Skip to main content

हवामान अंदाज

लेखक Rajesh188 यांनी बुधवार, 12/06/2019 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
हवामानाचा अंदाज हा विषय लोक विनोदी दृष्टीने बघ तात . तेव्हा मी स्वतः अनुभव ghayche ठरवले आणि सर्व हवामान विषयी अॅप डाऊन लोड केले आणि अंदाज आणि त्या जागेचा खरे वातावरण चेक केले . आणि माझ मत पक्क झालं हवामानाचा अंदाज हे किती तरी प्रमाणात चुकीचे असतात . अजुन सुद्धा हवामान हा विषय मानवी शक्तीच्या पलिकडल विषय आहे

वाचने 15654
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

मानवी शक्तीच्या पलिकडल विषय आहे कि नाही ते नाही माहित पण शुद्धलेखन हा नक्कीच मानवाला शक्य असणारा विषय आहे ...

बहुतेक ढगांमुळे आणि रडार अचूक अंदाज द्यायला चुकत असेल, पण या विषयावर आपल्याशी एकदा गंभीर चर्चा करायची आहे.

In reply to by महासंग्राम

या विषयावर आपल्याशी एकदा गंभीर चर्चा करायची आहे.
वा, मंबा वा, अखेर असा शूर, वीर फिदायीन योध्दा मिळालाच मिपाला. बांध कफन डोक्याला, पाह्जे त्या हत्यारांनी हो शस्त्रसज्ज, ठरव एकदाची लांब कुठलीतरी युध्दभूमी, भले तीस चाळीस वर्षे लागू दे पण ठोस निकाल लागल्याशिवाय यायचेच नाही परत. स्वर्गात बहात्तर नाहीतर एकशेच्च्व्वेचाळीस (बहुधा नवीन नियमाने एक चाळीस चार) देखण्या देखण्या अप्सरा वाट पाहतील तुझी. विजयी होऊन आलास तर डायरेक्ट संपादकपद प्राप्त होऊन मोक्षास जाशील. ;) हलकेच घेशील हे काय सांगायला नकोच.

In reply to by अभ्या..

अभ्या भाऊ, नवीन नियम इतकाही टाकाऊ नाही वाटत मला. विशेषतः दुसरीच्या मुलांचा विचार केला तर. ऐसी वर चर्चा चालू आहे. बघूया काय वाटते जालावरील लोकांना ते !

In reply to by धर्मराजमुटके

मामा = आई भाउ काकु = बाबा भाउ बायको पणजी = आई आई आई / बाबा आई आई बाकी चालुद्या!!!

हवामानाचे अंदाज चुकीचे असले तरी Rajesh188, स्वमि१ आणी हस्तर आयडी वापरणारी व्यक्ती एकच आहे हा आमचा अंदाज अचूक आहे!!!

पाहिले तर स्वामी आणि मी ऐकच व्यक्ती नाही . हवामानाचा अंदाज का चुकतो असा अर्थ माझ्या पोस्ट चा आहे आणि तो नक्कीच गंभीर विषय आहे . पण तुम्हाला त्यात गांभीर्य दिसत नसेल आणि थिल्लर विषय वाटत असेल तर तर -?????????

In reply to by भंकस बाबा

बर्याच गोष्टी आणि गुप्त गोष्टी यांचा उलगडा होईलच असे आमचा मौजे दळणगाव येथील वार्ताहर बोंबिलभिके कळवतो दै फुपाटा

In reply to by नाखु

देशापुढे कित्येक गहन प्रश्न आ वासुन पडले आहेत, पण तुम्हाला डुआयडी शोधायची घाई लागली आहे.

In reply to by भंकस बाबा

'डुआयडी शोधणे' आणि 'तिचा जाच सहन करणे', यापैकी जास्त जोमाने काय करावे, हाच मिपावर अनंत काळ, आ वासून पडलेला, गहन प्रश्न आहे... त्याचे काय ?! ;) :)

उपग्रहांकडून मिळालेली माहिती, सुपरकॉम्प्युटर्सची मदत, आधूनिक संशोधन यांद्वारे हवामानाचा वेध घेण्याबाबत संशोधन होत रहाणे गरजेचेच आहे त्याबद्दल किंचितही आक्षेप नाही. पण त्याच वेळी निसर्गातील बदल (पक्षी, प्राणी, कीटक, झाडे इत्यादींमधील वर्तणूकीतील बदल) आणि त्यावरुन मिळणारे पावसाचे, हवामानबदलाचे संकेत यांचाही अभ्यास स्वतंत्रपणे चालू रहावा. सरकारने या अभ्यासाकरिता स्वतंत्र विभाग , निधी उभारावा असे मला वाटते. काही वर्षांपुर्वी मारुती चितमपल्लींचा मेघा छाये हा लेख तसेच २०१४ च्या पावसाबद्दलचे संकेत देणारा हा लेख अत्यंत वाचनीय आहे.

In reply to by मराठी कथालेखक

पूर्वी निसर्गाकडून पावसाचे संकेत मिळत होते पण आता चातक राहिला नाही, पेर्ते व्हा म्हणणारा पावश्या राहिला नाही, बदललेली परिस्थिती पाहता निसर्गच राहिला नाहीतर संकेत कुठून मिळणार ?

In reply to by महासंग्राम

आता चातक राहिला नाही, पेर्ते व्हा म्हणणारा पावश्या राहिला नाही,
खेडे गावात वा मानवी वस्ती पासून काही अंतरावर तर असतील ना ? या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्याकरिता पुर्ण राज्यात काही लोकांची टीम असावी, आपल्या सुदैवाने मारुती चितमपल्लीसारखे तज्ञ आपल्या राज्यात आहेत खेडोपाडी फिरुन यासंबंधीचे ज्ञान असलेली माणसे गोळा करावी लागतील आणि त्यांची निरीक्षणे संगणकीकृत करुन अधिक अभ्यास करावा लागेल. निदान दरवर्षी काही कोटींचे जरी बजेट याकरिता मंजूर झाले तरी हळूहळू हा प्रवाह चालू होईल. पण सरकारी /अधिकृत पातळीवर या पारंपारिक ज्ञानाकडे पुर्णतः दुर्लक्ष केले जात आहे हे खेदाचे आहे.

काही वर्षा पासून मौसमी पावूस हा जुन्या समजुती प्रमाणे जून मध्ये चालू होत नाही तर जुलै मध्ये चालू होतो आणि पुढे परतीचा पावूस सुधा एक महिना उशिराच परत जातो . मला वाटतं सर्वच ऋतु एक महिना पुढे गेले आहेत . पावसाचं अंदाज हा जुनी लोक सुधा व्यक्त करायचे ते निसर्गाचे निरीक्षण करून . निरीक्षण मधून त्यांनी पावसा विषयी काही ठोकताळे मांडले होते आणि ते सुधा काही प्रमाणात बरोबर येत .

हवामान खात्यात नोकरी असलेल्या नवऱ्याला त्याची बायको वैतागून घटस्पोट द्यायला निघाली कारण काय तर आज पाऊस पडणार आहे भाजी चहा कर असे सांगत असे

उपग्रह मार्फत प्राप्त झालेले photos, हवेतील आद्रता ,वाऱ्याची दिशा,समुद्राचे तापमान, ह्या सर्व घटकांचा अभ्यास करून त्याचा चोधा केला तरी हवामान चे ( जास्त करून पावसा विषयी ) अंदाज सपशेल चुकतात . ह्या चे कारण सरळ आहे आपल्या कडून कोणता तरी घटक राहून जातोय जो हवामान वर परिणाम करतो