पि व्ही सिंधूने इतिहास घडवला
World Badminton Championships 2019, LIVE SCORE, finals: PV Sindhu beats Nozomi Okuhara 21-7, 21-7 to win gold
बासल् (स्विट्झर्लंड) येथे झालेल्या जागतिक बॅड्मिंटन विजेतेपद स्पर्धेच्या (World Badminton Championships 2019) अंतिम सामन्यात नोझोमी ओकुहारा हिचा २१-७, २१-७ असा मोठ्या फरकाने सरळ पराभव करत पी व्ही सिंधू जगज्जेती झाली आहे. हा ऐतिहासिक बहुमान मिळवणारी ती पहिली भारतिय आहे. आतापर्यंत या स्पर्धेत ५ पदके मिळवून आणि तीनदा अंतिम स्पर्धेपर्यंत धडक मारल्यानंतर आज सिंधुने सुवर्णपदकावर हक्क प्रस्थापित केला आहे. कोणत्याही जागतिक स्पर्धेत ब्राँझ, रौप्य आणि सुवर्ण पदके मिळविणारी सिंधु ही पहिली भारतिय खेळाडू आहे.
(सर्व चित्रे, जालावरून साभार)
वाचने
16368
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
I just simply like her.
मनःपूर्वक आनंद झालाय.. खूप खूप अभिनंदन! :-)
मजा आणली सिंधू नी
मनःपूर्वक अभिनंदन सिंधू चे .
अभिनंदन आणि शुभेच्छा
बाकी क्रिकेटवर पान भर आणि चवितचर्वण करणारी माध्यमेही या बातमीवर हातचं राखून लिहीतात, दाखवतात
सिंधूचे खूप अभिनंदन!!
अभिनंदन!!
जियो सिंधू, proud ऑफ यु.
धागालेखात असलेला बाल वॉशिंग्टनी उत्साह भावला.
लगे रहो.
In reply to वाह वाह वाह वाह वाह वाह वाह by अभ्या..
नक्की काय म्हणायचे आहे ???!!!
एखाद्या भारतियाने केलेल्या जागतिक विक्रमी कामगिरीबद्दलचे साधे कौतूकही इतका मानसिक त्रास देत आहे ? कमाल आहे !
In reply to वाह वाह वाह वाह वाह वाह वाह by अभ्या..
च्यायला अभ्या भावा गल्ली चुकलास जणू ?
मनःपूर्वक अभिनंदन सिंधू चे .
सिंधुचे मन: पूर्वक अभिनंदन.
अजून काही विजेते-
कोमलिका बारी - जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा - सुवर्ण
मानसी जोशी आणि प्रमोद भगत - जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धा - प्रत्येकी सुवर्ण
In reply to अजून काही विजेते- by यशोधरा
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !!!
In reply to अजून काही विजेते- by यशोधरा
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन
वा वा वा !!!!!
अभिनंदन .
पण खेळा मध्ये हा आपला हा परका असे काही नसते .
ह्याच्या अगोदरचे सर्वोच्य रेकॉर्ड काय आहेत
In reply to अभिनंदन by Rajesh188
नायतर काय ! लोक उगाचच, आपला देश/खेळाडू जिंकला की आनंद साजरा करतात आणि हारला की दु:ख साजरा करतात ! येडबंबू कुठचे !
;) =))
In reply to नायतर काय ! लोक उगाचच, आपला by डॉ सुहास म्हात्रे
लोल... नाहीतर काय... उगाच ऑलिंपिक मधे सिल्व्हर मिळालेलं तेव्हा सगळे हळहळलो आणि आता खूष होत आहोत....
ह्याच्या अगोदरचे सर्वोच्य रेकॉर्ड काय आहेत>>> जरी तुमचे समाधान होणार नाही, तरी माझ्या परीने उत्तर ..
हा खेळ म्हणजे धावण्याची शर्यत नाही की १० सेकंदाचे वर्ल्ड रेकॉर्ड आहे.... ह्या अगोदरील कोणतीही वर्ल्ड चँपियनशिप फायनल इतकी वन साईडेड झालेली नाही (हे झालं
वैयक्तीक मतं).. अजुन काही ......
... सिंधुने लागोपाठ ३ वर्ष फायनलमधे पोचुन दाखवले आहे...
वर्ल्ड चँपियनशिपमधे ५ मेडल जिंकुन सर्वाधिक मेडल जिंकणार्या विक्रमाची बरोबरी केलेली आहे....
सर्व प्रकारची मेडल जिंकणारी जगातील ४थीच खेळाडु आहे...
गेल्या २० वर्षात चीन सोडुन ह्या प्रकारात (विमेन्स सिंगल्स) मेडल जिंकणारा भारत हा फक्त ५ वाच देश आहे... (४० वर्षात ६वा)...
सिंधुचा तसेच सर्व खेळाडुंचा जे जागतिक पातळीवर भारतासाठी मेडल जिंकतात त्यांचा अभिमान आहेच....
सिंधूच्या ह्या दैदिप्यमान यशामुळे आसिंधु हिमालय अ'बाल' वृद्धांमध्ये उत्साहाचे 'वॉशिंग्टनी' वातावरण !!
In reply to सिंधूच्या ह्या दैदिप्यमान यशामुळे आसिंधु हिमालय अ'बाल' by चामुंडराय
In reply to सिंधूच्या ह्या दैदिप्यमान यशामुळे आसिंधु हिमालय अ'बाल' by चामुंडराय
हे
'वॉशिंग्टनी' वातावरण म्हणजे नक्की काय असते ?
प्रश्न खरा आणि गंभीर आहे._/\_
अभिमान वाटावा अशीच गोष्ट आहे. लोकसत्ताच्या संपादकीयात काही चांगले मुद्दे मांडले आहेत या अनुषंगाने.
अशा खेळाडूंच्या कुटुंबाचा खूप सहभाग आहे आणि तो प्रशंसनीय आहे असं काहीस लिहिलंय.
सिंधूचे मनापासून अभिनंदन..
https://www.google.co.in/amp/s/www.news18.com/amp/news/buzz/while-pv-sindhu-made-headlines-manasi-joshi-quietly-won-her-first-gold-at-bwf-para-badminton-championships-2286967.html
बढिया!!!
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2818993974780590&id=174719129208101
Yesssz!