Skip to main content

भाजपचे दिल्लीत पानिपत ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 09/02/2020 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. गेली काही दिवस ज्या निवडणुकांचे बिगूल वाजत होते ज्याची अतिशय चर्चा होत होती अशा नवी दिल्लीतील भाजपने प्रतिष्ठेच्या केलेली लढाई आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल पुन्हा विजयाकडे वाटचाल करतील असा मतदानोत्तर चाचण्यांचा कल दिसत आहे. भाजपचे केंद्रात सरकार असल्यामुळे साम दाम दंड भेद नितीचा वापर करुन या निवडणूकीत काही चमत्कार करता येईल का असा एक प्रयत्न झाल्याचे दिसून येते. तसेही इतर पक्षांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. एकही जागा नसलेली काँग्रेसपक्षाला अजूनही सावरता आलेले नाही. मात्र अनपेक्षितपणे दिल्लीच्या मोठ्या एका आंदोलनानंतर राजकीय प्रवेश केलेल्या आम आदमी पार्टीने दोनदा ज्या पद्धतीने सरकार स्थापन केले आणि त्यांनी दिल्लीकरांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, नवीन बदल केले एक आश्वस्त करणारा प्रचार केला. वीज,पाणी, शाळा, पर्यावरण, रस्ते शासकीय योजनांचा योग्य उपाययोजना सामान्य लोकांपर्यंत पोहचवल्या म्हणूनच तिसर्‍यांदा लोकांनी त्यांना निवडले आहे असे मतदानोत्तर चाचण्यांमधून दिसत आहेत. दुसरीकडे भाजपने नेहमीप्रमाणे धार्मिक ध्र्वीकरण ज्यात हिंदु-मुस्लीम गट तट करुन पाहिले. काही राष्ट्रीय मुद्द्यांना दिल्लीत टाकून पाहिले. संघपरिवाराने सव्वालाख कार्यकर्त्यांना प्रचारात लावले. (संदर्भ दैनिकातल्या बातम्या) काही खासदारांना मतदारसंघ वाटून निव्वळ त्याच मतदारसंघावर फोकस करण्याचा सांगण्यात आले. साधन संपत्तीचा योग्य उपयोग करुन त्यांना प्रचाराला जुंपले तरीही दिल्लीकरांनी या सर्व गोष्टींना नाकारुन आपवरच लक्ष केंद्रीत केल्याचे दिसते. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पार्टीवर टीका करुनही त्यांच्या विकासाच्या मार्गाला कोणीही रोखू शकलेले नाहीत असे वाटायला लागले आहे. मंडळी, राजकारणात सतत कोणीही आम्हीच सरकारात असू असे स्वप्न पाहू शकत नाही. जनतेचे प्रश्न कोणते, प्राधान्याने कोणते प्रश्न सोडवायला हवेत. यावर भर दिला की लोक योग्य पर्याय निवडतात असे वाटते. येत्या काळात जनता दिल्लीचा प्रवास कसा असेल ते बघणे रोचक असेल. अजूनही निश्चित कोणाची सत्ता येईल हे जरी गुलदस्त्यात असले तरी भाजपचे पानिपत होऊन मतदानोत्तर चाचण्या आपच्या पदरात कल टाकत आहेत असे दिसते. मंडळी, या सर्व निवडणू़कीत अजून काय मुद्दे होते ? दिल्ली विधानसभेतील बलाबल काय असेल ? संभाव्य वाटचाल आणि इतर दिल्ली राजकारणा विषयी आपापली मतं संदर्भासहीत, कोणाचाही व्यक्तीगत द्वेष न करता, शांतपणे काही वैचारिक चर्चा पुढे घेऊन जाता येईल काय, त्यासाठीचा हा काथ्याकूट. आपलं स्वागत आहे.

वाचने 37309
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

"एकंदरीत मोदी सोडले तर भाजपचे नेतृत्व प्रत्येक राज्यात एक एक पप्पूच करतोय हे पुन्हा एकदा सिद्ध झाले." हल्लिच्या काळात "अमूक तमूक पदाचा चेहरा कोण? नेतृत्व द्या" अशा प्रकारची मागणी होताना दिसते. मतदार मत देतात ते फक्त चेहरा/नेत्रुत्व पाहून नाही तर सत्ताधारी पक्षाने/सरकारने केलेल्या कामाचा विचार करूनही. मे २०१९ मध्ये मोदी सरकार निवडून आले ते फक्त चेहरा व नेत्रुत्व नाही तर काही अंशी तळागाळात पोचलेले काम. विविध सरकारी योजनांचा लोकाना झालेला लाभ.. हे मुख्य कारण होते. दिल्लीतही साधारण असेच झाले. 'आप'चा फोकस फक्त त्यानी केलेल्या कामांवरच होता.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

बाकी तमाचे तमाशे, मिपा वर परत येइन वगैरे हरलेल्या मनोवृत्ती ची लक्शणे आहेत!"विघ्नसंतोशी" हा योग्य शब्द.

केजरीवाल यांच्या यशात श्री अरुण जेटली यांचा थोडासा तरी वाटा आहे. बेफाट वक्तव्ये केल्याबद्दल न्यायालयात माफी मागायला लावून त्यांनी केजरीवालांना तोंड बंद ठेवण्याचे शहाणपण शिकवले. ते झाले नसते तर केजरीवाल कदाचित अशीच बेफाट वक्तव्ये आणि माकडचेष्टा करत राहिले असते आणि कदाचित हरले असते. न्यायालयातील माफी हा केजरीवाल यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळण ठरले आणि त्यांनी त्यानंतर बडबडीपेक्षा विकासाकडे जास्त लक्ष दिले असे एकंदर इतिहास सांगतो. बाकीच्या गोष्टी समोर आहेतच. उदा. मिपावरील काँग्रेसी लोक आपल्या ६३ जागी अनामत रक्कम जप्त झाली याबद्दल दुःख करायच्या ऐवजी भाजप हरला म्हणून आनंद व्यक्त करत आहेत (आपलं पोरगं नापास झालं तरी चालतंय पण शेजाऱ्याचा मुलगा पहिला न आल्याचा आनंद साजरा करत आहेत).

In reply to by सुबोध खरे

केजरीवाल यांच्या यशात श्री अरुण जेटली यांचा थोडासा तरी वाटा आहे. बेफाट वक्तव्ये केल्याबद्दल न्यायालयात माफी मागायला लावून त्यांनी केजरीवालांना तोंड बंद ठेवण्याचे शहाणपण शिकवले.
याच न्यायाने प्रधानसेवकांच्या यशात नेहरुंचा वाटा आहे असेही म्हणता येईल. निवडणुका आल्या की "पिछले साठ सालोंमे कुछ् नही हुआ"चा साक्षात्कार त्याना होतो.
न्यायालयातील माफी हा केजरीवाल यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळण ठरले आणि त्यांनी त्यानंतर बडबडीपेक्षा विकासाकडे जास्त लक्ष दिले असे एकंदर इतिहास सांगतो.
जे शहाणपण केजरीवालाना सुचले तेच भाजप आणि तथाकथित प्रधानसेवकाना सुचले तर आगामी निवडणुकात काही धङगत आहे अन्यथा फक्त पराभवाचे विश्लेषण करणे आणि "अस बोलायला नको होत, ते वक्तव्य करायला नको होत" वगैरे कबुली देत बसायची वेळ येणार नाही.
बाकीच्या गोष्टी समोर आहेतच. उदा. मिपावरील काँग्रेसी लोक आपल्या ६३ जागी अनामत रक्कम जप्त झाली याबद्दल दुःख करायच्या ऐवजी भाजप हरला म्हणून आनंद व्यक्त करत आहेत (आपलं पोरगं नापास झालं तरी चालतंय पण शेजाऱ्याचा मुलगा पहिला न आल्याचा आनंद साजरा करत आहेत).
मजा आहे नाही ?भाजपने मार खाल्यानंतर लोकाना दिल्ली विधानसभा हि महानगरपालीकेच्या आकाराची आहे असे साक्षात्कार झाले.

In reply to by दुर्गविहारी

एकंदरित केजरीवलांचा विजय विकासकांमुळे झालेला नाही. हे सिद्ध करन्याचा आटोकाट प्रयत्न चाललाय. कारण उद्या इतर राज्यातील लोकांनी केजरीवालांच उदाहरण देऊन भाजपकडे पायाभूत सुविधा मागू नयेत. त्यांनी पाकिस्तान, कश्मीर, 370 हुतच व्यस्त रहावं.

मनोवृत्तीतील फरक खालील प्रश्न ३ जणांना विचारला tar तुला कोणाची सत्ता चालेल? १) संघ भक्त : कोणाची हि कारण कि "हंम रहे ना रहे भारत ये रहना चाहिये " आणि ते सुद्धा सत्ता आज नाही उदय नाही पर्वा .. मन वळवू ( म्हणजे जवळ जवळ गांधीवादीच , फटाके खाऊ पण आधी मन वळवू मन वळवू ) २) काँग्रेस भक्त : आमचीच ( आणि ते सुधाच नेहरू घराणे असेल तर उत्तम) पण नसले शक्य तर कोणाचीही फक्त संघ नको ( त्यांची मदत चालेल मात्र) ३) अति दावे : आमची कधीच येणार नाही पण कोणाचीही आलाय तरी आम्ही देशाला सुखी जगू देणार नाही काड्या घालत राहू मग देश गेला चुलीत...

माफ करा "फटके" म्हणायचं होतं ( शिंचं मराठी चांगलं आहे पण टंकलेखन करताना गोंधळ आणि त्यात मिपावर एडिट नाही )