मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मेणबत्तीला करा 'राम' 'राम' !

ताजे प्रेत · · काथ्याकूट
प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यावर्षी साजरा करूया मेणबत्ती विरहित ख्रिसमस.  मधमाश्या नष्ट झाल्या कि चार वर्षात मानव नष्ट होईल अस म्हटलं कि लोक विचारतात कस बर... हे वाक्य आहे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन याचं, ते सांगतात कि मधमाशी विविध प्रकारचा वनस्पतीचे परागीभवन करीत असतात, बरीच फळझाड, फुलझाड, भाजीपाला, धान्य पिके याचं परागीभवन फक्त मधमाश्याच करू शकतात. जर याचं प्रमाण कमी होत गेल तर आपल्या खाद्यातील अनेक घटक नष्ट होतील आणि मग वनस्पतीच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन भूकबळी वाढतील आणि मग अन्नही मिळणार नाही.  आणी या मधमाशा कशाचे घर बनवतात ? मेणाचे - आणि मेणबत्ती कशाने बनते मेणापासून ! Dr. Humberto Boncristiani (honey bee husbandry applied researcher at the University of Florida Honey Bee Research and Extension Lab) म्हणतात  कि   एक साडेपाच इंच मेणबत्ती बनवण्यासाठी १३७.४८ मधमाशा चा बळी द्यावा लागतो . ख्रिसमसच्या दिवसात साधारण २३७ अब्ज मेणबत्त्या जगभर विकल्या जातात , तर किती मधमाशा मारल्या जात असतील! आणि यापासून तयार होणारा कार्बन डायऑक्साईड फटाक्यांच्या तुलनेत ५७. २२  पटीने जास्त असतो. फटाका ०.३  ग्रॅम तर मेणबत्ती १७.१६६ ग्रॅम.! मेणबत्त्या अशा प्रकारे वाया घालवू नका, त्या वीज नसलेल्या छोट्या वाड्या वस्त्यांना दान करून त्यांची अंधारलेली घरे तेजोमय करण्यासाठी मदत करा. आजही जगात ४. ७ अब्ज  लोक रोज अंधारात रात्र काढतात. विनाकारण पेटवण्यात येणार्‍या एवढ्या मोठ्या प्रमाणातील मेणबत्त्या १३२ कोटी गरीब लोकांना वर्षभर उजेड देऊ शकेल. चला तर मग मेणबत्ती रहित ख्रिसमस साजरा करण्यासाठी सर्वांना फॉरवर्ड करा.

वाचने 14215 वाचनखूण प्रतिक्रिया 33

समीर वैद्य 06/11/2020 - 20:37
स्तुत्य उपक्रम आहे हा....

बाप्पू 06/11/2020 - 20:53
योग्य वेळी आलेला योग्य लेख.. आजून बुद्धुजीवीयांनी दरवर्षीची दिवाळीआधीची टिवटिव चालू केलेली नाहीये.. आणि केली तरी त्याला आधी हा लेख दाखवून याबद्दल काय असा प्रश्न विचारू..

कंजूस 06/11/2020 - 20:56
क्रिसमस, दिवाळी, धर्म बाजूला ठेवून फक्त 'मेण' यावर विचार करा. मेणबत्तीचे मेण १९१९ मध्ये किंवा अगोदर कोणते होते आणि आता २०२० मध्ये कोणते आहे. म्हणजे ते कुठून मिळते. लेख वाटसपवरून मिळाला आहे का? --------------------------- 'Wax' search करून प हा.

प्रकाश घाटपांडे 06/11/2020 - 21:18
मौजमजा या सदरात घ्यायचा आहे कि उपहास म्हणून? यावर बरच काही अवलंबून आहे. तुलना दिवाळीच्या फटाक्यांच्या वायु व ध्वनीप्रदूषणाशी असेल तर तारतम्य बाळगणारे वाचक आहेत. कंजूस म्हणतात मेणबत्तीचे मेण १९१९ मध्ये किंवा अगोदर कोणते होते आणि आता २०२० मध्ये कोणते आहे. म्हणजे ते कुठून मिळते. या बद्दलही लिहा.

चौथा कोनाडा 06/11/2020 - 22:08
सध्याच्या काळात बहुतेक मेणबत्त्या पॅराफिन मेणापासून बनविल्या जातात आणि पॅराफिन मेण हे पेट्रोलियम रिफायनिंगचे एक उत्पादन असे विकिकोश सांगतो. https://en.wikipedia.org/wiki/Candle#:~:text=Today%2C%20most%20candles%20are%20made,bayberry%2C%20or%20soybean%20wax). सदर मेणबत्त्यांच्या खपावर संकट आलं तर उत्पादन ते विक्री या साखळीचा उद्योग संकटात तर येणार नाही ना ?

In reply to by चौथा कोनाडा

सामान्यनागरिक 09/11/2020 - 15:12
आपण ही माहिती कुठुन काढता ? तुम्ही वापरता तो विकीपेडीया कुठल्या शतकातला आहे ? प्रत्येक मेणबत्ती पेटवल्यानंतर मला आता १३७.४८ मधमाश्यांची 'ताजी प्रेतं ' दिसतील. आता पुढचे शांतता नोबेल प्राइझ तुम्हालाच ! योग्य वेळी नामांकनासाठी आपली माहिती मागविण्यात येईल. पी एम ओ मधुन कधीही फोन येईल. तयार रहा. लोकांना ही महत्वाची माहिती देऊन करोडो मधमाश्यांचे प्राण वाचवलेत तुम्ही. शिरसाष्टांग नमस्कार !

In reply to by सामान्यनागरिक

चौथा कोनाडा 09/11/2020 - 19:56
ताजे प्रेत यांना अपसव्य करुन नमस्कार ! ....... ..... १३७.४८ मधमाश्यांची 'ताजी प्रेतं ' दिसतील. .... .. करोडो मधमाश्यांचे प्राण वाचवलेत तुम्ही.
Olectra12456 सामान्यनागरिक _/\_

In reply to by सामान्यनागरिक

निनाद 11/11/2020 - 06:10
आता पुढचे शांतता नोबेल प्राइझ तुम्हालाच ! असे का? हे तर प्रेत आहेत. आणि प्रेताला का नोबेल प्राइझ? माझा विरोध आहे या प्रकाराला. उद्या तुम्ही मधमाश्यांना नोबेल प्राइझ द्याल. असे नाही चालणार. त्या माश्यांची नावे तरी माहित आहेत का?

साहना 06/11/2020 - 23:09
अतिशय स्तुत्य उपक्रम ! त्याशिवाय झाडे पृथ्वीची फुफ्फुसे असल्याने झाडाच्या फांद्या सुद्धा घरांत आणू नये. ख्रिस्तमस ट्री आपल्या मनात वाढवावी आणि येशूचा पवित्र प्रेमाचा संदेश आपल्या मनात वाढू द्यावा. त्याशिवाय ह्या कठीण परिस्थितींत चंगळवाद वाढू नये ह्यासाठी दुकानावर संता बाबाची चित्रे लावून माल खपवण्याचे निंद्यनीय प्रकार करू नयेत. गरीब माणूस ईश्वराला जास्त प्रिय असतो असे पपू पोप साहेबांनी म्हटले आहे.

In reply to by साहना

निनाद 10/11/2020 - 11:34
शिवाय झाडे पृथ्वीची फुफ्फुसे असल्याने झाडाच्या फांद्या सुद्धा घरांत आणू नये. मग कडूलिंबाचे दातून पण बंद करा!

विजुभाऊ 07/11/2020 - 07:45
युरोपात जेंव्हा मेणबत्त्या वापरल्या जायच्या त्यापेक्षाही कितीतरी अगोदरपासून भारतात तेलाचे तुपाचे दिवे वापरले जात होते. युरोपीयन आल्यानंरही इथे अत्यल्प समाज सोडता बहुतेक समाज तेलाचे दिवेच वापरत राहिला. आजही आपण मेणबत्त्या क्वचितच वापरतो. आज वापरल्या जातात त्या मेणबत्त्या पेट्रॉलियम पासून बनवतात. मधमाशाम्पासून बनवलेले मेण असे जाळण्यासाठी वापरले जात असेल असे वाटत नाही. किती कारखान्यात मधमाशांच्या पोळ्यातले मेण वापरले जाते याचा विदा आहे का काही?

Rajesh188 07/11/2020 - 09:46
देशात होणाऱ्या वायू प्रदूषणात दिवाळी मध्ये होणाऱ्या आतषबाजी मधून किती वायू प्रदूषण होते आणि ते सर्व प्रदूषणाच्या किती टक्के आहे. मग दिवाळी मध्ये फटकडे वाजवणे म्हणजे खूप मोठा गंभीर गुन्हा आहे असा प्रचार का केला जातो.

महासंग्राम 07/11/2020 - 16:36
ख्रिसमस ला मेणबत्त्या लावायच्या तर लावा अंटार्क्टिका चा बर्फ वितळला तर तुम्ही जबाबदार :)

डॅनी ओशन 07/11/2020 - 17:28
क्या रे ताजे प्रेत. प्रेत होके भी इतना चोटा सोचता हय। थिंक बिग माय बुआय । ये मेणबत्ती शेणबत्ती सब चोटा प्लेया हय। बडा प्लेया तो तुमजाईसा प्रेत लोग हय। सब प्रेत लोग को तुमजाईसा ताजा प्रेत रायनेको सिकाओ, तो सोचो, कॉफीन माफिक, और वो पायर का माफिक किटना लकडी वेस्ट होता हय । वो बीलोग भी ट्रीजपे रहता हय । तो टूम प्रेतको ईजिप्शियन लोग माफिक ताजा रख सखता हाय, सॅण्डसे पिरॅमिड बनाके ऊनसाबको अंडर ठुस सकता हय, तो सोचो किटना एयर, किटना ट्री अँड किटना बीलोग को तुम बचा सकता हय। ये नाही जमता तो वो पारसी फोल्क जैसा वेल मे डंप करनेका सोच सकता हय । इतना बडा उपाय होने माफिक तुम ये कँडल शॅंडल खेलता हय, व्हेरी बॅड। तुमजाईसे झंटलमन प्रेत से ये एक्सपेकटेशन नाही थी।

निनाद 10/11/2020 - 11:32
अतिशय वाईट लिखाण आहे हे. लोकांच्या पवित्र भावनांशी असे खेळणे योग्य नाही. तुम्ही एकदा करार वाचा तुम्हाला पण कळेल खरा मार्ग कोकणात आहे ते. ख्रिसमसच्या दिवसात का? लाईट गेल्यावर आम्ही लावतो. तुम्ही नका लाउ . पण फटाके जाळून काय होते ते प्रदुषण असते. त्यातून कुठे उजेड कसा पडतो?

In reply to by निनाद

राघव 10/11/2020 - 12:14
सणासुदीच्याच वेळेस हे असे धागे काढायचे प्रयोजन काय? अंतःस्थ हेतू उघड आहे. इतर दिवशी ज्या मेणबत्त्या जाळल्या जातात त्यामुळे काय मधमाशा कमी होणार नाहीत अन् आणि पर्यावरणाचा र्‍हास होणार नाही??

In reply to by राघव

निनाद 11/11/2020 - 06:06
या स्पर्धांचे परिक्षक आपणच होतात. आणि त्या ऑनलाईन परिक्षणातून आज हे निकाल आपल्या हाती आले आहेत.

राजेंद्र मेहेंदळे 10/11/2020 - 14:31
दिवाळीला फटाके उडवु नका, ख्रिसमसला मेणबत्त्या जाळु नका, ईदला बकरे कापु नका, होळिला ******* आता श्वास घ्यावा की नाहि हे विचारायला पण कायप्पा नाहितर मिपावर यावे लागणार बहुतेक.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

निनाद 11/11/2020 - 06:12
प्रश्न जरा अस्थाई आहे असे वाटते. श्वास घ्यावा की नाहि याचे प्रेताला काय पडले आहे?

In reply to by निनाद

राजेंद्र मेहेंदळे 11/11/2020 - 12:11
भारीच विनोदी बुवा तुम्ही बादवे अस्थाई नही अस्थायी म्हणजे अयोग्य स्थानी

चौथा कोनाडा 11/11/2020 - 13:21
सालं, मेणाच्या पुतळ्यांच्या संग्रहालयावर देखील बंदी घातली पाहिजे. ती मादाम तुसाँ जगभर मेण वाया घालवत सुट्लीय ! लोकांना मधमाश्यांच्या जीवाचं काहीच घेणं राहिलेलं नाही ! मा. आदित्य ठाकरे, वाचताय ना ?

In reply to by चौथा कोनाडा

बबन ताम्बे 12/11/2020 - 09:49
फर्निचरवाले लाकडात खड्डा दिसू नये म्हणून मेण भरतात आणि त्याच्यावर पॉलिश मारतात. किती मधमाशा मरत असतील काय माहीत. 3.456 एका सोफ्यामागे किंवा एका डायनिंगटेबल मागे?