✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अरे कुणीतरी मला अरे-तुरे म्हणा

प
पुष्कर यांनी
Mon, 01/07/2008 - 19:57  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13054 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

स
सुनील Mon, 01/07/2008 - 20:08 नवीन

पुष्क्या....

हे कसं वाटतं? इनायकभौंनी माझा "सुन्या" केलेला आहेच!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 01/07/2008 - 20:27 नवीन

हे काय रे!सुन्या...

च्यामारी मी तुला बालपणीचा मित्र असल्यासारखे मानायचे आणी तु मात्र मला इनायकभौ,विनायकराव्,अनिवसे साहेब आणि विनायकशेठ सारखी कानाला टोचणारी 'नावं ठेवता.'असं असल तर मी पण तुम्हाला ह्याच उपाध्या लावेन.चालेल का? पुष्क्या इथं पंचायतीमधे सगळ्यांना या असल्या उपाध्या लावायचा आजार आहे बहूतेक.मला पण हे असेच परका करतात रे!किती दिवस सोसायचा हा अन्याय?आता परत कुणी अशी हाक मारली तर छोट्या डॉन्याला सुपारी देऊन 'गेम' करायला लावेन. 'पुष्क्या' नाव कसं वाटलं रे? (साधा सरळ) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Mon, 01/07/2008 - 20:55 नवीन

स्वारी .... आणि "म" ची बाधा

च्यामारी मी तुला बालपणीचा मित्र असल्यासारखे मानायचे आणी तु मात्र मला इनायकभौ,विनायकराव्,अनिवसे साहेब आणि विनायकशेठ सारखी कानाला टोचणारी 'नावं ठेवता स्वारी...चूक झाली. पुन्हा नाय करणार, इनोबा. पुष्क्या इथं पंचायतीमधे सगळ्यांना या असल्या उपाध्या लावायचा आजार आहे बहूतेक च्यायला. इथेही लोकांना "म" ची बाधा झाली?? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
छ
छोटा डॉन गुरुवार, 02/28/2008 - 14:22 नवीन

च्यायला हे काय अजून नवीन ?

"........परत कुणी अशी हाक मारली तर छोट्या डॉन्याला सुपारी देऊन 'गेम' करायला लावेन"

अरे इन्या, हे काय नाटक आहे लेका ? [ आमच्या सोलापुरात कुठल्या 'वि' ने सुरू होणार्‍या शब्दाचा अपभ्रंश होऊन तो 'इ' ने सुरू होते जसे की इन्या , इक्या , इज्या .... ]
तू तर पार आम्हाला "सुपारी किंग्"बनवून टाकलसं.
इथे आत्ताच आमच्या मागे "१२ मुल्कोकी पुलीस" लागल्याने पार्श्वभागाला पाय लाऊन पळता-पळता आमची पार वाट लागली आहे आणि त्यात तू मला सुपारी देतो म्हणून समद्या दुनवेत [ हा मिरासदारांचा शब्द ] आमच नाव खराब कर ....
म्हंजे निघूदे आमच्या नावाने अजून एक "वॉरंट" आणि होऊदे आमचे "एंन्काऊंटर" .........

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://hariprasadcoep.blogspot.com ] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
प
पुष्कर Tue, 01/08/2008 - 08:21 नवीन

चालेल चालेल

काही हरकत नाही. -पुष्क्या (ना हरकत प्रमाणपत्रवाला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 01/07/2008 - 20:09 नवीन

अरे-तुरे

बघ....मी म्हणालो तुला!!!!
  • Log in or register to post comments
प
पुष्कर Sat, 01/12/2008 - 18:27 नवीन

धन्य झालो

आणखी काय म्हणू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
व
विकि Tue, 01/08/2008 - 18:20 नवीन

काय रे

अरे ए.....पुष्क्या . एकेरी संबोधन लय आवडतय तुला काय बात काय हाय. अस्सल मराठी माणुस समोरच्याला शिव्या घालून आपलासा करतो.तेव्हा तुला शिव्या घालायची पण विनंती कर की लेका. आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments
प
पुष्कर Sat, 01/12/2008 - 18:33 नवीन

आदरणीय विकीश्वर महोदय,

सा.लो.वि.वि. * प्रतिक्रिया लिहिण्यास कारण की, आपला प्रतिसाद वाचून हसू आलं. तसे आम्ही लिंबूटिंबूच. आम्हा गरीबाची चेष्टा करताय का राव! आम्ही म्हणलं, पिझ्झा-बर्गर खाऊन कंटाळा आला, काहीतरी घरगुती होऊन जाऊ द्या; तर तुम्ही म्हणताय 'वांग चालेल का, दोडका चालेल का..' ते असो. लोभ असू द्या. चेष्टा नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि
व
विकि Sat, 01/12/2008 - 18:40 नवीन

ऐ पुष्क्या

आपला प्रतिसाद वाचून हसू आलं. हसणे,रडणे हे तुझ्यावर अवलंबुन आहे त्यामुळे तुला हसु आल काय नी रडू आल काय ते तुझ तु बघ . आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्कर
स
सुधीर कांदळकर Sun, 01/13/2008 - 20:01 नवीन

हे खरे नाही.

मालवणी माणूस शिव्यांची लांबलचक माळ लावू शकतो. परंतु मागेपुढे पाहून. खास करून एकाच्या शेतातील तरवा (पेरणीनंतर उगवलेली रोपे जी नंतर उपटून वाफ्यात शिस्तबद्ध लावणी करतात.) खाल्ल्यानंतर एखाद्या बैलाने खाल्ले किंवा खाण्यास बैल घुसला तर लाखो शिव्यांची माळ लावतो. परंतु एरवी बोलतांना लौकिक दृष्ट्या छोट्यात छोट्या माणसाला देखील आदरार्थी संबोधन करतो. (एखद्या मालवण्याला भारतीय क्रिकेट चमूत घेतल्यास कांगारूंचे स्लेजिंग जरूर थांबेल. कुणीतरी सचीनला माझ्याकडे प्रशिक्षणार्थ पाठवा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि
प
प्रमोद देव Tue, 01/08/2008 - 21:28 नवीन

चुकीचा प्रचार करू नको!

अस्सल मराठी माणुस समोरच्याला शिव्या घालून आपलासा करतो. विकी उगीच चुकीचा प्रचार करू नकोस. तू वैयक्तिक तसा वागत असशीलही.पण उगाच सगळ्या मराठी माणसांबद्दल असे सरसकट विधान करून गैरसमज पसरवू नकोस.
  • Log in or register to post comments
व
विकि Wed, 01/09/2008 - 01:40 नवीन

काय रे पम्या

तुला कस माहीत मी असा वागतो ते .अस्सल मराठी माणुस कसा वागतो ते तुच सांग की आपला को.विकि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
इ
इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 01:56 नवीन

कृपया शांतता राखा...

प्रमोद काका(मला तुमचं वय माहित नाहि) आणि विक्या...आधीच इथे वातावरण ढवळून निघाले असताना,नवा वाद नको...त्यापेक्षा आपण सामंजस्याने घेऊ... अध्यक्षः मिपा शांतता समिती ('शांती' ठेवलेला) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि
प
प्रमोद देव Wed, 01/09/2008 - 09:03 नवीन

विकि आजोबा....

तुम्हाला राग आलेला दिसतोय त्यावरून नक्की तुम्ही तसे वागत असणार असे सिद्ध होतेय. आपला आज्ञाधारक नातू (पम्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि
व
विकि Wed, 01/09/2008 - 15:30 नवीन

प्रमोद देव

तुम्ही मनोगतावरील अत्यानंद आहात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
व
विसोबा खेचर Wed, 01/09/2008 - 00:29 नवीन

अरे कुणीतरी मला अरे-तुरे म्हणा

अरे कुणीतरी मला अरे-तुरे म्हणा मीही एक्सॅट्ली हेच म्हणतो...! मलाही अहो जाहो पेक्षा अरे तुरे केलेलेच जास्त आवडते! आम्ही राहतो त्या इमारतीत बच्चे कंपनीची फौजही बरीच आहे. ती तमाम बालसेना मला 'अरे तात्या' असंच म्हणते! As far as Tatyaa is concerned, 'NO aho-jaho' business please! अशी शिस्तच मी त्यांना लावली आहे. खूप धमाल येते! इथे मिसळपाववर काही एक दोन अपवाद वगळता मला सगळे अहो तात्याच म्हणतात तेही खरं तर मला आवडत नाही. तात्या आले, तात्यासाहेब बसले, तात्याराव हगले, तात्याजी पादले अशी आदरार्थी बहुवचने ऐकून ऐकून खरं तर कंटाळा आला आहे! :) खरं तर सर्वांनीच (माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्यांनीही,) मला अरे तुरे केलं तर ते मला जास्त आवडेल. पुष्करच्या या चर्चाप्रस्तावाच्या निमित्ताने मीही सर्वांना हीच विनंती करतो...! : ) मालकाला/प्रशासकाला अहो जाहो करण्याची पद्धत मिपावर नाही! :) अहो एवढंच कशाला मंडळी, तिथे आमच्या मनोगतावरदेखील जो तो, प्रशासक/वेलणकर यांना अहोजाहो म्हणत असे/अजूनही म्हणतो. आपण साला मनोगताचरचा पहिला माणूस ज्याने वेलणकराला चारचौघात आपुलकीने अरेतुरे केलंन! :) काय रे शक्तिवेलू, खरं की नाही बोल लेका! :)) असो.. तात्या.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 01/09/2008 - 02:03 नवीन

अरे तात्या......

आता ठीक आहे ना? (तुझा अरे 'तुरे' वाला मित्र) छोटी टिंगी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
इ
इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 00:42 नवीन

अरे तात्या...

तुझ्या भावना पोचल्या आणि टोचल्यासुद्धा...जाऊ दे जून्या आठवणी...आता मिपावर झकास चाललंय ना... हेच पाहिजे आपल्याला. (लोकशाही जिंदाबाद!) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
द
देवदत्त Sat, 01/12/2008 - 20:01 नवीन

बॉबी

ती तमाम बालसेना मला 'अरे तात्या' असंच म्हणते! ह्यावरून तुम्ही मला "४०५ आनंदवन" मधील बॉबीच (सुधीर जोशींनी साकार केलेला) वाटताय. मग त्यावरून 'अरे तात्या' म्हणायला हरकत नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 01/09/2008 - 09:26 नवीन

आवडले मित्रानो

मित्रहो, हा उपक्रम एकदम मस्त आहे.. आणि विशेषत: परदेशात आल्यावर याची महती जास्त पटली..खरोखरच काहीतरी अस्सल मिळाले.... ध.अ.मिराशी
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 01/09/2008 - 18:59 नवीन

अरे तात्या

ते रोशनी वगैरे काय गुंडाळले काय आणीबाणीत? आणी ते आणीबाणी काय ते कमरेचे काढुन कधी डोस्क्याला गूंडाळणार? औ..... नाना
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 02/28/2008 - 15:15 नवीन

पुष्कराक्षस ..................

पुष्कराक्षस  हे नाव चालेल का रे पुष्कुबाळा.....

सेमिराक्षस: विजुभाउ

  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा