Skip to main content

कोण कोण मॅच बघताहेत? (भारत वि. न्यूझीलंड सेमीफायनल)

लेखक गवि यांनी मंगळवार, 09/07/2019 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
सुरुवात अतिशय बेकार झाल्यावर न्यूझीलंड जरा अंमळ स्थिरावतंय की काय? मुळात टॉस आणि त्यांची पहिली बॅटिंग, इथेच मूड गेला. पण एका बातमीनुसार याच मैदानावर छत्तीस (तीस सहा) वर्षांपूर्वी विश्व कप सेमीफायनललाच इंग्लंड आपल्याविरुद्ध टॉस जिंकला, त्यांनी प्रथम ब्याटिंग घेतली आणि तरी आपण ती मॅच घेतली हे वाचलं. त्यामुळे जरा धीर आलाय. पॉप कॉर्न घेऊन बसलेल्या लोक्सनी इथे लाईव्ह चर्चा आणि अपडेट्स करा. कामानिमित्त घराबाहेर असलेल्यांना लाईव्ह स्कोर खूप ठिकाणी कळेल, पण मिपा स्टाईल टिप्पणीसहित प्रतिक्रिया गुगलही देऊ शकणार नाही. तेव्हा इच्छुकांसाठी हा धागा सुरु केल्या गेला आहे. आत्ता 125/2 34 षटके न्यूझीलंड फायनल स्कोर वधारेत वधारे अंदाज 225. कसे?

वाचने 72647
प्रतिक्रिया 133

प्रतिक्रिया

In reply to by गवि

धागा काढायला उशिर झाला नाहितर आधिच गेला असता ;)

In reply to by प्रशांत

बसवला टेम्पोत.. खरंच की.. लेकिन देर आये दुरुस्त आये, असं म्हणू. तुमचा काय अंदाज टोटल ?

गविसेठ, विश्वचषक क्रिकेट चालू आणि मिपावर धागा नाही याचं आश्यर्च वाटलं होतं. पण आपण धागा सुरु केला आभार. तीन बाद १३६ मला वाटतं. न्यूझीलंड २५७ करतील. -दिलीप बिरुटे

In reply to by यशोधरा

ते तर झालंच, पण आत्तापर्यंत झालेल्या विजयांप्रमाणे एकतर्फी आणि विनाचुरस सामना होणार की नखे कुरतडत बघावा लागणार हे महत्त्वाचे.

होणार हे निश्चित, संध्याकाळी नियमित कोट्यापेक्षा जास्त मद्य घेऊन क्रिकेट पाहणा-यांनी आज टेंशन घेऊ नये. अशी सुचना द्यावी वाटते. १४९/३-३८.४ -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

*वर्ल्डकप क्रिकेट अपडेट्स* भारत न्युझीलंड उपांत्य सामना सध्या पावसामुळे सामना थांबलेला आहे, जर पाऊस थोड्या वेळात थांबला व न्यूझीलंड पुन्हा फलंदाजीसाठी उतरला नाही तर, भारतासमोर 46 ओव्हरमध्ये 237 धावा करण्याचे आव्हान असणार आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार 4 ओव्हर कमी होणार आहेत. तसेच, जर सामना 20 षटकांचा झाला तर भारतासमोर 148 धावांचे आव्हान असणार आहे. न्यूझीलंडनं 4.5 च्या रनरेटनं धावा केल्या आहेत. त्यामुळं भारताला 6 च्या रनरेटनं धावा कराव्या लागणार आहेत.  आणि जर पाऊसामुळे आज सामना झालाच नाही तर बुधवारी सामना आजच्या स्थितीतच उद्या पुढे सुरू होईल. आणि जर उद्याही पाऊसामुळे सामना झालाच नाही तर गुण जास्त असल्यामुळे भारत थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल.(चोप्य पस्ते) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारतासमोर 46 ओव्हरमध्ये 237 धावा करण्याचे आव्हान असणार आहे.
ऑ? 46 ओव्हर्समधे फक्त 211 केल्यात ना त्यांनी? मग भारताला 46 ओव्हर्समधेच 237 टार्गेट कशापायी?

In reply to by गवि

When overs are lost, setting an adjusted target for the team batting second is not as simple as reducing the run target proportionally to the loss in overs, because a team with ten wickets in hand and 25 overs to bat can play more aggressively than if they had ten wickets and a full 50 overs, for example, and can consequently achieve a higher run rate. The DLS method is an attempt to set a statistically fair target for the second team's innings, which is the same difficulty as the original target. The basic principle is that each team in a limited-overs match has two resources available with which to score runs (overs to play and wickets remaining), and the target is adjusted proportionally to the change in the combination of these two resources

थोडंसं पुरुष मंडळींंना जळवण्यासाठी whatsapp वरून चोप्यपस्तेः *आज भारत वि.न्युझीलंड हा उपांत्य सामना असल्याने स्त्रियांनी घ्यावयाची काळजी....* पती १) सायंकाळी आपल्या नेहमीच्या मालिका लावण्याचा आग्रह अजिबात धरु नये... पती २) अधुनमधुन पतीदेवांना पाणी व चहा आणुन द्यावा.... पती ३) संघाची स्थिती वाईट असल्यास पतीस धीर द्यावा... पती ४) संघ उत्तम स्थितीत असल्यास पतीच्या आनंदात सहभागी व्हावे... पती ५) पती सातत्याने चिडचिड करु लागल्यास शांतता बाळगावी... पती ६) तुम्ही नेहमी जरी नवऱ्याला रिमोटली कंन्ट्रोल करत असल्यात तरीही टि.व्ही चा रिमोट आज मात्र त्याच्याकडेच द्यावा... पती ७) "भारतच जिंकेल" हे सातत्याने म्हणावे.... हे सगळं करताना तुमची घुसमट झाली तरी काळजी नको. तुम्हाला त्याचा वचपा काढायची एक खूप चांगली संधी वारंवार मिळेल आणि तेसुद्धा आजच. तिचा जरूर लाभ घ्या: पत्नी १) सामना सुरू असताना तुमचा नवरा जेंव्हा केंव्हा स्टेडियममध्ये बसलेल्या सुंदर बायकांकडे डोळे भरून पहात असेल तेंव्हा खुशाल टिव्ही आणि त्याच्या मधोमध (त्याला टीव्ही दिसुच शकणार नाही असं) उभं राहून त्याच्या नजरेला नजर भिडवून पण अतिशय प्रेमाने हे सगळे प्रश्न विचारा: स्कोर काय झाला? आत्ता कोण बॅटिंग करतंय? या बॉलरचं नाव काय? किती ओव्हर झाल्या? रन रेट काय आहे? कोण चांगला स्पिनर आहे? विकेट कीपरच नाव काय? मग टिव्हीवरची मॅच कोणीही जिंको... तुम्हाला निर्मळ आनंदाची अनुभूती येईल.

In reply to by इरामयी

पण शेवटचा उतारा नव्हता. छान. अवांतर : आमच्याकडे अजुनही सचिन तेंडुलकर टीम मधे असतो. धन्यवाद. ;) -दिलीप बिरुटे

ज्या देशात पाऊस असतो तिकडे ठेवतातच कशाला हे सामने. असो, आज काय वेदर रिपोर्ट ? राहिलेल्या चार षटकात ४० धावा जरी आल्या तरी दोनशे एक्कावनच्या पुढे ते जात नै. आणि ते आव्हान आपण लीलया पेलू शकतो. आपल्या संघाचं एक वैशिष्ट्य की आपण त्या त्या संघाच्या लेवलवर जाऊन खेळतो म्हणून दोनशे एक्कावनचं टारगेट साठी चार पाच फलंदाज कामी येतील असे वाटते. भारतीय संघाला शुभेच्छा आहेतच. अवांतर : धागा लेखकांनी वरचवर अपडेट टाकले पाहिजे. आग्रह नाही पण धाग्याचा रंगमंचं हलता ठेवला पाहिजे असे वाटते. -दिलीप बिरुटे (मिपा फलंदाज)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ते डकवर्थ लुईस नियमानुसार जास्तीचे टार्गेट येणार होते तो मानसिक लोड उतरला. त्या नियमांचं लॉजिक काही पटलं नाही पूर्णपणे. अमुक परिस्थितीत संघ अधिक आक्रमक खेळला असता, तमुक इतकी षटके असती तर तो रिलॅक्स खेळला असता वगैरे इतका तपशीलवार विचार करुन वाढीव टार्गेट ठरवायचं तर मग आणखी बऱ्याच बाजू निसटल्या असं म्हणता येतं. पाऊस पडू शकतो याची जाणीव असतानाही एक संघ तुलनेत स्लो खेळला, तर हे हेतुपुरस्सर असण्याची शक्यता आहे असं म्हटलं तर? त्याबद्दल त्यांना पेनल्टी द्यावी की फायदा? असो. बाकी मिपाकर रंगमंच हलता ठेवतीलच.

In reply to by गवि

डकवर्थ लुईस पद्धतीमध्ये काही सुधारणा करुन २०१४ पासून डकवर्थ-लुईस-स्टर्न (DLS) पद्धत वापरात आहे.

In reply to by गवि

The Duckworth-Lewis method of resolving rain-affected games has divided the cricketing fraternity into those who do not understand it and those who pretend they do. Rumour has it that it involves calculus, astrology, quantum mechanics and the use of dice. Either way , the teams get screwed.

https://m.maharashtratimes.com/sports/cricket-news/ndia-vs-new-zealand-… अरे देवा..
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजही हा अर्धवट राहिलेला सामना पूर्ण होईल का याचीही शक्यता धूसर असल्याचेच दिसते.

In reply to by गवि

काळजी/पर्वा इल्ले ! सामना पूर्ण झाला नाही तर लीग फेजमध्ये अधिक गुण असलेला भारत अंतिम फेरीत जाईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अजिबात होऊ न शकल्यास ते ठीक. पण पावसाच्या अधेमधे अर्धवट काहीतरी सामना होऊन डकवर्थ लुईस पद्धतीने टार्गेट वाढवून मिळून उगीच पराभवाची भानगड नको.

भारतीय इनिंगच्या वेळी अँपायरच्या दोन्ही खिशांत फेविकॉल भरुन ठेवावे. हात खिशाबाहेर निघायला नकोत. हवे तर पीडिलाईटची स्पॉन्सरशिप घ्यावी.

चायला. पुन्हा ईश्वराकडे अङ्गुलीनिर्देश? असू देत. जास्ती विकेटस घेतल्या तर पुढे अडीअडचणीत फायदाच होईल.

कोहली आऊट रिव्ह्यू ची मागणी केलीय.

दोन विकेट्स गेल्या आता तुमची जवाबदारी. ५/२ -३ ओव्हर्स -दिलीप बिरुटे