कदाचित हि गोष्ट तुम्ही कुठेतरी, कधितरी ऐकली असेल,
तुर्तास तरि ती वाचुया ....उ म्मिच्या स्टाइलमध्ये....
मिपाच्या वाचकान्चे यावर मत घ्यायला मला नक्कीच आवडेल,
गोष्ट सुरु.......................................
एकदा एक मनिमाऊ आपल्या उन्दिरमामान्च्या मागे लागते. पाठलाग सुरु होतो, उन्दिरमामा पुढे, मनिमाऊ मागे.....
मनिमाऊ मागे.....उन्दिरमामा पुढे,
उन्दिरमामा पुढे.....मनिमाऊ मागे,
उन्दिरमामा चलाख असल्याने मनिमाऊच्या तावडित सापडत नव्हता. पण मनिमाऊ देखिल भुकेली असल्याने उन्दिरमामाचा पिच्छा सोडण्यास तयार नव्हती.
बराच काळ असच चालु होत, शेवटि एका वळ्णावर उन्दिरमामाना एक बिळ सापडले व ते बिळात पसार झाले.
मनिमाऊनेहि त्या बिळात शिरण्याचा प्रयत्न केला, पण बिळाच आशिर तोन्ड त्या महाकाय शरिराला आत येण्यास मज्जाव करत होते.
मनिमाऊ बराच काळ बिळाबाहेर ऊपाशिपोटी ’म्याऊ-म्याऊ’ करत राहिली.
उन्दिरमामा आतमध्ये काहिसे सुरक्षित होते.
’म्याऊ-म्याऊ’ चा आवाज त्याच्या काळजाचे वेध घेतच होता.
ब्रराच काळ हे असेच चालु होते.......
नन्तर मनिमाऊला हे कळुन चुकले की जोपर्यत आपण आवाज (म्याऊ-म्याऊ) करत राहु तोवर हा उन्दिर काहि बिळाच्याबाहेर येणार नाही.
म्हणुन मनिमाऊ शान्तपणे दबा ध्ररुन बसली.....
पण आपला उन्दिरमामा देखिल कच्च्या गुरुचा चेला नव्हता....त्याला मनिमाऊची हि लबाडि लगेच कळली....
तो काहि बिळाबाहेर आला नाहि.
असाहि बराच काळ उलटुन गेला.
उन्दिरमामा ढिम्म हलत नव्हता...........................
अचानक एक वेगळाच आवाज ऐकु येऊ लागला,
उन्दिरमामाने कान टवकारले,
’बो-भो.......’
’भो---भो----भो-----भो----’
’भोभो-----भोभो------’
अरे, हा तर कुत्तुचा (कुत्र्याचा) आवाज, म्हणजे मनिमाऊचा जानि-दुष्मन....
कुत्तु बिळाकडे आलाय म्हणजे मनिमाऊने नक्कीच धुम ठोकली असणार......
या विचाराने खुष होत स्वारि (अर्थातच उन्दिरमामाचि) बिळाच्या बाहेर आली....................आणी अलगद पन्जात सापडली.
च....च....च...
अरे, अरे, अरे........
कोणाचा बर पन्जा होता तो ??( ओळखा पाहु, ’माझ्या मिपाकरानो’)
अगदि बरोबर....
तो पन्जा होता मनिमाऊचा,
पोटासाठि आपल्या मातुभाषेला बाजुला सारुन एका परक्या भाषेचा (चातुर्याने) वापर करणार्या मनिमाऊचा......
आज आपल्यापैकी बहुत्तैकानि मनिमाऊ प्रमाणे आपल्या मातुभाषेला (म्याऊ-म्याऊ--मराठिला) बाजुला सारुन पोटासाठि परक्या भाषेचा ( भो---भोचा---इग्रजीचा ) आसरा घेतला आहे..
कदाचित या युगात तसे करण्यावाचुन आपल्याकडे दुसरा पर्यायच राहिला नाहिये.?
तरि मन्ड्ळी आपल्याला याबद्दल काय वाटते ?
पोटासाठि परक्या भाषेचा आधार घेण बरोबर आहे की चुकीचे ? आणि का ?
(ऊपाशी रहाण्यापेक्षा गरज पडल्यास परक्या भाषेचा आधार घेणारा)
(प्रायवेट कम्पनित काम करणारा एक मनिमाऊ)
(पण मायबोली मराठीला न विसरणारा)
आपला लाडका;
उम्मि.
वाचने
2401
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
वडाची ...............
जेंव्हा
तम्ही लहान
फरक
काहीतरीच