कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध
या विषयाचे आधीचे संदर्भ :
१. हात, जंतू, पाणी आणि साबण
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज
३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य
४. कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण
........................
पूरक विषय : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन
.......
31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक बारसे झालेल्या कोविड१९ या आजाराने अद्यापही आपला पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी काही काळ आपण त्याच्यावर कुरघोडी केल्यासारखे वाटत होते. परंतु आता तर तो विषाणू विविध अवतार बदलून आलाय. या बदललेल्या अवतारांची काही रुपे जरा जास्तच त्रासदायक होत आहेत. दरम्यान जागतिक पातळीवर लसीकरण व्यापक स्वरूपात होत आहे. औषधोपचारांच्या दृष्टीनेही संशोधन चालू आहे पण अद्याप रामबाण असा उपाय सापडलेला नाही. एकंदरीत पाहता भारतात या आजाराची दुसरी लाट आली आहे असे म्हटले जाते. काही युरोपीय देशांनी तर त्यांच्याकडे ‘तिसरी लाट’ आली असे म्हटले आहे.
या लेखमालेच्या मागच्या भागामध्ये एका वाचक महोदयांनी निरोपाद्वारे अशी सूचना केली, की इथे चर्चेदरम्यान दिली जाणारी महत्त्वाची माहिती ही प्रतिसादांच्या रूपाने असल्याने ती विस्कळीत स्वरूपात राहते. तेव्हा अशी माहिती एकसंध वाचायला मिळाल्यास बरे होईल. त्यावर अन्य काही वाचकांशीही विचारविनिमय झाला. तसेही असा माहितीपर धागा सुमारे तीन महिने जुना झाला की त्याच्या चर्चेची जागा बऱ्यापैकी फुगलेली असते. त्यामुळे मागच्या पानांवर जाऊन काही बघायचे झाल्यास ते बऱ्यापैकी कष्टप्रद होते. यावर विचार करून मी असा एक पर्याय काढला आहे. मागच्या धाग्यातील चर्चेदरम्यान आलेली महत्त्वाची उपयुक्त माहिती संपादित करून इथे एकसंध स्वरूपात लिहीत आहे. त्यानेच या धाग्याची सुरुवात करतो.
ही महासाथ आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला तीन आघाड्यांवर लढायचे आहे :
१. लसीकरणाच्या माध्यमातून प्रतिबंध
२. औषधोपचार आणि
३. सामूहिक आरोग्यशिस्त आणि प्रशासकीय उपाय.
गेल्यावर्षीच्या अखेरीस विविध उत्पादकांच्या लसी बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. त्यातील काहींना संबंधित देशांच्या औषध प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर लोकांचे लसीकरण सुरू झाले. भारतातील लसीकरण साधारण जानेवारीमध्ये सुरू झाले. भारतात सध्या दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत या दोन्ही स्नायूंमध्ये इंजेक्शन द्वारा घ्यायच्या आहेत :
१. कोविशिल्ड : ही ‘सिरम’ने तयार केलेली असून त्यात अन्य वाहकविषाणू आणि प्रथिन-कोड हे तंत्रज्ञान वापरले आहे.
२. कोवाक्सिन : हे भारत बायोटेकने तयार केलेले असून त्यात निष्प्रभ विषाणूशी संबंधित तंत्रज्ञान वापरलेले आहे.
दोन्ही लसींचे दोन डोस घ्यावयाचे आहेत. कोवाक्सिनच्या बाबतीत ते एक ते दीड महिन्याच्या अंतराने, तर कोविशिल्डच्या बाबतीत पहिल्या डोसनंतर दीड ते दोन ( जास्तीत जास्त तीन) महिन्यांपर्यंत दुसरा डोस घेतलेला चालेल, असे संबंधितांनी जाहीर केले आहे.
अमेरिकेत मुख्यतः फायझर आणि मॉडरना या दोन कंपन्यांच्या लसी वापरल्या जात आहेत. त्या दोन्ही अत्याधुनिक अशा एम-आरएनए तंत्रज्ञानावर आधारित बनवल्या आहेत. त्याही इंजेक्शनद्वारच घ्यायच्या आहेत.
अमेरिकेत फायझर व भारतात कोवाक्सिनच्या संदर्भात २ डोस घेऊन झाल्यानंतर तिसरा डोसच्या आवश्यकतेबाबतचे शास्त्रीय प्रयोग सुरु झालेत.
कुठलीही लस परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वतः लसवंत झाले तरीही संबंधित रोगजंतूचा संसर्ग होऊ शकतो. परंतु त्या परिस्थितीत लसीकरण झाल्याचे स्वतःला प्रत्यक्ष व इतरांना अप्रत्यक्ष फायदे असे मिळतात :
१. लस घेतलेल्या व्यक्तीस तो संसर्ग जर झालाच तरी त्याचा परिणाम सौम्य असतो. तिच्या शरीरात विषाणूची घनता व आक्रमकता खूप कमी राहते. २. वरील व्यक्तीद्वारा ते विषाणू पसरवण्याची शक्यता राहते, पण तिचे प्रमाण खूप कमी असते.
अर्थात इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे इतरांना होणारा रोगप्रसार थांबेल की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. या संदर्भात अमेरिकेत एक महत्त्वाचे संशोधन चालू झाले आहे. त्यामध्ये बारा हजार महाविद्यालयीन तरुणांचा समावेश केलाय. दोन टप्प्यांत त्यांना मॉडर्नाची लस दिली जाईल. त्या प्रत्येकाजवळ एक ‘इ-डायरी ऍप’ असेल. यातील प्रत्येकजण स्वतःच्या नाकातून रोज स्वाब घेईल. तसेच ठराविक काळाने त्यांचे रक्तनमुनेही तपासणी जातील. पुढच्या टप्प्यात या तरुणांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांचीही संबंधित तपासणी केली जाईल. सुमारे पाच महिन्यानंतर या अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील. लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर लोकांच्या वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण होत आहे. त्यातील एक महत्वाचा मुद्दा असा: “लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी दुखले, जागा लाल झाली आणि थोडा ताप आला, म्हणजे ‘चांगलेच’ झाले. याचा अर्थ लस काम करीत आहे”, अशी एक सामान्य समजूत (मिथक) असते. ( नो पेन, नो गेन कन्सेप्ट). यासंदर्भात बराच शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. लसींच्या विविध प्रकारानुसार अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आलेले आहेत. लोकांमध्ये ताप येण्याचे प्रमाण तर सहसा २५ टक्क्यांवर जात नाही. एकंदरीत विदा पाहता वरील मिथक शास्त्रीयदृष्ट्या काही सिद्ध झालेले नाही. लसीमुळे शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ही प्रतिपिंडे (Ab) आणि T संरक्षक पेशी या दुहेरी स्वरूपाची असते. ती व्यक्तीनुसार कमीअधिक प्रमाणात निर्माण होते. आपले शरीर आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित अनेक घटकांवर ती अवलंबून असते. करोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकी ५ हे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evaders) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे. सद्य लसी या अजूनही विषाणूला भारी आहेत असे तज्ञ म्हणताहेत. पण बहुतेक मोठ्या उत्पादकांनी विषाणूच्या बदलानुसार लसीमधील तांत्रिक बदल सुरू केलेले दिसतात. शेवटी सतत बदल करत राहण्याऐवजी एकच सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) लस करता येईल का, याचा उहापोह चालू आहे. इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे शरीरात केंद्रीय प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते. परंतु श्वसनमार्गात स्थानिक प्रतिकारशक्ती फारशी निर्माण होत नाही. ही शक्ती देखील महत्वाची असते कारण मुख्यत्वे तिच्यामुळे एखाद्या व्यक्तीकडून दुसरीस होणारा रोगप्रसार आटोक्यात येतो. त्यादृष्टीने अशा काही लसींचे संशोधन सुरु आहे. भारतातील परिस्थिती अशी आहे: १. भारत बायोटेकने नाकाद्वारे घ्यायची लस बनवली असून त्याचे मानवी शास्त्रीय प्रयोग सुरू झालेले आहेत. २. प्रेमास बायोटेकने तोंडातून घ्यायच्या कॅप्सूलच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. तिचे प्राणीप्रयोग यशस्वी झालेले आहेत. लसींच्या जोडीने उपचारांवरही संशोधन सातत्याने चालू आहे. त्यापैकी नवीन घडामोडी : १. १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने Bamlanivimab and Etesevimab (Antibodies) या औषधांच्या संयुक्त वापराला आपत्कालीन वापराची परवानगी दिली. सौम्य ते मध्यम आजार असलेल्या रुग्णांना हे दिल्यास आजार रोखला जातो. 2. Monlupiravir : हे औषध तोंडाने घ्यायची गोळी असून त्याचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णप्रयोग काही ठिकाणी चालू आहेत. ते औषध शरीरात गेल्यानंतर करोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. तोंडाने घ्यायची गोळी हा तिचा महत्त्वाचा फायदा राहील. ३. Favipiravir (गोळी) या औषधाला भारतात ‘आपत्कालीन वापराची परवानगी’ या आधीच मिळालेली आहे. काही रुग्णांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. तरीसुद्धा त्याच्या उपयोगितेचा पुरेसा विदा अजून उपलब्ध नाही. त्याच्या वापराबाबत तज्ञांत मतांतरे आहेत. रुग्णास जर मूत्रपिंडाची सहव्याधी असेल तर हे औषध काळजीपूर्वक द्यावे लागते. ४. Ivermectin : हे पूर्वापार जंतावरील औषध कोविड रुग्णांसाठी भारत आणि दक्षिण आशियात बर्यापैकी वापरलं जातं आणि त्याचे अनुभव चांगले आहेत. मात्र WHOने त्याचा सरसकट वापर करू नये असे म्हटले आहे; सध्या ते फक्त शास्त्रीय रुग्णप्रयोगादरम्यान वापरले जावे असे सुचविले आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींमध्ये कोविड संबंधी काही संशोधन पुढे गेलेले असल्यास संबंधित जाणकारांनी जरूर भर घालावी. महासाथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि उपचारांच्या जोडीने मूलभूत त्रिसूत्री आणि गर्दी टाळण्याची शिस्त दीर्घकाळ ठेवावी लागेल. .... तर असा आहे हा गेल्या २ महिन्यातील घडामोडींचा परामर्श. खरं म्हणजे ही महासाथ जर या वर्षाच्या प्रारंभीच बरीचशी आटोक्यात आली असती तर या विषयावरील वाढत्या चर्चेचे काही कारण नव्हते. परंतु निसर्गाला अजून तरी हे मंजूर नाही असे दिसते. त्यामुळे सध्या तरी वैज्ञानिक व संबंधित सामाजिक घटनांचा आढावा घेणे एवढे आपण करूया. नेहमीप्रमाणेच प्रश्न, पूरक माहिती आणि व्यक्तिगत अनुभव अशा विविधांगी चर्चेचे स्वागत आहे. …………………………………………………In reply to इथे by हेमंतकुमार
In reply to धन्यवाद डॉक्टर by Rajesh188
In reply to पहिल्या लाटेत मृत्यूमुखी by शाम भागवत
In reply to बनावटगिरी by हेमंतकुमार
In reply to करोना’योध्दा’च… ! by हेमंतकुमार
In reply to कोरोना योध्याचे अभिनंदन by Rajesh188
In reply to आज काय आहे by गॉडजिला
In reply to ह्याचे उत्तर ह्या धाग्यावर नाही by Rajesh188
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Misirlou AcapellaIn reply to पूर्ण मान्यता by हेमंतकुमार
In reply to इस्रायल स्थिती by हेमंतकुमार
In reply to तुलनात्मक विदा by तर्कवादी
In reply to याबाबत मी एक तर्क मांडला होता by शाम भागवत
In reply to लसीकरण by Rajesh188
In reply to लसीकरण by Rajesh188
In reply to डॉ चा परवाना रद्द by हेमंतकुमार
In reply to https://www.loksatta.com/desh by मराठी_माणूस
In reply to तिसरी लाट भारतात कधी येणार by Rajesh188
In reply to तिसरी लाट भारतात कधी येणार by Rajesh188
October सुरू झालाकुठे??
In reply to महत्त्वाचे प्रतिज्ञापत्र... by हेमंतकुमार
In reply to महत्वाचे by तर्कवादी
आपत्कालीन वापर म्हणजे नेमके काय ?चांगला प्रश्न. एखाद्या नव्या औषधाला मान्यता देताना काही टप्पे असतात. जर त्या औषधाला अंतिम स्वरूपाची मान्यता द्यायची असेल, तर त्या औषधाचे रुग्णांवर पुरेसे प्रयोग करून समाधान कारक निष्कर्ष मिळाल्याचा विदा सादर करावा लागतो. सद्यस्थितीत जेव्हा मोठी साथ आलेली असते तेव्हा तातडीने काहीतरी औषध किंवा लस देणे भाग असते. पुरेसा विदा जमा होईपर्यंत थांबता येत नाही. अशा वेळेस औषध प्रशासन जो काही थोडा विदा सादर केलेला असेल त्याला अनुसरून तात्पुरत्या वापराची मान्यता देते.
In reply to महत्त्वाचे प्रतिज्ञापत्र... by हेमंतकुमार
In reply to आज सकाळीच... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थोतांड वाले गामा यांना नक्की काही तरी या सर्वांपेक्षा जास्त माहिती असणार..... धन्यकाही वर्षांपूर्वी तुम्ही एक धुळीचा कणही नव्हतात. त्यापासून तुमचं एका पूर्ण वाढ झालेल्या नरात रुपांतर कोणी केलं? त्यासाठी तुमच्या शरीराचं संरक्षण व्हायला हवं ना? हे संरक्षण करण्यासाठी अत्यंत अभ्युच्च व हुरहुन्नरी रक्षाव्यवस्था ( = sophisticated and versatile immune system ) हवी ना? त्या रक्षाव्यवस्थेस करोनाशी लढायची ताकद नाहीये म्हणे. कुठलंसं द्रव्य टोचल्याने तिला ती ताकद येणारे म्हणे. अंधश्रद्धेचं इतकं प्राणघातक उदाहरण दुसरं काही आहे का? असो. पांढऱ्या कपड्यातल्या आलोपाठी मेडिसिनल चर्चच्या कार्डीनलानं फतवा काढला की करोना हा सर्वभक्षी विषाणू आहे. यावर कोणीही कसलेही प्रश्न उपस्थित करयचे नाहीत. कळलं? मग केवळ पांढऱ्या कपड्यातल्या कार्डीनलाने मंत्रावलेलं पाणीच तुमचा जीव वाचवू शकतं. यावर कोणीही कसलेही प्रश्न उपस्थित करयचे नाहीत. कळलं ना? व्हेरी गुड. हे पाणी टोचून घ्यायचं असतं. जे पुण्यवान असतील ते वाचतील. जे पापी असतील ते सारे नष्ट होतील. यावर कोणीही कसलेही प्रश्न उपस्थित करयचे नाहीत. कळलं ना व्यवस्थित ? फ्लूचा विषाणू मारायला mRNA लस कशाला? mRNA म्हणजे messenger-RNA. हे जनुकोपचार ( Gene Therapy ) आहेत. विषाणू मारायला जनुकोपचार कशासाठी? डास मारायला कोणी रणगाडा आणतं का? करोना खरंच इतका घातक आहे की त्याची वारंवार चाचणी करावी लागते? आणि लोकांना सतत पटवून द्यावं लागतं की तुम्हांस रोग झालाय म्हणून? पण काये की एकदा आपलं ठरलंय की प्रश्न विचारायचेच नाहीत. फक्त विज्ञानाच्या नावाने ढोल बडवायचे. मग सगळं कसं परीकथेसारखं चानचान दिसू लागतं. नरेंद्र महाराज की त्यांचे कोणी भक्त कसलासा ताईत वा अंगठी द्यायचे. ती वस्तू परिधान केली की भक्ताचं रक्षण होतं म्हणे. तर मग प्रश्न असाय की : आलोपाठी सफेदकोटी बिशप आणि नरेंद्र महाराज यांच्यात नेमका फरक काय ? उत्तर : आलोपाठी अभिमंत्रित पाण्याने जीव जाऊ शकतो. नरेंद्र महाराजांच्या ताईताने जीव जात नसतो. आवडलं उत्तर? असो. घोड्यास पाण्यापर्यंत नेता येतं. पाणी मात्र त्याचं त्यानेच प्यायचं असतं. आ.न., -गा.पै.
In reply to नव्या युगाचा कर्मठ कार्डीनल by गामा पैलवान
In reply to कुठलंसं द्रव्य टोचल्याने तिला by सुबोध खरे
घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, गोवर, देवी, कांजिण्या, हिपॅटायटिस बी यांच्या लशी सुद्धा थोतांड आहेत म्हणा कि!या लशींविषयी इथे माझा एक लेख आहे : https://www.misalpav.com/node/48431 अर्थात, लेख जरी माझा असला तरी तो एका पुस्तकावर आधारित आहे. ते पुस्तक डॉक्टर सुझन हम्फ्रीज व रोमन बिस्त्रीयांक या द्वयींनी लिहिलेलं आहे. डॉक्टर सुझन हम्फ्रीज या अमेरिकेतल्या खऱ्याखुऱ्या म्हणजे मेडिकल डॉक्टर असून पेशाने मूत्रपिंडतत्ज्ञा आहेत. त्यांनी लशींकरणाविषयी प्रचंड शोधाशोध करून माहिती मिळवून २०१३ साली एक पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकाचं नाव : Dissolving Illusions - Disease, Vaccines, and The Forgotten History (2013) by Suzanne Humphries MD. हे पुस्तक येथे उपलब्ध आहे : https://drive.google.com/file/d/1ZAR7v0i5t62JOUqmPlWR2v90ntpJfXRD/view?usp=sharing या निमित्ताने तुम्हांस व डॉक्टर कुमार१ यांना विनंती करू इच्छितो. तुम्ही व/वा कुमार१ यांनी ते वाचून त्याची चिरफाड करावी. ही विनंती मी तुम्हांस यापूर्वीही केली आहे. त्यानिमित्ताने लशींचे धोके व परिणामकारकता यांविषयी बऱ्याच कल्पना स्पष्ट होतील. आ.न., -गा.पै.
In reply to लस : धोके व परिणामकारकता by गामा पैलवान
लशींचे धोके व परिणामकारकता यांविषयी बऱ्याच कल्पना स्पष्ट होतील.तटस्थपणे चर्चा व्हायला पाहिजे. आता तसंही जवळ जवळ आपण सर्वच मिपाकरांनी लस घेतलीय. आता आपल्याकडे परतीचे कोणतेही ऑप्शन शिल्लक नाहीत. संदर्भ, नवी माहिती त्याबद्दल अभ्यासपूर्ण चर्चा, व्हायला काही हरकत नाही असे वाटते. -दिलीप बिरुटे
लस म्हणजे काय आणि ती कशी आणि कितीप उपयुक्त असू शकते यावर वर्षानुवर्षे जगभर अभ्यास झालं आहे त्याकडे दुर्लक्ष कार्याचा का !कोण करतोय दुर्लक्ष ? उलट मी म्हणतोय की असा अभ्यास झालाय. तो डॉक्टर एलिझाबेथ हम्फ्री यांच्या पुस्तकात सविस्तर वर्णिलेला आहे. पण पुस्तक उघडून वाचणार कोण, इतकाच प्रश्न आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो : आजवर कुठल्याही लशीने कसलीही साथ आटोक्यात आलेली नाहीये. २.
एक साधा प्रश्न आहे अहो संपूर्ण जगातील विविध दावे आणि उजवे सगळी सरकारे या "थोतांडाला " गंडली असा तुमचा दावा आहे का?हो. फक्त त्यास 'थोतांडाला गंडणे' म्हणंत नाहीत. त्यास 'जनोच्छेदक धोरण' म्हणजे genocidal policy असं म्हणतात. हा प्रकार सुमारे १०० वर्षांपूर्वीही घडला होता. मुद्दामून केलेल्या विपरीत उपचारांमुळे स्पॅनिश फ्लू ची साथ १९१८ च्या सुमारास आली होती. हे विधान १९४८ साली हेन्रीख म्युलर ( Heinrich Mueller) या गेस्टापो प्रमुखाने दिलेली कबुली आहे. संदर्भ (इंग्रजी दुवा) : http://themillenniumreport.com/2018/01/spanish-flu-a-genocide-carried-out-by-way-of-an-influenza-pandemic/ लेख वाचायचा असेल तर वाचा अन्यथा आपण आपल्या मर्जीचे मालक. फक्त एक प्रश्न उरतोच : तुम्हाला जिवंत राहायचं आहे की सरकारला? ३.
हे जे पालुपद आहे ना तुमचे "कि प्रश्नच विचाऱ्याला बंदी का?"... खूप झाला कांगावाकांगावा? हे काय असतं? एक गंमत सांगतो. आंथनी फौचीने उघड कबुली दिलीये की पूर्वी दिलेल्या कोविड लशीची परिणामकारकता कमी होतेय. त्यामुळे लसधारकांची प्रतिकारक्षमता उणावतेय. हा घ्या इंग्रजी दुवा : https://www.nytimes.com/2021/11/12/podcasts/the-daily/anthony-fauci-vaccine-mandates-booster-shots.html?showTranscript=1 वरील लेखात waning immunity किती वेळा आलाय ते शोधा. तर मग लस घ्यायचीच कशाला? आपल्या प्रतिकारशक्तीचा ऱ्हास करवून घेण्यासाठी का? आता, यावर तुम्ही फौचीला काय प्रश्न विचाराल ? आ.न., -गा.पै.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ना मशवरा ना राय चाहिए, ठंड बढ गई... एक ग्लास चाय चाहिए |In reply to मुखपट्टी सक्ती by हेमंतकुमार
In reply to अशी सक्ती किती योग्य आहे? by सर टोबी
In reply to कोविड्ची फेज उलटुन गेल्यानंतर by सिरुसेरि
avascular narcosisसर्वप्रथम हा शब्द सुधारून घेतो: Avascular necrosis (necrosis =पेशींचा मृत्यू) खरे आहे की अशा प्रकारचे काही रुग्ण आढळलेले आहेत. १. प्रामुख्याने हा त्रास अशा रुग्णांना झाला आहे की ज्यांना स्टिरॉइड्स अधिक प्रमाणात आणि अधिक काळ द्यावी लागली होती. अधिकतर हा त्रास मांडीच्या हाडाच्या खुब्यातील भागाला होतो. २. काही रुग्णांच्या बाबतीत ती न देताही समस्या उद्भवलेली आहे. अर्थात यावर अधिक संशोधन झाल्यावरच चित्र स्पष्ट होईल.
“'डिजीज X' आहे तरी काय? जगावर घोंगावतोय महामारीचा धोका; WHO नं जारी केलाय अलर्ट”हे वाचून विचलित व्हायचे किंवा दडपून जायचे काही कारण नाही. सन 2018 मध्येच जागतिक आरोग्य संघटनेने, ‘भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या विषाणूजन्य साथींसाठी’ “डिसीज एक्स” (माहित नसलेले) हे नामकरण करून ठेवलेले आहे. हे संबोधन कुठल्याही विशिष्ट एका आजारासाठी नसून संभाव्य आजारांच्या गटासाठी आहे. जसजसे नवे विषाणू सापडत जातील ते सर्व या एक्स पंथातील घटक राहतील. किंबहुना कोविड-19 घडविणारा विषाणू या पंथातील पहिला घटक होता.
In reply to कोविड हुतात्मा दिन by हेमंतकुमार
In reply to कोविड हुतात्मा दिन by हेमंतकुमार
धन्यवाद डॉक्टर