राम राम मंडळी, केंद्रसरकारने लॅपटॉप, टॅबलेट, आणि वैयक्तिक संगणकाच्या आयातीसाठी परवाना बंधनकारक केला आहे. आता हा परवाना म्हणजे काय वगैरे ते मला माहिती नाही. पण हा निर्णय तातडीने लागू करण्यात आला असून आता ब्रँडेड लॅपटॉप जसे की डेल, अॅपल, यांना फटका बसणार आहे म्हणे. आपल्याकडे आपण चीनकडून आणि अन्य देशातून लॅपटॉप चे सुटे भाग आयात करतो आणि मग असेंबल करुन त्यांच्या कंपन्या लॅप्टॉप विकतात वगैरे. असे समजतो. विदा नाही. इतक्या दिवस अशा आयातींना लागणा-या परवानग्यामुळे लॅपटॉप महाग होतील की कसे ? आपल्या देशातील लॅपटॉप्सना चांगले दिवस येतील ? स्वस्त मिळतील ? महाग होतील ? रोजगार मिळेल ? असे सर्व प्रश्न आहेत. आपण इतके स्वयंपूर्ण अजून नसू असे वाटते की आपण ब्रँडेड मॉडेल्सना टक्कर देऊ शकू काय ? तर त्याचे स्वरुप कसे असेल. एखादा लॅपटॉप चार-पाच वर्षानंतर त्याच्यातील वाढत्या सुविधांमुळे बदलावे लागतात किंवा आणखी काही कारणाने लॅपटॉप बदलतो. तर. भारतीय बाजारपेठेत एचसीएल, सॅमसंग, डेल, एलजी, एसर, अॅपल, लेनोव्हा आणि एचपी या ब्रँडेचीची सवय झालेल्यांना आता आयातीसाठी परवानगी लागेल. या कंपन्यांना निर्बंधांचा फटका बसेल असे समजूया.
पण आता आपल्या देशातील लॅपटॉप्स डेस्कटॉप स्वस्त होतील किंवा होणार नाहीत. 'मेक इन इंडिया' वर सरकारचा भर असल्यामुळे स्थानिक निर्मात्यांच्या उत्पादनास संधी मिळेल ? इलेक्ट्रॉनिक सामग्रीच्या एकूण वार्षिक आयातीत लॅपटॉप, टॅब्लेट, आणि वैयक्तिक संगणकाचे प्रमाण केवळ दीड टक्का आहे आणि यातील नीम्मी आयात ही एकट्या चीनमधून होते. अशा वेळी देशभरातील जनतेसाठी हे किती फायद्याचे असेल. धागा विचार विस्कळीत आहेत. पण जाणकारांकडून सविस्तर माहिती यावी हा धाग्याचा प्रपंच.
वाचने
10911
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला ही ह्या विषयावर चर्हा हवी
यामागे सरकारचा नेमका काय
यामागे सरकारचा नेमका काय उद्देश
In reply to यामागे सरकारचा नेमका काय by गवि
- स्थानिक उत्पादनाला चालना देण्यासाठी भारताचे पाऊल
- अशा हार्डवेअरच्या आयातीला फक्त विश्वसनीय भागीदारांनाच अनुमती
- अशा उपकरणांच्या सुरक्षेविषयी भारताला असलेली चिंता
अशी कारणे दिली गेली असली तरी त्यामागे मुख्यत्वे अर्थशास्त्रीय दृष्टिकोन असावा असे वाटते. रॉयटर्सच्या बातमीत म्हंटले आहे, "India's electronics imports, which include laptops, tablets and personal computers, stood at $19.7 billion in the April to June period, up 6.25% year-on-year." ह्या बातमीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच भारताची फक्त इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात जर १९.७ बिलियन डॉलर्स (तब्बल एक लाख बासष्ट हजार आठशे शहाऐंशी कोटी रुपयांपेक्षा जास्त 😱) असेल आणि त्यात प्रतिवर्षी ६.२५ % वाढ होत असेल तर हि नक्कीच विचार करण्यासारखी बाब ह्मणतां येईल. कोविड पर्वात 'वर्क फ्रॉम होम' साठी असंख्य कंपन्यांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना देण्यासाठी मागणी वाढल्याने प्रचंड प्रमाणात लॅपटॉप्सची आयात झाली होती हे जगजाहीर आहे, डेप्रीसिएशनचा मुद्दा लक्षात घेता आता तीन वर्षांनी ते लॅपटॉप्स जुने झाल्याने किंवा त्यांची 'बुकव्हॅल्यू' शून्य झाली / होऊ घातली असल्याने पुन्हा मोठ्याप्रमाणावर नवीन लॅपटॉप्सची आयात होण्याची शक्यता गृहीत धरून, "एवीतेवी परकीय चलन खर्च होणारच आहे तर किमान आयात शुल्क लावून आपल्या तिजोरीत तरी भर घालून घेऊ" असा तर सरकारचा ह्या निर्णयामागे विचार नसेल? अशी आपली माझी शंका. +१००१ बाकी बिरुटेसरांच्या "आयातींना लागणा-या परवानग्यामुळे लॅपटॉप महाग होतील की कसे ?" ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्या मते "हो, ते महागण्याची शक्यताच अधिक आहे " असे आहे! अर्थात वरील शंका आणि अंदाज हे केवळ माझ्या अर्थशास्त्राच्या अल्पज्ञानावर आधारित आहेत. येत्या काळात बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतीलच, तो पर्यंत 'वेट अँड वॉच' चे तत्व अंगिकाराणे तेवढे आपल्या हाती, अजून काय 😀जियो बुक गेल्याच वर्षी लॉन्च
पण या बेसिक क्लास मधील एक
प्रतिसाद नकारात्कमक आणि राजकीय वाटण्याची शक्यता आहे
अजूनपर्यंत तरी आयातीला
अजूनपर्यंत तरी आयातीला प्रतिबंध
In reply to अजूनपर्यंत तरी आयातीला by आनन्दा
१ नोव्हेंबर ही अंतिम तारीख
अंमलबजावणी पुढे ढकलली.
चीनी उत्पादकांना धोबीपछाड
In reply to अंमलबजावणी पुढे ढकलली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मान्य .
In reply to चीनी उत्पादकांना धोबीपछाड by प्रचेतस
चीनी उत्पादने स्वस्त आहेतच,
In reply to मान्य . by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आज भारतात स्वतःचं नावाच्या २
In reply to मान्य . by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या फायद्यासाठी.
In reply to आज भारतात स्वतःचं नावाच्या २ by चौकस२१२
ही पाहा धोबीपछाड प्राईमबुक
In reply to चीनी उत्पादकांना धोबीपछाड by प्रचेतस
हं.
In reply to ही पाहा धोबीपछाड प्राईमबुक by कंजूस
रेडीयो रीपेरिंगशिकायचो
In reply to हं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गूगल pixel फोनचा processor
हं.
In reply to गूगल pixel फोनचा processor by कंजूस
आयात निर्बंधा पेक्षा इथे जुने
आयात निर्बंधाने देशांतील
हे
In reply to आयात निर्बंधाने देशांतील by साहना
संरक्षण क्षेत्र हे पूर्णतः
In reply to हे by निनाद
कित्येक दशके आयात माला पासून
In reply to आयात निर्बंधाने देशांतील by साहना
" येथे विका पण येथे बनवा "
In reply to कित्येक दशके आयात माला पासून by निनाद
भारतात बनवण्यासाठी
बरोबर निनाद
In reply to भारतात बनवण्यासाठी by निनाद
भारतीय वाहन उद्योगाबद्दल
मारुतीचा साद्यन्त इतिहास
In reply to भारतीय वाहन उद्योगाबद्दल by सर टोबी
https://www.indiatoday.in
In reply to मारुतीचा साद्यन्त इतिहास by सुबोध खरे
https://www.lawaudience.com
In reply to मारुतीचा साद्यन्त इतिहास by सुबोध खरे
माझा प्रतिसाद
In reply to मारुतीचा साद्यन्त इतिहास by सुबोध खरे
हो
In reply to माझा प्रतिसाद by सर टोबी
अरे देवा!
In reply to हो by सुबोध खरे
अरे देवा!
In reply to हो by सुबोध खरे
आपला प्रतिसाद माझ्या साठी
In reply to भारतीय वाहन उद्योगाबद्दल by सर टोबी
भारतात मिळणारी वाहनं ही येथील
In reply to आपला प्रतिसाद माझ्या साठी by साहना
शेणच मागे धावत आले
प्रिंटर आणि कॅमेऱ्यांवर
इंपोर्ट ड्युटी वाढवणे हाच
In reply to प्रिंटर आणि कॅमेऱ्यांवर by आग्या१९९०
आयटी.
शेठ सध्या अमृत काळात
In reply to आयटी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तंत्र विभाग.
बरेच दिवस चुपचाप राहिल्यास
In reply to तंत्र विभाग. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्लीव्ह आणि पिकअप रोलर बदला.
In reply to तंत्र विभाग. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गीयर रीप्लेस.