Skip to main content

पण कधीतरी अमेरिकेच्या / पाश्चिमात्यांच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी

लेखक चौकस२१२ यांनी शुक्रवार, 20/01/2023 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
उपयोजक यांन्च्य्या धाग्यात :" पण कधीतरी अमेरिकेच्या (पाश्चिमात्यांच्या " दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी" असे होते , त्यातून हि विचार मांडत आहे आधीच क्षमा मागतो कि हे अमेरिके बद्दल नाही .. याच कारण कि "पाश्चिमात्य देश म्हणजे काही फक्त अमेरिका नव्हे " कानडा , ऑस्ट्रेल्यात , न्यू झीलंड इत्यादी देश याशिव्या जुने इंग्लंड आणि आजकाल बरेच जण आयर्लंड ला हि स्थलांतरित होतात ... याशिवाय इंग्रजी भाषा ना बोलणारे काही इयूरोप मधील देश आणि सिंगापोर आणि जपान सारखया प्रगत देशात हि लोकं कायमचे राहायला गेले आहेत ... पण खालील विचार मुखत्वे ऑस्ट्रेल्यात , न्यू झीलंड आणि कदाचित कानडा ला लागू होतील ... तर दुसरी बाजू मांडताना हे नमूद केले पाहिजे कि हे एका भारतीय स्थलनातराच्या दृष्टितीने लिहिलेले आहे त्यामुळं भारताचा संधर्भ येणारच पण त्यामागे " भारतात कसे वाईट आणि परदेशी कसे चांगले असे मांडण्याचा कोणताही हेतू नाही आणि दुसरे कि हे जे मुद्दे आहेत ते प्रश्न आहेत कि कसे हे ज्याचे त्यांने ठरवायचे आहे. जसे कि "स्वतःचे काम, संडास साफ करण्यापासून स्वयंपाक सर्व स्वतः करावे लागते इकडे " हा प्रश्न आहे कि " एक वैश्विक नागरिक म्हणून याचा उपयोग तुम्ही जगात इतरत्र वावरताना होईल" हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे प्रत्येक प्रशान बरोबर त्याची पण दुसरीबाजू लिहिण्याची इच्छाच होती पण मग त्याचे रूपांतर परत " बघा अजून एक एन आर आय इकडे कसे सगळे चांगले आहे असे लिहीत आहे " तसे होऊ नये म्हणून ते टाळले आहे १) पूर्ण वेळ ( ६ दिवस ) घरकाम + गाडी चालक हि गोष्ट फक्त "मेगा रिच" लोकानंच परवडते २) वैद्यकीय तज्ञ एकदम भेटत नाही , त्याआधी सर्वसाधारण ( जी पी ) ची भेट घ्यावी लागते ३) नोकरी करणाऱ्याला आयकर वाचवण्यासाठी भारताच्या मानाने उपाय कमी आहेत ४) छोटे उद्योग काढताना जरी सरकार अडथळा कमी असला तरी सुरवातीचे विशेष करून कोणास नोकरी वर ठेवण्याचा खर्च खूप असतो ... त्यामुळे सुरवातीला तरी जास्तीचे रोख पैसे जवळ असावे लागतात ५) आयकर ४५% पर्यंत जाऊ शकतो ६) भारतापासून दूर पडते ७) वयस्कर लोकांनां किंवा तरुण पण ज्यांचे भारतात फारसे उत्पन्न किंवा स्थापित झालेली नोकरी नाही त्यांना व्हिझिट व्हिसा मिळण्यास कधी कधी अवघड होते ८) नेहमी पेक्षा इतर गोष्टी श्कियावया लागतात ( किरकोळ दुरुस्ती + संडास साफ ते स्वयंपाक ) ९) छोट्या दुरुस्ती पासून ते स्प्लिट एयर कंडिशन बसवणे रस्ताही तंत्रांच्या कधी कधी लगेच मिळत नाही १०) भारतीय उपहारगृहे जरी अनेक असली आणि भारतीय लोकसंख्या जरी बरिच असली तरी अंतरांमुळे म्हणा किंवा इतर कारणाने "घरगुती डबा पद्धतीचे जेवण अजून तरी सर्रास मिळत नाही, एक दोन ठिकाणी ( सिडनी मध्ये) कोणतरी टी फीन सेवा सुरु केली आहे असे ऐकले आहे ११) जरी बहुतेक सर्व आणि विविध राज्यातील भारतीय पदार्थ मिळत असले तरी स्वतः प्रवासी म्हणून असे पदार्थ आणण्यावर खूपच निर्बंध आहेत , विशेष करून करून ऑस्ट्रेलियात , ( इथे न्यूझीलंड ची सफरचंदे पण येऊ देत नाहीत तर भारतातील काय आणणार कप्पाळ ) १२) अनेकदा प्रयत्न करून हि हापूस आंबा यासास्वी रित्या आणि नेहमी प्रमाणे कोणी आयात करू शकले नाही ! आणि जखमेवर मीठ म्हणजे अ ) येथे पायरी सारखा आंबा मिळतो आणि हापूस ची चटक वाढते ब ) बहुतेकडं भारतात डिसेंबर जानेवारीतच यायला जमते त्यामुळे दरवर्षी भारतात येऊन सुद्धा हापूस नशिबी नाही ... बस आता लिहिवाट नाही .. बाजारात जाऊन हापूस सरखय दिसणाऱ्या आर २ नाईचं आंबीवर ताव मारण्याची वेळ झाली ( निदान फळ तर मोठे असेल तुक म्हणे त्यातलया त्यात !) सध्या तरी एवढेच सुचतंय अजून सुचेल कि लिहीन अर्हताःत कोणास "अमेरिकेशिवाय इतर" फॉरेन मध्ये गम्य असले तर !

वाचने 19481
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

In reply to by विवेकपटाईत

> भारताची नंबर दोनची अर्थव्यवस्था नबर एकच्या किमान दुप्पट मोठी आहे. हि दोन नंबरची अर्थव्यस्था GDP वर निगेटिव्ह परिणाम करते कारण दोन नंबर चे आय हे रेंट सीकिंग प्रकारचे आहे. त्याशिवाय ती दुप्पट वगैरे आहे हा शक्य नाही कारण दोन नंबर चा माल शेवटी क्षुल्लक प्लेयर लोकांचा आहे. रिलायन्स, अडाणी, इन्फोसिस ह्या कंपन्या काही अंशतः दोन नंबर मध्ये गुंतल्या असल्या तरी एकूण धंद्यांच्या तुलनेत हा आकडा फारच कमी असतो. बिल्डर्स, राजकारणी आणि इतर लाचखाऊ आणि काही अत्यंत मोजके लोक सोडल्यास बहुतेक लोकांची दोन नंबर ची आय हि एक नंबर च्या आय पेक्षा खूपच कमी असते. आणि निव्वळ गृहीतक म्हणून हे मान्य केल्यास सुद्धा इतर देशांत सुद्धा विशेषतः ब्राझील, मेक्सिको, इंडोनेशिआ इत्यादी देशांत सुद्धा तसेच असू शकते त्यामुळे तुलनेने भारत तिथे सुद्धा मागे पडतो. > थे फ्री शिक्षण, फ्री उपचार आणि फ्री राशन आहे. हे तर प्रत्यक्षांत मागासलेल्या समाजाचे लक्षण आहे. शिक्षण भिकार दर्जाचे, उपचार कुठल्या तरी कोपऱ्यांत कुणी डॉक्टर ने पाहिले तर पाहिले दर्जाचे आणि राशन तर फक्त अति गरीब सोडून कुणी खाणार सुद्धा नाही असले. "शिक्षण" हे सध्या देश सोडून जाण्याचे प्रथम कारण आहे. एम्स सारख्या ठिकाणी आरोग्यव्यवस्था काय आहे ह्याबद्दल कोरियन मुलीने बनवलेला व्हिडिओ पहा : https://twitter.com/YujungHwang3/status/1616548339595579393 > भारतीय आरोग्यव्यवस्था भारतांत मेडिकल (खाजगी) व्यवस्था जगातील तुलनेने चांगली आहे पण फक्त तुम्हाला परवडत असेल तर. मुंबई, पुण्यात अनेक डॉक्टर्स आहेत त्यामुळे फक्त काही हजार रुपये खर्च करून डॉक्टर आणि औषधांचा खर्च होतो. बायपास, अँजिओग्राफी, गुढगे बदलणे इत्यादी गोष्टी मध्यमवर्गीयाला परवडू शकतात. पण भारतीय आरोग्यव्यवस्थेचा समग्र आढावा घ्यायचा असेल सर्वसाधारण भारतीय म्हणजे बिहारी गांवात राहणारे, उत्तर प्रदेश, ओरिसा किंवा आपल्या इथे गडचिरोली, इत्यादी ठिकाणी राहणारे ह्यांची आरोग्यव्यवस्था कशी आहे हे पाहणे गरजेचे आहे. बिहार मध्ये १००० मुलांनी जन्म घेतला तर त्यातील २७ मुले मरतात. हा एकदा २००१ मध्ये ६० होता आणि मागील २० वर्षांत कमी झाला आहे. तुलनेने हा आकडा बोत्सवाना सारख्या आफ्रिकन देशा प्रमाणे आहे. हाच आकडा मेक्सिको मध्ये १२ आहे. गोव्यांत हाच आकडा ३ आहे. महाराष्ट्रात १६ आहे. तात्पर्य : भारताच्या सरासरी बद्दल बोलायचे झाले तर सर्व भारतीयांचा डेटा पाहूनच बोलले पाहिजे, कारण बहुतेकदा आपण इतर भारतीय आपल्याप्रमाणेच असतील अशी समजूत करून घेतो पण बहुतेक भारतीय आपल्या पेक्षा खूपच गरीब आहेत आणि त्यांचे आयुष्य आणखीनच कठीण आहे. भारतीय शिक्षण, आरोग्यव्यवस्था आणि तथाकथित फुकट राशन ह्यांत गर्व बाळगण्यासारखे काहीच नसून ह्या तिन्ही गोष्टी भारताच्या अधोगतीचीच साक्ष देतात. > बाकी इथे 25 लाख पॅकेज मध्ये माणूस राजा सारखा राहू शकतो. धुणी-भांडी, साफ सफाई, कपड्यांची इस्त्री, भटकंती इत्यादि उत्तम रीतीने करता येते. स्वछता सोडल्यास भारताची स्थिति उत्तम आहे. आधी लिहिल्या प्रमाणे तुम्ही किम जोंग ऊन असाल तर नॉर्थ कोरिया हे जगांतील सर्वांत उत्तम राष्ट्र आहे ह्यांत शंकाच नाही. किंवा तुम्ही अंबानी आणि अडाणी असाल तर भारत तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. पण इथे चर्चा सर्वसामान्य माणसाची आहे. भारतीय रिपोर्ट्स प्रमाणे तुम्ही जर महिन्याला २५,००० पेक्षा जास्त कमावता तर तुम्ही देशांतील सर्वांत श्रीमंत १०% लोकांमध्ये येता. आता हा आकडा चुकीचा आहे असे धरले आणि प्रत्यक्षांत वरच्या १०% मध्ये येण्यासाठी महिन्याला १ लाख सुद्धा कमवायला पाहिजे असे धरले तरी १ लक्ष सुद्धा कमीच आहे. त्याशिवाय दोन नंबर चा पैसा हा श्रीमंत लोकांकडेच जास्त असतो म्हणजे देशांतील सर्वां गरीब ३०% लोकांकडे काहीच नाही असा अर्थ होतो. आणि हे ३०% लोक बहुतांशी जनावरां प्रमाणेच जगत आहेत असा अर्थ होतो. भारतातील काही राज्यांची आणि शहरांची तुलना पूर्व युरोपिअन देशांशी होऊ शकते. गोवा, मुंबई, चंदिगढ, बेंगलोर, सिक्कीम इत्यादी. पण हे भाग म्हणजे भारत नव्हे. बहुतेक भारतीय हे उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा आणि बंगाल भागांत राहतात.

येथील अजून काही अडचणी १) एकूण लोकसंख्येतील घटणारी तरुणांची पिढी आणि वाढणारी वयस्कर पिढी ... (जपान) , ऑस्ट्रेल्या ला २६ मिलियन वरून ३० - पुढे ५० मिलियन वर लोकसंख्या न्यायाची आहे पण घाऊक स्थनतरीत घेणे हि एकदम परवडणारे नाही , दोन्ही दृष्टिने सुख सोयी आणी पाणी / वीज आणि वर्ण भेद / मिसळ या दृष्टीने ! https://www.aihw.gov.au/reports/australias-health/profile-of-australias… नाहीतर ऑस्ट्रेल्या आणि न्यू झीलंड ला " श्रीमंत आशियायी लोकांसाठी" हजारो किमी चे क्षेत्रफळ बाजूला काढून ९९९ वर्षे लीज वर देता येईल जिथे नियम ऑस्ट्रेल्याचे असतील पण बाकी व्यवहार आशियायी असतील प्रति सिंगापोरर निर्माण करता येईल ! २) श्रीमंती मुळे "हलकी" किंवा कमी पगाराची कामे ना करण्याकडे कल ( सिंगापुर मध्ये रेस्टारंट उद्योगात आज काळ सर्वत्र फिलिपिनो दिसतात .. पूर्वी ती संख्या कमी होती ) ३) नामशेष होणारे "स्किल सेट " उदाहरण वाहन उत्पादन / बोट उत्पादन यातील तंत्र पॅसिफिक देशातून हरवून गेलाय ते आता कधी परत येण्याची शक्यता नाही क्रमांक ३ मुळे देशाची वाढणारे परावलंबत्व .. आज भारतात ४ तरी उद्योग पंखे निर्माण करतात .. पॅसिफिक देशात एक पण नसेल यातून निर्माण झालेलाल उप प्रश्न : एकाच (चीन) वर अवलंबून राह्यलमुळे झालेली पंचाईत ...

चांगली चर्चा सुरू आहे. जिज्ञासूंनी अपर्णा वेलणकर यांचे For Here or To Go हे मराठी पुस्तक जरूर वाचावे. १९४० पासून तिकडे गेलेल्या वेगवेगळ्या मराठी कुटुंबात राहून त्यांना आणि नंतरच्या पिढयांना त्यावेळी आलेल्या अडचणी, त्यांचे अनुभव, अज्ञानातून होणाऱ्या चुका (उदा. उपवासाला म्हणून खाल्लेले फ्राईज प्रत्यक्षात डुकराच्या चरबीत तळलेले असणे) आणि आज इंटरनेटच्या जमान्यात भारतातूनच सगळी माहिती मिळवून तिकडे जाणारी पिढी.. या सर्वांचा प्रवास छान टिपला आहे. या पुस्तकात बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील... .

अज्ञानातून होणाऱ्या चुका (उदा. उपवासाला म्हणून खाल्लेले फ्राईज प्रत्यक्षात डुकराच्या चरबीत तळलेले असणे)
मुळात उपवासाला तळलेले कार्बोहायड्रेट खाणेच हास्यास्पद आहे हो! ते फ्राईज डुकराच्या चरबीत तळलेले असणे आणि ती 'चूक' असणे ही तर लै लांबची गोष्ट झाली. जर अशा गोष्टी परदेशस्थ मराठी लोकांना, तेही 'अमेरिके'त गेलेल्या, चुका/समस्या वाटत असतील तर त्यांनी समुद्र वगैरे ओलांडून, मुळामुठेच्या काठाचा काही चौरस मैलांचा पवित्र परिसर सोडून स्थलांतर करून कशाला धर्म बुडवावा म्हणतो मी? - प्रायोरिटी गंडलेला हणमंतअण्णा

In reply to by हणमंतअण्णा शंक…

आता असे आहे.. मी पुस्तकाची माहिती लिहिताना १९४० पासून तिकडे गेलेल्या सगळ्या पिढ्यांचा उल्लेख केला आहे. त्यातल्या कुणीतरी या चुका केल्या असण्याची शक्यता अजिबात नाही असे का गृहीत धरत आहात? आजच्या युगात सुशिक्षित मराठी लोकं काहीतरी कारणाने ओव्हरस्टे करतात, CBP च्या फॉर्ममध्ये बिनदिक्कत डिक्लेअर कारण्यासारखे काही आणले नाही असे लिहितात आणि ट्रॅफिक पोलिसाने गाडी थांबवली की गाडीतून उतरून त्याच्याकडे चालत जातात.. इतक्या गंभीर चुका आजही लोकं "अनावधानाने" करत असतील तर मी उल्लेख केलेली (आणि पुस्तकात लिहिलेली) चूक फारच निरुपद्रवी आहे. जुन्या खोंडांना अनेक प्रथा, परंपरा आणि स्वतःच्या सवयी बदलणे सहज जमत नाही - हे सदासर्वकाळ भारतात / भारताबाहेर लागू आहे. आणि हो... कुटुंबाला प्रायोरिटी म्हणून धर्म बुडाला तरी चालेल अशी धार्मिक प्रायोरिटी मुद्दाम गंडवून ठेवून समुद्र पार केलेले अनेक आजीआजोबा लोकं जवळून बघितले आहेत.