लाचलुचपत विभाग खरेच प्रामाणिक असतो काय?
नमस्कार मंडळी,
बर्याच दिवसांनी लेख लिहतोय. त्याचं असं झालं की जानेवारी २०२० मध्ये मी रहात असलेल्या इमारतीत आमच्याच मजल्यावर माझ्या १ रुम किचन पेक्षा जास्त जागा असलेल्या अशा बाजुच्याच मोठ्या १ बी.एच.के. फ्लॅटमध्ये स्थलांतरीत होण्याची संधी चालुन आली. आणि मी ती उचलली. तसेच त्या समोरच्या पार्टीलाही छोटा फ्लॅट हवा होता म्हणुन त्यांनी माझा फ्लॅट घेतला तेव्हा आम्ही फक्त जागेची अदलाबदल केली. आमची अजुन टी.एम.सी. मध्ये नोंदणीकृत सोसायटी नाही. अनाधिकृत अपार्टमेंटच आहे. तर सगळी कागदपत्र , पैसे अशी तजवीज वगैरे करेपर्यंत फेब्रु. २०२० च्या महिन्या अखेरीस टी.एम.सी मध्ये अधिकृतरित्या नोंदणी करुन फ्लॅट मात्र नावावर झाला. मार्च १८ पासुन घरातुन काम करावे लागत असल्याने घरीच होतो मग आठवड्याने जागेची अदलाबदल २५ मार्चच्या दिवशी गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर सगळं सामान फक्त इकडुन तिकडे हलवुन गृहप्रवेश केला.
आता फक्त इलेक्ट्रिक मिटर आणि घराचा प्रॉपर्टी टॅक्स नावावर करणे एव्हंढेच काम बाकी राहिले आणि इकडे कडक टाळेबंदी चालु झाली. संपुर्ण ४ महिने २/३ वेळा टी.एम.सी कार्यालयात खेपा घालुन झाल्या तेव्हा बाहेरच्या बाहेरच तिथल्या पोलिसांनी ऑफिस बंद म्हणुन अडवले. पण प्रोपर्टी टॅक्स भरण्यासाठी मात्र एक खिडकी उघडी होती तेव्हा या वर्षीचा मार्च २०२० ते एप्रैल २०२१ चा टॅक्स भरला. त्याच खिडकीमध्ये टॅक्स नावावर करणारा कागद "मिळकतीचे हस्तांतरण" हा फॉर्म ५ रु. भरुन घरी आलो सगळा फॉर्म भरला आवश्यक ती कागद पत्रे जोडली आणि टाळेबंदी संपेपर्यंत ४ महिने गप्प बसलो.
टॅक्स नावावर झाल्या खेरीज इले. मीटर नावावर होत नाही त्यामुळे मला आलेली इले. बीले आम्ही एकमेकांशी अदलाबदल करतो.
सप्टेंबर नंतर मग हळुहळू सर्व शिथलीकरण झाल्यावर एके दिवशी तो कागद / फोर्म भरुन एक खिडकी योजनामध्ये गेलो व सगळी जरुरी कागद पत्रांसहित त्यांच्याकडे सुपुर्द केला. खिडकीवाल्यांनी हस्तांतरणाचा कागद मिळाला असा शिक्का मारुन एक पावती दिली आणि १५ दिवसांनी या असे सांगुन आतल्या लिपिकाचे नांव त्यावर लिहले आणि त्यांना भेटायला सांगितले.
खरी गोष्ट इथुन सुरु झाली. मी जेव्हा त्यांना भेटायला जायचो तेव्हा ते कुठे तरी वसुलीला गेलेत असे आजुबाजुचे सहकारी सांगत आणि काही जण तर आम्हाला करोनासाठी अतिरिक्त कर्तव्य (ड्युटी) ला जावं लागत आहे तुमचे काम एव्हढ्यात होणार नाही असे सांगत.
शेवटी एकदाची त्या लिपिकाची गाठ पडली आणि मी माझ्याकडचा पावतीचा कागद त्यांना दाखवला. तोंडात अख्खं गुटख्याचं पाकिट रिकामं केले होते म्हणुन समोरच्या खिडकीत जावुन महाशय आधी ते रिकामं करुन आले. पलिकडे कोणी उभे असता तर नक्कीच त्यांना महशायंचे तोंडात ब्रह्मांड दिसलं असतं.
तर जाग्यावर आल्यावर महाशयांनी माझ्या पावती वरची तारिख बघितली आणि म्हणाले की अहो तुमची सप्टें.ची तारिख आहे इथे बघा आधीच ३ गठ्ठे आहेत तेव्हा या कामाला वेळ लागेल. प्राध्यान्यक्रमाने तुमचा फॉर्म या ४ थ्या गठ्ठयात आहे. तेव्हा जरा वाट पाहावी लागेल.
दिवस जात होते काम काही होत नव्हते एके दिवशी मात्र तुम्ही ४ ह. भरलेत तर काम लवकर होईल असे कानावर आले. मला काही हे पटत नाहीये.
आता प्रश्न हा आहे की या महाशयांना कसे सामोरे जावे?
१) मी त्यांना नाही म्हणालो तर ते माझे काम ३ गठ्ठे पुर्ण झाल्यावरच करणार पण त्याला कितीही अगदी १ ते २ वर्षही लागु शकतात. मी जिथ पर्यंत अगदी बाळबोध चेहर्याने त्यांना विचारणार तेव्ह तेव्हा ते अजुन वेळ लागेल असेच सांगणार. आणि मला थांबावेच लागणार कारण मुळात तिकडे जावुन शहानिशा कशी होणार की आता कोणत्या महिन्याच्या गठ्ठ्याचे काम चालु आहे ते. माहिती अधिकार या योजने अंतर्गत मी काम कुठपर्यंत आले आहे ते पाहु शकतो काय?
२) मी जर त्यांना पैसे घेताना लाच. लु. विभागाकडुन कारवाई करवुन पकडुन दिले तर ते (म्हणजे त्यांचे सहकारी सुध्दा) पुढे आयुष्यभर माझे कोणतेच काम करणार नाहीत अडवणुक करतील, डुख ठेवतील असे वाटत आहे.
३) शिवाय यापुढे इमारतीच्या इतर कोणत्याही सदस्यांचे सुध्दा जर टीएम.सी. मध्ये काहीही काम झाले नाही तर ते मला वाळीत टाकतील.
या सर्वांवर काय उपाय तुम्हाला सुचवासा वाटतोय? . गप्प बसुन माझा क्रमांक येण्याचे वाट पाहु की सरळ ४ ह. देवुन मोकळा होवु?
वाचने
7786
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
तुम्हाला काय हवं आहे? आपलं
तुम्ही इतर वेळेला काय करता?
एका बाबतीत माझा अंदाज ....
त्यांचा फक्त टॅक्स नावावर करण्याचे काम बाकी असावे
टायटल सांगा प्रथम.
फ्लॅट ची अदलाबदल केली म्हणजे काय केले
आपलं काम करुन घ्या. नसत्या
In reply to आपलं काम करुन घ्या. नसत्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हेच म्हणतो.
कळव्यात कुठ्ली बिल्डिन्ग ?
निर्मुलन खाते
लाचलुचपत विभागाचेलाचलुचपत निर्मुलन विभागाचे>
(आमची अजुन टी.एम.सी. मध्ये
टॅक्स नावावर झाल्या खेरीज इले
वीज मीटर मालकाच्या नावावर
मीटर ट्रानस्फर कसे होते - पद्धत.
चुकून पण आडवे जाऊ नका