आमची प्रेर्ना
मित्र दारू घेऊन येतात...
तुमच्या (काव्य) प्रतिभेला आवाहन आणि आव्हान देखील.
खिलजीभायच्या "माणसे मित्र बनून येतात" चे विडंबन करायला घेतले आणि अचानक एक कल्पना सुचली.
"मित्र दारू घेऊन येतात" अशी मध्यवर्ती संकल्पना घेऊन "आणि झिंग सोडून जातात" किंवा "आणि नशा सोडून जातात" किंवा आणखी काही सुचेल ते असा शेवट करायचा, मधल्या ओळी मात्र रिकाम्या ठेवायच्या.
आता तुम्ही काय करायचे तर तुम्हाला जसे सुचेल तसे मधल्या ओळी पूर्ण करायच्या आणि इथे प्रतिसादामध्ये टाकायच्या. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने वेगवेगळ्या कल्पना सुचतील. प्रत्येकाचे अनुभव वेगळे, आवाका वेगळा, प्रतिभा वेगळी त्यामुळे एकंदरीतच वाचायला मज्जा येईल.
दारुकामाचे काही प्रसंग उदाहरणार्थ सांगायचे झाले तर कोणा मित्राची बॅचलर्स पार्टी, कोणाचे प्रोमोशन तर कोणा एकाच्या सासऱ्याला लॉटरी लागली, कोणा एका मित्राची बायको माहेरी गेली किंवा येनाराय, येनाराय असा गजर करणारा परंतु क्वचितच येणारा तुमचा एखादा एनआरआय मित्र ड्युटी फ्री मधून दोन इम्पोर्टेड खंबे घेऊन आला आहे इत्यादी. अशा आणि इतर प्रसंगांना समोर ठेवून तुमची काव्य प्रतिभा या गाळलेल्या ओळी प्रसवू दे अशी मदिरा देवीला ओठी लावून प्रार्थना.
चला तर मग, उचला तो पेग आणि लावा ओठाला....नो नो ... उचला ती लेखणी .. आपलं ... उचला ते बोट आणि लावा कळफलकाला.
केशवसुतांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून
लिखाणाने भरू द्या मिपा
लेखणी भरभर चालू द्या...
बघूनीया प्रतिभा तुमची
धुंद आम्हा होऊ द्या...
क्विता चालू
मित्र दारू घेऊन येतात
.
.
.
.
आणि झिंग सोडून जातात ...
मित्र दारू घेऊन येतात
.
.
.
.
आणि नशा सोडून जातात ...
मित्र दारू घेऊन येतात...
मिसळपाव
अजुनी बसुनी आहे हलता गडी
हा माझा एक बाळबोध प्रयत्न
In reply to हा माझा एक बाळबोध प्रयत्न by ज्ञानोबाचे पैजार
ग्रेट पैजारबुवा! आवडली.
मित्र
मित्र स्वतः दारू बनून येतात
कवी लोकांनी आता काथ्याकूट
In reply to कवी लोकांनी आता काथ्याकूट by दुर्गविहारी
मिपावर गवि, मुवि, दुवि अश्या बऱ्याच " वि " ची मांदियाळी आहे.
मित्र दारू घेऊन येतात
मित्र दारू घेऊन येतात
जोहार मिपाकर जोहार तुमच्या प्रतिसादांचे आभार बहु संतुष्ट जाहलो..
च्पायला