Skip to main content

आंतरधर्मीय विवाह करताना : स्त्री दृष्टिकोन

लेखक साहना यांनी सोमवार, 26/10/2020 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
महत्वाची सूचना : लेखिका स्वतः वकील नाही आणि त्यामुळे खालील लेख निव्वळ मनोरंजनात्मक माहिती म्हणून वाचावा. ह्या लेखांत कायदेशीर सल्ला देण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही. तुम्ही अश्या प्रकारच्या एखाद्या परिस्थितींत असाल तर तुम्ही एखाद्या योग्य वकिलाचा कायदेशीर सल्ला घ्यावा. इंग्रजी भाषेंतून एक छान लेख खऱ्या वकिलांनी लिहिला आहे तो तुम्ही वाचू शकता : https://www.esamskriti.com/e/National-Affairs/Ideas-ad-Policy/What-Ever… गाडी कोणती घ्यावी ह्यावर लोक हजार सल्ले देतील. स्वदेशी म्हणून टाटा घ्यावी इथपासून, सायकल चालवणे केंव्हाही उत्तम अश्या प्रकारचे सल्ले ऐकायला मिळतील पण शेवटी पैसे तुमचे, गाडी पार्किंग जागा तुमची, पेट्रोल तुमच्या पैश्यांचे आणि सर्व्हिसिंग चे पैसे सुद्धा तुमचेच असल्याने गाडी नेहमी आपल्याला पाहिजे तीच घ्यावी. त्याच वेळी इतरांचे अनुभव, खरी किंमत, इत्यादी गोष्टी समजून घेण्याची जबाबदारी सुद्धा तुमचीच आहे. विवाह हे प्रकरण सुद्धा असेच आहे, राजकीयमी धार्मिक किंवा जातीय दृष्टिकोनातून लोक सल्ले देत असतील तरी, जीवन तुमचे असल्याने निर्णय घेण्याचा १००% अधिकार सुद्धा तुमचाच आहे. हा अधिकार नैसर्गिक अधिकार असून कायदा काय किंवा समाज काय कोणीही तुम्हाला इथे जबरदस्ती करू शकत नाही. पण एकदा विवाह केला कि समाज आणि कायद्याचे नियम तुम्हाला लागू होतात त्यामुळे हे सर्व समजून घेऊनच आपला निर्णय घ्यावा. अंडी शाकाहारी आहेत कि मांसाहारी हा विचार आम्लेट करण्याच्या आधी करावा लागतो, नंतर नाही. हा लेख स्त्रियांसाठी आहे. पुरुषांनी वाचले तरी चालेल. वाचणे सोपे व्हावे ह्यासाठी प्रश्नोत्तराच्या स्वरूपांत इथे मांडले आहे. अनुष्का आधुनिक स्त्री आहे. इंजिनीअरिंग आणि MBA करून पुणे इथे मोठ्या कंपनीत चांगल्या कामाला आहे. ब्राह्मण हिंदू परिवारांत वाढलेली असली तरी पुढारलेल्या विचारांची युवती आहे. आई वडील लग्नासाठी मागे लागले आहेत पण अनुष्काला आपल्या कंपनीतील झाएद पसंद आहे. घराच्या लोकांच्या विरोधांत जाऊन झाएद शी लग्न करायची तिची तयारी आहे. झाएद च्या अम्मी अब्बूना सुद्धा अनुष्का पसंद असून ते सुद्धा पुढारलेल्या विचारांचे आहेत. अम्मी बुरखा वगैरे घालत असली तरी अनुष्काला आपला धर्म पालन करण्याची त्यांची संपूर्ण मुभा आहे. फक्त नातेवाईकांच्या समाधानासाठी लग्न निकाह पद्धतीने करावे असे त्यांचे मत आहे. अनुष्का बुद्धिवान आहे त्यामुळे काहीही निर्णय घाईत घेण्याच्या आधी तिने ऍडव्होकेट पेन्सिलवाला ह्यांच्याशी कायदेशीर सल्ला मसलत करण्याचा निर्णय घेतला. पेन्सिलवाला हे पारसी असून धार्मिक किंवा जातीय पूर्वग्रह नसताना योग्य तो कायदेशीर सल्ला देतील असे तिला वाटले. अनुष्का : वकील साहेब , झाएद शी मला लग्न करायचे आहे. पण ह्याला घरच्यांचा विरोध आहे. लग्न झाल्यानंतर झाएद चा मुस्लिम परिवार मला योग्य पद्धतीने वागवणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे तसेच भारतातील लग्नविषयक कायदा मुस्लिम लोकांच्या महिलांसाठी चांगला नाही असे माझे वडील म्हणाले. मला सत्य जाणून घ्यायचे आहे. तुम्ही मला सांगा कि झाएद शी लग्न करण्यासाठी कायद्याच्या दृष्टीने काही अडचण आहे का ? पेन्सिलवाला : तू हिंदू आहेस आणि झाएद मुस्लिम. अश्या सिच्युएशन मध्ये तुम्ही तीन प्रकारे लग्न करू शकता. (गोवा सोडून इतर कुठेही भारतांत). १. SMA (स्पेशल मॅरेज ऍक्ट) द्वारे जिथे तुला आणि झाएदला सामान अधिकार असतील. SMA द्वारे लग्न करण्यासाठी तुम्हाला एक वकील घेऊन आपले लग्न रजिस्टर करावे लागेल. त्यानंतर तुम्ही कायदेशीर दृष्टीने पती पत्नी बनाल. त्याशिवाय तुम्ही औपचारिक स्वरूपांत काहीही लग्नसमारंभ केला तरी फरक पडत नाही. कायदेशीर दृष्ट्या तू हिंदू आणि झाएद मुस्लिम म्हणून आपले जीवन व्यतीत करू शकाल. २. तू इस्लाम कबुल केलास तर तू मुस्लिम खाजगी कायद्या नुसार निकाह करू शकतेस. इथे तुला आपला धर्म बदल करावा लागेल, आपले नाव बदलावे लागेल आणि तुमच्या लग्नाला भविष्यांत इस्लामिक कायदा लागू होईल. ३. झाएद हिंदू धर्म कबुल करू शकतो आणि तुम्ही दोघे हिंदू विवाह कायद्याप्रमाणे लग्न करू शकता. भविष्यांत तुमच्या लग्नाला हिंदू विवाह कायदा लागू होईल. अनुष्का : समजा मी ह्यातील एक पर्याय निवडला पण भविष्यांत मला दुसरा कायद्याप्रमाणे चालायचे असेल तर तसे चालेल का ? नाही. विवाह ज्या कायद्याप्रमाणे झाला आहे त्याच कायद्याप्रमाणे भविष्यांत तुला न्याय मिळेल. लक्षांत घे कि कायदा आणि लग्न ह्यांचा संबंध खालील गोष्टीं येतो. - लग्न करून संबंधांना सरकार आणि समाजाची मान्यता मिळवणे. - मुले जन्माला घालून मुलांवर आपला हक्क सिद्ध करणे. - दुर्दैवाने कुणाचा मृत्यू झाला तर कायद्याप्रमाणे इन्शुरन्स, वारसा हक्क इत्यादी मिळवणे. - दुर्दैवाने लग्न टिकले नाही तर कायद्याने घटस्फोट मिळवणे तसेच त्यातून आपले आर्थिक, वैयक्तिक आणि मुलांवरचे हक्क सुरक्षित करणे. नवीन लग्न करणारे कुठलेही जोडपे आपल्या जोडीदाराचा मृत्यू किंवा घटस्फोट ह्या विषयांवर विचार करू इच्छित नाही. पण स्वानुभवाने सांगतो कि "a stich in time saves nine". निर्णय १००% तुझा असला तरी वकील म्हणून सांगणे माझे कर्तव्य आहे कि सर्व गोष्टींचा विचार करून तू निर्णय घे. अनुष्का: मला ह्यावर खरेतर विचार करावासा वाटत नाही पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे भावना बाजूला ठेवून विचारते. समजा मला घटस्फोट घ्यावासा वाटला तर निकाह, हिंदू विवाह आणि SMA ह्यांत काय फरक आहे. पेन्सिलवाला : हिंदू विवाह आणि SMA कायदे वेगळे असले तरी घटस्फोटाच्या दृष्टिकोनातून खुपश्या प्रमाणात समान आहेत. विवाह विस्च्छेद करण्यासाठी तुम्हा दोघांना आपआपला वकील निवडून फॅमिली कोर्टांत जावे लागेल. तिथे कायद्याप्रमाणे न्यायाधीश मुलांचा मालकीहक्क, वारसा हक्क, आर्थिक मोबदला (पोटगी) इत्यादी गोष्टी कायद्याप्रमाणे आणि बहुतेक वेळा पतीच्या आर्थिक स्थितीला पाहून ठरवतील. ३० वर्षांच्या माझ्या अनुभवावरून इथे कायदा आणि न्यायाधीश महिलेला जास्त सहानुभूती दाखवतात. निकाह पद्धती फार वेगळी आहे. निकाह करताना निकाहनामा ठरवला जातो आणि मौलवी तो वाचतात. हा एक प्रकारचा करार असतो. तुमचा घटस्फोट, मालकी हक्क इत्यादी गोष्टी ह्या करारनामा प्रमाणे असतात. निव्वळ तात्विक दृष्टिकोनातून झाएद आणि तू आधी करारनामातील विविध कलमे ठरवू शकतात पण नाव दाम्पत्य एका खोलीत बसून एकमेकांच्या मृत्यूनंतर फ्लॅट कुणाचा होईल अश्या प्रकारच्या गोष्टी बोलतील ह्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे करारनामा हा बहुतेक वेळा मौलवी लोक ठरवतात आणि तिथे समाजाच्या दबावाने सर्वाना तो मान्य करावा लागतो. अनुष्का : म्हणजे SMA मध्ये माझे आणि पतीचे हक्क हे सर्वज्ञात कायद्याप्रमाणे आहेत तर निकाह पद्धतीत हे मौलवींच्या निकाहनामा प्रमाणे ठरतील ? पेन्सिलवाला : हो, विशेषतः पोटगी, घटस्फोट ह्याविषयांत निकाहनामा महत्वाचा आहे पण त्याशिवाय निकाह हा शरिया पद्धतीने होत असल्याने शरिया कायद्यातील हक्क सुद्धा तुम्हा दोघांना लागू होतात. अनुष्का : शरिया पद्धतीत माझे आणि माझ्या पतीचे हक्क काय ? पेन्सिलवाला : शरिया म्हणजे इस्लामिक कायदा. शरिया ची कलमे प्रत्येक इस्लामिक समुदायांत वेगळी असतात आणि विविध फतव्यांवर आधारित असतात. पण सर्वांत महत्वाचे मुद्दे इथे सांगतो. बहुतेक आंतरधर्मीय विवाहांत हेच महत्वाचे आहेत. - झाएद ला तुझ्या व्यतिरिक्त आणखीन ३ पत्नी करण्याचा अधिकार आहे. झाएद ने आणखीन निकाह केले तर त्याला विरोध करण्याचा अधिकार तुला नाही. अर्थांत तुझा झाएद असे करणार नाही असे तुला वाटेल पण काही वेळा पुरुष ह्या अधिकाराचा वापर करतात. कधी कधी समाजाच्या दबावाखाली सुद्धा पुरुषांना आणखीन लग्नें करावी लागतात उदाहरण म्हणजे समजा नातलगांतील एखादी युवती भरकटली किंवा अकाली विधवा झाली तर काही पुरुष तिला दुसरी पत्नी म्हणून आधार देतात. असे झाले तर तुला त्याचा विरोध करण्याचा कायदेशीर अधिकार नाही. - The Dissolution of Muslim Marriages Act, 1939 प्रमाणे तुला घटस्फोट मागण्याचा अधिकार आहे. त्यासाठी नक्की कोणती कारणे तू देऊ शकशील हे तू तिथे वाचू शकते. पण त्याच वेळी पुरुष मात्र तुला तलाक अगदी सहज पणे देऊ शकतो. आजकाल तात्काळ तलाक सरकारने बे कायदेशीर ठरवला आहे तरी सुद्धा पुरुष तलाक सहज पणे देऊ शकतो. एकदा पुरुषाने तलाक दिला कि तो ९० दिवसांत किंवा पत्नीच्या तीन मासिक पाळी नंतर लागू होतो. ह्या दरम्यान पुरुष आपले मन बदलू शकतो. त्याशिवाय पत्नी गरोदर असली तर मूल जन्मे पर्यंत तलाक लागू होत नाही. - एकदा तलाक लागू झाला कि कायदेशीर पद्धतीने विवाह विच्छेद झाला असे आपण समजू शकतो आणि पत्नी दुसरा विवाह करण्यास मोकळी होते. पण समजा तलाक नंतर दोघा पती पत्नींना पुन्हा एकत्र यावे असे वाटले तर मात्र पद्धत थोडी विचित्र आहे. इस्लामिक कायद्याप्रमाणे पत्नीने आणखीन कुणाबरोबर निकाह करून शरीर संबंध ठेवल्याशिवाय पुन्हा जुन्या पतीबरोबर ती निकाह करू शकत नाही. त्यामुळे इथे पत्नीला तात्पुरते का होईना पण कुणा इतर पुरुषाबरोबर निकाह करून शरीर संबंध करावा लागेल. अनुष्का : आणि वारसा हक्क ? पेन्सिलवाला : तुम्हाला मुले असतील तर तुला तुझ्या संपत्तीतील १/८ वा भाग मिळेल. मुले नसतील तर १/४ भाग. त्याशिवाय मुलीला मुलाच्या अर्धा भागच मिळतो. पण हे सर्व होण्यासाठी आधी धर्मांतरण करून नंतर निकाह करणे आवश्यक आहे. आधी निकाह आणि नंतर धर्मांतरं केले किंवा धर्मांतरण न करता निकाह केला तर कायद्याने ह्या निकाह ला इस्लामिक निकाह मानला जात नाही. अनुष्का : तर मग हिंदू किंवा SMA प्रमाणे वारसा हक्क कसा असतो ? पेन्सिलवाला: हिंदू कायद्याप्रमाणे झाएद जर हिंदू झाला तर तुम्हाला हिंदू वारसाहक्क मिळेल. त्याच्या अंतर्गत पत्नीला पतीच्या सर्व संपत्तीत समान वाटा मिळतो त्याशिवाक एकत्र कुटुंब पद्धतीत घराचा सुद्धा भाग मिळतो. पण इथे झाएदला हिंदू बनावे लागेल. SMA अंतर्गत लग्न केले तर तुम्हाला धर्मांतरं करायची गरज नाही पण वारसा हक्काच्या दृष्टीने झाएद इथे मुस्लिम ठरत नाही आणि पत्नीला पतीच्या समान अधिकार मिळतो. पतीचा मृत्यू झाला तर पत्नी क्लास १ वारसदार ठरते. अनुष्का : तर मग वकील साहेब, मी तुमची अशील आहे तर त्या नात्याने मी तुमचा सल्ला विचारला तर तुमचा सल्ला काय असेल ? पेन्सिलवाला: अनुष्का, निर्णय घेताना ट्रेड ऑफ असर्वांत महत्वाचे. तुझ्यासारख्या आधुनिक स्त्रीने आपले निर्णय नेहमी स्वतःच घ्यावेत आणि जेंव्हा चांगले निर्णय घेतील आणि त्यांचे जीवन सुखाचे होईल तेंव्हा आपोआप पुढील पिढीला सुद्धा योग्य precedent मिळेल. मी तुला ट्रेड ऑफ सांगू शकतो पण निर्णय हा तुझाच असायला पाहिजे. हा प्रश्न तुझ्या संपूर्ण आयुष्याचा असल्याने इथे तू झाएद, तुझे आई वडील, मित्र इत्यादींशी सुद्धा विचार विनिमय केला तर हरकत नाही. ट्रेड ऑफ खालील प्रकारे आहेत. - समजा तू जो काही निर्णय घेशील त्याला झाएद संमती देईल असे आपण गृहीत धरले तर हिंदू पद्धतीने लग्न हे तुझ्या दृष्टीने सर्वांत जास्त फायद्याचे आहे. ह्याच्या अंतर्गत झाएद ला हिंदू धर्म पत्करावा लागेल. हे जणू काही दुसऱ्या हिंदू मुलाबरोबर विवाह करण्यासारखेच आहे. इथे SMA पेक्षा जास्त मोठा फायदा म्हणजे देशांतील बहुतेक लागणे हिंदू आहेत आणि घटस्फोट इत्यादी सुद्धा हिंदू आहेत त्यामुळे ह्या विषयांवर प्रचंड precedent उपलब्ध आहे त्यामुळे इथे कायदेशीर सल्ला घेणे किंवा कोर्टानं जाऊन युक्तिवाद करणे सोपे जाते. त्याशिवाय पोटगी, मुलांचे हक्क इत्यादी विषयावर जास्त कॅलॅरिटी आहे. - समजा झाएदला त्याचा धर्म जास्त पसंद आहे पण तू आपला धर्म पालन करण्यास त्याला काहीही आपत्ती नसेल तर इथे SMA सर्वांत जास्त चांगला उपाय ठरतो. - पण झाएद ने निकाहच करायचा ठरवला आणि तुला ते मान्य असेल तर तू आधी धर्मांतर करून नंतर निकाह करावा असा माझा कायदेशीर सल्ला असेल. इथे तुझे कायदेशीर हक्क खूप कमी असतील पण तुला झाएद बरोबर विवाह करायला मिळेल. अनुष्काने इथे काय केले ? अनुष्का आधुनिक विचारांची मुलगी असल्याने तिने इथे भावना बाजूला ठेवल्या आणि आणखीन एका वकिलाचा सल्ला घेतला. त्यानंतर ती एका मॅरेज सल्लागाराला भेटली. तिथे सुद्धा तिने सर्व बाजूंचा विचार केला आणि निर्णय घेतला कि ती धर्मपरिवर्तन करणार नाही. लग्न केले तर ती समान हक्कांवरच करेल. त्यामुळे ती जर एका नवीन धर्माशी अड्जस्ट होत असेल तर झाएद आणि त्याचा आधुनिक विचारांचा परिवार सुद्धा अड्जस्ट होईल ह्यांत तिला शंका नव्हती. सल्लागार मंडळींनी अनुष्काची भेट अनेक अश्या व्यक्ती बरोबर घडवून आणली ज्यांनी विविध पद्धतीने आंतरधर्मीय विवाह केला होता. अमेरिकेतील श्री दिलीप अमीन http://interfaithshaadi.org/ हे संकेतस्थळ चालवतात आणि ह्या महत्वाच्या विषयावर सल्ले सुद्धा देतात. अनुष्काने तिथे सुद्धा अनेक लोकांचे अनुभव वाचले. झाएद बरोबर तिने ह्या सर्व बाबी डिस्कस करून निर्णय घेतला. वाचक तिने नक्की काय निर्णय घेतला ह्याबद्दल उत्सुक असतील. पण निर्णय तिचा असल्याने ती घेईल आम्हाला उगाच चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही स्त्री असाल आणि अश्या परिस्थितीत असाल तर तुम्ही कोणता निर्णय घ्याल हे महत्वाचे आहे. आम्ही इतर लोकांचे निर्णय घेऊ शकत नाही. पण आम्ही माहिती जास्तीत जास्त लोकांकडे पोचवू शकतो. आमच्या लहान मुलींना योग्य ते संस्कार आणि माहिती देऊन स्वतःचे भले करण्याचे निर्णय घेण्याची क्षमता देऊ शकतो.

वाचने 42410
प्रतिक्रिया 97

प्रतिक्रिया

40 पैसे ४० पैशात राजमा आणि कोथिंबीर येते? अजून ३० वर्षे मागासलेलेच आहात वाटतं १५ लाख आले ना खात्यात? ते वापरा कि

लेखावर प्रतिसादांची राळ उडणे अपेक्षितच होते, पण काही गोष्टी जवळुन पाहिल्या ऐकल्या असल्याने, लिहितोय लग्न हा मुळातच गुंतागुंतीचा मामला आहे. करणे सोपे पण टिकवणे अवघड. मग तो प्रेम विवाह असो की पत्रिका,नाडी वगैरे जुळवुन ठरवलेले लग्न असो. नैसर्गिक भावनांना समाजमान्य कोंदण देउन वाट काढुन देणे हा त्याचा मूळ उद्देश. पण परंपरा, रितीभाती,कुलाचार, नात्यांचा लिप्ताळा, शेजार्‍यापाजार्‍यांचा गोतावळा,आर्थिक विवंचना,आजारपणे,जोडीदाराशी प्रतारणा यांनी बर्‍याच वेळा लग्न मूळ उद्देशापासुन भरकटते आणि आपण लग्न का केले किवा याच्याशी/हिच्याशी लग्न का केले? ईथपर्यंत मजल जाउ शकते. जरी कायदेशीर पर्याय उपलब्ध असले तरी वेळेचा / पैशाचा अपव्यय, मनावर आघात आणि सगळ्यात वाईट म्हणजे संतती असेल तर त्याच्या/तिच्यावर होणारे परीणाम टळत नाहीत. त्यामुळे आता ही तारेवरची कसरत करायची ठरवले तर त्यात जातीधर्माचे गुंते आणावेत का? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आयुष्यात आपल्याला लग्न सोडुन भरपुर काही करायचे असते. त्यामुळे या एका गोष्टीवर आपण किती गुंतवणुक करावी किवा आपल्या उर्जेचा किती टक्के भाग खर्च करावा हा खरा मुद्दा आहे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

त्यामुळे आता ही तारेवरची कसरत करायची ठरवले तर त्यात जातीधर्माचे गुंते आणावेत का?
You said it

एका ऊपयूक्त विषयावरील लेखाचा अनुवाद लेखिकेने उपलब्ध केला हे कौतुकास्पद आहे. याच विषयाच्या ईतर काही पैलुंची मी माझ्या तीनेक दीर्घ लेखातून चर्चा केली आहे: , ,

Gk,
आणि मग 1947 ला जनतेच्या उरावर बसून पेन्शन खाणारे 400 संस्थानिक कोण होते ?
कृपया नीट माहिती घ्या. सर्व राजे जनतेच्या उरावर बसून खाणारे नव्हते. बडोद्याचे महाराज सयाजीरावांनी व्यवस्थित प्रजापालन केलं होतं. आजच्या घडीला गुजरात राज्यात सर्वात विस्तृत रेल्वे जाळं आहे. आंबेडकरांना बडोद्याचे सयाजीमहाराज, कोल्हापूरचे शाहूमहाराज अशा प्रागतिक विचारांच्या राजांनी मदत केली होती. आ.न., -गा.पै.

आपण "कायम राहण्याचं वीसा बद्दल बोलताय हे गृहीत धरतो ... नमूद केलेल्या व्यावसायिकांना जसा बरेचद शिक्षण + अनुभव यावर पाश्चिमात्य देशात वीसाआ बऱ्यापकी सुलभतेने मिळू शकतो .. नुसते कलाकार या व्यासावर मिळणे तसे अवघड आहे हे खरे , कानडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांची व्हिसा पद्धती साधरण पणे सारखी आहे त्यावरून म्हणतो ... पण यात कलाकारानं दोन प्रकारे वीसा मिळू शकत असणार १) निर्मात्याने देऊ केलेले पैसे/ एक प्रकारची नोकरी येवढया मोठ्या स्तरावरची असेल तर खास क्षेत्रातील / आपल्या क्षेत्रातील उच्चतम दर्जाची व्यक्ती असे काहीसे दाखवून व्हिसा मिलू शकतो ( पै इरफान खान ) २) जर यात पैसे / स्थानिक नोकऱ्या उपलब्ध होणे शक्य असेल तर सरकार स्वतःहून याला पाठिंबा देते उदाहरणार्थ लॉर्ड ऑफ द रिंग चे बहुतेक काम न्यूझीलंड मध्ये झाले आणि पायरत ऑफ कॅरिबियन चे बरेच काम ऑस्ट्रेलियात झाले .. तेवहा लाखो डॉलर देशात आले मग VISAA मिळणे अवघड नाही परंतु यातील बरेच कलाकार तात्पुरत्या व्हिसा वर येतात ..(पण काम कायाला परवानगी असलेल्या , नुसत्या "प्रवासी व्हिसा " वर नव्हे ) उदाहरण म्हणून अर्थात हे खरे कि साधारण तंत्रन्याला जेव्हा सहजपणे असा व्हिसा मिळेल तेवढा उदाहरण म्हणून माताही हिंदी नाटक कलाकाराला मिळणार नाही तेवढेच काय अगदी मुंबईतील इंग्लिश भाषिक रंगकर्मीला सुद्धा मिळणार नाही .. ३) स्थानिक नागरिकांशी लग्न करून कायमचा व्हिसा मिळेल याचा आपण कोणत्या व्यसायातील आहेत याचा काह्ही संबंध नाही

इथे स्त्री चा दृष्टिकोन पुरुषाचा दृष्टिकोन समाजाचा दृष्टिकोन असे वेगळे दृष्टिकोन नसतात. अंतर धर्मीय विवाह करणारे सामाजिक ,आर्थिक,मनगट शाही मध्ये किती समर्थ आहेत ह्या वर सर्व स्थरतील लोकांचा दृष्टिकोन बदलतो. बाकी काही नाही. तुम्ही बलवान असाल तर कोणत्या ही धर्माच्या जातीच्या मुली शी विवाह करा तो समाजमान्य असतो. दुर्बल व्यक्ती च्या स्वजातीय विवाह पण समाजात मान्य होत नाही.

In reply to by Rajesh188

ज्या एखाद्या गोष्टीस समाज मान्यता असते तिथे मनगटशाहीची गरज तेवढीच कमी भासते हेही तेवढेच खरे नाही का ?

In reply to by माहितगार

करीना कपूर नी मुस्लिम व्यक्ती शी लग्न केलं शाहरुख नी हिंदू स्त्री शी लग्न केले सलमान खान ची आई मराठी आहे. रेणुका शहाणे पासून किती तरी अभिनेत्री नी गैर मराठी लोकांशी लग्न केले.. खूप उदाहरणे आहेत. सक्षम लोकांनी केलेल्या अंतर जातीय ,अंतर धर्मीय,अंतर राष्ट्रीय विवाह ला कोणताच विरोध धार्मिक किंवा सामान्य लोकांकडून होत नाही. उलट अशा विवाहाचे गौरिवी कारण होते.

साधनाजी, अतिशय चांगला आणि माहितीपर लेख. +१ गजानन कागलकर नामक मनुष्य हजारोंनी आयडी घेतो आणि प्रत्येक धाग्यावर येऊन वातावरण नासवतो. मिपा व्यवस्थापकांची निष्क्रियता हे त्याला दिलेले अभय आहे. एकेकाळी चांगले लेख आणि चर्चा होत असणारे संस्थळ हळूहळू मरणपंथाला लागते आहे हे बघणे आता उरले आहे. अर्थात ह्या गोष्टींचा एक फायदा झाला तो म्हणजे मिपा सोडून गेलेले उत्तम लिहिणारे आयडी तेव्हा मिपावर जाणारा वेळ आता सत्कारणी लावत आहेत. तसेच सततचा मोदीविरोध आणि हिंदुत्वाला शिव्या देणारे प्रतिसाद ह्यामुळे मोदींच्या बाजूने नसणारेआणि कुंपणावरचे पण आता मोदींच्या बाजूने जात आहेत.

In reply to by तेजस आठवले

तसेच सततचा मोदीविरोध आणि हिंदुत्वाला शिव्या देणारे प्रतिसाद ह्यामुळे मोदींच्या बाजूने नसणारेआणि कुंपणावरचे पण आता मोदींच्या बाजूने जात आहेत.
अगदी बरोबर. धागा कोणताही असो.. प्रत्येक धाग्यावर येऊन मोदी, गुजरात, शाह, आणि हिंदुत्वाची चेष्टा एवढेच काय ते गजानन कागलकर यांचे कर्तृत्व.. मी मोदीसमर्थक किंवा BJPwala नाही तरीही गजानन कागलकर यांनीं मला तसे होण्यासाठी भाग पाडले आहे. ( फक्त प्रतिसाद देण्याच्या बाबतीत. )

In reply to by तेजस आठवले

हजारो आयडी होते , हे स्वतःच लिहिताय , म्हणजे काही अनुचित लिहिले तर आयडी डिलीट होतात , आयडी जिवन्त आहे , म्हणजे कदाचित काही आक्षेपार्ह लिहिलेले नाही. असे अनेकांचे आयडी डिलीट झाले आहेत आणि पुन्हा पुन्हा येत आहेत

In reply to by Gk

तुमचा खोटारडेपणा लोचटपणा लुब्रेपणा आणि पचपच करण्याची वृत्ती (लोलुप) तुम्ही सोडणार नाहीच. इतक्यावेळेस तुमचे आय डी उडाले तरी तुम्हाला लाज वाटत नाही. खोटारडेपणा उघड केला तरी लुब्रेपणा सोडत नाही. कोणत्याही धाग्यावर पचपच करणे सोडत नाही. तुमच्याइतका निगरगट्ट, निर्लज्ज, स्वाभिमान नसलेला आणि खोटारडा माणूस मी जालावर आजतागायत पाहिलेला नाही

धर्मांतरणाबाबत अलाहाबाद न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नाही, असा निर्णय अलाहाबाद न्यायालयानं शुक्रवारी एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान दिला आहे. ही बातमी

In reply to by एस

तुमची प्रतिक्रिया वाचून आनंद झाला.. म्हणजे काहीवेळा एखाद्या माणसाबद्दल आपला काही पूर्वग्रह असतो, तो दूर झाला तर बरे वाटते, तसे काहीसे झाले. असो.

In reply to by आनन्दा

आनन्दा, दिखाऊ आस्तिकापेक्षा प्रामाणिक नास्तिक केव्हाही अधिक स्वीकारार्ह असतो, असं विवेकानंद म्हणून गेलेत. आ.न., -गा.पै.

शाकाहारि पन तसेच - "तुम लाश खा रहे हो" - चिकेन असेल तर सोबत बसु नको - माझ्या मुलाला एग alergy आहे. मग शालेत कुनालच egg allowed नाहि

उपयुक्त माहिती: Today I was called to help in a love-jihad case. In the last three months, this is the fourth or fifth such case. I am writing this because it's very necessary to make parents aware of the risks children are facing. 1. Out of the five odd cases that have come to me, only one is what is known to be a 'lower' caste. 2. Girls are trapped at any age. One was a widow with two children. But all other girls were between 14 and 16 when the affair started. 3. In almost all cases, the boys take the girls out on bike rides. Girls are made to feel that this is 'freedom'. 4. The Muslim boys are trained to make the girls sexually aware. They then start by holding hands, giving a friendly hug, touching inappropriate places by 'mistake'. They then move on to kissing and physical relationship when the girl is in 10th or 12th and under educational stress. Videos of their physical relationship is made secretly. 5. Most parents are unaware till it is too late. 6. Once parents come to know and try to break the relationship, either the girl is pressured to run away, or the girls are blackmailed to continue relationship by blackmailing them with videos of their physical relationship. Till this point, the girl is unaware that a video was made without her knowledge. 7. If the girl insists on breaking up, the boy will get his friends to force physical relationship with the girl with threat or blackmail. All the time, he will keep saying that he will marry the girl. 8. If parents interfere, the boy will stay away temporarily. Once the girl is 18, this starts again and this time the girl is completely trapped. 9. Mostly, marriage takes place. Girl is converted. For about six months, there are no problems. Then starts the torture. Continuous pregnancies and termination of pregnancies take place. 10. After two years, the boy will get married again to some other girl while remaining married to the first girl. 11. Now the first girl will definitely resist. To keep her in the marriage, she is raped by boy's father and brothers. Other women members of the family will beat the girl routinely. 12. Police and other family members (if still on talking terms) will counsel the girl to adjust and continue in the marriage. 13. In many cases, if the girl resists, she will be jailed inside the house without a mobile. 14. If she manages to run away, she will not get custody of the children or get only one child custody. The other child(ren) will remain with husband. 15. Even if court gives monthly maintenance, husband will never pay. It is an unusual marriage because girl will be converted only after marriage, NOT BEFORE. So she cannot claim right to husband's property. But boy can claim right to girl's parent's property as per Hindu customs! 16. Please enlighten your children of this Muslim menace called love jihad before it's too late. *Share this with all non-Muslim parents.* *Attention all non-Muslim parents:* Today I was called to help in a love-jihad case. In the last three months, this is the fourth or fifth such case. I am writing this because it's very necessary to make parents aware of the risks children are facing. 1. Out of the five odd cases that have come to me, only one is what is known to be a 'lower' caste. 2. Girls are trapped at any age. One was a widow with two children. But all other girls were between 14 and 16 when the affair started. 3. In almost all cases, the boys take the girls out on bike rides. Girls are made to feel that this is 'freedom'. 4. The Muslim boys are trained to make the girls sexually aware. They then start by holding hands, giving a friendly hug, touching inappropriate places by 'mistake'. They then move on to kissing and physical relationship when the girl is in 10th or 12th and under educational stress. Videos of their physical relationship is made secretly. 5. Most parents are unaware till it is too late. 6. Once parents come to know and try to break the relationship, either the girl is pressured to run away, or the girls are blackmailed to continue relationship by blackmailing them with videos of their physical relationship. Till this point, the girl is unaware that a video was made without her knowledge. 7. If the girl insists on breaking up, the boy will get his friends to force physical relationship with the girl with threat or blackmail. All the time, he will keep saying that he will marry the girl. 8. If parents interfere, the boy will stay away temporarily. Once the girl is 18, this starts again and this time the girl is completely trapped. 9. Mostly, marriage takes place. Girl is converted. For about six months, there are no problems. Then starts the torture. Continuous pregnancies and termination of pregnancies take place. 10. After two years, the boy will get married again to some other girl while remaining married to the first girl. 11. Now the first girl will definitely resist. To keep her in the marriage, she is raped by boy's father and brothers. Other women members of the family will beat the girl routinely. 12. Police and other family members (if still on talking terms) will counsel the girl to adjust and continue in the marriage. 13. In many cases, if the girl resists, she will be jailed inside the house without a mobile. 14. If she manages to run away, she will not get custody of the children or get only one child custody. The other child(ren) will remain with husband. 15. Even if court gives monthly maintenance, husband will never pay. It is an unusual marriage because girl will be converted only after marriage, NOT BEFORE. So she cannot claim right to husband's property. But boy can claim right to girl's parent's property as per Hindu customs! 16. Please enlighten your children of this Muslim menace called love jihad before it's too late.

उपयुक्त लेख.. खुप दिवसांनी मिपावर आलो आणि हा लेख वाचुन छान वाटले.. वाचन खूण साठवली आहे