झोपेतून उठताच "भारतात 24 तासातील सर्वाधिक नवीन रुग्णसंख्या" अशी उत्साहित होऊन ऑनलाईन पेप्रांनी दिलेली बातमी वाचली. त्यापाठोपाठ चवदा एप्रिलपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाल्याची अधिकच उत्साहवर्धक बातमी वाचली.
सुटीतील सहलींच्या बेतांचे तेरावे आम्ही कालच जेवलो.
मुंबईत न येता कोंकणातच निवांत स्थायिक राहिलो असतो तर बरे झाले असते असे म्हणावे तर तिथेही हे शिंचे करोना घुसले आहेच.
आता माशीद्वारेही करोना प्रसार होऊ शकतो असं एक चिलट आलं आहे.
पाण्याद्वारे, डासाद्वारे वगैरे व्हायला लागल्याचा शोध बाहेर पडला की आपण बाहेर पडायला मोकळे.
आज तिसराच दिवस आहे लॉकडाऊनचा, हेही झटकन जाणवलं. कधीतरी तरुण असताना लॉकडाऊन सुरू झाला होता असं फिलींग आहे. आणि तीनच दिवस झाले ? दोनच खरं तर.. अं ?
बाकी कार्यालयीन कामकाज घरून दुप्पट वेगाने आणि दुप्पट व्यापाने व्हावे अशी अपेक्षा दिसतेय. डोक्याला कल्हई होतेय रोज.
त्यामुळे ते मोकळा वेळ मिळून छंद, बागकाम, तबला, चित्रकला (जळली ती लहानपणीच), फ्यामिलीसोबत गोड गप्पा वगैरे लोकांच्या अनुभवांना अधेमधे असूयेने वा वा म्हणणे चालू आहे.
सांगा आता आणखी कशाकशाने पसरतोय करोना आणि किती लाख लोक बाधित होणारेत?
अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या योजनांबद्दल आभार आणि अभिनंदन.
ता.क. : कतरीना कैफने परवा भांडी घासली आणि काल केर काढले. गृहकृत्यदक्ष दिसते. आता आज भरतकाम.
वर्गीकरण
वाचने
26329
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहजच एक गेम लावली अन जिंकलो पण... :)
प्रतिस्पर्ध्याने गेम रिझाईन
In reply to सहजच एक गेम लावली अन जिंकलो पण... :) by फुटूवाला
होय...
In reply to प्रतिस्पर्ध्याने गेम रिझाईन by प्रचेतस
फुटूवाला
In reply to सहजच एक गेम लावली अन जिंकलो पण... :) by फुटूवाला
हे पटलं...
नेहमीच्या ऑफिसच्या सवयीने
खुसखुशीत सकाळ
डबल बॅरल
In reply to खुसखुशीत सकाळ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१००% सहमत.
In reply to डबल बॅरल by प्रशांत
हा हा हा हा.........
In reply to खुसखुशीत सकाळ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाय द वे....
जर
In reply to बाय द वे.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरंय....
In reply to जर by फुटूवाला
म्हणजे घरं लॉक करून लोक बाहेर
बद्धीबळाची हाणामारी वाढल्यास
कंजुसकाका.
In reply to बद्धीबळाची हाणामारी वाढल्यास by कंजूस
हार जीत तर होतंच असते
In reply to कंजुसकाका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हं.
In reply to हार जीत तर होतंच असते by प्रचेतस
टाकताय का एक डाव?
In reply to हं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चला
In reply to टाकताय का एक डाव? by प्रचेतस
ही घ्या
In reply to चला by फुटूवाला
या भो लवकर
In reply to ही घ्या by प्रचेतस
अर्रर्र
In reply to या भो लवकर by प्रचेतस
माफ करा...
In reply to अर्रर्र by फुटूवाला
परत डाव मांडणार असल्यास
In reply to माफ करा... by फुटूवाला
मस्त झाला खेळ.
In reply to परत डाव मांडणार असल्यास by प्रसाद गोडबोले
हा प्रतिसाद फुटूवाल्याना आहे.
In reply to मस्त झाला खेळ. by प्रचेतस
होय...
In reply to मस्त झाला खेळ. by प्रचेतस
चालायचंच. त्यांचं नेहमीचं
In reply to कंजुसकाका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
.... अन त्या धाग्याला
In reply to बद्धीबळाची हाणामारी वाढल्यास by कंजूस
ओनलाईन पटाचा दुसरा धागा काढा
कंटाळा येतो काका.
In reply to ओनलाईन पटाचा दुसरा धागा काढा by कंजूस
घरात बसून डास मारतो आहे
फिशफुड खाणारे मासे ठेवतो. ते
In reply to घरात बसून डास मारतो आहे by भंकस बाबा
घरात बसून डास मारतो आहे
घरात बसून डास मारतो आहे
हा .... हा .... हा ...... !
In reply to घरात बसून डास मारतो आहे by भंकस बाबा
दुपारपासून मोबाईलचे नेट बंद
लोक का पाठवतात ?
In reply to दुपारपासून मोबाईलचे नेट बंद by विजुभाऊ
तीन आठवडे...
ॲमेझॉन प्राईम वर उपलब्ध
सध्या जसा वेळ मिळतोय तसे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Raftaara... :- Luciferहंटर (अल पचिनो ) चोरीचा मामला
कतरीना कैफने परवा भांडी घासली