Science can answer moral questions- Sam Harris
"विज्ञान नैतिकता शिकवू शकत नाही" हे वाक्य सगळ्यांना अगदी सुपरिचित आहे. आणि अगदी नक्की. विज्ञानाला बरे वाईट यातले काय बरे कळणार ? विज्ञान तर्कशास्त्राचीच अशी शाखा आहे जी वेगवेगळ्या गोष्टींच्या निरीक्षणावरून अनेक अनुमान काढते. विज्ञान बेट्याच्या मुळात स्कोप मध्येच नाहीये बरे वाईट असे निर्णय घेणे.
पण यात गमतीचा भाग म्हणजे, विज्ञान नैतिकता शिकवू शकत नाही हे वाक्य येते कुठल्या अनुषंगाने ? तर नैतिकतेचा स्रोत हा धर्म आहे हे सिद्ध करण्यासाठी ! धर्मातल्या नैतिकतेकडे एकवार नजर फिरवली तरी हे लक्षात येतं की बऱ्याचश्या धर्मग्रंथांमधील नैतिकता ही 21व्या शतकात तशीच्या तशी कधीही घेता येणार नाही. धर्मातल्या बऱ्याचश्या कथा आणि उपदेश कालबाह्य म्हणून फेकुनच द्यावे लागतील, किंवा वैचारिक जिम्नॅस्टिक करून त्यातल्या संदेशाला 21व्या शतकात आणावे लागेल. (सॅम हॅरिस म्हणतोच- आज्ञापालन न करणाऱ्या स्त्रीला चाबकाने फटकवा, या धर्मातल्या आदेशाचे अनेक प्रकारे आकलन केले जाऊ शकते. मूलतत्ववादी शब्दशः अर्थ घेतील (हे आकलन तर्कहीन अजिबात नाही.) तर आधुनिक धर्मनेते काव्यात्मक मुलामा देऊन, केवळ उदाहरणार्थ/ सिम्बॉलीक फटके अथवा, आज्ञापालन न करण्याचा मनोवृत्तीला फटके अशी काहीबाही सारवासारव करतील. पण तरीही या दोन्ही टोकांमध्ये कुठेही ममत्व आणि समानता येत नाहीच!)
धर्मामध्ये काय प्रकारची नैतिकता दिसते-
1) स्त्रियांनी स्वतःला नखशिखांत झाकून ठेवावे.
2) देवाच्या/पाहुण्याच्या आदरतिथ्यासाठी स्वतःच्या बाळाला मारून टाकावे. (अबराम/चिलया बाळ)
3) स्वधर्मीय सोडून इतरधर्मीय हे आपले नैसर्गिक गुलाम आहेत.
4) हॅमची कृष्णवर्णीय वंशावळ ही श्वेतवर्णीयांच्या गुलामगिरीसाठीच देवाने ठेवली आहे/ वर्ण हे मागच्या जन्माच्या पाप/पुण्यावरून ठरतात, त्यामुळे या जन्मात वर्णानुशंगाने मिळणारी वागणूक हा कार्मिक न्याय आहे.
हि यादी इतकीच नाही. यात आणखी बऱ्याच गोष्टी वाढवता येऊ शकतात.
या उदाहरणांचा दावा धर्म केवळ आणि केवळ अनितीने भरला आहे असा नाही. धर्म चांगल्या गोष्टी सुद्धा नक्कीच शिकवतो. इतकेच नव्हे, तर अनेक वर्षांपासून धर्माने नैतिकता शिकवण्याची महत्वाची भूमिका बजावली आहे हे सुद्धा अमान्य करता येणार नाही.
उदाहरणांचा उद्देश काय होता-
वरील गोष्टी अनैतिक आहेत, या बाबत वाद नसावा. पण आपल्याला बहुसंख्य धार्मिक व्यक्ती आज ह्या गोष्टी पाळताना दिसत नाहीत. निदान ह्या अशा गोष्टी पाळणारा माणूस आज नैतिक समजला जात नाही, इतके तर निश्चितच आहे. एकूण काय- तर धर्मातल्या ह्या गोष्टींकडे धार्मिक व्यक्ती सुद्धा दुर्लक्षच करतो.
ह्याचा अर्थ काय होतो ? बरेचसे धर्म नैतिकता हे "डॉग्मा" , म्हणजेच, एका व्यक्तीने अथवा संस्थेने घालून दिलेले नियम या प्रकारात सांगतात. हे नियम बहुतांशी माणसापेक्षा वरचढ शक्ती कडून आलेले असतात. हे नियम त्रिकालाबाधित सत्य आहेत, हाच धर्माचा दावा असतो.
पण आपल्याला दिसणारे धार्मिकजन, वर सांगितल्याप्रमाणे, या नियमांमध्ये काटछाट करतच असतात. किंबहुना, यामध्ये नवीन नियम सुद्धा वाढवत असतात. हे वाढवलेले नियम/बदललेले नियम हे नक्कीच धर्माच्या डॉग्मा/नियमांपेक्षा वेगळे आहेत.
हं. मग जर विज्ञान बरेवाईट सांगू शकत नाही, आणि धर्मानेही या बाबतीत सांगितले नाही/काही आता अनैतिक वाटत असणारी गोष्ट सांगितली आहे-
तर मग हे बदल/नियम आले कशातून ?
उत्तर आहे तर्क. माणसाने आपली तर्कबुद्धी वापरून डॉग्मा बदलले. मुळातच विज्ञान नैतिकता सांगू शकत नाही, हे आर्ग्युमेंटच शब्दछल आहे. विज्ञान तर्कशास्त्राने दिलेले एक उपकरण आहे. विज्ञान नैतिकतेवर तितकेच भाष्य करू शकते , जितके भाष्य आईस्क्रीम नैतिकतेवर करू शकते.
आणि धार्मिकव्यक्तीने सुद्धा "कुणाचा खून करू नका" हे फक्त धर्मातून उचलले आणि आहे तसे अंगिकारले नाही, तर तर्काशी पडताळले, की बुवा हा नियम खरंच नैतिक आहे का ? तर तर्काशी सुसंगत असल्याने हा नियम ठेवला गेला, तर इतर नियम जे तर्काशी सुसंगत नव्हते, ते उडवले गेले.
पुढील प्रश्न- तर्काने नैतिकता ठरवणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. कारण काय चांगले आणि काय वाईट ही कल्पनाच मुळात सापेक्ष आहे.
माझे मत- चांगले वाईट सापेक्ष आहे यात तर काही वाद नाहीच. पण, सापेक्ष असणे, याचा अर्थ असा होत नाही की समविचारी व्यक्ती एका निष्कर्षापर्यंत पोहचू शकत नाहीत.
उदाहरणार्थ- वर दिलेल्या धर्मातील गोष्टींना नैतिक कोण म्हणेल ? ज्याची मुळातच नीती अनितीची व्याख्या फारच वेगळी आहे असाच व्यक्ती!
उदाहरणार्थ- सापेक्षता असूनही, समलैंगिक व्यक्तींना पकडून शिक्षा केली जाऊ नये, हे सर्वांना (close enough) मान्य आहेच ना ? म्हणजेच की हा मुद्दा तुलनेने कमी गुंतागुंत असलेला आहे. यापेक्षा जास्त गुंतागुंतीचे मुद्दे तुलनेने जास्त सापेक्ष असतील, आणि जास्त चर्चा लागेल, एकमत होण्यासाठी.
शेवटचा आणि कळीचा मुद्दा. अणु बॉम्ब वगैरे सांगून विज्ञान अनैतिक आहे असे म्हणणे- नक्कीच. विज्ञान एक टूल आहे. त्याचा आपल्यादृष्टीने नैतिक आणि अनैतिक गोष्टींसाठी वापर होऊ शकतोच. पण विज्ञानाला अनैतिक म्हणणे, फक्त अणुबॉम्बच्या जोरावर, म्हणजे विष घातलेले आईस्क्रीम- यामध्ये विष आणि आईस्क्रीम ह्या वस्तू अनैतिक आहेत म्हणल्यासारखे होईल.
वर्गीकरण
वाचने
27292
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
विज्ञान आणि धर्माची तुलना का करत आहात
विज्ञान कोण नियंत्रित करते
तुम्हीच सांगितले तर बरे
In reply to विज्ञान कोण नियंत्रित करते by Rajesh188
शा वि कु,
कोहंसोहं पुस्तकं सुचवल्याबद्दल धन्यवाद
In reply to शा वि कु, by कोहंसोहं१०
मग तुम्ही चुकीचं विचार करताय
राजेश,
In reply to मग तुम्ही चुकीचं विचार करताय by Rajesh188
नितीमत्ता तसंही मानवी मनाची कल्पना आहे.
@अर्धवटराव
In reply to नितीमत्ता तसंही मानवी मनाची कल्पना आहे. by अर्धवटराव
त्यातही बरेच ग्रे शेड्स आहेत
In reply to @अर्धवटराव by शा वि कु
अनुभव + तर्क
In reply to त्यातही बरेच ग्रे शेड्स आहेत by अर्धवटराव
तर्क कि विवेक ?
In reply to अनुभव + तर्क by शा वि कु
विवेक
In reply to तर्क कि विवेक ? by अर्धवटराव
विवेक आणि तर्क
In reply to विवेक by शा वि कु
सहमत.
In reply to विवेक आणि तर्क by अर्धवटराव
समविचारी लोकांना एकत्र आणणे
In reply to सहमत. by शा वि कु
पण जर समविचारी व्यक्तींनी एकत्र येऊन नैतिकता ठरवायचे झाले...
In reply to सहमत. by शा वि कु
@ अर्धवटराव
In reply to पण जर समविचारी व्यक्तींनी एकत्र येऊन नैतिकता ठरवायचे झाले... by अर्धवटराव
त्यांचं प्रभाव क्षेत्रं वेगवेगळं आहे.
In reply to @ अर्धवटराव by शा वि कु
अर्धवटराव
In reply to त्यांचं प्रभाव क्षेत्रं वेगवेगळं आहे. by अर्धवटराव
परस्पर विरोध अॅज सच नाहि
In reply to अर्धवटराव by शा वि कु
अर्धवटराव
In reply to परस्पर विरोध अॅज सच नाहि by अर्धवटराव
मला नेमकं उलट वाटतं
In reply to अर्धवटराव by शा वि कु
तर्काला समजुतदारपणाचं प्रचंड
In reply to पण जर समविचारी व्यक्तींनी एकत्र येऊन नैतिकता ठरवायचे झाले... by अर्धवटराव
तर्काला समजुतदारपणाचं प्रचंड
In reply to पण जर समविचारी व्यक्तींनी एकत्र येऊन नैतिकता ठरवायचे झाले... by अर्धवटराव
काही प्रश्नांची उत्तरे ध्या
राजेश188
In reply to काही प्रश्नांची उत्तरे ध्या by Rajesh188
धर्माचा प्रभाव आणि नीतिमत्ता
In reply to राजेश188 by शा वि कु
विज्ञान एक टूल आहे
तुमच्या मते याचे काय कारण
In reply to विज्ञान एक टूल आहे by Rajesh188
स्वभाव म्हणजे
स्वधर्मीय सोडून इतरधर्मीय हे आपले नैसर्गिक गुलाम आहेत.
4) हॅमची कृष्णवर्णीय वंशावळ ही श्वेतवर्णीयांच्या गुलामगिरीसाठीच
आज काल अश्या चर्चा मधून मन
हे कसे साध्य असणार
अर्धवटराव
समारोप
In reply to अर्धवटराव by शा वि कु
समारोप
In reply to समारोप by अर्धवटराव
समारोपाची पानसुपारी.
In reply to समारोप by शा वि कु
कमाल आहे ब्वा
In reply to समारोपाची पानसुपारी. by अर्धवटराव
आता पानसुपारीत लवंग टाकतो.
In reply to कमाल आहे ब्वा by शा वि कु
इतर धर्मांचा मत प्रदर्शीत
राघव
In reply to इतर धर्मांचा मत प्रदर्शीत by राघव
आपल्याकडे एकच ग्रंथ आणि तीच
In reply to राघव by शा वि कु
अपौरुषेय यामध्ये पुरुष याचा
In reply to आपल्याकडे एकच ग्रंथ आणि तीच by राघव
तुम्ही मांडलेले सर्वकाही पटले.
हि कमजोरी खरी आहे
In reply to तुम्ही मांडलेले सर्वकाही पटले. by शा वि कु
सोत्री
In reply to हि कमजोरी खरी आहे by सोत्रि
उशीर झाला खरं तर प्रतिसाद
In reply to सोत्री by शा वि कु
मान्य आहे.
In reply to उशीर झाला खरं तर प्रतिसाद by राघव
यासंदर्भातली शिप ऑफ थिसिअस मधली सुंदर जैन प्रार्थना
may my karma of ignorance be
In reply to यासंदर्भातली शिप ऑफ थिसिअस मधली सुंदर जैन प्रार्थना by शा वि कु