अफगाणीस्तान पुन्हा एकदा तालीबानच्या ताब्यात जाताना
जानेवारी २०१७ मध्ये अध्यक्षपदी आरूढ होताना आमेरीकेचे सद्य सर्वेसर्वा डोनाल्ड ट्रम्प महाशयांनी आपला जन्म व्यावसायिकतेत गेल्या मुळे आपण डिल मेकींगमध्ये काही खासच आहोत आणि आपल्या या कौशल्याचा फायदा आमेरीकन जनतेला करून देऊ अशा बढाया मारल्या. आंतरराष्ट्रीय राजकारण हा काही जाहीर बढाया फुशारक्यांचा आणि एवढ्या तेवढ्याने हुरळून जाण्याचा किंवा तांत्रम फेकण्याचा मंच नव्हे हे सर्वसामान्य सोडा भल्या भल्यांच्या गावी नसते.
दोन वर्षे पुरी होता होता काल का परवा डोनाल्डरावांनी सिरीयातून त्यांची फौज काढून घेण्याचा आणि तोच मार्ग अफगाणीस्तानबाबत पत्करण्याचा निर्णय ट्विटर द्वारे जाहीर केला. डोनाल्डरावांनी गेल्या दोनवर्षात ट्विटरवरून घोषणाबाजी करुन एवढे धक्के देऊन ठेवलेत की त्यांनी दिलेल्या धक्क्यांचे आताशा कुणाला काहीच वाटेनासे झाले आहे. विश्वसम्राट लहरी असल्याचे माहित असले तरी त्याच्या लहरींनी होणार्या उलथापालथी बद्दल किमान भुवया उंच रहाणे स्वाभाविक असावे. मागच्याच दोन एक महिन्यात झालेल्या जी-२० आंतरराष्ट्रीय बैठकी दरम्यान सौदी राजक्पुत्राने रशीयन अध्यक्ष महोदयांना हाय फाईव्ह दिला त्याला त्यांच्या अरोगन्सचे स्वरुप असल्याचे मिडियाने मानले पण ते सिरीया आणि अफगाणीस्तानातील आमेरीकी पराजय साजरा करत असू शकण्याची शक्यता तेव्हा जाणवली नव्हती पण डोनाल्ड रावांचे अफगाणीस्तानातील माघारीबद्दलची निश्चित अंदाजा या दोघांना नसेलच असे नाही. कारण आमेरीकेच्या अफगाणीस्तानातून सन्मानाने बाहेर पडण्याच्यासाठी वाटाघाटीसाठी नेमलेल्या झालमे महोदयांकडुन या विषयी या दोघांना अंदाज आला असण्याची शक्यता असू शकावी.
डोनाल्डरावांनी महिनाभरापुर्वी पाकिस्तानने आमेरीकेला कसे फसवले या बाबत ट्विटरवरून गहबज केला. त्याला इम्रानरावांनी उलटपक्षी पाकिस्ताननेच आमेरीकेवर हकनाक उपकार केल्याचा कांगावा केला. भारतात डोनाल्डरावांच्या पाकिस्तानविरोधी ट्विटने आनंदी आनंद झाला तरी आमेरीकन मिडियाने इम्रानखानच्या पाकिस्तानी कांगाव्याची खरडपट्टी दूरच वॉशींग्ट्न पोस्टाने इम्रानच्या इंटर्व्ह्यूमधून जेमतेम दखल घेतली तर न्युयॉर्क टाईम्सने या ट्विटर प्रदर्शनाची दखलही घेतली नाही उलटपक्षी डोनाल्डरावांनी इम्रानरावांना तालीबानसोबत वाटाघाटीत मदत करण्याची विनंती केली आणि इम्रानरावांनी कसा होकार भरला यासाठी पाकीस्तानची पाठ थोपाटली.
आयएमएफच्या माध्यमातून आमेरीका पाकीस्तानवर दबाव वाढवेल अशी गोड स्वप्ने भारतीयांना पडत असतानाच डोनाल्डरावांचे खास प्रतिनिधी केवळ आमेरीकेवर तालीबानने दहशतवादी हल्ले करू नयेत एवढ्या बोलीवर अफगाणिस्तानातून आमेरीका बाहेर पडेल याचे सुतोवाच करत होते. त्यांच्या सुतोवाचाला किती गंभीर घ्यायचे याचा इतर सर्वांनाच प्रश्न होता पण डोनाल्ड ट्रंपांनी अफगाणीस्तानातून टप्प्याने फौज मागे घेण्याचे सुतोवाच करुन त्यांचे प्रतिनिधी खरेच बोलत होते हे दाखवून दिले.
एकुण इम्रान , सौदी प्रीन्स, आणि पुतीन यांची अरेरावीची भाषा उगीच नव्हती त्यांचा ढळढळीत विजय होत होता. इम्रानची आयएसाआय 'आमेरीकेने अफगाणिस्तानातून आमेरीकेने बाहेरपडताना कटूता ठेऊन बाहेर पडू नये अफगाणीस्तानचा मित्र म्हणुन बाहेर पडावे' असे म्हटले. डिप्लोमसीत अशा वाक्यांचे अर्थ बरेच वेगळे असतात.
६० टक्के अफगानीस्तान तालीबानने वापस मिळवला आहे, अफगाणी फौज तालीबानचा बिमोड करण्यास अपयशी सिद्ध झाली आहे. आमेरीकेने नॉमीनल ५-७ हजार फौज ठेवली तर उरलेली हि ५ - ७ हजार फौज केवळ मुठभर आमेरीकी डिप्लोमॅट्सचे आणि स्वतःचे तात्पुरते संरक्षण तेवढे करू शकेल. अफगाणिस्तान तालीबानच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाकिस्तानी आय एस आयच्या पूर्ण वर्चस्वाखाली येण्यास अजून काही महिन्यांचा अवधी आहे असे म्हणावे लागेल.
आमेरीकेचाच पैसा वापरून अफगाणिस्तानला स्वतःची कळ्सूत्री बनवणे, स्वतः नामा निराळे राहून आमेरीकेवर दहशतवादी हल्ले घडवणे, आमेरीकेने अफगाणीस्तान पादाक्रांत केल्या नंतर आमेरीकेच्याच पैशाने तालीबानींना आमेरीकेच्या विरुद्धा लढवून आमेरीकेची नाचक्की करणे आणि हे सर्व का तर अफगाणीस्तान आणि भारताचे संबम्ध चांगले होऊ नयेत आणि काश्मिर प्रश्नावर आमेरीकेने भारतावर दबाव आणावा यासाठी. अशा दुटप्पी पाकीस्तानी आयएस आयचे भले व्हावे वाटण्याचा प्रश्नच नाही पण आमेरीकी पैसा आणि अफगाणि दहशतवादी वापरून आमेरीकेचीच नाचक्की करण्याच्या पाकीस्तानी गुप्तच संस्थेच्या चातुर्याची दखल घेणे क्रमप्राप्त असावे.
अफगाणिस्तानात तालीबांनीशी तडजोड करायला भाग पाडणे म्हणजे अफगाणीस्तानात नंतर कोणतेजरी सरकार आले तरी भारताचा पत्ता कटलेला असेल. भारतासाठी इफेक्टीव्हलि २००१ च्या आधीची स्थिती पुन्हा एकदा अफगाणीस्तानात आलेली असेल. आणि गेल्या सतरा वर्षात अफगाणिस्तानात भारताने खर्च केलेले २ अब्ज डॉलर म्हणजे जवळपास दिड हजार कोटी रुपायांची बहुतांश भारतीय गुंतवणूक अक्कल खाती जमा झालेली असेल. ( संदर्भ)
नाही म्हणायला अफगाणीस्तानातील नद्यांवरील भारत सरकारने जी धरणे बांधून दिली त्यातील पाणी तालीबानने पाकिस्तानला सोडण्यास पुढेचालून नकार दिला तर भारतीय मदतीस छोटे मोठे फळ आले असे मानता येईल पण तुर्तास असे काही होण्यचा संभव कमी असावा असे वाटते.
आंतरराष्ट्रीय राजकारणात कोण कोणावर केव्हा आनि कशी मात देईल हे सांगणे कठीण असावे. येती काही वर्षे पुन्हा एकदा तालीबान असेल आणि आपल्या पाताळयंत्राला आलेल्या यशात पाकीस्तान अधिकच मग्रुरी दाखवत असेल अशी शक्यता नाकारता येत नाही.
संदर्भ आणि अधिक वाचन :
* गूगल न्यूजवर अफगाणीस्तान बद्दलच्या न्यूज शोधताना येते काही महिने Zalmay Khalilzad यांच्या नावाने शोधणे श्रेयस्कर. Zalmay Khalilzad इंग्रजी विकिपरीचय
ट्रंपची घोषणा होण्याची कुण कुण लागलेली असतानाचे सिएनएनवरचे विश्लॅषण
* आणि न्युयॉर्क टाईम्सवरील ताजे विश्लेषण In Afghanistan, Alarm and a Sense of Betrayal Over U.S. Drawdown
* Are We Ready to Lose Afghanistan? - theamericanconservative.com
* The war in Afghanistan isn’t a ‘stalemate.’ The U.S. has lost
* Is Trump handing over Afghanistan to Pakistan?
* Taliban greets Pentagon's withdrawal of troops from Afghanistan with cries of victory
* Afghans, diplomats surprised by report of Trump plan to pull out troops - पाकीस्तानी वृत्त संस्था जीओ न्यूज
* अलजझीरावर पाकीस्तानी पत्रकाराची पाकिस्तानी भूमिक्चे मांडणी (युट्यूब)
* Britain left in dark over US withdrawal from Afghanistan
* We Know How Trump’s War Game Ends
* Zalmay Khalilzad’s idea of paradise on earth – Asif Haroon Raja
* Full Transcript: Khalilzad’s Exclusive Interview After UAE Meeting
* ट्रंप घोषणे नंतर आमेरीकी मॅटीस या संरक्षण मंत्र्यानी राजीनामा दिला. आमेरीकी परराष्ट्रमंत्री माईक पाँपीओ यांनी एक मुलाखत दिली त्यात बाकी सर्व जगाबद्दल भूमिका मांडताना अफगाणिस्तातील फौजवापसी बद्दल मौनच पाळले
* ईंडिया वॅरी ऑफ पाक रोल इन सोल्यूशनर्टू अफगाणीस्तान - हिंदूस्तान टाईम्स प्रेस रिडर
* Blow to India as US to recall 50% troops in Afghanistan
* Donald Trump इंग्रजी विकिपीडिया परिचय
याद्या
24391
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
अमेरिकेचे धोरण
मुख्य डोकेदुखी आहे ती भारतासाठी
In reply to अमेरिकेचे धोरण by हुप्प्या
अंग काढून घ्यायचे
In reply to मुख्य डोकेदुखी आहे ती भारतासाठी by माहितगार
उरलेली बाजू
In reply to अंग काढून घ्यायचे by हुप्प्या
==
In reply to उरलेली बाजू by माहितगार
....ट्विट अचानक आले म्हणजे
In reply to == by हुप्प्या
निवडणुक जाहिरनामा/आश्वासनं
दुसर्या काठांवरून दिसणार्या दुसर्या बाजू
In reply to निवडणुक जाहिरनामा/आश्वासनं by राजाभाऊ
इझरेल अमेरिकेचा स्ट्रटिजिक
In reply to दुसर्या काठांवरून दिसणार्या दुसर्या बाजू by माहितगार
अमेरिकेने कोणत्याही देशात
अमेरिकेने कोणत्याही देशात
In reply to अमेरिकेने कोणत्याही देशात by सुबोध खरे
कम्युनिझमचा द्वेष
In reply to अमेरिकेने कोणत्याही देशात by प्रसाद_१९८२
कम्युनिस्ट हो ची मिन्हच्या
In reply to अमेरिकेने कोणत्याही देशात by प्रसाद_१९८२
म्हणजे काय ? किंवा म्हणजे कसे ?
In reply to अमेरिकेने कोणत्याही देशात by सुबोध खरे
सुरुवातीला तुमच्याकडे
In reply to म्हणजे काय ? किंवा म्हणजे कसे ? by माहितगार
सुरक्षा न देता डेव्हेलपमेंटवर खर्च करण्यात कोण शहणपणा आहे ?
Trump gets his facts wrong. Again
In reply to सुरक्षा न देता डेव्हेलपमेंटवर खर्च करण्यात कोण शहणपणा आहे ? by माहितगार
ट्रंपतात्या हल्ली हल्ली जरा
In reply to Trump gets his facts wrong. Again by नंदन
बेताल बहु मीटिंगीत बडबडला...
In reply to ट्रंपतात्या हल्ली हल्ली जरा by डॉ सुहास म्हात्रे
नेमकी कुठली लायब्ररी ही आहे,
In reply to Trump gets his facts wrong. Again by नंदन
गो फिगर!!
In reply to नेमकी कुठली लायब्ररी ही आहे, by यशोधरा
मदनबाण.....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हुस्न परचम... ;) :- ZEROलहरी राजा, भक्त आंधळे, अधांतरी सरकार...
इस्लामिक स्टेटच्या
In reply to लहरी राजा, भक्त आंधळे, अधांतरी सरकार... by नंदन
आमाला पावर नाय!
In reply to इस्लामिक स्टेटच्या by डॉ सुहास म्हात्रे
हायला
In reply to आमाला पावर नाय! by नंदन
ऑपरेशन इराण (+ चीनसोबतची वाढती तूट आणि कपोलकल्पित करकपात!)
रामशास्त्री कुठे गेले?
In reply to ऑपरेशन इराण (+ चीनसोबतची वाढती तूट आणि कपोलकल्पित करकपात!) by नंदन
अगाणिस्तानमधील मधली परिस्थिती चा भारताला काही फायदा तोटा आहे का
भारताला अफगाणिस्तानमध्ये
In reply to अगाणिस्तानमधील मधली परिस्थिती चा भारताला काही फायदा तोटा आहे का by Rajesh188
इतर मध्य आशियायी देश, इराण
In reply to भारताला अफगाणिस्तानमध्ये by डँबिस००७
हे ज्ञान की निरागसता ?
In reply to अगाणिस्तानमधील मधली परिस्थिती चा भारताला काही फायदा तोटा आहे का by Rajesh188
तो ट्विटरवर अमुक गोष्ट
ट्रम्प्पु?
In reply to तो ट्विटरवर अमुक गोष्ट by वीणा३
ढोंगीपणा
वरील ट्वीटमधे मूलनिवासी
In reply to ढोंगीपणा by शेंडेनक्षत्र
==
In reply to वरील ट्वीटमधे मूलनिवासी by नंदन
सारखं सारखं त्याच झाडावर काय!
In reply to == by शेंडेनक्षत्र
गणित : १/६४ आणि १/१०२४ हे अगदी लहान आकडे आहेत.
In reply to सारखं सारखं त्याच झाडावर काय! by नंदन
चालू द्या...
In reply to गणित : १/६४ आणि १/१०२४ हे अगदी लहान आकडे आहेत. by शेंडेनक्षत्र
ट्रम्प जे काय करतो ना
...आपण हसे लोकाला
In reply to ट्रम्प जे काय करतो ना by वीणा३
अतिरेकी द्वेष
In reply to ...आपण हसे लोकाला by नंदन
फ्रस्ट्रेशन?
In reply to अतिरेकी द्वेष by शेंडेनक्षत्र
ढोंगीपणा आणि 'ड्रेन द स्वाम्प'
छी:थू: कंटिन्युज!!
In reply to ढोंगीपणा आणि 'ड्रेन द स्वाम्प' by नंदन
सोव्हियेतांचे अफगाण 'आक्रमण'
ठीक
In reply to सोव्हियेतांचे अफगाण 'आक्रमण' by गामा पैलवान
सोव्हियेत रशियात अतंक्यांची पेरणी
In reply to ठीक by नंदन
तालिबान ची नक्की मागणी काय आहे
अमेरिकेचा इतरांच्या कारभारात हस्तक्षेप ... वाईट
वरील चर्चा जोरात सुरू आहे...
same pinch for sanjay dutt
In reply to वरील चर्चा जोरात सुरू आहे... by शशिकांत ओक