्यासारखे काही शिल्लकच राहिलेले नाही. तसे असेल तर मग इराण अगदी उघडपणे अमेरिकन कंपन्यांना लक्ष्य करू अशी धमकी कशी देत आहे? आणि त्या धमकीचा परिणामही होताना दिसत आहे. एकूणच तात्याने युध्द सुरू तर केले आहे पण इराणी आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत असे दिसते. समजा अमेरिका तिथून पळून जाईल तरी इस्राएलपासून जॉर्डन, युएई, सौदी, कतार, बाहरेन, ओमान वगैरे अमेरिकेचे मित्रदेश कुठे जाणार? इराण अमेरिकेवर थेट हल्ला करू शकणार नाही कारण त्यांच्याकडे तितक्या लांब पोचतील अशी क्षेपणास्त्रे नसावीत. पण अमेरिकेच्या मित्रदेशांना मात्र या सगळ्या प्रकारात मोठी किंमत मोजायला लागू शकेल. तात्याने सापाच्या वारूळात हात घातला आहे हे नक्की.