Skip to main content

जरा विचार करा, शिक्षक आणि शिक्षण कंत्राटी कसे असू शकते?

लेखक धर्मराजमुटके यांनी बुधवार, 04/10/2023 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
जरा विचार करा, शिक्षक आणि शिक्षण कंत्राटी कसे असू शकते? आजच्या लोकसत्ता मधे आलेल्या लेखाचा दूवा वरीलप्रमाणे आहे. डॉ. डी. एन. मोरे अलीकडच्या काळात शासनाने सर्वच क्षेत्राचे कंत्राटीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. वीज, रेल्वे, विमान, बँका, विमा, सैन्य इत्यादीसह अनेक सरकारी आणि सहकारी संस्था खासगी कंपन्यांना चालविण्यासाठी दिल्या जात आहेत. आता शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद राहिले नसून शिक्षक आणि सहाय्यक शिक्षकांची पदभरती नऊ खासगी सेवापुरवठादार कंपन्याकडून करण्याचा शासन निर्णय नुकताच निर्गमित केला आहे. कुशल श्रेणीत समाविष्ट शिक्षक व सहाय्यक शिक्षक पदासाठी बीएड, डीएड, पिटीसी किंवा संबंधित पदवी, पदविका, टीईटी आणि टेट पात्र व तीन वर्षाचा अनुभव असलेल्या शिक्षकांना ३५ हजार तर दोन वर्षाचा अनुभव असलेल्या सहाय्यक शिक्षकांना २५ हजार रुपये ठराविक वेतन निश्चित केले आहे. या भरतीत शिक्षकांना दिले जाणारे सेवा संरक्षण, सेवाशर्ती, वेतनवाढ, बढती आणि विशेषत: आरक्षण लागू असणार नाही. सैन्य दलात अमलात आणलेली ‘अग्निवीर’ सारखी कंत्राटी तत्त्वावरील योजना शिक्षण क्षेत्रात ‘शिक्षणवीर’ म्हणून राबविण्याचा शासन निर्णय शासकीय नोकरीसाठी आस लावून बसलेल्या हजारो पात्रताधारकांचे स्वप्न चक्काचूर करणारा आहे. त्याचे दूरगामी परिणाम समाज आणि एकूणच राष्ट्राच्या विकासावर मोठ्या प्रमाणात होणार आहेत. पुर्ण लेख इथे देत नाही. इच्छूकांनी लोकसत्तावर जाऊन वाचावा आणि चर्चा करावी.

वाचने 16067
प्रतिक्रिया 74

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

>>>ऋण काढून सण केल्यास दिवाळखोर होण्यास किती वेळ लागेल? देश गेला खड्यात ! आम्हाला आमच्या ७ पिढ्या पुरेल एवढे पैसे मिळालेच पाहिजेत ते ही काहिही काम न करता !

In reply to by सुबोध खरे

त्यातून आता गेहलोत सरकारने २०० युनिट वीज फुकट, दीड कोटी स्त्रियांना फुकट स्मार्टफोन, गॅस सिलिंडर ५०० रुपयात सरसकट १००० रुपये महिना निवृत्तीवेतन सारख्या खिरापती वाटण्याचे जाहीर केले आहे. विदेशातून काळा पैसा आणला की सर्व समस्या सुटतील. पण आणणार कोण?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विदेशातून काळा पैसा आणला की सर्व समस्या सुटतील. पण आणणार कोण? कसा आणणार? ते सांगा. श्री मोदी म्हणालेच आहेत कि जर विदेशातील काळा पैसा भारतात आणता आला तर प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये येतील इतका पैसा आपल्याच लोकांनी विदेशात पाठवलेला आहे. काही देश केवळ अशा पैशावर आपली अर्थव्यवस्था चालवतात अशी स्थिती आहे. ते तुमच्या राजनैतिक शिष्टाचार किंवा मुत्सद्दीपणाला भीक घालत नाहीत. स्वित्झर्लंड सारख्या देशाचे नाक दाबल्यावर त्यांनी अखेर २०१९ पासून आपल्याकडील काळ्या पैशाचा हिशेब देण्यास सुरुवात केली आहे. https://www.businesstoday.in/latest/economy-politics/story/black-money-… https://www.livemint.com/news/india/india-gets-fresh-set-of-swiss-bank-…. परंतु आपल्या त्याच देशद्रोही लोकांनी तो पैसा लगेच तेथून दुसरीकडे हलवायाला सुरवात केली.

विद्यार्थी आणि पालकांमुळे शिक्षकांवर आत्महत्येची वेळ दक्षिण कोरीयातील बातमी https://edition.cnn.com/2023/10/27/asia/south-korea-teachers-strike-ana… बघा भारतातले शिक्षक कित्ती कित्ती सुखी आहेत... तरी रडतात दळभद्री लेकाचे.