पण कधीतरी अमेरिकेच्या / पाश्चिमात्यांच्या दुसर्या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी
उपयोजक यांन्च्य्या धाग्यात :" पण कधीतरी अमेरिकेच्या (पाश्चिमात्यांच्या " दुसर्या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी"
असे होते , त्यातून हि विचार मांडत आहे
आधीच क्षमा मागतो कि हे अमेरिके बद्दल नाही .. याच कारण कि "पाश्चिमात्य देश म्हणजे काही फक्त अमेरिका नव्हे "
कानडा , ऑस्ट्रेल्यात , न्यू झीलंड इत्यादी देश याशिव्या जुने इंग्लंड आणि आजकाल बरेच जण आयर्लंड ला हि स्थलांतरित होतात ... याशिवाय इंग्रजी भाषा ना बोलणारे काही इयूरोप मधील देश आणि सिंगापोर आणि जपान सारखया प्रगत देशात हि लोकं कायमचे राहायला गेले आहेत ...
पण खालील विचार मुखत्वे ऑस्ट्रेल्यात , न्यू झीलंड आणि कदाचित कानडा ला लागू होतील ...
तर दुसरी बाजू मांडताना हे नमूद केले पाहिजे कि हे एका भारतीय स्थलनातराच्या दृष्टितीने लिहिलेले आहे त्यामुळं भारताचा संधर्भ येणारच पण त्यामागे " भारतात कसे वाईट आणि परदेशी कसे चांगले असे मांडण्याचा कोणताही हेतू नाही आणि दुसरे कि हे जे मुद्दे आहेत ते प्रश्न आहेत कि कसे हे ज्याचे त्यांने ठरवायचे आहे.
जसे कि "स्वतःचे काम, संडास साफ करण्यापासून स्वयंपाक सर्व स्वतः करावे लागते इकडे " हा प्रश्न आहे कि " एक वैश्विक नागरिक म्हणून याचा उपयोग तुम्ही जगात इतरत्र वावरताना होईल" हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे
प्रत्येक प्रशान बरोबर त्याची पण दुसरीबाजू लिहिण्याची इच्छाच होती पण मग त्याचे रूपांतर परत " बघा अजून एक एन आर आय इकडे कसे सगळे चांगले आहे असे लिहीत आहे " तसे होऊ नये म्हणून ते टाळले आहे
१) पूर्ण वेळ ( ६ दिवस ) घरकाम + गाडी चालक हि गोष्ट फक्त "मेगा रिच" लोकानंच परवडते
२) वैद्यकीय तज्ञ एकदम भेटत नाही , त्याआधी सर्वसाधारण ( जी पी ) ची भेट घ्यावी लागते
३) नोकरी करणाऱ्याला आयकर वाचवण्यासाठी भारताच्या मानाने उपाय कमी आहेत
४) छोटे उद्योग काढताना जरी सरकार अडथळा कमी असला तरी सुरवातीचे विशेष करून कोणास नोकरी वर ठेवण्याचा खर्च खूप असतो ... त्यामुळे सुरवातीला तरी जास्तीचे रोख पैसे जवळ असावे लागतात
५) आयकर ४५% पर्यंत जाऊ शकतो
६) भारतापासून दूर पडते
७) वयस्कर लोकांनां किंवा तरुण पण ज्यांचे भारतात फारसे उत्पन्न किंवा स्थापित झालेली नोकरी नाही त्यांना व्हिझिट व्हिसा मिळण्यास कधी कधी अवघड होते
८) नेहमी पेक्षा इतर गोष्टी श्कियावया लागतात ( किरकोळ दुरुस्ती + संडास साफ ते स्वयंपाक )
९) छोट्या दुरुस्ती पासून ते स्प्लिट एयर कंडिशन बसवणे रस्ताही तंत्रांच्या कधी कधी लगेच मिळत नाही
१०) भारतीय उपहारगृहे जरी अनेक असली आणि भारतीय लोकसंख्या जरी बरिच असली तरी अंतरांमुळे म्हणा किंवा इतर कारणाने "घरगुती डबा पद्धतीचे जेवण अजून तरी सर्रास मिळत नाही, एक दोन ठिकाणी ( सिडनी मध्ये) कोणतरी टी फीन सेवा सुरु केली आहे असे ऐकले आहे
११) जरी बहुतेक सर्व आणि विविध राज्यातील भारतीय पदार्थ मिळत असले तरी स्वतः प्रवासी म्हणून असे पदार्थ आणण्यावर खूपच निर्बंध आहेत , विशेष करून करून ऑस्ट्रेलियात , ( इथे न्यूझीलंड ची सफरचंदे पण येऊ देत नाहीत तर भारतातील काय आणणार कप्पाळ )
१२) अनेकदा प्रयत्न करून हि हापूस आंबा यासास्वी रित्या आणि नेहमी प्रमाणे कोणी आयात करू शकले नाही ! आणि जखमेवर मीठ म्हणजे अ ) येथे पायरी सारखा आंबा मिळतो आणि हापूस ची चटक वाढते ब ) बहुतेकडं भारतात डिसेंबर जानेवारीतच यायला जमते त्यामुळे दरवर्षी भारतात येऊन सुद्धा हापूस नशिबी नाही ... बस आता लिहिवाट नाही .. बाजारात जाऊन हापूस सरखय दिसणाऱ्या आर २ नाईचं आंबीवर ताव मारण्याची वेळ झाली ( निदान फळ तर मोठे असेल तुक म्हणे त्यातलया त्यात !)
सध्या तरी एवढेच सुचतंय अजून सुचेल कि लिहीन अर्हताःत कोणास "अमेरिकेशिवाय इतर" फॉरेन मध्ये गम्य असले तर !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
> हे एवढे सोपे आहे का?
अजब न्याय वर्तुळाचा !
> एकीकडे कायदेशीर रित्या येऊन
* रॉजर रॉस नावाचा एक माणूस
तुलना
भारताची तुलना चीन, मेक्सिको
श्री साहना, चित्राबद्दल
भारताची नंबर दोनची
ह्या असमानते मुळे भारतीय
जकार्ता चे दरडोई उत्पन्न ५७
साहना मी लिहिताना थोडी चूक
श्री साहना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
असो मूळ धागा हा पाश्चिमात्यांच्यात काय प्रश्न , अडचणी आहेत
पाश्चात्य ह्या विषयावरील आपला
तुम्ही हळु हळु शांतीप्रिय
एकूण सामंत यावर भर असल्याने
माझे जपानमधील काही अनुभव.
हे बघा ऐका आणि सांगा
थोडीच बघली. चांगली हजामत केली आहे.
भारताची नंबर दोनची
> भारताची नंबर दोनची
अजून काही अडचणी
For Here or To Go - अपर्णा वेलणकर
हे पुस्तक वाचलंय. काही वर्षे
अज्ञानातून होणाऱ्या चुका (उदा
प्रायोरिटी ?