विद्या बाळ गेल्यानंतर त्यांच्या आदरांजली सभेत उल्लेख केलेले त्यांचे शेवटचे रेकॉर्डिंग. मार्च 2020 च्या मिळून सार्याजणी मधे आले आहे. स्वेच्छामरण या विषयी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांची मते काय होती हे जाणुन घेण्याची उत्सुकता होती.
-------------------------------------------------------------------------
अखेरच आवाहन...
मी विद्या बाळ, १०१, नचिकेत सोसायटी, प्रभात रोड, पुणे - ४, वय ८३ पूर्ण. आज मनाच्या एका अत्यंत गंभीर अशा; पण निर्णायक अवस्थेत बोलते आहे. हा विचार मी आजवर शेकडो लोकांशी बोललीये, पण कुणाला तो इतका गंभीर वाटला, कुणाला नाही, मीही कदाचित थोडी द्विधा मनस्थितीत असेन. पण आज मी अतिशय निर्णायक मनस्थितीत बोलतीये. माझे दात काढल्यामुळे थोडी अस्पष्टता येतीये ती समजून घ्या.
मला असं म्हणायचंय की, मला केव्हापासूनच वाटतंय की माझ्या आयुष्याला आता अर्थ राहिलेला नाही. सगळे माझे प्रियजन सांगताहेत मला की, तुला खूप करण्यासारखं आहे, खूप आयुष्य पुढे आहे, पण मला स्वतःला प्रामाणिकपणे असं वाटतं की, त्याला अर्थ नाहीये, या पुढे बरं होणं, काम करणं, पहिल्या उमेदीनी बरं होऊन काही करणं ही माझी इच्छाही नाहीये आणि मला करायचंही नाहीये. जोशी हॉस्पिटलमध्ये मी ई.ओ.एल. फॉर्म भरलाय - ‘एण्ड
ऑफ लाईफ' म्हणून. काही त्याला अर्थ नाहीये. कारण जोपर्यंत मी प्रत्यक्षात मरण्याच्या स्थितीत येत नाही. तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाहीये हे माझ्या प्रत्यक्ष अनुभवातून लक्षात आलंय. तेव्हा हा जो विचार करून, विशेषतः आज विचार करून, मी असं ठरवते आहे की, मला यातून सुटकेचा मार्ग हवा आहे. तो लीगल नाही, हे मला २००% माहितीये; पण तरी तो मला हवा आहे.
मला यावर एक मार्ग सुचतो तो असा : तो ४-८ दिवसात होणारा नाही, त्यामुळे सगळ्यांना सांगण्यास, जाहीर करण्यात आता अर्थ नाही, पण मी बोलतीये. माझ्या असं लक्षात आलं की, याच्यात माणसाच्या जवळ, सज्जन माणसाजवळ, जे नाही (त्याची गरज आहे). पण मला आज एक नवा विचार सुचलाय तो असा की, जी माणसं खरोखरच सुपारी देऊन काम करतात, त्या माणसांच्याकडे कदाचित म्हणजे उदाहरणार्थ क्रूर असे किंवा उद्देश नसलेले (लोक), सर्पमित्र (ज्यांच्याविषयी मला आदर आहे) किंवा त्या प्रकारचे लोक शोधणं आणि त्यांच्या मदतीनी यावर काहीतरी उपाय काढणं शक्य आहे. त्याला वेळ लागेल, पण ते कदाचित शक्य आहे. त्याला काही काळ लागेल तो घ्यावा. आणि माझी इच्छा आहे की त्यांनी तो (मार्ग) पूर्ण करावा ज्यामुळे तशी कुणावरच आरोपाची वेळ येणार नाही. कसं, काय, याचे डिटेल्स सिरिअसली ठरवावे लागतील.
आज मी मनाच्या अत्यंत निर्णायक, भावनाविवश नसलेल्या अवस्थेत बोलतीये. इथे आज या बैठकीला सविता ही माझी सध्याची सेवक, विनीता माझी मुलगी, उर्मिला माझी सून, डॉ. मंगला नाही माया (हजर आहेत). इथे हॉस्पिटलमध्ये मी आत्ता ॲडमिट आहे, तिच्याशीही (मायाशीही) मी बोलले आहे. या सगळ्यांनी कृपया याचा नीट नीट नीट विचार करावा आणि जे जे लोक मृत्युशय्येवर आहेत, किंवा लवाटे यांच्यासारखे प्रामाणिकपणे अशाच अवस्थेत मृत्यूची वाट पाहताहेत त्यांना मार्ग मोकळा करून द्यावा. कृपया तुम्ही सगळ्यांनी इथे विचार करावा. आत्ता ही गोष्ट मोठ्यांनी बोलण्याची नाहीये; पण काही महिन्यात, वर्षात, याचा विचार करावा. आत्ता ते शक्य नाही मला माहितीये. मी तोवर थांबायला तयार आहे; पण कधीच न निघणाऱ्या मार्गापेक्षा हा मार्ग खूप चांगला आहे, अनेकांसाठी चांगला आहे, तुम्ही सर्वांनी यावर विचार करावा. हे सगळे विचार ऐकून घेतलेत आणि त्यातनं सगळे जण शांत, शहाण्यासारखा विचार करतील अशी मला आशा आहे.
माझ्यावर लोकांनी इतकं अपार प्रेम केलंय की, मी असा निर्णय घेणं हे एका परीने खूप क्रूर आणि कृतघ्नतेचं लक्षण आहे. मला असं वाटतं की, अनेक लोकांच्या पुढील हितासाठी हा खूपच आणि विशेषतः माझ्यासाठी उपयुक्त (मार्ग) आहे. कृपया विचार करावा. माझ्या निर्णयाचं काही भलं करावं आणि व्यापक जनतेच्यासाठी काहीतरी करावं.
विद्या बाळ २९ जानेवारी २०२०
संध्या. ७.३०
वर्गीकरण
वाचने
65354
प्रतिक्रिया
156
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज्यांना खरंच सुखानी मरायचंय
In reply to @ प्रकाश घाटपांडे : संथारा ही तर्कक्रिया आहे का ? by संजय क्षीरसागर
@ सुबोध खरे : अन्नत्याग करण्यासाठी फार मोठे मानसिक धैर्य लागते
In reply to ज्यांना खरंच सुखानी मरायचंय by सुबोध खरे
तरुणपणी मृत्यू हे एक सुंदर
In reply to ज्यांना खरंच सुखानी मरायचंय by सुबोध खरे
नैसर्गिक मृत्यु
In reply to @ गवि : इतर मुद्दे सोडवत बसलो तर by संजय क्षीरसागर
@ सोत्रि : काय बोल्ता ?
In reply to नैसर्गिक मृत्यु by सोत्रि
१. नैसर्गिक मृत्यु ही जैविक
In reply to @ सोत्रि : काय बोल्ता ? by संजय क्षीरसागर
निसर्गाने ठरवलेला मृत्यू
In reply to १. नैसर्गिक मृत्यु ही जैविक by सोत्रि
@ सोत्रि : ७/८ वर्षाच्या मुलाला मृत्यूचं कितपत
In reply to १. नैसर्गिक मृत्यु ही जैविक by सोत्रि
...
In reply to @ सोत्रि : ७/८ वर्षाच्या मुलाला मृत्यूचं कितपत by संजय क्षीरसागर
@ Gk : नाही
In reply to ... by Gk
ओशोंना नैसर्गिक मृत्यू आला
In reply to @ Gk : नाही by संजय क्षीरसागर
https://www.thequint.com/news
In reply to ओशोंना नैसर्गिक मृत्यू आला by सुबोध खरे
@ सुबोध खरे : ओशोंना कसा मृत्यू आला यापेक्षा
In reply to https://www.thequint.com/news by सुबोध खरे
आमच्यापैकी कुणालाच ओशो चा
In reply to @ सुबोध खरे : ओशोंना कसा मृत्यू आला यापेक्षा by संजय क्षीरसागर
@ सुबोध खरे : ओशो कम्युन आणि मृत्यू समयी त्यांच्या समीप
In reply to आमच्यापैकी कुणालाच ओशो चा by सुबोध खरे
लेखाचा विषय काय आहे?
In reply to @ सुबोध खरे : ओशो कम्युन आणि मृत्यू समयी त्यांच्या समीप by संजय क्षीरसागर
@ सुबोध खरे : लेखाचा विषय काय आहे ते तुम्हीच पाहा !
In reply to लेखाचा विषय काय आहे? by सुबोध खरे
१. नैसर्गिक मृत्यू याचा अर्थ
In reply to @ सुबोध खरे : लेखाचा विषय काय आहे ते तुम्हीच पाहा ! by संजय क्षीरसागर
@ सुबोध खरे : मुद्दा सोडून वाट्टेल ती शेरेबाजी चालू आहे !
In reply to १. नैसर्गिक मृत्यू याचा अर्थ by सुबोध खरे
नैसर्गिक मृत्यू झाल्यावर
In reply to @ सुबोध खरे : मुद्दा सोडून वाट्टेल ती शेरेबाजी चालू आहे ! by संजय क्षीरसागर
नैसर्गिक मृत्यू चे प्रमाणपत्र कसे लिहायचे याचा अभ्यास करून उत्तर दिलेत
तर पुढे चर्चा होऊ शकेल अन्यथा दीड शहाण्याची अवास्तव बडबड म्हणून तुम्हाला फाट्यावर मारण्यात येत आहे@ सुबोध खरे : पुन्हा न वाचल्यामुळे तोल गेला !
In reply to नैसर्गिक मृत्यू झाल्यावर by सुबोध खरे
हार्ट फेल्युअर हे नैसर्गिक
In reply to @ सुबोध खरे : पुन्हा न वाचल्यामुळे तोल गेला ! by संजय क्षीरसागर
@ सुबोध खरे : फार कठीण आहे हो तुमचं !
In reply to हार्ट फेल्युअर हे नैसर्गिक by सुबोध खरे
याच्या उलट अभिप्राय असणाऱ्या
In reply to @ सुबोध खरे : फार कठीण आहे हो तुमचं ! by संजय क्षीरसागर
नैसर्गिक मृत्यू चे प्रमाणपत्र
In reply to याच्या उलट अभिप्राय असणाऱ्या by सुबोध खरे
@ सुबोध खरे : आता हद्द झाली !
In reply to नैसर्गिक मृत्यू चे प्रमाणपत्र by सुबोध खरे
मी फक्त नैसर्गिक मृत्यु
In reply to @ सोत्रि : ७/८ वर्षाच्या मुलाला मृत्यूचं कितपत by संजय क्षीरसागर
@ सोत्रि : केवळ एका घटनेवर तुमचा निष्कर्श आधारित आहे
In reply to मी फक्त नैसर्गिक मृत्यु by सोत्रि
मी फक्त नैसर्गिक मृत्यु
In reply to @ सोत्रि : केवळ एका घटनेवर तुमचा निष्कर्श आधारित आहे by संजय क्षीरसागर
इच्छा मरण
स्वेच्छा उपाय
अवांतर : आत्महत्या व प्रायोपवेशन यांविषयी हिंदू धर्ममत
प्रसिद्धीचा सोस वाटतो
समजल नाही
In reply to प्रसिद्धीचा सोस वाटतो by Gk
विद्या बाळ
In reply to समजल नाही by प्रकाश घाटपांडे
विचारांचा प्रसार म्हणजे प्रसिद्धीचा सोस?
In reply to विद्या बाळ by Gk
दोन्ही सारखेच आहे
In reply to विचारांचा प्रसार म्हणजे प्रसिद्धीचा सोस? by प्रकाश घाटपांडे
छान
In reply to विचारांचा प्रसार म्हणजे प्रसिद्धीचा सोस? by प्रकाश घाटपांडे
ईच्छा मरण आणि आत्महत्या हे
In reply to छान by Gk
-१
In reply to ईच्छा मरण आणि आत्महत्या हे by माहितगार
+१
In reply to -१ by शा वि कु
हॉस्पिटलात आजारी असेल तर डी
In reply to छान by Gk
हो
In reply to हॉस्पिटलात आजारी असेल तर डी by सुबोध खरे
प्रसिद्धीचा सोस वाटतो
In reply to प्रसिद्धीचा सोस वाटतो by Gk
+१ अनुमोदन
In reply to प्रसिद्धीचा सोस वाटतो by सुबोध खरे
विद्या बाळ यांच्या मते
मुळ लेख वाचला.. मला तरी हे
आपला कार्यभाग आटोपला आणि आता
In reply to मुळ लेख वाचला.. मला तरी हे by गणेशा
इच्छा मरण
अगदी बरोबर आहे, आत्महत्या /
In reply to इच्छा मरण by Rajesh188
कायद्याचा दुरुपयोग होण्याची भीती
In reply to इच्छा मरण by Rajesh188
दोन्ही लेख छान आहेत.
In reply to कायद्याचा दुरुपयोग होण्याची भीती by प्रकाश घाटपांडे
दोन्ही लेख कायद्याच्या
In reply to दोन्ही लेख छान आहेत. by चौथा कोनाडा
दुसऱ्या लेखात श्रीमती अरुण
In reply to दोन्ही लेख कायद्याच्या by सुबोध खरे
DNR आणि Living will मधे काय फरक आहे?
In reply to दुसऱ्या लेखात श्रीमती अरुण by सुबोध खरे
इच्छ्य मरण हे फक्त शरीर
In reply to इच्छा मरण by Rajesh188
एक सरासरी बघितली तर
सरकारी पातळीवर असहाय वृध्द
एवढी चर्चा झाली पण विद्या बाळ
ट्रीटमेंट नाकारण्याने येणार
In reply to एवढी चर्चा झाली पण विद्या बाळ by सनईचौघडा
त्यांचा नैसर्गिक मृत्यू च झाला
उपचार थांबवणे म्हणजे इच्छा
In reply to त्यांचा नैसर्गिक मृत्यू च झाला by Rajesh188
इच्छामरण या विषयी शाम मानव काय म्हणतात ते पहा
हे मायबोलीवर लिहिलेले थोडे बदलून कॉपी पेस्ट करत आहे
डॉकटर फिलिप निष्की
+१
In reply to डॉकटर फिलिप निष्की by चौकस२१२
माणसाची मत ठाम नसतात
चौथा कोनाडा यांच्या प्रतिसादार्थ माझं मत
@ गामा पैलवान : ही नक्की प्रक्रिया काय आहे ?
In reply to चौथा कोनाडा यांच्या प्रतिसादार्थ माझं मत by गामा पैलवान
विशिष्ट प्रकारे श्वास रोखणे
In reply to @ गामा पैलवान : ही नक्की प्रक्रिया काय आहे ? by संजय क्षीरसागर