मून शॉट !
आज एक बातमी वाचली, ती ही, कि जगभरातील लाखो लोकांनी चंद्रावर प्रॉपर्टी खरेदी केली आहे (शाहरुख खान, मायकल जॅक्सन वगैरे ) ! वाचुन थक्क झालो! अनेक प्रश्नांचे तारे एकाच वेळी टिम्टिमले ! एका व्यक्तीने तर जमीन खरेदी करून नंतर फ्रॉड म्हणुन तक्रार केली आहे ! बघा !
कुणाला वरचा आकाशातला पसारा बघुन कुतूहल वाटेल , कुणाला काहीतरी संशोधन करावे वाटेल, कुणाला शांत वाटेल, कोण तारे मोजेल, कुणाची नुसतीच मान दुखेल, पण कुणाला चक्क प्रॉपर्टी दिसू शकेल !?
lunarland नावाची एक सो कॉल्ड "व्हिजनरी" कंपनी आहे, यांनी १९८० च्या सुमारास असा पराक्रम करुन दाखवलाय! यांना सादर प्रणाम.
ते म्हणे Earth's Oldest Most Recognized Celestial Real Estate Agency आहेत ! आणि ते सुद्धा "आपल्या गॅलॅक्सी पुरते मर्यादित" असे नमुद केलंय ! हाहा !
नुसतं सेलेब्रिटी , रिच पीपल फॅड म्हणावं, तर यांनी ठरवलेल्या एकर च्या किंमतीमधे कुणीही मल्टीएकर जमीन घेउ शकेल. सो दे आर सिरीयस अबाउट ईट !
त्यांची गिफ्ट पॅकेजेस पण आहेत ! 29.95$ Standard, 39.95 Premium. त्याच्यात म्हणे तुम्हाला एकरचा मॅप, फ्रेम्ड लूनार डीड मिळेल !
लूनार डीड ?? लुनॅटीक वर्ड असाच आला असाव !
मला सांगा, हे कोण टिकोजीराव चंद्रावरची जमीन क्लेम करणारे आणि विकणारे ? कोण कुणाला कसा काय हक्क देउ शकेल असले काहीतरी करण्यासाठी ? आणि लोक कसे काय घेतायत ? म्हणजे How people are Buying Into it ?
मुळात हे असलं काही करण्याचं सुचतं कुठून ? जगभरातले आयलंड सुद्धा क्लेम करुन झाले! पण आता चंद्र चक्क ? चंद्र तर काही नाही म्हणणार यान ! याय्चं तर या, जायचं तर जा ! पण म्हणजे एक्जॅक्ट्ली चाल्लय काय ?
यावर कुणीतरी मूनलाईट पाडावा ही नम्र विनंती !
- मून्मेष
वर्गीकरण
वाचने
5384
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
एखाद्या वस्तूची / असेटची
विषय
शॉक्ड ..
संक्षीसेठ वेलकम.
In reply to संक्षीसेठ वेलकम. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तो
In reply to तो by उन्मेष दिक्षीत
अच्छा असय होय.
कायदेशीर मान्यता कशी मिळवणार
In reply to कायदेशीर मान्यता कशी मिळवणार by Rajesh188
UN
In reply to UN by उन्मेष दिक्षीत
कायदा
मग काय ठरवलं? घेताय का जमीन
देख जानेमन पुरा चांद हि ना