मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गोल्ड आणि रिकामटेकडे उद्योग (अस्मादिकांचे )

आंद्रे वडापाव · · काथ्याकूट
गाभा: हा लेख, टाइमपास म्हणून केलेल्या एका प्रयोगाचा आहे, सिरिअसली घेणे /न घेणे, वाचकांच्या मर्जीवर. वाचकांनी गुंतवणूक हि मान्यताप्राप्त तज्ज्ञांकडून करावी. इथे उल्लेखलेली भांडवली बाजारातील गुंतवणूक साधने फक्त उदारहणादाखल दिलेली आहे. खरेदी विक्रीचा कोणताही सल्ला मानू नये. फक्त चर्चेपुरता वापर करावा. उत्तरदायित्वास नकार लागू. तर मी काय केले, मागील दहा वर्षांचे प्रति मासी (पर मन्थ ) गोल्ड चा परतावा (रिटर्न ) गोळा केला , आणि कृत्रिम बुद्धिमत्तेला भारावला ... आणि म्हटलं , "बाबा तुही वाच , मलाही सांग तुला काय दिसतंय ते " (टीप : जास्ती सिरिअसली घेऊ नका हा लेख, धागा लेखकास टाइम पास करण्याचा असल्याने धागा काढलाय ) g

वाचने 3543 वाचनखूण प्रतिक्रिया 14

In reply to by अमर विश्वास

don't keep all eggs in one basket
म्हणुनच म्हणत होतो की, सगळी अंडी, निफ्टी च्या बास्केट मधे ठेवू नका... थोडं थोडं फिजिकल गोल्ड सुध्दा घेतं रहा...

In reply to by आंद्रे वडापाव

अमर विश्वास 22/11/2024 - 13:11
फिजिकल गोल्ड नाही ... प्रत्यक्ष सोने हे गुंतवणूक नाही (बायको कधीच विकू देणार नाही :) ) पण गोल्ड बॉण्ड जरूर घेतो.. ५% inevstment सोन्यात आहे

In reply to by टर्मीनेटर

डोन्ट केअर फॉर धीस
तुमचं कांय ... तुम्ही पच्छास पच्छास तोला , गळ्यात घालुन फिरत असाल .. आमच्या सारख्या मिडल क्लास साठी एक एक टक्का महत्वाचा आहे .. आम्हाला केअर करावी लागते .. :)

पाषाणभेद 21/11/2024 - 10:39
हाच आलेख मतदानाचा कल आणि तरूण उत्साह असा होता. धागाकर्ता वपाडाव ने केवळ क्ष अक्ष आणि य अक्षावरील उल्लेख बदलले आहेत. असे करणे त्यांच्या लेखनकिर्तीला शोभा देणारे असेल काय असा विचार मनात आला होता तो लगोलग काढून टाकावा काय असा विचार केला असत्गांना तसे करणे अयोग्य आहे असे वाटले आणि लिहीतांना हात आखडता घेतला.

In reply to by पाषाणभेद

हाच आलेख मतदानाचा कल आणि तरूण उत्साह असा होता.
जरा चिकटवता का हिकडे तो आलेख ? मतदान कल .. मलाही पाहू देत ..

In reply to by आंद्रे वडापाव

पाषाणभेद 22/11/2024 - 03:03
घ्या. आधी लेखनातल्या विधानांसाठी विदा मागायचे, संदर्भ मागायचे. आता तर चित्र, आलेख यांचेही संदर्भ लागतात वाटतं. लेख हलका फुलका लिहीला असे लिहील्याने मी तसे लिहीले. असो. पुर्वीचे मिपा राहिले नाही.

आहो नुकतेच संपादकांनी जाहीर केले की मिपा आठरा वर्षाचे वयस्क झाले म्हणून.... जुने जाऊ द्या मरणालागुनी जाळुनी किंवा पुरुनी टाका सडत न एक्या ठायी ठाका सावध!ऐका पुढल्या हाका खांद्यास चला खांदा भिडवूनी आमच्या काकांनी सुद्धा तुतारी हाती घेतली आहे. जुने राग किती दिवस आळवायचे.