Public memory is very short !
काहि दिवसातच लोक सगळे विसरुन जातील, घडलेली घटना पण आणी त्यावरिल प्रतिक्रिया पण :) आणी कोणी ह मुद्दा जिवंत ठेवायचा प्रयत्न केलाच तर, कशाला पुन्हा पुन्हा जुने मुद्दे उकरुन काढता आणी द्वेष पसरवता ? असे विचारायला आपलेच काहि हिंद बांधव धावतील. आणी पुन्हा एखादा हल्ला होइपर्यंत ह्याची कोण आठवण सुद्धा काढणार नाही !!
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
बडे शेहरोंमे ऐसे एखाद हादसे होते रहते है. वो ५००० लोगोंको मारने आये थे, हमने कितना कम नुकसान होने दिया
निर्लज्जतेचा कळस!!!!!
आता ठिगळं लावता येणार नाहीत....
नव्या पिढीसाठी नवं आकाश बांधायचं आहे हे खरंच! पण शासनाची तेवढी क्षमता आहे का?
जनतेची असे व्हावे ही इच्छा असली तरी त्यासाठी लागणारे कष्ट करायला जनता खरंच तयार का? इझी मनीच्या जमान्यात जन्माला आलेल्या पैशेवाल्या भारतात आरामाला कवटाळणार्या प्रत्येकाने नवं आकाश इतकं इझिली पैसे फेकून मिळणार नाहि ह्याची नोंद केली आहे का?
या घटने नंतर प्रत्येक कृतीत फक्त देशाचा "कंस्ट्रक्टीव्ह" विचार केला गेला तरी भारतीयांनी अतिरेक्यांना साफ हरवलं असं म्हणता येईल
-(गोंधळलेला) ऋषिकेश
या घटने नंतर प्रत्येक कृतीत फक्त देशाचा "कंस्ट्रक्टीव्ह" विचार केला गेला तरी भारतीयांनी अतिरेक्यांना साफ हरवलं असं म्हणता येईल
या वाक्याशी २००% सहमत.
विकासरावांचा लेख खरोखरच पुन:पुन्हा विचार करायला भाग पाडणारा आहे.
वाईटच वाटले ! किती हा निर्लज्जपणा !
पाच हजाराचा आकडा पार झाला असता तर सिरीयस मॅटर झाले असते, तो पर्यंत चलता है म्हणून सोडून देण्याची वृत्ती लैच नीच..
खरं म्हणजे आबाकडून अशी अपेक्षा नव्हती.
अवांतर : आबाचा राजीनामा येतो की काय ? मग विलासरावांचा ? मग राणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ :?
-दिलीप बिरुटे
स्वातंत्र्य मिळाल्यावर सत्तेची जी केंद्रे निर्माण झाली, जिथे जिथे सामान्य माणसाचा सरकारी खात्याशी संबध येतो तिथे तिथे ह्या नव्या राजांनी [अगदी संसद, पंतप्रधानपदापासुन सर्वात खालच्या श्रेणीचा सरकारी नोकर] सर्व पदाधिकार्यांनी आता आपण सामान्य नागरिकाचे राजे व त्याने कायम आपण म्हणु तसे वागले पाहीजे हीच अपेक्षा केली. परवा एकानी उदाहरण दिलेला बँक कॅशियर, ते प्रकाशकाकांना जातिवरुन मग तुम्ही या नोकरीत कसे हा प्रश्न हे सर्व कित्येक वर्षापासुन ठरत आलेल्या एका भ्रष्ट सामाजीक जाळ्याची जाणीव करुन देतात. मटा मधे माजी पोलीस महासंचालक इनामदार यांनी म्हणले आहे की पोलीसांनी सामान्य जनतेला आदराने वागवले नाही त्याचा विश्वास संपादन केला नाही तर पोलीसांना खबर [इंटेलीजन्स] कुठून व कसे मिळणार. मिपासंपादकीय मधे पोलीसी अनुभवांवर चर्चा झालीच आहे.
जास्त शहानिशा न करता पैसे खाउन अतिरेक्यांना पारपत्र, रेशनकार्ड, अजुन कसले कसले दाखले देणारे "सामान्य दर्जाचे" सरकारी कारकून, पैसे घेउन येणार्या सामानाची शहानिशा न घेता जाउ देणारे कस्टम अधिकारी, गुन्हेगारी पाश्वभुमी ना मिळणारा राजकीय आश्रय, या सर्वाचे परिवसन सामान्य माणसाचे खच्चीकरण करण्यात झाला. सर्व सामान्य माणसे "चलता है " ह्या मनोवृत्तीचे शिकार झाली. राजकीय नेत्यांबद्दल तर बोलायलाच नको.
आज याचेच फळ म्हणुन माननीय गृहमंत्री हे असे होणारच. मोठा उद्योजक ज्याला बहुतेक माहीत आहे की आतुन फंदफितुरी झाल्याने हे अटळ होते म्हणतो.
भ्रष्ट आचार कित्येक शतके, दशके चालवुन घेण्याच्या आपल्या समाजाच्या स्वभावामुळे आज आपण एक कोणिही यावे ....मारुन जावे समाज/ देश झालो आहोत.
मधे ३ दिवस अतिरेक्यांनी वेठीस धरले होते पण आता राजकीय पक्ष, नोकरशाही धरेल. सामान्य माणुस हा नेहमी कोणा न कोणाच्या तावडीत आहेच. कधी जात, कधी धर्म, कधी प्रादेशीक, कधी कोण किती पैसे देतो त्या हिशोबाने कोणा न कोणा राजकीय गोठ्यात स्वताला बांधुन घेणे यात आपण धन्यता मानतो. अशी लोकांचे भवितव्य कसे असणार?
अगदी उच्चशिक्षीत ते अशिक्षीत माणुस ह्या घाणेरड्या सवयी, नीच राजकारण सोडून पुर्ण देशाचा विचार स्व च्या आधी करेल तेव्हा या परिस्थीतीत बदल होईल.
सुजाण नागरीक हा नेहमीच भले तो हिंदुस्थानात असो की पाकीस्तान की बांगलादेश की सौदी अरेबिया, सुजाण नागरीक सगळ्याच देशात आज अगतीक आहे.
सर्व देशातील सरकारांनी एकत्र येउन बिमोड केल्याशिवाय हा आतंकवाद थांबणार नाही. आता हा भारताल्या कुण्या एका राजकीय पक्षाने किंवा भारत-पाक समंजस्यांने सुटणारा प्रश्न नाही. हा जगातील सर्व देशांनी एकत्र मोहीम केल्याशिवाय सुटणार नाही.
सर्वात महत्वाचे चलता है, मी कायदा कशाला पाळू ही प्रवृत्ती जरी आज सामान्य लोकांनी सोडली तरी फरक पडेल. किंबहुना हीच पहीली निर्णायक पायरी असेल.
कालच पोलीस ऑफिसर वाय पी सिंग यांच्या एका मुलाखतीत नुकत्याच घडलेल्या घटनेबद्दल त्यांनी सांगितले की विकत घेण्यापूर्वी पोलीसांची हेल्मेट्स जेव्हा चेक केली गेली, तेव्हा त्या हेल्मेट्सना बुलेट्सनी भोके पडली म्हणून पोलीसांनी ती रिजेक्ट केली परंतु वरिष्ठांकडून तीच हेल्मेट्स विकत घेण्यासाठी ऑर्डर दिली गेली...यामुळे पोलीसांमध्ये प्रचंड चीड आहे.... आता याचा अर्थ सर्वांनाच व्यवस्थित कळतो....
आता कशाकशांत पैसे खायचे बाकी आहे ? ??
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
प्रतिक्रिया
Public memory is very short
निर्लज्ज सरकारे .. आणि जनता?
+१
आबाच्या त्या वाक्याचे
हे असेच चालायचे
आपलेच लोक असे वागायला लागले की काय करायचे?
हे सगळं