मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

PCMC मध्ये जुनी मासिके दिवाळी अंक.

Nishantbhau · · काथ्याकूट
नमस्कार, PCMC भागात जुने दिवाळी अंक आणि जुनी मासिके कुठे मिळू शकतात. मी डांगे चौकाजवळ राहतो. आस पास जर एखादे दुकान असेल तर कृपया माहिती द्या.

वाचने 4945 वाचनखूण प्रतिक्रिया 12

योगी९०० 07/01/2022 - 15:21
ते आम्हाला कशाला इचारते... ? ते कोणला तरी घाटीला इचारून घे नी..

प्रसाद गोडबोले 07/01/2022 - 16:34
PCMC
हे म्हणजे अगदीच खडा लागल्यासारखे झाले अन अचानक नवीन कल्पना मनात आली. माचुपिचु च्या धर्तीवर PCMC चे नामकरण

पिंपुचिंचु

असे करायला काय हरकत आहे ?

In reply to by प्रसाद गोडबोले

चौथा कोनाडा 07/01/2022 - 18:04
पिंपुचिंचु
.... लै भारी मार्कस राजे !

😀

आमचा एक मित्र PCMC मध्ये कामाला होता, आम्ही त्याला "मिसीसीपी" त आहे असं म्हणायचो !

तर्कवादी 07/01/2022 - 16:58
पिंपरी चिंचवड लिंकरोडला अजिंक्य न्युज पेपर एजन्सीला मिळू शकतील (लोकेशन) किंवा इतर कोणत्याही न्युज पेपर एजन्सीवाल्यांकडे बघू शकता.

मुक्त विहारि 07/01/2022 - 18:01
हा सर्वोत्तम पर्याय आहे ... आणि एकदम खात्रीशीर मनुष्य हवा असेल तर, निरंजन घाटे. निरंजन घाटे, हे अशा बाबतीत, ज्ञानी आहेत.

सिरुसेरि 07/01/2022 - 18:06
शब्द लायब्ररी -- कदाचित इथे मिळु शकेल . चौकशी करा . --- www.shabdabooks.com Shabda Books & Library , Opposite Sonigara Landmark building , Kaspate Wasti , Wakad

चौथा कोनाडा 10/01/2022 - 12:55
चिंचवडः बिजलीनगर ते दळवीनगर या लिंक रोडवर एक मोठे होलसेल रद्दीचे दुकान आहे, त्याच्याकडे मिळतील !

Nishantbhau 15/01/2022 - 11:40
चौथा कानोडा जी खूप आभार. आज मी त्या दुकानात जाऊन जुने दिवाळी अंक घेऊन आलो. ३०% किमती मध्ये अंक मिळतात. तिथे बरीच पुस्तके आणि कथा कादंबऱ्या आहेत.