शेअर ट्रेडिंग मध्ये मार्जिनचा वापर - दुधारी तलवार कि विन-विन?
गणेशा यांच्या शेअर मार्केटची बाराखडी भाग ० या धाग्यावर मार्जिन या विषयावर थोडी चर्चा झाली होती. त्या अनुषंगानुसार हा मार्जिन प्रकार जरा विस्ताराने उदाहरणासह पाहू म्हणजे मग ठरवता येईल ती दुधारी तलवार आहे की (माझ्या मतानुसार) विन-विन आणि त्यामानाने अतिशय कमी धोकादायक परिस्थिती आहे. मार्जिन समजण्यासाठी त्याबाबतीत वापरल्या जाणाऱ्या अजून काही व्याख्या समजणे आवश्यक आहे.
समजा माझ्याकडे २५,००० रु. आहेत आणि मी माझ्या अभ्यासानुसार अबक कंपनीचा शेअर ज्याची किंमत ५०० रु. आहे तो घ्यायचा ठरवलं आहे. आता माझ्याकडे असलेल्या २५,००० रु. त त्या कंपनीचे ५० शेअर्स घेता येतील. पण अबक कंपनीच्या शेअर वर माझा विश्वास असल्याने मला अधिक शेअर्स, समजा १०० शेअर्स, घेण्याची इच्छा आहे परंतु माझ्याकडे तेवढी रक्कम, ५००X१००=५०,००० नाहीयेत. म्हणून मी मार्जिन घेण्याचे ठरवतो.
आता मी आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक कंपनीच्या कामगिरीनुसार ब्रोकरेज हाऊस त्या कंपनीचे इनिशीयल मार्जिन टक्केवारी (initial margin percentage) ठरवतात. समजा आपल्या अबक कंपनीची अशी इनिशीयल मार्जिन टक्केवारी ३५% आहे. याचा अर्थ जर मला १०० शेअर्स घ्यायचे असतील तर मला १००X५००=५०,००० च्या ३५ टक्के, म्हणजेच ५०,०००X०.३५=१७,५००रु. इनिशीयल मार्जिन म्हणून भरावे लागतील. उरलेले ३२,५००रु. ब्रोकरेज हाउस मला मार्जिन म्हणून पुढच्या ३६५ दिवसांसाठी देईल. या मार्जिन रक्कमेवर माझे ब्रोकरेज हाऊस १३% व्याज घेते (इतर ब्रोकरेज हाउसेस चे सध्याचे व्याजदर माहीत नाहीत). म्हणजेच एक लाखाला दिवसाला साधारणपणे ३० ते ३५ रु. म्हणजेच आपल्या वरच्या उदाहरणात ब्रोकरेज हाउस ने दिलेल्या ३२,५००रु. वर दिवसाला साधारणपणे ११ ते १२ रु., महिन्याला साधारणपणे ३२५रु. म्हणजे २ महिने शेअर्स ठेवले तर साधारणपणे ६५०रु.
आता ब्रोकरेज हाउस अजून दोन गोष्टी मेंटेन करते.
१. मिनिमम मार्जिन टक्केवारी (minimum margin percentage) - हे देखील इनिशीयल मार्जिन टक्केवारी प्रमाणे प्रत्येक शेअर साठी ठरवले जाते. ही टक्केवारी साधारणपणे २० ते ४० टक्के असते. समजा आपल्या अबक शेअर साठी ही टक्केवारी ३०% आहे. ही टक्केवारी वापरून मिनिमम मार्जिन काढले जाते. मिनिमम मार्जिन = ब्रोकरेज हाउस ने दिलेले मार्जिन + त्या रक्कमेच्या ३०% (minimum margin percentage). आपल्या उदाहरणात ब्रोकरेज हाउस ने मला ३२,५०० रु. दिले आहेत. म्हणजेच माझे मिनिमम मार्जिन ३२,५०० + (३२,५००x०.३=९,७५०) = ४२,२५० असेल.
२. अवेलेबल मार्जिन (available margin) = मूळ व्यवहाराची रक्कम +/- नफा/तोटा (नफा असेल तर +, तोटा असेल तर -).
अवेलेबल मार्जिन आणि मिनिमम मार्जिन मधील अंतर खूप कमी झाले तर ब्रोकरेज हाऊस तुम्हाला अजून स्वतःचे मार्जिन भरण्यासाठी आठवण करून देईल. जर असे अधिकचे मार्जिन भरले नाही आणि जर तुमचे अवेलेबल मार्जिन हे मिनिमम मार्जिनला टच झाले किंवा खाली आले तर ब्रोकरेज हाउस तुमचे शेअर्स उडवून टाकेल.
आता या माहितीनुसार आपल्या शेअर्स च्या बाबतीत काय घडू शकते ते पाहू. आपण असे गृहीत धरू की अबक कंपनीच्या बाबतीतला माझा अंदाज घेताना असा होता की हा शेअर पुढील २ महिन्यांत २०% वाढून ६०० ला जाणार आहे. आता २ महिन्यांनी समजा तो तसा ६०० ला पोहोचला आणि माझे लक्ष्य (टार्गेट) साध्य झाले तर मी तो शेअर विकून टाकेन. मग पाहू माझा किती फायदा होईल.
(६००x१००=६०,०००(विक्रीची किंमत)) - ३२,५०० (ब्रोकरेज हाऊस चे मार्जिन) = २७,५००. यातून माझी मूळ रक्कम (इनिशीयल मार्जिन) १७,५०० आणि व्याजाचे ६५० वजा केले तर माझा नफा हा २७,५००-१७,५००-६५० = ९,३५०रु. असेल (यात ब्रोकरेज आणि एक्सचेंज टॅक्सेस धरलेले नाहीत.). दोन महिन्यांऐवजी ६ महिन्यांनी लक्ष्य (टार्गेट) साध्य झाले तर व्याज ६५० ऐवजी १९५०रु. जाईल, म्हणजेच फायदा २७,५०० - १७,५०० - १९५० = ८१५० रु. असेल.
आता दुसरी शक्यता अशी आहे की तो शेअर वर जाण्याआधी खाली गेला. समजा दोन महिन्यात हा शेअर ५०रु. पडून ४५० ला गेला. आता बघू माझे जास्तीत जास्त नुकसान किती होईल. वर काढल्याप्रमाणे आपले मिनिमम मार्जिन रु. ४२,२५० आहे. शेअर ५० रु. ने पडल्याने माझा सध्याचा तोटा ५०x१००=५,०००रु. आहे. म्हणून वरच्या अवेलेबल मार्जिन च्या सूत्रानुसार माझे अवेलेबल मार्जिन = ५०,०००-५,०००=४५,०००रु. आहे. मी जेव्हा शेअर घेतला होता तेव्हा माझा नफा/तोटा ० होता, म्हणून तेव्हा हेच अवेलेबल मार्जिन ५०,००० - ०=५०,०००रु. होते. शेअर पडत गेला तसे मिनिमम मार्जिन आणि अवेलेबल मार्जिन यातील अंतर कमी होत गेले. आता ते २,५०० रु. आहे. म्हणजेच शेअर आणखी २५ रु. ने पडल्यास (२५x१००=२,५००) हे अंतर ० होईल. म्हणून ब्रोकरेज हाउस तुम्हाला सूचना करेल की तुम्हाला हा शेअर ठेवायचा असेल तर अधिकचे मार्जिन भरा. ही रक्कम तुम्ही तुमच्या मनाने कितीही भरू शकता. म्हणजे आपल्या उदाहरणात शेअर ७५रु. ने पडल्यावर अवेलेबल मार्जिन मिनिमम मार्जिन ला जाऊन पोहोचले आहे. पण माझा अंदाज जर असा असेल की हा शेअर अजून १०रु. पेक्षा जास्त ने पडणार नाही आणि तिथून रिकव्हरी करेल, तर मी १०×१०० = १,०००रु. भरेन. जेणेकरून माझे अवेलेबल मार्जिन वाढेल, पर्यायाने मिनिमम मार्जिन आणि अवेलेबल मार्जिन मधील अंतर वाढेल आणि आपला शेअर उडणार नाही. थोडक्यात हा आपला महितीपूर्वक निर्णय (informed decision) असेल. या रिकव्हरीची वाट बघण्यासाठी माझ्याकडे एक वर्षातील उरलेले १० महिने असतील. अर्थात प्रत्येक महिन्याला साधारणपणे ३२५रु. व्याज माझ्या अपेक्षित नफ्यातून कमी होत राहील.
याउलट जर तुम्ही अधिकचे मार्जिन भरले नाही तर मात्र तुमचा शेअर ७५रु. पडल्यावर (वरील गणितानुसार), ४२५रु. ह्या सध्यकिमतीवर (मार्केट प्राईस वर) ब्रोकरेज हाऊसकडून उडवला जाईल. आता यात किती नुकसान झाले? तर ७५×१०० = ७,५०० रु. (हे थेट नुकसान) + दोन महिन्यांच्या मार्जिनच्या व्याजाचे ६५० = ८, १५०रु. इथे सर्वात अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे, ब्रोकरेज हाउसेसनी मिनिमम मार्जिन आणि अवेलेबल मार्जिन च्या माध्यमातून ठरवलेला तुमचा जास्तीत जास्त लॉस (if you don't take informed decision to keep the stock by adding additional margin).
म्हणजेच आपण मार्जिन सुविधेने स्वतःच्या २५,००० रु. पैकी १७,५०० + ६५० (व्याज) = १८,१५०रु. वापरून ९,३५० रु. फायदा किंवा ८,१५०रु. तोटा होण्याच्या शक्यता निर्माण केल्या. याव्यतिरिक्त माझ्या मूळ रक्कमेतील उरलेले २५,००० - १८,१५० = ७,८५० रु. इतर शेअर्स मध्ये वापरायला मोकळे राहिले.
आता हेच जर, मी मार्जिन नसते वापरले तर काय झाले असते ते बघू. माझ्याकडे २५,००० रु. होते. त्यात अबक कंपनीचे ५००रु. प्रमाणे ५० शेअर्स येतील ( हे शेअर्स डिलिव्हरी मोड मध्ये असतील). जर तो अपेक्षेप्रमाणे १००रु. वर गेला तर फायदा ५०×१००=५,०००रु. होईल. जर तो खाली गेला आणि ब्रोकरेज हाउसप्रमाणे आपणही तो ४२५ रु. सध्यकिमतीवर तो विकून टाकला तर तोटा ७५×१००= ७५००रु. होईल. म्हणजेच मार्जिन न वापरता, स्वतःकडील २५,००० रु. त आपण ५,००० रु. नफा किंवा ७,५०० रु. तोट्याची शक्यता निर्माण केली. मार्जिन न वापरण्यात फायदा असा की तुम्हाला वेळेचे बंधन राहणार नाही. जर एक वर्षापर्यंत तुमचे लक्ष्य साध्य नाही झाले तरी तुम्ही त्याला २, ३ कितीही वर्षे ठेऊ शकता. नुकसान असे की मार्जिन वापरल्यामुळे मोकळे राहिलेले ७,८५०रु. इथे मोकळे राहणार नाहीत.
चौकस२१२ यांच्या गणेशा यांच्या धाग्यावरील प्रश्नाचे उत्तर -
मी आयसीआयसीआय चे ३ इन १ अकाउंट वापरतोय, निदान त्यात तरी मार्जिन हे एक वर्षासाठी दिले जाते. इतर ब्रोकर्सच्या बाबतीत हा कालावधी मला माहित नाही. वर्षाच्या शेवटी, मार्जिन कॉल आलेला नसेल तरी तुमचे शेअर्स विकले जातील. जर तुम्हाला त्यापुढेही हे शेअर्स ठेवायचे असतील तर अशा मार्जिन शेअर्स ना मार्जिन रक्कम भरून डिलिव्हरी मध्ये रूपांतरित करणे ३६५ व्या दिवसापर्यंत शक्य आहे. म्हणूनच मी वर उल्लेख केला की मार्जिन हे लॉंग टर्म ट्रेडिंग साठी नसून शॉर्ट टर्म आणि इन्ट्राडे ट्रेडिंग साठी आहे.
मला अपेक्षा आहे की मी वरील उदाहरणाला न्याय देऊ शकलोय, पण तरीही काही त्रुटी राहिल्या असल्यास जाणकारांनी त्या दुरुस्त केल्या तर आनंदच होईल. माझ्यामते तरी शॉर्ट टर्म साठी मार्जिन ही अतिशय मदतकारक सुविधा आहे. खासकरून बाजारातील प्रत्येक डाउन हा एक संधी असते. चांगल्या कंपन्यांचे शेअर ग्लोबल प्रेशर, नफेखोरी इ. अनेक कारणांमुळे पडतात. पण मुळत: भक्कम (fundamentally strong) असल्यामुळे लगेच रिकव्हरही होतात. अशावेळी मार्जिन वापरून, आपल्याकडील कमीत कमी पैशात जास्ती शेअर्स खरेदी करून, काही दिवसांत बाजार सुधारला की शेअर काढून टाकून नफा घेणे हे खूप फायदेशीर असते हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. शिवाय माझे पैसे जास्त दिवस अडकून राहण्याची रिस्क कमी असते.
यावर अजून भरपूर चर्चा करता येऊ शकते, माझ्या अल्पमतीने मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. याव्यतिरिक आधीच घेतलेले शेअर्स हेही मार्जिन म्हणून दुसरे शेअर्स घेण्यासाठी वापरता येतात (ज्याला शेअर्स ऍज मार्जिन असे म्हणतात), त्यावर उहापोह पुढील लेखात करता येईल.
वर्गीकरण
भारी सांगितले आहे..
माहिती बद्दल धन्यवाद
उत्तम माहिती
मला एकच प्रश्न राहून राहून पडतो
In reply to मला एकच प्रश्न राहून राहून पडतो by Rajesh188
उत्तर खाली दिले आहे
In reply to मला एकच प्रश्न राहून राहून पडतो by Rajesh188
अमेरिकेत फेडरल रिझर्व चे
Covid मुळे अर्थव्यवस्था डब्यात असताना....
In reply to Covid मुळे अर्थव्यवस्था डब्यात असताना.... by मुक्त विहारि
प्रत्येक महिन्याला सरकार एक
बिटाकाका,
In reply to बिटाकाका, by शाम भागवत
उदाहरण देताना फायद्याच्या
In reply to बिटाकाका, by शाम भागवत
वाचण्यात गल्लत झाली असावी
In reply to वाचण्यात गल्लत झाली असावी by बिटाकाका
हो.
उदाहरण थोडे क्लिष्ट वाटले.
In reply to उदाहरण थोडे क्लिष्ट वाटले. by उगा काहितरीच
तुमच्याकडे १००० रु. आहेत
In reply to तुमच्याकडे १००० रु. आहेत by बिटाकाका
खालचं उदाहरण वाचलं. कळालं
@ राजेश जी,
In reply to @ राजेश जी, by गणेशा
सहमत.
२. FII/DII INVESTMENTS
मार्जिन चा वापर उत्तम समजावला
In reply to मार्जिन चा वापर उत्तम समजावला by अमर विश्वास
सहमत.
In reply to सहमत. by शाम भागवत
हे १:२ कळले नाही. कुठे घेतला
In reply to हे १:२ कळले नाही. कुठे घेतला by बिटाकाका
मी रिस्क रिवॉर्ड रेशो
In reply to मी रिस्क रिवॉर्ड रेशो by शाम भागवत
नाही, नाही, कृपया गैरसमज करून
In reply to नाही, नाही, कृपया गैरसमज करून by बिटाकाका
तुम्ही मुळ धाग्यात आणि ह्या
In reply to तुम्ही मुळ धाग्यात आणि ह्या by गणेशा
ओके, धन्यवाद गणेशा. थोडक्यात
In reply to ओके, धन्यवाद गणेशा. थोडक्यात by बिटाकाका
बरोबर.
In reply to बरोबर. by गणेशा
तुमच्या मतांशी सहमत आहे.
बापरे
In reply to बापरे by राजेंद्र मेहेंदळे
मार्जिनच्या टक्केवारीपेक्षा
In reply to मार्जिनच्या टक्केवारीपेक्षा by शा वि कु
मला हा मुद्दा जरा समजला नाही.
मार्जिनच्या वर पैसे भरायला
In reply to मार्जिनच्या वर पैसे भरायला by अमर विश्वास
खरंय.
In reply to मार्जिनच्या वर पैसे भरायला by अमर विश्वास
स्टॉपलॉस शी सहमत!
प्रताप
In reply to प्रताप by प्रदीप
अगदी बरोबर, हा प्रकार जवळजवळ
हा लेख लिहल्या बद्दल आपले खुप
In reply to हा लेख लिहल्या बद्दल आपले खुप by शानबा५१२
कोणत्या गोष्टीतील मार्जिन ( किंवा लिव्हरेज )
दुधारी तलवार
100 रु
In reply to 100 रु by चौकस२१२
ओके. तुम्ही १:१ म्हणजे ५०%
In reply to ओके. तुम्ही १:१ म्हणजे ५०% by बिटाकाका
लेखाजोखा करतांना
In reply to लेखाजोखा करतांना by चौकस२१२
ओके, फेअर एनफ. ज्याचा त्याचा
In reply to ओके, फेअर एनफ. ज्याचा त्याचा by बिटाकाका
अंतर्गत ट्रेडिंग साठी
In reply to अंतर्गत ट्रेडिंग साठी by चौकस२१२
चौकस जी,
In reply to चौकस जी, by गणेशा
अगदी बरोबर!
In reply to अंतर्गत ट्रेडिंग साठी by चौकस२१२
"आहे मार्जिन म्हणून घे
In reply to "आहे मार्जिन म्हणून घे by बिटाकाका
% वारी मध्ये रिस्क वाढते
चिन मध्ये अगदी रस्त्याच्या
In reply to चिन मध्ये अगदी रस्त्याच्या by श्री गावसेना प्रमुख
चीन मधे काय घडले माहित नाही
In reply to चीन मधे काय घडले माहित नाही by अमर विश्वास
नसेल येत बूम ठीक
प्रत्येक डाउन हा एक संधी असते
डिव्हर्सिफिकेशन
In reply to डिव्हर्सिफिकेशन by चौकस२१२
चौकस जी,
In reply to चौकस जी, by गणेशा
बरोबर गणेश
In reply to बरोबर गणेश by चौकस२१२
मार्जिनच्या बाजूने एकच मुद्दा
मार्जिनबद्दल एवढी माहिती
१००/७५? का ?
In reply to १००/७५? का ? by चौकस२१२
मार्जिन नियम
In reply to मार्जिन नियम by गोंधळी
मार्जिन चे व्यवहार
In reply to मार्जिन चे व्यवहार by अमर विश्वास
margin requirement
In reply to १००/७५? का ? by चौकस२१२
जर पुरेसा वेळ दिला (-अभ्यास
मार्जिनमुळेच छोट्या