भावातीत ध्यान आणि तुम्ही आम्ही
स्थळ काळाचे भान विसरून जाणे, याला सामान्यपणे आपण स्वरूपाशी एकरूप होणे म्हणतो. हे केव्हा होते, तर मेंदू मध्ये काही रासायनिक अभिक्रिया होतात तेव्हा. (संभव असंभव वाचा, त्यात भावातीत ध्यानासाठी एक मोठा लेख आहे).छानच. स्वरूप हा शब्द सोडला तर बाकी न पटण्यासारखं काहीच नाही. स्वरूप न पटण्यासारखा नाही, पण व्हेग आहे. अर्थ माहित नाही. पण देहाबाहेरचे अस्तित्व या संकल्पनेवर आजिबात जोर न देता केवळ "मेंदू शांत करणे" इत्यादी संज्ञा वापरल्यात, त्यामुळे आमच्यासारख्या नूबला काही तरी समजले. नाहीतर सिद्धी आणि विदेहत्व म्हणजे आत्तापर्यंत तरी अर्थहीन शब्दांची किंवा अर्थपूर्ण शब्दांची अर्थहीन भेळमिसळ वाटत होती.
हे सगळे आपण मन बुद्धी अहंकार वगैरेंच्या पातळीवर मोजत असलो तरी त्यात शेवटी असतात काही रासायनिक अभिक्रिया, ज्या मेंदूमध्ये होतात. भावातीत ध्यानात मेंदूचे काही विशिष्ट भाग बहुधा frontal लोब, शांत होतो असे वाचल्याचे स्मरते.. काही लोकांनी नाडी बंद करून दाखवल्याचे देखील वाचल्याचे आठवते.हे मान्य करणारे बहुदा तुम्ही मिपावरील पहिलेच. नाहीतर "संक्षिच्या साधनेने येणारा अनुभव फक्त शारीरिक आहे" अशी टीका झाली, मग शारीरिक नसलेला अनुभव म्हणजे काय, असे वाटून गेलेले. पण विचारलं तर आणखी एक भेळेची डिश समोर येईल अशी शंका आली आणि विषय सोडून दिला. :)
कधीकधी वाटते , कशाला घालायची विज्ञान आणि अध्यात्माची सांगड?एक्झाक्टली. आमचे आवडते वक्ते सॅम हॅरिस म्हणतातच, "When we are discussing God or spirituality, the other side shouldn't be mentioning quantum mechanics. These are two streams derived from completely different methodologies." प्रत्येक गोष्टीत विज्ञानाचा वरदहस्त असावाच असे आजिबात नाही. त्यामुळे जिथे होत नाही तिथे मारून मुटकून मेळ घालणे अयोग्य आहे. विज्ञान परिपूर्ण नसतेच, प्रत्येक ठिकाणी विज्ञानाशी सांगड घालणे तसे शक्यही नाही.त्यामुळे, "ग्रहणात खाल्लं तर आजार होतो, हि माझी श्रद्धा आहे त्यामुळे मी खाणार नाही" हे कशीही चांगलेच, "आधुनिक विज्ञानाने ग्रहणकाळात काही खाऊ नये हे सिद्ध केले आहे" यापेक्षा.
In reply to प्रामाणिक लेख ! by शा वि कु
In reply to मी माझा एक अनुभव सांगतो. by सतिश गावडे
In reply to हो मलापण एकदा आला असा अनुभव.. by Bhakti
In reply to मला वाटते याला आऊट ऑफ बॉडी by आनन्दा
मला वाटते याला आऊट ऑफ बॉडी अनुभव म्हणतात.होय, तुमचं बरोबर आहे. बरेच दिवसांपूर्वी मी हे वाचलं असल्याने दोन संज्ञांमध्ये गफलत झाली. "संभव असंभव" हे पुस्तक मी जरुर वाचेन. लोकांच्या श्रद्धांबद्दल आदर असलेला नास्तिक असल्याने मला हे पुस्तक नक्की आवडेल. :)
In reply to तुमचं बरोबर आहे by सतिश गावडे
In reply to मी माझा एक अनुभव सांगतो. by सतिश गावडे
In reply to @धवा, by गवि
पहिले ध्यान म्हणजे काय याची व्याख्या करू मग पुढे जाऊ.. कसे?ध्यानाची व्याख्या माहित नाहि. पण ति (किमान) मनाची एक अवस्था आहे हे नक्की. शरीर, मन, बुद्धी वगैरे ज्या काहि माहित असलेल्या/नसलेल्या फॅकल्टी आहेत त्यांचं सिंक्रोनायझेशन म्हणजे ध्यान.
In reply to विषय तसा कॉम्प्लिकेटेड आहे.. by अर्धवटराव
- (क्वांटा असलेला) सोकाजीIn reply to क्वांटम मेकॅनिक्स by सोत्रि
In reply to क्वांटम मेकॅनिक्स by सोत्रि
In reply to क्वांटम मेकॅनिक्स by सोत्रि
In reply to विषय तसा कॉम्प्लिकेटेड आहे.. by अर्धवटराव
In reply to समाधी म्हणजे समबुद्धी . सुख by प्रसाद गोडबोले
In reply to तरी देखील ही स्थिती by आनन्दा
In reply to नाही by प्रसाद गोडबोले
In reply to नामस्मरण देखील भावातीत by आनन्दा
In reply to नाही by प्रसाद गोडबोले
In reply to अन त्यांच्या वचनावर गाढ श्रद्धा ठेवा म्हणजे झाले.. by अर्धवटराव
....तरी अंतीमतः ते मनाचं समाधान करेल (कदाचीत तेच सर्वात महत्वाचं देखील आहे)...असेच काहीसे माझेही मत होते. म्हणजे आपण देहविरहीत आहोत आणि आता एकही विचार मनात नाही आहे हे वाटणे हाही एक विचार आहेच जो मनात राहणार. खाली मार्क्स ओरेलिएस नी समाधीची योग्य व्युत्पत्ती सांगितली आहे त्याप्रमाणे ध्यान करणे म्हणजे निर्विचारता नसुन विचारांवर नियंत्रण आणण्याची प्रक्रिया असावी.म्हणजे मनात असंख्य विचार आहे पण एकुणच मन बुध्दी व एकाही विचारात गुंतलेले नाही. निर्विचारता म्हटले कि मला एखादे आटलेले सरोवर समोर येते तेच ध्यान म्हटले कि तुडुंब भरलेले पण अतिशय शांत सरोवर दिसते. बर्याच ठिकाणी असेही वाचले आहे कि कुणी एक अमुक तमुक एखादा विचार मनात धरुन ध्यान लावतो व त्याला एखादे उत्तर गवसते. बुध्दालाही जे काही सत्य गवसले ते ध्यान लावल्यानंतरच असे काहीसे वाचल्याचे आठवते. म्हणजे एखाद्या विचाराचा पूर्ण सांगोपांगी अभ्यास हा ध्यान लावुन करता येतो. अप्रिय आठवणींच्या धाग्यात ही शाम भागवत सरांनी म्हटल्याप्रमाणे अप्रिय आठवणींमुळे येणार्या विचारांना निर्बीज कसे करायचे ह्याचा उपाय सांगितला होता आणि तो पटलाही होता.
In reply to अन त्यांच्या वचनावर गाढ श्रद्धा ठेवा म्हणजे झाले.. by अर्धवटराव
In reply to श्रद्धा ठेवा म्हणजे काय? ते by कोहंसोहं१०
In reply to श्रद्धा ठेवा म्हणजे काय? ते by कोहंसोहं१०
In reply to समाधी म्हणजे समबुद्धी . सुख by प्रसाद गोडबोले
समाधी म्हणजे समबुद्धी . सुख दुःख यश अपयश संपत्ती वित्पत्ती अशा कोणत्याही स्थितीत समान राहणे म्हणजे समाधी.झक्कास! एकदम साधी सरळ, सोप्पी आणि मूलभूत व्याख्या!! ह्या कोणत्याही स्थितीत समान राहता येण्याचा सराव म्हणजे साधना आणि त्या सरावाचा मार्ग म्हणजे ध्यान, कारण तशी स्थितप्रज्ञता (समाधी) येणं एका रात्रीत शक्य नसतं.
बाकी अतींद्रिय बितींद्रिय असं काही नसतं हो.१००% सहमत. एकदा का क्वांटम फिल्ड समजू लागलं की अध्यात्म ह्या शब्दाचं कसं अवडंबर माजवून ठेवून, तत्वज्ञानाच्या, शास्त्रिय अंगाने अभ्यासाला उगाचंच कसं समजण्याच्या पलीकडे नेऊन ठेवलंय ह्याची अनुभूती येते. - (क्वांटा असलेला) सोकाजी
In reply to "संभव असंभव" ह्य पुस्तकाची by मराठी_माणूस
In reply to मार्कस आणि आनंदा छान प्रतिसाद by कोहंसोहं१०
In reply to माझे एक तमिळ सहकारी कधीकाळी by पॉइंट ब्लँक
In reply to एकदम नावाप्रमाणेच...पॉइण्ट ब्लँक by अर्धवटराव
In reply to माझे एक तमिळ सहकारी कधीकाळी by पॉइंट ब्लँक
मुळात अध्यात्म हा सिध्द करायाचा विषय नाही आहे, त्यामुळे केमीकल किंवा क्वाँटम वगैरे पद्धती वापरून तो कसा वैज्ञानिक आहे हे खटाटोप म्हणजे विज्ञान आणि वेळ दोन्हीचा दुरुपयोग.शंभर टक्के सहमत.
विज्ञानामध्ये सगळंच सिद्ध करण्याची क्षमता आहे असं वाटणे सुद्धा एकप्रकारची अंधश्रद्धा आहेअसहमत. ह्यात कसलीही अंधश्रद्धा नाही. सिद्ध करणे ही संपूर्ण विज्ञानाची मक्तेदारी आहे. 'सिद्ध' हि पूर्णपणे वैज्ञानिक मेथडोलॉजी मधली संकल्पना आहे.
गेल्या ५०० वर्षांत विज्ञाने सामाजिक जीवनात सगळीकडे शिरकाव केलाय , पण "टेक्नो युटोपिया " अजुन तरी काय आलेला नाही. उलटं विज्ञानाची वरदान वापरुन ग्लोबल वार्मिंग, लाईफस्टाईल डिसिजेस मिळाले. अनेक प्रजाती लुप्त होन्याच्या मार्गावर आहेत. तरीही विज्ञान हाच एक रामबान उपाय आहे सगळ्या समस्यांवर असं म्हणन आणि ते सगळ्यांवर थोपवनं किती योग्य आहे?चालायचंच. हजारो वर्षात अध्यात्मिक युटोपीया तरी कुठे आलाय ? "विज्ञानामुळे" ग्लोबल वार्मिंग आले हे योग्य तर आहे, पण संपूर्ण म्याटर कव्हर होत नाही यातून. माणसाने काही गोष्टी शिकल्या ज्याने माणसाच्या आयुष्यमानावर दृष्ट परिणाम होत होता, त्यातून काही नवीन समस्यां उदभवल्या. पण ह्या ज्ञानाचा अभाव असलेला काळ किंवा विचार करण्याची पद्धतीपेक्षा विज्ञान कनिष्ठ आहे, किंवा त्याच पातळीवर आहे, हे काय पटत नाही.
In reply to संमिश्र by शा वि कु
असहमत. ह्यात कसलीही अंधश्रद्धा नाही. सिद्ध करणे ही संपूर्ण विज्ञानाची मक्तेदारी आहे. 'सिद्ध' हि पूर्णपणे वैज्ञानिक मेथडोलॉजी मधली संकल्पना आहे.ह्याचा पूरावा किंवा विज्ञाननिष्ठ दुवा देवू शकाल का एखदा? चार एक वर्षापूर्वी मी मिपावर एक लेख लिहिला होता. (http://misalpav.com/node/35060), त्यात एका चर्चासत्रात कुठल्या पातळी पर्यंतच्या गोष्टी विज्ञान सिद्ध करु शकते ह्यावर काढलेल्या काही निष्कर्षाबद्दल लिहिलं होतं. तिथलं एक चित्र इथे परत छापत आहे.
चार वर्ष जुनं जरी असलं तर विज्ञानाच्या तपासणीच्या मर्यादा ह्य चित्रात स्पष्ट दिसता आहेत. तपासणी करता येणं हे सिद्धा करण्याची पायाभुत गरज आहे. त्यामुळे विज्ञानाची सिद्धा करण्याची भौतिक जगात तरी मर्यादा आहे अस शास्त्रज्ञांच तरी म्हणनं आहे. जे जग अभ्यासन्याचं विज्ञान हे साधन आहे तिथे त्याला इतक्या मर्यादा आहेत, मग सगळीकडे मक्तेदारी कशी चालेल बरं?
चालायचंच. हजारो वर्षात अध्यात्मिक युटोपीया तरी कुठे आलाय ? "विज्ञानामुळे" ग्लोबल वार्मिंग आले हे योग्य तर आहे, पण संपूर्ण म्याटर कव्हर होत नाही यातून. माणसाने काही गोष्टी शिकल्या ज्याने माणसाच्या आयुष्यमानावर दृष्ट परिणाम होत होता, त्यातून काही नवीन समस्यां उदभवल्या. पण ह्या ज्ञानाचा अभाव असलेला काळ किंवा विचार करण्याची पद्धतीपेक्षा विज्ञान कनिष्ठ आहे, किंवा त्याच पातळीवर आहे, हे काय पटत नाही.अध्यात्मानं युटॉपिया येवू शकत नाही, कारण त्याचा उद्देश समाजाचा उद्धार करणे हा नाही, ते काम किंवा तसा प्रयत्न करने हे धर्माचं काम आहे, अध्यात्माचं नाही. अध्यात्म ही खुप जास्त वैयक्तीक गोष्ट आहे, कुणी उपदेश केला म्हणुन करायची किंवा तसा नियम किंवा प्रथा आहे म्हणुन करायचीही गोष्ट नाही. त्यामुळे युटोपिया आणि अध्यात्म ह्यांचा संबंध नाही. ते मनःशांती किंवा आंतरीक समधान मिळवायचं साधन असु शकत. विज्ञान किंवा धर्म इतर मार्गाने मिळवलेल्या ऐहिक सुखामध्ये जेव्हा काही कमतरता भासते त्यांच्यासाठीचा एक पर्याय आहे तो. विज्ञान कनिष्ठ आहे असं मला म्हणायचं नाही आहे. ते योग्य पद्धतीने वापरलं तर नक्कीच फायद्याचं आहे आणि त्याचे फायदे आपणही उपभोगतोय- जस की समोरासमोर नसतानाही आपण करत असलेली चर्चा. पण त्याचे काही फायदे आहेत म्हणुन सगळीकडेचं ते कामाला येतं अस म्हणन, थोडं अतिशयोक्तीचं होईल अस सुचवायचं होत.
काही भाग पटला, काही नाही.सगळंच पटावं हा अट्टाहास ही नाही. आणि सगळ्यांच मत एकसमान झालं तर चर्चा कुठुन होईल. हि विचारातली विविधताच ज्ञानवर्धन करन्यास खुप गरजेची आहे :)
In reply to असहमत. ह्यात कसलीही by पॉइंट ब्लँक
ह्याचा पूरावा किंवा विज्ञाननिष्ठ दुवा देवू शकाल का एखदा?नाही. हे माझे स्वतःचे विचार आहेत. मला ते तार्किक वाटतात.
विज्ञानाच्या तपासणीच्या मर्यादा ह्य चित्रात स्पष्ट दिसता आहेत.नक्कीच. विज्ञानाच्या तपासणीत मर्यादा आहेत, म्हणजे , सर्व गोष्टी आपल्याला माहित नाहीत, निरखता येत नाहीत, तपासता येत नाहीत. मान्य.
पण
हे mott and bailey प्रकारचे आर्ग्युमेन्ट वाटले, ज्या context मध्ये तुम्ही मांडले आहे. एखाद्या गोष्टीची एखादी कमतरता दाखवणे, म्हणजे त्याच्या पर्यायांची उपयुक्तता सिद्ध करणे नसते. विज्ञानाच्या मर्यादा मान्य करणे आणि विज्ञान/तर्क यांच्या आधाराची अपेक्षा न करणे ह्या वेगळ्या गोष्टी आहेत.अध्यात्म ही खुप जास्त वैयक्तीक गोष्ट आहे, कुणी उपदेश केला म्हणुन करायची किंवा तसा नियम किंवा प्रथा आहे म्हणुन करायचीही गोष्ट नाही. त्यामुळे युटोपिया आणि अध्यात्म ह्यांचा संबंध नाही. ते मनःशांती किंवा आंतरीक समधान मिळवायचं साधन असु शकत. विज्ञान किंवा धर्म इतर मार्गाने मिळवलेल्या ऐहिक सुखामध्ये जेव्हा काही कमतरता भासते त्यांच्यासाठीचा एक पर्याय आहे तो.सहमत.
In reply to संमिश्र by शा वि कु
असहमत. ह्यात कसलीही अंधश्रद्धा नाही. सिद्ध करणे ही संपूर्ण विज्ञानाची मक्तेदारी आहे. 'सिद्ध' हि पूर्णपणे वैज्ञानिक मेथडोलॉजी मधली संकल्पना आहे.या बाबतीत एक मत मांडू इच्च्छितो.. एखादी गोष्ट सिद्ध करण्याचे काम तंत्रज्ञानाचे आहे.. विज्ञान हे संगती लावणे वगैरे थिअरीपुरते मर्यादित असते.. तंत्रज्ञान पुरेसे प्रगत झाले की विज्ञान एखादी गोष्ट "सिद्ध" करते.. त्यामुळे त्यात शक्यतो गल्लत करू नये असे मला वाटते.
In reply to असहमत. ह्यात कसलीही by आनन्दा
In reply to माझे एक तमिळ सहकारी कधीकाळी by पॉइंट ब्लँक
In reply to पॉइंट ब्लँक by उपयोजक
प्रामाणिक लेख !