Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विनायक प्रभू on Mon, 11/03/2008 - 08:49
  • Log in or register to post comments
  • 16085 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रकाश घाटपांडे on Mon, 11/03/2008 - 09:05

Permalink

घटस्फोट

विंडोजतुन डोकावणारी बदलती नातीहा २१ आक्टोबर २००७ लोकसत्तेतील लोकरंग पुरवणीतील चिन्मय बोरकर यांचा लेख अप्रतिम आहे. जागतिकिकरणाचा परिणाम केवळ आर्थिक वा तंत्रज्य़ान क्षेत्रावर होत नाहीत, तर ते नाते संबंधांवरही होतात. आय.टी. संलग्न क्षेत्रात सध्या लग्न टिकणे ही समस्या प्रकर्षाने जाणवू लागली आहे येत्या काळात हा प्रश्न अधिक व्यापक होणार आहे. आधुनिकतेच्या प्रचंड फोर्स मध्ये पारंपारिक व्यवस्थांना धक्के बसत आहेत. नात्यांची वीण बदलत आहे. असं चिन्मयने लिहिल आहे प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by संजय अभ्यंकर on Mon, 11/03/2008 - 17:00

In reply to घटस्फोट by प्रकाश घाटपांडे

Permalink

प्रकाशजीं सहमत!

प्रकाशजिंनी म्हटल्या प्रमाणे घटस्फोटांची समस्या वाढट आहे. वि.प्रं.नी म्हटल्या प्रमाणे लग्ना आधी मुला - मुली च्या ३-४ भेटीतून काय साध्य होते ते समजत नाही. मी एका मुलीला पहायला गेलो होतो तेव्हाव्ही गोष्टः मुलीच्या आईने मुली बरोबर वेगळ्या खोलीत गप्पा मारायचा बराच आग्रह केला. मी सांगीतलेकी मला जे सांगावयाचे आहे ते चारचौघां देखत सांगीतलेले आहे. या उप्पर मुलीला काही विचारायचे असेल तर मी तिच्याशी वेगळ्या खोलीत गप्पा मारायला तयार आहे. वेगळ्या खोलीत गप्पा मारायच्या राहील्या बाजूला, संपुर्णं बघण्याच्या कार्यक्रमात मी आणी मुलीचे आई-वडीलच गपा मारत होतो. मुलीने चेहेर्‍यावरची माशी सुद्धा हलू दिली नव्हती. हा प्रसंग आठवून आजही हसू येते. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 11/03/2008 - 09:09

Permalink

अग्रीमेंट

भारतात न्युपिटल ऍग्रिमेंट लवकरच ही एक अट होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Mon, 11/03/2008 - 09:21

In reply to अग्रीमेंट by विनायक प्रभू

Permalink

छानच की त्यात काही वाईट नाही.

प्रि नप ही नवरा-बायको दोघांच्या हिताचे सारखेच रक्षण करते. चांगली गोष्ट आहे. आता समुपदेशन प्रकार देखील केव्हाचा आलाय तरी कुठे सगळेच लोक त्यांच्याकडे थोडेच जातात? व समुपदेशन घेणारे सगळे सुखान्त असतील असे थोडेच आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 11/03/2008 - 09:34

In reply to छानच की त्यात काही वाईट नाही. by सहज

Permalink

समुपदेशन

समुपदेशन हे एक फॅड आहे. ९९% बकवास. समुपदेशन घेणारे सोडा करणारे सुद्धा सुखी नसतात. प्रि. नप कधी वाचले आहेका? भारतिय कायदा परिस्थितीत त्याचे योग्य एक्झीक्युशन फार कठीण वाटते. सर्वात योग्यः अय शेख तेरी तू देख. समुपदेशक गेला ढगात.
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Mon, 11/03/2008 - 10:20

In reply to समुपदेशन by विनायक प्रभू

Permalink

का बरं..?

समुपदेशनाने काहीच भलं घडत नाही का? मला अनुभव नाही पण चार चांगल्या गोष्टी ऐकून होते आजवर म्हणून विचारतेय... - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 11/03/2008 - 10:30

In reply to का बरं..? by नीधप

Permalink

खर्च

वेळ आणि पैसा खर्च करुन समुपदेशकाचा सल्ला अयकायला कानच बंद असतात. जे अयकतात आणि त्याचा वापर करतात त्यांचे नक्कीच भले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Mon, 11/03/2008 - 20:37

In reply to समुपदेशन by विनायक प्रभू

Permalink

समुपदेशन हे एक फॅड आहे. ९९% बकवास......खरंय..

समुपदेशनाच्या नावाखाली शिंग मोडून वासरात धुडगुस घालताय. ऑल पीस अँड विंड..... ग्रासरुट लेवलला काम करा आता.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 11/03/2008 - 20:51

In reply to समुपदेशन हे एक फॅड आहे. ९९% बकवास......खरंय.. by रामदास

Permalink

राग

हा कसला राग बॉ? कसली वासरे? मला शिंगे कधी उगवली? तुम्ही म्हणता ते ग्रास रूट कुठे आहे? कसला पीस कसला वींड ज्या मिपा वाल्यानी हाक मारली त्याच्यापर्यंत पोचलो की? एकतर गेले १ महिना तुम्ही भेटत नाही कारण काय ते माहित नाही. आपला नम्र विप्र
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Mon, 11/03/2008 - 09:19

Permalink

"काय बोलु?

"काय बोलु? कुठला विषय बोलु? कसली चर्चा करु? कसल्या आवडी निवडी? माझ्या भविष्यातील वैवाहिक जिवनाशी त्याचा काय संबंध. आणि समजा आवडी निवडी जुळल्या नाही तर काय करु? नकार देउ. (सासु चा चेहेरापांढरा फटक )ही माझी बायको- विषय संपला. काय जुळवाजुळव ती माझी मी बघुन घेईन." यशस्वी वैवाहिक जिवनाचे सार येथे आहेत....
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 11/03/2008 - 09:51

Permalink

दाखवणे

दाखवणे बघणे कार्यक्रमात समजूत दार पालक मंडळी "चला तुम्हाला टेरेस दाखवतो म्हणत नवर्‍याकडच्या लोकाना बाहेर काढतात्.किंवा त्याना आता बोलुद्या कोठेतरी जाउन असे साम्गतात. त्या अर्ध्या तासात मुलीली तु म्हणाचे. की तुम्ही या पासुन सुरुवात होते. मुलगा काहितरी बडबडतो आणि मुलगी पसन्त करतो ( बहुतेकदा) मुलगी घुम्यासारखी बसुन रहाते. ती फक्त हम्म हो नाही किंवा हा समोर बसलेला प्राणी अजून काय विचारेल असा विचार करत असते. बरे बाहेर गेले असतील आणि जास्त वेळ लागला तर आपल्या चिरन्जिवानी नवख्या मुलीला काय दाखवायला नेले आहे या चिन्तेत घरातली मंडळी असतात. कसनुसे हसत आणखी एकदा चहा पितात. आणि ती दोघे आल्यावर मुलगा आईशी कहितरी बोलतो. मुलेगी आतल्या खोलीत जाते. ती तिच्या आइशी काही तरी बोलते. मुलाची आई मुलाच्या वडिलाना काहि सांगते मुलीची आई मुलीच्या वडिलाना काहितरी साम्गते. अशा रितीने मुलाचे आणि मुलीचे आइ वदील लग्नाला तयार होतात. मुलगी पाया पडते मुलीला साडीचोळी दिली जाते. शुभमन्गल सावधान.................. ढुम ढुम ढुम ढु ढुमक्क ( सावधान हे शब्द ऐकल्यावर समर्थ रामदास बोहोल्यावरुन पळाले आणि त्यानी " प्रपंच करावा नेटका" हे लिहिले.) झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Mon, 11/03/2008 - 09:58

Permalink

हं

माझ्या बर्‍यापैकी जवळच्या एका मित्राने, मुलगी घरच्यांचे क्रायटेरीया पूर्ण करते ना बास! मी ऍडजेस्ट करून घेईन.. ते काहि वाईट मुलगी बघणार नाहित असा पवित्रा आजच्या जगात घेतला तेव्हा आम्ही सो कॉल्ड मॉडर्न लोकांनी त्याला जवळजवळ वेड्यात काढले. आता त्यांचा गेले २ वर्षे चाललेला संसार बघुन तरी त्याचा निर्णय चुकला असे वाटत नाहि. तरीही जेव्हा माझ्यावर लग्नाबाबत निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा इतक्या अलिप्तपणे+निर्भिडपणे मी निर्णय घेऊ शकणार नाहि हे देखील मी जाणून आहे. जे व्हायचे ते तसंही होणारच आहे. पण म्हणून सगळंच नशिबाच्या हवाल्यावर सोडणं कठिण वाटतं. जर निर्णय चुकला तर तो माझा चुकेल..नशीबाचा नाहि.... अश्यावेळी नशिबाला दोष देण्यात काय हशील? काय हवंय यापेक्षा नक्की कशी मुलगी नको आहे हे लक्षात ठेवणं गरजेच आहे असे मला वाटते. मला ३-४ मिटिंग्ज लागतीलच ;) (आयटीमुळे मिटींग्ज-टेलिकॉनची सवय लागलेला ;) ) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Mon, 11/03/2008 - 10:00

Permalink

प्रभु साहेब नक्की म्हणणे कळले नाही

एक प्रष्नः आज काल ३ ते ४ मिटींगा होतात म्हणे मुलगी बघितल्यानंतर. नेमके काय बोलतात ते होणारे जोडीदार? एवढ सगळ बोलुन होणा-या लग्नानंतर घट्स्फोटाचे प्रमाण का वाढते आहे. तुमच्या मते एकदा भेटले की परत लग्न होईपर्यंत भेटू नये की लग्न ठरवले तरच पुढे भेटणे? घटस्फोटाचे प्रमाण व लग्नाआधी जुजबी बोलणे किंवा विस्तारपुर्वक बोलणे याचा नेमका कसा संबध लावत आहात? तुमच्यासारखे थोडक्यात पिंक टाकायची तर मी असे म्हणेन की आज काल घटस्फोट होतात कारण पुर्वीसारखे चालवून घेत नाही कोणी. पटत नाही तर जा उडत. आजकाल कित्येक घटस्फोटीत लोकांचे सुखी दुसरे विवाह पाहीले आहेत. तुम्हाला काय वाटते लोक हौस म्हणुन घटस्फोट घेतात? कोणाचे स्पेसिफीक प्रि नप वाचले नाही. पण त्याबद्दल थोडीफार जी माहीत आहे त्यात दोन्ही बाजुच्या (आर्थिक) हक्कांचे रक्षण होते व दोन्ही बाजुचे वकील आपल्या अशिलांना योग्य असाच करार घेतात. भारतिय कायदा परिस्थितीत त्याचे योग्य एक्झीक्युशन फार कठीण वाटते. हे न्यायालयच ठरवेल. त्याचा प्रि नप नसावे असा अर्थ काढताय का?
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 11/03/2008 - 15:17

In reply to प्रभु साहेब नक्की म्हणणे कळले नाही by सहज

Permalink

पि़क

बरे बाबा. पिंक टाकणार नाही>
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 11/03/2008 - 10:11

Permalink

नेमके काय बोलतात

नेमके काय बोलतात ते होणारे जोडीदार? मला मुलींकडुन आलेले काही प्रश्र.. १)तुझे तुझ्या नोकरीतील फ्युचर काय वाटते? २)तुझे अफेअर वगरै आहे का ? ३)तुझ्या माझ्या विषयी काय अपेक्षा आहेत ? ४)पगार इन हॅन्ड किती मिळतो? ५)माझ्या आधी किती मुली पाहिल्यास ? ६)तु कधी भांडतोस का ? अजुन किती काय ..... माझ्या मते १ सेटिंग घ्या नाहीतर १०...समोरची व्यक्ती ही गुडी गुडीच वागणार त्यामुळे खरे व्यक्तीमत्व कळणे तसे मुश्कीलच आहे!! मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Mon, 11/03/2008 - 10:17

In reply to नेमके काय बोलतात by मदनबाण

Permalink

बुल्ज आय

शाब्बास मदनबाण बरोब्बर बोललास माझ्या मते १ सेटिंग घ्या नाहीतर १०...समोरची व्यक्ती ही गुडी गुडीच वागणार त्यामुळे खरे व्यक्तीमत्व कळणे तसे मुश्कीलच आहे!! वैयक्तिक मत - प्रेमविवाह ते सुद्धा निदान दोन वर्षांच्या प्रेमानंतर.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 11/03/2008 - 11:21

In reply to नेमके काय बोलतात by मदनबाण

Permalink

सर्व प्रश्न

सर्व प्रष्न नेहेमीचे. हीच माझी बायको ही भावना आल्यानंतर इतर प्रश्न नगण्य होतात. हा असे वाटून सुद्धा तुझ्या भावनाविरुद्ध मुलीच्या धारणा असतील तर मात्र "तू नही तो ऑर सही". हा नियम दोन्ही बाजुनी लागू.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 11/03/2008 - 10:28

Permalink

कोण, कधी, का

कोण, कधी, का आवडेल सांगता येत नाही, प्रेमविवाह असू देत वा ठरवलेलं लग्नं. फक्त त्या दोन व्यक्ती एकमेकांशी किती कमिटेड (मराठी शब्द?) आहेत तेच महत्त्वाचं! आणि ही कमिटमेंट होण्यासाठी किती वेळा आधी भेटावं लागेल तेही व्यक्तीसापेक्ष असावं. त्यात सर्वसमाविष्ट विधान करता येणं कठीणच आहे. किती लोकांना स्वतःचीच संपूर्ण ओळख असते की आपल्या स्वतःच्या जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत ते आपलं आपल्याला समजावं? (कमिटेड) अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 11/03/2008 - 10:33

In reply to कोण, कधी, का by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

बात

क्या बात कही अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 11/03/2008 - 11:12

In reply to कोण, कधी, का by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

अदितीने

अदितीने छान लिहिलं आहे.. आपला, (कुणालाही कमिटेड नसलेला) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 11/03/2008 - 11:28

In reply to कोण, कधी, का by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

समर्पण

क्या बात है संहिताजी ! फार छान ! पण असे समर्पण करणे फारच थोड्यांना जमते. बाकी सर्वत्र फक्त बाजारच आहे...देवघेवीचा. रोखठोक. नाना
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Mon, 11/03/2008 - 13:31

In reply to कोण, कधी, का by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

अदितीशी

अदितीशी प्रचंड सहमत ! कमिटमेंट, विश्वास, याला खूप महत्व आहे.. तसेच मी यात तडजोडीलाही महत्व देईन थोडं. मी माझ्या मैत्रिणींवरून बघते, कोणीही तडजोडीला तयर नसतं. मान्य आहे की, आपण इतके सर्वगुणसंपन्न असताना तडजोड का करावी वगैरे विचार येतात. पण ती करावी लागतेच. कुठे ना कुठे.. हे एकदा ध्यानात ठेवलं की माझ्यामते सर्व गोष्टी सुरळीत होतात. बाकी आमच्या लग्नाचीही कथा थोडीफार विप्रंसारखीच असल्याने मजा वाटली.. अविश्वसनिय वाटावं इत्कं फास्ट लग्न ठरलं. पण अर्थात नंतर एकमेकांना पूर्णपणे समजुन घ्यायला चिक्कार वेळ असल्याने काहीच प्रश्न आला नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 11/03/2008 - 13:36

In reply to अदितीशी by भाग्यश्री

Permalink

प्लास्टर

मला वेळ प्लास्टर ने दिला.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 11/03/2008 - 22:01

In reply to प्लास्टर by विनायक प्रभू

Permalink

म्हणजे

प्लास्टरमधल्या हातांनी 'हात' दिला म्हणा की!! मास्टर ब्लास्टरला प्लास्टरचे काय ओझे!! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 11/03/2008 - 22:05

In reply to म्हणजे by चतुरंग

Permalink

बरोबर

फूल ब्लास्ट.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 11/03/2008 - 15:54

In reply to कोण, कधी, का by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

अदितीचे म्हणणे पटले.

किती लोकांना स्वतःचीच संपूर्ण ओळख असते की आपल्या स्वतःच्या जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत ते आपलं आपल्याला समजावं? एकदम लाख वाक्य! आमच्या कारभारणीची आणि आमची एकच भेट झाली. एकमेकांना बघताक्षणीच दोघांच्याही डोक्यात घंटा वाजली होती की येस हाच/हीच आपला जोडीदार. तरीही त्यादिवसापासून लग्न साधारण ३ महिन्यांनी झाले. बर्‍याचवेळा फिरायला गेलो. बोललो. पुढील बाबतीत एकमेकांच्या अपेक्षा काय आहेत - आवडी-निवडी, पैसा, धंदा, दोघांनी नोकरी करणे/न करणे, मुलं-बाळं, नातेवाईक, घरातले लोक, मित्र/मैत्रिणी इ. ह्यासंबंधी बोलणे महत्त्वाचे. ही फक्त सुरुवात असते. एकमेकांना मान देणं, वैयक्तिक आवडीला सामावून घेणं आणि समर्पण ही यशाची गुरुकिल्ली! दोघांच्या मधे ईगो आला की इनो घ्यायची वेळ आलीच म्हणून समजावे! संसारात भांडणे होणार, वादविवाद होणार, तापातापी होणार - कशासाठी हे होते आहे ह्याचे मूळ शोधून त्यावर इलाज हा प्रत्येक प्रश्न सोडवायचा राजमार्ग! कितीही कंटाळा आला, वीट आला तरी कोणताही प्रश्न अर्धवट टाकू नका! सोनं चोख असेल तर अशा तापातापीतूनच बाहेर पडतं! तुम्ही मनाने स्वतःजवळ आणि मग एकमेकांजवळ येत जाता. बोहल्याच्या जवळ उभ्या असलेल्या समस्त मिपाकरांना/मिपाकरणींना शुभेच्छा!! B) (खुद के साथ बातां : रंगा, कुठेसं वाचलं होतंस ना? "आय ऍम दि बॉस इन धिस हाऊस अँड आय हॅव माय वाईफ्स परमिशन टु से सो!" ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Mon, 11/03/2008 - 16:14

In reply to अदितीचे म्हणणे पटले. by चतुरंग

Permalink

आमची घंटी पण अशीच वाजली ...

विप्र साहेब , पुन्हा एकदा उत्तम विषय आणि योग्य हाताळणी , हाबिणंदण .. आम्हाला समजला तुम्हाला काय म्हणायचा तां .. "प्लास्टर हाताला आहे हो " =)) =)) =)) रंगाकाका के साथ बातां : आमची घंटी तर न पघताच वाजलेली, आणि भेटल्यावर सायरन वाजलेले .. मग बाकी गोष्टी जसे उंची, रंग , जात-पात किंवा तत्सम ...गौण ठरल्या .. आता गोष्ट वेगळी आहे की लग्नासाठी मुलगी बघायला गेलो नव्हतो , आणि त्या अनुशंगाने बोलणी झालीच नाहे .. परंतू असं जरूर वाटलं भो .. शोध संपला आहे ... -- विचारी प्रेवी. टारझन
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 11/03/2008 - 16:50

In reply to अदितीचे म्हणणे पटले. by चतुरंग

Permalink

रंगाशेठ ...

(खुद के साथ बातां : रंगा, कुठेसं वाचलं होतंस ना? "आय ऍम दि बॉस इन धिस हाऊस अँड आय हॅव माय वाईफ्स परमिशन टु से सो!" ) मी हेपण ऐकलं होतं, "बीईंग माय हसबंड ही इज द हेड ऑफ द फॅमिली, अँड बीईंग हीज वाईफ, आय ऍम द नेक, आय डिसाईड विच डायरेक्शन टू लुक ऍट!" ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 11/03/2008 - 16:52

In reply to रंगाशेठ ... by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

आई गं!

लचकली गं मान माझी!! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 11/03/2008 - 17:02

In reply to रंगाशेठ ... by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

खरा मर्द...

एक साधा सरळ माणूस असतो. त्याची बायको लै खाष्ट असते. एकदा त्यांचं भांडण होतं. बायको काठी घेउन नवर्‍याच्या मागे लागते, नवरा पळत सुटतो. पळता पळता नवरा पलंगाखाली जाऊन लपतो. बायको महाकाय असल्याने, पलंगाखाली नाही शिरू शकत. ती बाहेरूनच ओरडते, 'अबे छुपता क्यों है? बाहर आ' नवरा पलंगाखालून म्हणतो, 'नही आउंगा, मर्द की जबान है, एक बार बोल दिया नही आउंगा बाहर तो बोल दिया.' बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 11/03/2008 - 17:05

In reply to खरा मर्द... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

हा हा हा!!

बिपिनभौ, एकदम धोबीपछाड आहे हा!!! =)) =)) =)) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 11/03/2008 - 17:09

In reply to हा हा हा!! by चतुरंग

Permalink

ह्म्म्म... क

ह्म्म्म... काय करणार रंगाशेठ, इथे मिपावरच थोडं बोलता येतं हो... अजून माझी बायको इथे नाहिये ना, म्हणलं थोडं मन मोकळं करावं, आपबीती सांगावी, तेवढंच मन हलकं होतं... अपने आपसे वार्तालापः तुमच्या बद्दल खरंच सहानुभूति वाटते हो. तुम्हाला तर ते पण सुख नाही. :( मागे एक विडंबन काय टाकलंत तर लगेच... जाऊ दे, नको त्या आठवणी. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Mon, 11/03/2008 - 23:33

In reply to रंगाशेठ ... by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

अदिती, माय

अदिती, माय बिग फॅट ग्रीक वेडींग मधे आहे हे वाक्य. आय मिन मी त्यात ऐकलंय , अजुन दुसरीकडे असू शकते. आई मुलीला समजवत असते, युअर डॅड इज हेड ऑफ द हाऊस, बट आय ऍम द नेक, अँड नेक डिसाईड्स व्हेअर टू मुव्ह द हेड! ( मी लिटरली टाळ्या वाजवल्या होत्या हे वाक्य ऐकून...! :) )
  • Log in or register to post comments

Submitted by एक on Tue, 11/04/2008 - 03:41

In reply to रंगाशेठ ... by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

माय इटॅलियन वेडिंग मधलं वाक्य आहे.

.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 11/03/2008 - 10:30

Permalink

सहज्राव.

सहज्राव. सामुपदेश करणारी व्यक्ती ही तिर्‍हाइ त असते. ती दोन्ही बाजुंकडे समान नजरेने पाहु शकते. कित्येकदा आपल्या जवळच्या मित्रानासुद्धा न सांगितल्या जाउ शकणार्‍या गोष्टी सामुपदेशकाला सांगितल्या जातात. त्याच्याशी मोकळे पणे बोलणे शक्य असते. सामुपदेशकाचे वैक्तीक जीवन हे त्याचे स्वतःचे असते. सामुपदेशक हा एक व्यक्तीच असतो. तो काही सर्वद्ज्य नसतो. त्याचे काम तुमच्या मनातले काढुन घेणे आणि त्यावर समर्पक उत्तर शोधायला तुम्हाला मदत करणे हे असते. त्याच्या व्यवसायाचा आणि वैयक्तीक आयुश्याचा तसा थेट सम्बन्ध नसतो. बरेचदा जुन्या कुटुम्बात सामुपदेशनाचे काम एखादी आत्या/मामा अथवा शेजारे /वडीलांचे मित्र करतच असतात. फक्त त्याना सामुपदेशक हे नाव नसायचे. झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Mon, 11/03/2008 - 10:42

Permalink

एक अनुभव

अशाच एका भेटीत , माझ्या मित्राला ,मुलीने , लग्न झाल्यावर वेगळे बिर्‍हाड करायचे सुचवले जे त्याला मान्य नव्हते त्या मुळे त्यांनी पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. ह्या मूळे लग्ना नंतरच्या कित्येक समस्या निकालात निघाल्या. त्यामुळे त्या भेटीचा कसा उपयोग केला जातो त्यावर ते अवलंबुन आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 11/03/2008 - 11:43

In reply to एक अनुभव by मराठी_माणूस

Permalink

अट

माझ्या बाबतीत म्हणाल तर वेगळ घर नाही ही अट पत्रिका बघतानाच काकाला घातली. अशा मिटींग बद्दल मला जरासुद्धा आक्षेप नाही. फक्त त्यावेळी बोललेले बोलाची कढी बोलाचा भात होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिरत भिरभि-या on Mon, 11/03/2008 - 11:31

Permalink

नेमके काय बोलतात व नेमके काय बोलावे?

मदनशेठनी नेमके काय बोलतात याची प्रश्नवली दिलिये. यात आणखी काय काय भर घालता येईल ? (सध्या सूपात पण जात्यात भरडण्याची मानसिक तयारी करणारा) अभिरत
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 11/03/2008 - 11:38

Permalink

आई ग

अनुभव असलेल्यानी मद्त करावी अभिरतला. मला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिरत भिरभि-या on Mon, 11/03/2008 - 11:49

In reply to आई ग by विनायक प्रभू

Permalink

बसली का टपली आम्हाला ?

वि.प्र. काका, मी निमित्तमात्र आहे. माझ्यापेक्षा अडलेले सिनीअर इथे खूप असतील; त्यांना मदत व्हावी, त्यांना बोलते करावे ही सदिच्छा आहे. (इथल्या दादा-तायांचे कार्य मार्गी लागल्याशिवाय बोहल्यावर न चढणारा) अभिरत
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 11/03/2008 - 11:53

Permalink

यंदा

यंदा कर्तव्य आहे ना? मग काय फरक पडतो. मी टपल्या मारत नाही. सहजराव सांगतिल तुला.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिरत भिरभि-या on Mon, 11/03/2008 - 12:10

In reply to यंदा by विनायक प्रभू

Permalink

नाय वो काका.

मपल्या डोक्यावर मुंडावळ्या चढायला अजून वेळ आहे. पण पूर्ण चर्चेत एक ऋषिकेष-भाऊ सोडून सगळे दिग्गज आणि अनुभवीच बोलताहेत म्हटले ज्या गरिब-बापुड्या जनतेची पुढारी चर्चा करताहेत त्यांचा आवाज व मागण्या पोचवाव्यात. कारण घरात नुकतीच काही लग्ने पाहिल्याने जरा या विषयाची धग पण जाणवली होती. असो (सहजरावांच्या सहज सोप्या प्रश्नोत्तराच्या प्रतिक्षेत) अभिरत
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 11/03/2008 - 12:02

Permalink

:)

विवाहाचा किस्सा भारीच आहे, विप्राच आहात तुम्ही :) दोन-चार भेटीत माणसाच्या स्वभावाची ओळख काय होणार. आयुष्यातली अनेक वर्ष एकत्र राहिल्यावरही माणसाचा स्वभाव ओळखता येत नाही, असे म्हणतात. तेव्हा अशा मिटींगामधून काय स्वभाव कळणार ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Mon, 11/03/2008 - 21:30

In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

हेच म्हणते..

विवाहाचा किस्सा आवडला. प्लास्टर मधले हात... जबरदस्त.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 11/03/2008 - 16:03

Permalink

चांगला विषय

प्रभूमास्तरांनी अजून एक चांगला विषय मांडला आहे. माझे मत पण अदितीच्या मतासारखेच आहे. भेटी गाठी झाल्या न झाल्या, बोलणं झालं न झालं तरी ठीक आहे. त्या दोन व्यक्ति किती कमिटेड आहेत त्या नात्याप्रति हे फार महत्वाचे आहे. जर का आवश्यक ते नाते जुळून आले तरच सगळ्या गोष्टी नीट होतात. जर का असे नसते तर पूर्वीच्या काळातली सगळीच लग्ने (जेव्हा मुलगी कळती पण नसायची, तिने मुलाला बघणे वगैरे तर सोडाच) शोकांत झाली असती आणि आजकालची बहुतेक लग्नं (जी नीट दोघांना वेळ वगैरे देवून किंवा प्रेमविवाह अशी असतात) सुखांत झाली असती. विप्रंनी हेच जरा वेगळ्या शब्दात वर एका प्रतिसादात लिहिले आहे..... "हीच माझी बायको ही भावना आल्यानंतर इतर प्रश्न नगण्य होतात." कमिटमेंट म्हणजे हीच असावी. अवांतरः मास्तर प्लॅस्टर किती दिवस होते? आणि तो पर्यंत कसं केलंत? आय मीन, जेवण वगैरे हो? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 11/03/2008 - 16:05

In reply to चांगला विषय by बिपिन कार्यकर्ते

Permalink

घास

अवांतरः मास्तर प्लॅस्टर किती दिवस होते? आणि तो पर्यंत कसं केलंत? आय मीन, जेवण वगैरे हो? का समोरचा घास भरवु शकत नाही का? काय राव तुमी पन.... छ्या
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 11/03/2008 - 16:17

In reply to घास by अवलिया

Permalink

चला...

चला म्हणजे कमीत कमी जेवणाचा तरी प्रश्न सुटला. बा़कीचं (म्हणजे कपडे घालणं, सकाळी आंघोळ वगैरे झाल्यावर हो) वगैरे पण कसं तरी जमवलंच असेल कसं तरी. असो. अवांतरः विप्रंची कॉमेंट आली नाही अजून... धाडकन एखादा फटाका फोडतील एकदम. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Mon, 11/03/2008 - 16:22

In reply to चला... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

काय भौ ...

आहो काका , आपला शोले मधला "रामगड का ठाकूर" माहित्ये का ? त्याला तर प्लास्टरपण नव्हतं ... हार्डवेअरच गायब होतं ... आणि सर्वर म्हणून "रामलाल" बसवला होता हा भाग अलहिदा .. पण ठाकूर ने मॅनेज केलंच ना ? - शोलेतल्या टारू-विरू मधला) टारू
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश on Mon, 11/03/2008 - 18:06

In reply to काय भौ ... by टारझन

Permalink

जल्ला क

जल्ला क मॅनेज केला र त्या ठाकुर न ? सूकटीच कालवन ठाकुर ओरपाचा न दूसरे दीवशी सकालचा तरास रामलालला खारपाडा क्रिप्टीक मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 11/03/2008 - 17:07

In reply to चला... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

अनुभव

३ महिने १ सोडून सर्व बाबतीत पराधिन होता जगती पुत्र दत्तात्रयाचा. (वडिलांचे नाव) अनुभव कामी येतोच की अड्चणीच्या वेळी. माझी जॉमेट्री खुप चांगली होती. ह्या उपर काही लिहु शकत नाही. मास्तर मारेल.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com