अफगाणीस्तान पुन्हा एकदा तालीबानच्या ताब्यात जाताना

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
22 Dec 2018 - 6:00 pm
गाभा: 

जानेवारी २०१७ मध्ये अध्यक्षपदी आरूढ होताना आमेरीकेचे सद्य सर्वेसर्वा डोनाल्ड ट्रम्प महाशयांनी आपला जन्म व्यावसायिकतेत गेल्या मुळे आपण डिल मेकींगमध्ये काही खासच आहोत आणि आपल्या या कौशल्याचा फायदा आमेरीकन जनतेला करून देऊ अशा बढाया मारल्या. आंतरराष्ट्रीय राजकारण हा काही जाहीर बढाया फुशारक्यांचा आणि एवढ्या तेवढ्याने हुरळून जाण्याचा किंवा तांत्रम फेकण्याचा मंच नव्हे हे सर्वसामान्य सोडा भल्या भल्यांच्या गावी नसते.

दोन वर्षे पुरी होता होता काल का परवा डोनाल्डरावांनी सिरीयातून त्यांची फौज काढून घेण्याचा आणि तोच मार्ग अफगाणीस्तानबाबत पत्करण्याचा निर्णय ट्विटर द्वारे जाहीर केला. डोनाल्डरावांनी गेल्या दोनवर्षात ट्विटरवरून घोषणाबाजी करुन एवढे धक्के देऊन ठेवलेत की त्यांनी दिलेल्या धक्क्यांचे आताशा कुणाला काहीच वाटेनासे झाले आहे. विश्वसम्राट लहरी असल्याचे माहित असले तरी त्याच्या लहरींनी होणार्‍या उलथापालथी बद्दल किमान भुवया उंच रहाणे स्वाभाविक असावे. मागच्याच दोन एक महिन्यात झालेल्या जी-२० आंतरराष्ट्रीय बैठकी दरम्यान सौदी राजक्पुत्राने रशीयन अध्यक्ष महोदयांना हाय फाईव्ह दिला त्याला त्यांच्या अरोगन्सचे स्वरुप असल्याचे मिडियाने मानले पण ते सिरीया आणि अफगाणीस्तानातील आमेरीकी पराजय साजरा करत असू शकण्याची शक्यता तेव्हा जाणवली नव्हती पण डोनाल्ड रावांचे अफगाणीस्तानातील माघारीबद्दलची निश्चित अंदाजा या दोघांना नसेलच असे नाही. कारण आमेरीकेच्या अफगाणीस्तानातून सन्मानाने बाहेर पडण्याच्यासाठी वाटाघाटीसाठी नेमलेल्या झालमे महोदयांकडुन या विषयी या दोघांना अंदाज आला असण्याची शक्यता असू शकावी.

डोनाल्डरावांनी महिनाभरापुर्वी पाकिस्तानने आमेरीकेला कसे फसवले या बाबत ट्विटरवरून गहबज केला. त्याला इम्रानरावांनी उलटपक्षी पाकिस्ताननेच आमेरीकेवर हकनाक उपकार केल्याचा कांगावा केला. भारतात डोनाल्डरावांच्या पाकिस्तानविरोधी ट्विटने आनंदी आनंद झाला तरी आमेरीकन मिडियाने इम्रानखानच्या पाकिस्तानी कांगाव्याची खरडपट्टी दूरच वॉशींग्ट्न पोस्टाने इम्रानच्या इंटर्व्ह्यूमधून जेमतेम दखल घेतली तर न्युयॉर्क टाईम्सने या ट्विटर प्रदर्शनाची दखलही घेतली नाही उलटपक्षी डोनाल्डरावांनी इम्रानरावांना तालीबानसोबत वाटाघाटीत मदत करण्याची विनंती केली आणि इम्रानरावांनी कसा होकार भरला यासाठी पाकीस्तानची पाठ थोपाटली.

आयएमएफच्या माध्यमातून आमेरीका पाकीस्तानवर दबाव वाढवेल अशी गोड स्वप्ने भारतीयांना पडत असतानाच डोनाल्डरावांचे खास प्रतिनिधी केवळ आमेरीकेवर तालीबानने दहशतवादी हल्ले करू नयेत एवढ्या बोलीवर अफगाणिस्तानातून आमेरीका बाहेर पडेल याचे सुतोवाच करत होते. त्यांच्या सुतोवाचाला किती गंभीर घ्यायचे याचा इतर सर्वांनाच प्रश्न होता पण डोनाल्ड ट्रंपांनी अफगाणीस्तानातून टप्प्याने फौज मागे घेण्याचे सुतोवाच करुन त्यांचे प्रतिनिधी खरेच बोलत होते हे दाखवून दिले.

एकुण इम्रान , सौदी प्रीन्स, आणि पुतीन यांची अरेरावीची भाषा उगीच नव्हती त्यांचा ढळढळीत विजय होत होता. इम्रानची आयएसाआय 'आमेरीकेने अफगाणिस्तानातून आमेरीकेने बाहेरपडताना कटूता ठेऊन बाहेर पडू नये अफगाणीस्तानचा मित्र म्हणुन बाहेर पडावे' असे म्हटले. डिप्लोमसीत अशा वाक्यांचे अर्थ बरेच वेगळे असतात.

६० टक्के अफगानीस्तान तालीबानने वापस मिळवला आहे, अफगाणी फौज तालीबानचा बिमोड करण्यास अपयशी सिद्ध झाली आहे. आमेरीकेने नॉमीनल ५-७ हजार फौज ठेवली तर उरलेली हि ५ - ७ हजार फौज केवळ मुठभर आमेरीकी डिप्लोमॅट्सचे आणि स्वतःचे तात्पुरते संरक्षण तेवढे करू शकेल. अफगाणिस्तान तालीबानच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाकिस्तानी आय एस आयच्या पूर्ण वर्चस्वाखाली येण्यास अजून काही महिन्यांचा अवधी आहे असे म्हणावे लागेल.

आमेरीकेचाच पैसा वापरून अफगाणिस्तानला स्वतःची कळ्सूत्री बनवणे, स्वतः नामा निराळे राहून आमेरीकेवर दहशतवादी हल्ले घडवणे, आमेरीकेने अफगाणीस्तान पादाक्रांत केल्या नंतर आमेरीकेच्याच पैशाने तालीबानींना आमेरीकेच्या विरुद्धा लढवून आमेरीकेची नाचक्की करणे आणि हे सर्व का तर अफगाणीस्तान आणि भारताचे संबम्ध चांगले होऊ नयेत आणि काश्मिर प्रश्नावर आमेरीकेने भारतावर दबाव आणावा यासाठी. अशा दुटप्पी पाकीस्तानी आयएस आयचे भले व्हावे वाटण्याचा प्रश्नच नाही पण आमेरीकी पैसा आणि अफगाणि दहशतवादी वापरून आमेरीकेचीच नाचक्की करण्याच्या पाकीस्तानी गुप्तच संस्थेच्या चातुर्याची दखल घेणे क्रमप्राप्त असावे.

अफगाणिस्तानात तालीबांनीशी तडजोड करायला भाग पाडणे म्हणजे अफगाणीस्तानात नंतर कोणतेजरी सरकार आले तरी भारताचा पत्ता कटलेला असेल. भारतासाठी इफेक्टीव्हलि २००१ च्या आधीची स्थिती पुन्हा एकदा अफगाणीस्तानात आलेली असेल. आणि गेल्या सतरा वर्षात अफगाणिस्तानात भारताने खर्च केलेले २ अब्ज डॉलर म्हणजे जवळपास दिड हजार कोटी रुपायांची बहुतांश भारतीय गुंतवणूक अक्कल खाती जमा झालेली असेल. ( संदर्भ)

नाही म्हणायला अफगाणीस्तानातील नद्यांवरील भारत सरकारने जी धरणे बांधून दिली त्यातील पाणी तालीबानने पाकिस्तानला सोडण्यास पुढेचालून नकार दिला तर भारतीय मदतीस छोटे मोठे फळ आले असे मानता येईल पण तुर्तास असे काही होण्यचा संभव कमी असावा असे वाटते.

आंतरराष्ट्रीय राजकारणात कोण कोणावर केव्हा आनि कशी मात देईल हे सांगणे कठीण असावे. येती काही वर्षे पुन्हा एकदा तालीबान असेल आणि आपल्या पाताळयंत्राला आलेल्या यशात पाकीस्तान अधिकच मग्रुरी दाखवत असेल अशी शक्यता नाकारता येत नाही.

संदर्भ आणि अधिक वाचन :

* गूगल न्यूजवर अफगाणीस्तान बद्दलच्या न्यूज शोधताना येते काही महिने Zalmay Khalilzad यांच्या नावाने शोधणे श्रेयस्कर. Zalmay Khalilzad इंग्रजी विकिपरीचय

ट्रंपची घोषणा होण्याची कुण कुण लागलेली असतानाचे सिएनएनवरचे विश्लॅषण

* आणि न्युयॉर्क टाईम्सवरील ताजे विश्लेषण In Afghanistan, Alarm and a Sense of Betrayal Over U.S. Drawdown

* Are We Ready to Lose Afghanistan? - theamericanconservative.com

* The war in Afghanistan isn’t a ‘stalemate.’ The U.S. has lost

* Is Trump handing over Afghanistan to Pakistan?

* Taliban greets Pentagon's withdrawal of troops from Afghanistan with cries of victory

* Afghans, diplomats surprised by report of Trump plan to pull out troops - पाकीस्तानी वृत्त संस्था जीओ न्यूज

* अलजझीरावर पाकीस्तानी पत्रकाराची पाकिस्तानी भूमिक्चे मांडणी (युट्यूब)

* Britain left in dark over US withdrawal from Afghanistan

* We Know How Trump’s War Game Ends

* Zalmay Khalilzad’s idea of paradise on earth – Asif Haroon Raja

* Full Transcript: Khalilzad’s Exclusive Interview After UAE Meeting

* ट्रंप घोषणे नंतर आमेरीकी मॅटीस या संरक्षण मंत्र्यानी राजीनामा दिला. आमेरीकी परराष्ट्रमंत्री माईक पाँपीओ यांनी एक मुलाखत दिली त्यात बाकी सर्व जगाबद्दल भूमिका मांडताना अफगाणिस्तातील फौजवापसी बद्दल मौनच पाळले

* ईंडिया वॅरी ऑफ पाक रोल इन सोल्यूशनर्‍टू अफगाणीस्तान - हिंदूस्तान टाईम्स प्रेस रिडर

* Blow to India as US to recall 50% troops in Afghanistan

* Donald Trump इंग्रजी विकिपीडिया परिचय

प्रतिक्रिया

हुप्प्या's picture

23 Dec 2018 - 1:29 am | हुप्प्या

अमेरिका अन्य देशात (विशेषतः मुस्लिम देश) नको इतकी ढवळाढवळ करते आणि त्यामुळे जगाला डोकेदुखी होते. अमेरिकेतील शस्त्रास्त्र बनवणार्या कंपन्या व त्यांच्या खिशात बसलेले राजकीय नेते यांच्या जोरावर आजवर अमेरिकेने अनेक देशात युद्धे केली. त्या देशांचा, अमेरिकन करदात्यांच्या पैशाचा बट्ट्याबोळ केला आहे आणि शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्रे बनवणार्‍या कंपनींचे उखळ पांढरे केले आहे. त्यात अमेरिकन जनतेचे हित नव्हते आणि नाही.
ट्रंप जर असल्या निरर्थक, खर्चिक, अमर्यादित काळ चालणार्‍या युद्धातून अंग काढून घेत असेल तर त्यात वाईट काय आहे? केवळ तो ट्विटरवर अमुक गोष्ट म्हणाला म्हणून ती वाईट ठरते का? मला वाटत नाही.

केवळ तो ट्विटरवर अमुक गोष्ट म्हणाला म्हणून ती वाईट ठरते का? मला वाटत नाही

.

अगदी, एखादी गोष्ट ट्विटरवरून केली म्हणून वाईट ठरते असे नाही. पण ट्रंपला अशा देशाचे नेतेपद मिळाले आहे ज्या देशाची जगभर ढवळाढवळ होती आणि आहे, एवढेच नाही त्याने देशाच्या अंतर्गत बाबीत केलेल्या निर्णयांचा फटका बाहेरच्या देशातील अर्थव्यवस्थांना सहज बसू शकतो. म्हणून आमेरीकेच्या अध्यक्षाकडून एका स्टेट्समन प्रमाणे प्रगल्भ वागणे अभिप्रेत असते. आणि ट्रम्प त्या अगदी विरुद्ध टोकाचा उथळ आहे. एखादी गोष्ट ट्विटरवरून जाहीर करण्यास हरकत नाही पण निर्णय घेण्यापुर्वी तुम्ही (म्हणजे ट्रम्प किंवा अमेरीकेचा जो कोणी अध्यक्ष असेल तो) तुमच्या देशातल्या आणि परदेशातल्या सगळ्या स्टेकहोल्डर्सचा विचार केला आहे का ?

....ट्रंप जर असल्या निरर्थक, खर्चिक, अमर्यादित काळ चालणार्‍या युद्धातून अंग काढून घेत असेल तर त्यात वाईट काय आहे? ...

भारतासहीत जगातील बहुसंख्य राष्ट्रे महासत्तांच्या दुसर्‍या देशातील हस्तक्षेपांचे समर्थन करत नाहीत. पण केवळ कृतीचा उद्देश्य नव्हे त्या कृतीची पद्धत सुद्धा महत्वाची नसावी का ?

एक चुकीची कृती करू नये पण केली असल्यास ती अर्धवट न सोडता पूर्ण निस्तरावयास नको का ? की घाण तर करायची पण पूर्णपणे साफ करायची जबाबदारी नाकारायची ? जिथे घुसखोरी केली तिथून बाहेर पडताय तर बाहेर पडा पण त्या जागेच्या सुरक्षेची जबाबदारी दुसर्‍या जबाबदार व्यवस्थेच्या हातात देऊन जाणार की बेजबाब्दार लोकांच्या हातात देऊन जाणार ?

आफ्रीकेतील बर्‍याच देशातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था कोसळल्याची उदाहरणे आहेत पण त्यातील काही उदाहरणात नवी व्यवस्था सक्षम होई पर्यंत सभोवतालच्या राष्ट्रांनी एकत्रित सैन्य उभे करून अंतर्गत सुरक्षेची हमी घेतली.

पहिले आमेरीकेने आक्रमण केले तरी तालीबान सरकारलाला मर्यादीत प्रमाणात ताब्यात घेऊन केवळ ओसामा आणि अलकायदावर कारवाई करून तिथून बाहेर पडावयास हवे होते, आमेरीकेने डोके लावले असते तर ते अशक्य राहीले नसते. दुसरे समजा जमले नाही अथवा केले नाही तर केवळ नाटो सैन्यावर न अवलंबिता तालीबानी सैन्याला हरवण्याची जबाबदारी पाकिस्तानवरच टाकायची (पाकिस्तानाल्या दहशतवाद्यांना मारण्यासाठी अशीच जबाबदारी आमेरीकेने टाकली ) त्यांच्या स्वतःच्या सैन्याचे जीव जाणार म्हटल्यावर पाकीस्तानी जरा अधिक जबाबदारीने वागले असते किंवा नाटो सैन्यात फ्रंटलाईनवर पाकीस्तानी नागरीकांचीच + इतर मुस्लिम फलटन काही टक्के ठेवायची म्हणजे मरणारे पाकिस्तानी आणि मुस्लिम आहेत म्हटल्यावर तालीबानला शस्त्र पुरवण्यात पाकीस्तानने हात आखडता घेतला असता. उदाहरणार्थ मालदिव्ज सारख्या छोट्या मोठ्या मुस्लिम देशांना धमकावून त्यांच्यातून एक फलटण सहज उभारता आली असती. तिसरे एक फलटन सभोवतालच्या इतर देशांच्या सैन्याची जसे ताझिक अझैरबजान आणि उझबेक सैन्याची मिळवून बनवावयास हवी होती म्हणजे परस्परांवर वचक राहून बॅलन्स साधला गेला असता.

एवढे करून सैन्य काढून घेणारच आहात तर जाताना शत्रूला सांगून कशाला जायचे गुपचूपही निघून जाण्याचाही पर्याय असू शकतो. म्हणजे तुम्ही उभ्या केलेल्या अफगाण सरकारला श्वास घेण्यासाठी किमान अधिक घटके वेळ मिळाला असता.

आता नेमका प्रॉब्लेम काय आहे की आम्ही कितीही दहशतवाद माजवला तरी आम्हाला कुणि काही करू शकत नाही ही पाकीस्तानी आएसएआय ची गुर्मी वाढेल आणि युरोमेरीकेला हात लावला नाही तरी भारतातील दहशतवादी कारवाया ते वाढवतील आणि हि नेमकी भारतासाठी डोकेदुखीची बाब असेल .

यातली अजून एक बाजू अशी की ज्या स्थानिक अफगाणांनी आमेरीकेला गेली १७ वर्षे साथ दिली त्यातील मूठभरांना युरोमेरीका शरणही देईल पण बाकीच्यांना तालीबान जिवंतही ठेवणार नाहीत. त्यांच्या सुरक्षेची नेमकी काय व्यवस्था आमेरीका लावून जाणार हे महत्वाचे नाही का ?

हुप्प्या's picture

23 Dec 2018 - 11:04 pm | हुप्प्या

>>एखादी गोष्ट ट्विटरवरून जाहीर करण्यास हरकत नाही पण निर्णय घेण्यापुर्वी तुम्ही (म्हणजे ट्रम्प किंवा अमेरीकेचा जो कोणी अध्यक्ष असेल तो) तुमच्या देशातल्या आणि परदेशातल्या सगळ्या स्टेकहोल्डर्सचा विचार केला आहे का ?
<<
असा कुठलाही विचार केला गेलेला नाही अशी खात्रीपूर्वक माहिती आपल्याकडे आहे का?

>>
एवढे करून सैन्य काढून घेणारच आहात तर जाताना शत्रूला सांगून कशाला जायचे गुपचूपही निघून जाण्याचाही पर्याय असू शकतो. म्हणजे तुम्ही उभ्या केलेल्या अफगाण सरकारला श्वास घेण्यासाठी किमान अधिक घटके वेळ मिळाला असता.
<<
इतके मोठे सैन्य काढून घेणे ही घटना गुपचूप करणे अशक्य आहे. कुठे ना कुठे त्याला वाचा फुटणारच. तशी फुटली की बघा अमेरिकन कसे घाबरट आहेत गुपचूप पळून चालले आहेत असे म्हणायला आयसिस आणि तत्सम संघटना तयार आहेतच. त्या ऐवजी जाहीर वाच्यता करणे बरे. प्रत्येक पर्यायात त्रुटी आहेत.

<<
यातली अजून एक बाजू अशी की ज्या स्थानिक अफगाणांनी आमेरीकेला गेली १७ वर्षे साथ दिली त्यातील मूठभरांना युरोमेरीका शरणही देईल पण बाकीच्यांना तालीबान जिवंतही ठेवणार नाहीत. त्यांच्या सुरक्षेची नेमकी काय व्यवस्था आमेरीका लावून जाणार हे महत्वाचे नाही का ?
<<
अंग काढून घ्यायचे म्हटले की अशा घटना होणारच. सगळ्याची व्यवस्था लावून मगच आम्ही निघतो असे ठरवले तर पुढची १०० वर्षे बाहेर पडता येणार नाही. त्यामुळे असे काहीतरी होणारच. परंतु काहीवेळा वैयक्तिक स्वार्थ जास्त महत्त्वाचा असतो. जगाचे कल्याण वगैरे विचार अशा वेळी दुय्यम ठरवणे हेच इष्ट आहे.

माहितगार's picture

24 Dec 2018 - 12:56 pm | माहितगार

....परंतु काहीवेळा वैयक्तिक स्वार्थ जास्त महत्त्वाचा असतो. जगाचे कल्याण वगैरे विचार अशा वेळी दुय्यम ठरवणे हेच इष्ट आहे.....

आपले अंशतः बरोबर आहे पण , मी खाली राजाभाऊंना दिलेल्या प्रतिसादात ड्रग्सच्या बाबतीत युरोमेरीकेवरील वाढू शकणार्‍या ताणाची चर्चा केली आहेच, त्या शिवाय भारतीय आणि इज्राएली काठावरून दिसणारे चित्र अफगाणीस्तानात किमान भारत आणि इज्राएलच्या बाबतीत दहशतवाद्यांना अधिकच थारा कसा मिळू शकतो शिवाय तालीबानी सरकारातून भारतावर मिसाईल हल्ले पाकीस्तानी सरकारने करवले तर भारताकडे याचे नेमके उत्तर काय ? हे प्रश्न उपस्थित केले आहेत.

....अंग काढून घ्यायचे म्हटले की अशा घटना होणारच....

असे अचानक अंग काढून घेतले जाणार म्हटल्यावर, तालीबानी अफगाणिस्तानातून पुन्हा आंतरराष्त्रीय दहशतवाद माजला आणि त्याचा बंदोबस्त करण्याची आणि अफगाणीस्तानात अफगाण मित्र शोधण्याची वेळ आली तर बिन भरवश्याच्या लोकांना चांगले अफगाणही मदत करण्यास पुन्हा पुढे कसे येतील ?

....इतके मोठे सैन्य काढून घेणे ही घटना गुपचूप करणे अशक्य आहे....

अंशतः बरोबर आहे, सध्य आमेरीकी तळांवर तालीबानी ड्रोनचा पहारा असल्याचे खरेच विनोदी चित्र आहे म्हणे. ;) पण अर्थात सैन्याच्या तुकड्यांची शारीरीक श्रम कमी पडावा म्हणून अदलाबदल केली जाते आहे, किंवा अफगाणिस्तानातच स्थलांतरे केली जाताहेत म्हटले तर किमान पराभव जाहीर करण्याची वेळ टाळता आली असती. पराभव स्विकारल्याचे जाहीर चित्र तयार होणे आणि असे जाहीर चित्र तयार न होऊ देणे यात मोठा फरक असावा.

....असा कुठलाही विचार केला गेलेला नाही अशी खात्रीपूर्वक माहिती आपल्याकडे आहे का?...

हुप्प्या's picture

24 Dec 2018 - 9:49 pm | हुप्प्या

==
....असा कुठलाही विचार केला गेलेला नाही अशी खात्रीपूर्वक माहिती आपल्याकडे आहे का?...आंतरराष्ट्रीय स्टेक होल्डर्सशी चर्चा होऊन तयार होणारी धोरणे आणि विधाने प्रगल्भ आणि डिप्लोमॅटीक असतात , डोनाल्डरावांच्या धोरण बनवण्यात आणि सादरीकरणात प्रगल्भ डिप्लोमसीची जागा सवंग उथळपणाने घेतल्याचे बर्‍यापैकी उघडपणे दिसते आणि त्यांच्या परराष्ट्रखात्यातील डिप्लोमॅट्सचे बाहेरपडणे असो परराष्ट्रमंत्री टिलरसनांचे बाहेरपडणे असो की संरक्षणमंत्री बाहेर पडणे असो त्यातून ते अधिक अधोरेखीत होते. दुसर्‍या स्टेक होल्डर्सना सोडा डोनाल्डराम्वांचे अन्के ट्विट एवढे अचानक आले आहेत की टिलरसन असो वा मॅटीस किंवा त्यांचे इतर प्रतिनिधी ऐन परकीय प्रतिनिधी मंडळांसमोर आणि अगदी पत्रकार परिषदेत सुद्धा तोंडावर पडलेत. आंतरराष्ट्रीय राजकारनात अनवधानाने दिसणारा कम्युनिकेशन गॅप ट्रंप आडमिनीस्ट्रेशन मध्ये रोज नजरेसच येतो असे नाही अगदी पब्लिकच्याही दृष्टोत्पत्तीस पडतो.
==
उथळ आणि सवंग ही सगळी सापेक्ष विशेषणे आहेत. कुणाला ते उथळ वाटेल तर कुणाला धाडसी व रोखठोक वाटेल. ट्रम्पच्या मंत्रिमंडळातून लोक जातात ह्याला वैयक्तिक कारणे असू शकतात. वैयक्तिक मतभेद, अपेक्षेप्रमाणे काम न करणे, ना करता येणे, त्यामुळे लोक बाहेर पडत असू शकतील. अफगाणिस्तानमधून बाहेर निघतो आहे म्हणूनच ते झाले असे म्हणायला काय आधार?
ट्विट अचानक आले म्हणजे त्यामागे कुठलाही विचार नव्हताच असे अट्टाहासाने समजने हा उथळ आणि सवंग विचार नाही का?

अशा निरर्थक युद्धात अडकून बसलेले असताना त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय हा तमाम शेजारी राष्ट्रांच्या फायद्याचा असेलच असे नाही. भारताचे नुकसान होणे, पाकिस्तान डोईजड होणे हे सगळे होणे शक्य आहे. परंतु ती एक तडजोड आहे आणि त्यातील सगळे नफेतोटे सगळ्यांना आवडतील असे नाही.

बाकी काही असले तरी युद्धात पैसा अमेरिकेचा खर्च होत आहे आणि ते खरे दुखणे आहे. आणि हा उपाय त्या दुखण्यावरचा आहे. बाकी सगळे साईड इफ्फेक्ट आहेत.

माहितगार's picture

25 Dec 2018 - 8:13 pm | माहितगार

....ट्विट अचानक आले म्हणजे त्यामागे कुठलाही विचार नव्हताच असे अट्टाहासाने समजने हा उथळ आणि सवंग विचार नाही का?....

आम्हाला वाटले होते आमची ट्रंप सोबत बरोबरी केवळ मातृभुमी फर्स्ट म्हणण्यात होते , बरोबरी आमेरीका फर्स्ट म्हणण्यात होईल असे वाटले नव्हते (पन इंटेंडेड). __/|__

अमेरिकन निवड्णुका तुम्ही फॉलो केल्या असतील, तर हा किंवा पुढचे काहि निर्णय त्यातल्या आश्वासनां नुसार होत आहेत हे जाणवेल. आंतरराष्ट्रिय राजकारणात पोलिसाची भूमिका, लष्कराच्या (पन इंटेंडेड) भाजर्‍या भाजण्याचं काम अमेरिका यापुढे करणार नाहि असं काहिसं एक कलम होतं जाहिरनाम्यात. हे असलं मोठेपण मिरवताना, युद्धं लांब लढली जात असली तरिहि सर्वसामान्य अमेरिकन जनता यात पोळ्लेली आहे. ट्रंपला निवडुन देण्यामागचा हा मुद्दा विसरुन चालणार नाहि. लष्करावर होणारा अवाजवी खर्च अमेरिकेतील ढासळत्या इंफ्रास्ट्रक्चरवर वापरला जावा असं ते धोरण आहे. आता ते चूक कि बरोबर ते तुम्ही कुठल्या काठावरुन बघता त्यावर अवलंबुन आहे...

...ते चूक कि बरोबर ते तुम्ही कुठल्या काठावरुन बघता त्यावर अवलंबुन आहे...

:) आपण म्हणता ते बरोबर आहे, मी भारतीय काठावरून बघतोय. अगदी इज्राएलच्या काठावरून सुद्धा चित्र भारतीय काठावरून दिसेल तसेच दिसत असावे. म्हणजे आमेरीकेच्या हरली ह्या प्रतिमेने पाकी आय एस आय आणि इस्लामिक दहशतवादी वर्तुळात वाढणारा आत्मविश्वास . गेल्या १७ वर्षाच्या संघर्षात आमेरीकेची बलथाने आणि कमकूवतस्थाने यांचा पाकी आय एस आय आणि इस्लामिक दहशतवादी यांना अधिकच अंदाज आला असावा.

आपण "आंतरराष्ट्रीय राजकारणात पोलिसाची भूमिका, लष्कराच्या (पन इंटेंडेड) भाकर्‍या भाजण्याचं काम अमेरिका यापुढे करणार नाही" या धोरणाचा उल्लेख केलात , आंतरराष्ट्रीय मदतीच्या खर्चात ट्रंप अ‍ॅडमिनीस्ट्रेशनने १/३ कपात केली आहे. पण ट्रंप अ‍ॅडमिनिस्ट्रेशन खरेच सगळ्याच फ्रंटवरून माघार घेत आहे का ? इज्राएलचे राष्ट्रीयत्व जगवण्यासाठी सातत्याने आमेरीकेने मदतच केली, अगदी आमेरीकन काँग्रेस+ ओबामारावांनी २०२८ पर्यंतसाठी केलेल्या ३८ अब्ज डॉलरच्या कमिटमेंटमध्ये डोनाल्डरावांनी वाढच केली. मिलिटरी आणि ट्रेड देफिसीटकरता डोनाल्डरावांनी ए टू झेड सगळ्या मित्र राष्ट्रांनाही धारेवर धरले मात्र यास इज्राएल एकमेव अपवाद आहे. आता बाकी जगाने या वस्तुस्थितीकडे डोळेझाक केली तरी दहशतवादला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष थारा बर्‍याच इस्लामिक राष्ट्र आणि संघटनांकडून अशी डोळेझाकही होणार नाही आणि सिरीया आणि अफगानीस्तानातील माघारही त्यांच्या पथ्यावर पडण्याची मोठीच शक्यता असेल.

सिरीयातून इसीस संपली तरीही इराणच्याबाबतीत कतार आणि तुर्कस्थानने सॉफ्टकॉर्नर केला आहे आणि सिरीयातील इज्राएलविरोधी दहशतवाद्यांवर इराणचा वरचष्मा आहे. जो पर्यंत इज्राएल आमेरीकी गटात आहे तो पर्यंत रशिया सिरीयात या दहशतवाद्यांना शह देणार. आता दहशतवादाचे स्वरूप केवळ बाँब आणि मशिनगन हँडहेल्ड छोट्या रॉकेट लाँचरपर्यंत मर्यादीत राहिलेले नाही. इराण रशिया त्यांच्या बाजूच्या दहशतवाद्यांना चक्क मिसाईल आणि इतर प्रगत तंत्रज्ञान वगैरे पुरवतात. म्हणजे सध्या आमेरीकेच्या अफगाणिस्तानातील तळावर तालीबानी ड्रोनचा पहारा असल्याचे विनोदी चित्र आहे.

परिस्थिती अस्थिर असताना केवळ एका बाजूने हात सोडून कसे चालते ? भारत असो वा आमेरीका आपल्या देशांची सैन्ये परदेशात गेली तरीही युरोपीयनांप्रमाणे वसाहतवादी दृष्टीकोण न ठेवल्यामुळे कुठे हस्तक्षेप केला तरी केव्हा एकदा बाहेर पडू अशी धरसोड वृत्ती रहाते. पण महायुद्धात स्वतःच्या जहाजावर हल्ला झाल्यामुळे असो वा ९/११ मुळे असो तुम्हाला नको असले तरी इतर तुम्हाला युद्धात ओढत असतात याचा भारत आमेरीका अशा देशांना विसर पडू नये तोच विसर नेमका पडत रहातो.

एकाद्या देशातून बाहेर पडण्यात व्यवस्थितपणा नसेल तर फाळणीतून पाकीस्तान असो कि गल्फमधल्या धर्माधारीत देशांची निर्मिती असो दहशतवादाला खतपाणी देणारी राष्ट्रे उदयास येतात. दुसर्‍या महायुद्धानंतर तयार झालेली धर्माधारीत राष्ट्रे जर ७५ वर्षांनी डोकेदुखी ठरू शकत असतील तर तालीबानला मोकळीक दिल्या नंतर नैसर्गीक प्रक्रीयेने अफगाणीस्तान सुधारेल आणि जगभरच्या दहशतवाद्यांना आश्रय देणार नाही याबाबत समजा त्यांनी तात्पुरती आश्वासने दिली तरी कितपत विश्वास ठेवावा ? कारण दोन दोन महासत्तांना पराभूत केल्याचा दंभ आता त्यांच्यात भरलेला असणार आहे.

समजा नव्या तालीबानने युरोमेरीकेवर हल्ले केले नाही तरी उद्या समजा पाकीस्तानने तालीबानी सरकारला मिसाईल पुरवठा करून अफणाणीस्तानतून तेथील दहशतवाद्यांच्या नावा खाली भारतावर मिसाईल अटॅक चालू केले तर त्याचे भारताकडे नेमके काय उत्तर असणार आहे ?

युरोमेरीकेच्या दृष्टीने तालीबानींनी सरळ दहशतवाद नाही केला ड्रग्सचे उत्पादनवाढवून युरोमेरीकेतील सप्लाय वाढवला तरी युरोमेरीकेस बरीच मोठी डोके दुखी होऊ शकते. ड्रगसप्लायवरचा सध्या असलेला छोटामोठा कंट्रोल सुद्धा आमेरीका बाहेर पडली की गळून पडेल असे वाटण्यास जागा दिसते. आणि इतर काही कारणाने नसेल तरी ड्रग्स सप्लायच्या कारणाने अगदी युरोमेरीकेतील काठावरून सुद्धा आमेरीका बाहेर पडल्या नंतरचे चित्र खूप सुखद असेल असे नसावे.

* युरोमेरीका इज्राएल लष्करी आणि ट्रेड विषयक साहाय्या बाबतचे संदर्भ अधिक वाचनार्थ

** U.S.-Israel Trade Facts

** EU-Israel trade benefit
** TRUMP'S 2019 BUDGET REQUEST INCLUDES $200 MILLON INCREASE TO ISRAEL

** U.S.-Israel Strategic Cooperation:

** How much trade benefits are provided to israel by europe ?

** How much economic support does US provides to Israel ?

** How much aid Trump administration increased to Israel ?

इझरेल अमेरिकेचा स्ट्रटिजिक पार्टनर का आहे, याचं उत्तर थोड्याफार प्रमाणात तुमच्या प्रतिसादात आलेलं आहे. मिडल इस्ट्च्या राजकारणात, रॅडिकल इस्लामवर अंकुश ठेवण्यात आणि शेवटी गरज पडल्यास इझरेलची मिलिटरी पावर (मिसायल्स, फायटर जेट्स इ.) वापरता यावी याकरता इझरेल अमेरिकेचा एक जवळचा पार्टनर म्हणुन वेळ पडेल तेंव्हा उभा राहिलेला आहे...

>>एकाद्या देशातून बाहेर पडण्यात व्यवस्थितपणा नसेल<<

व्हिएटनाम वॉरचंच उदाहरण घ्या. युद्ध जिंकणं असंभवनीय दिसत असुनहि डिफेंस सेक्रेटरी (मॅक्नमारा) आणि फोर स्टार जनरल (वेस्टमोरलंड) यांच्या हेकेखोरीमुळे, चूकिच्या निरिक्षणांमुळे (ग्राउंड रिअ‍ॅलिटी) अमेरिका तिथे नको तेव्हढा काळ गुंतली गेली. युद्धात आणि जुगारात हार समोर दिसत असताना, त्यातुन वेळीच पाय काढुन न घेणं हे नेहेमी सुसायडलचं ठरतं. दुसरा मुद्दा हा कि, परक्या देशात इन्सरजंसी विरुद्ध लढणं हा कधिहि न संपणारा प्रकार आहे. तुम्ही जेवेढे अतिरेकि माराल त्याहि पेक्षा जास्त काहि दिवसातंच निर्माण होत रहातात. यातुन मार्ग काढण्याकरता फर्म एक्झिट स्ट्रॅटजी अंमलात आणाविच लागते; मग ती कोणाला आवडो किंवा न आवडो. आणि या एक्झिट स्ट्रॅटजीत स्वतःचं भलं साधण्यात काहि वाईट/अनएथिकल आहे हा प्रश्न परत एक्दा तुम्ही कोणाच्या दृष्टिकोनातुन बघता यावर अवलंबुन आहे...

सुबोध खरे's picture

25 Dec 2018 - 7:34 pm | सुबोध खरे

अमेरिकेने कोणत्याही देशात हस्तक्षेप केला तो केवळ अमेरिकेचा फायदा गृहीत धरूनच केला आहे. मग ते व्हिएटनाम असो किंवा कोरिया असो कि इराक अफगाणिस्तान असो. आजही त्यांना जगाची कधीही काहीही पडलेली नाही ( आणि का असावी?)

अमेरिका जे काही करेल ते स्वार्थासाठीच. त्या स्वार्थात आपल्याला आपला स्वार्थ साधता आला तर उत्तम अन्यथा सोडून द्या.

भारताला अफगाणिस्तान विषयी प्रेम वाटले तरी भारत काही त्यांच्या प्रेमापोटी तिथे सैन्य नेणार नाही. तसे असते तर म्यानमार मध्ये रोहिंग्याविरूद्ध सैन्य घुसवले असते.
भारत चाबहार बंदरात पैसे लावतो आहे ते काही समाजसेवा म्हणून नाही तर पाकिस्तान आणि चीनला शह देण्यासाठी आणि इराणचे तेल मिळवण्यासाठी आणि पाकिस्तानच्या पिछाडीवर आघाडी उघडण्यासाठी. मग अशाच गोष्टी थायलंड इंडोनेशिया बाबत का करत नाही? कारण ते देश युद्धखोर नाहीत आणि त्यांच्याशी आपले युद्ध नाही किंवा त्यांच्याकडून आपल्याला काहीही मिळण्यासारखे नाही.

आंतर राष्ट्रीय राजकारणात स्वार्थ हाच एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तेंव्हा अमेरिका काय करते ते स्वतःच्या स्वार्थासाठीच. बाकी त्याला नाव काहीही देऊ द्या.इस्रायल तुम्हाला कोणतेही तंत्रज्ञान स्वार्थासाठीच देऊ इच्छितो आणि तेही काही फुकट नव्हे तर दमड्या मोजूनच. रशिया सुद्धा आता पाकिस्तानबरोबर चुंबाचुंबी करू लागला आहे तो सुद्धा भारत अमेरिकेशी जवळीक करू लागला म्हणूनच. प्रत्येक देश हा आपला फायदा हेच एककलमी कार्यक्रम राबवतो.
अफगाणिस्तान हे राष्ट्र म्हणून नापास( failed nation) झालेले आहे. पाकिस्तानची परिस्थिती फार काही वेगळी नाही. pakistan is a nation needed for their army. तेथे सामान्य माणसाला कुत्रं विचारत नाही. पदच्युत राष्ट्राध्यक्षाला फासावर लटकावणे पासून वर्षानुवर्षे तुरुंगात टाकणे या गोपिष्टी इतक्या सहज होतात कि न्यायपालिका सुद्धा हे कि नाही अशी स्थिती असलेला हा देश.अगोदरच कर्जबाजारी आहे. आय एस आय ला काय जे करायचं आहे ते करु द्या.अमेरिकेचा पैसा बंद झाल्यामुळे त्यांची पण गोची झाली आहे.चीन आपला पैसे व्याजासकट वसूल करून घेतो हा इतिहास आहे.ते सहजासहजी आपला पैसा इस्लामी दहशतवाद्यांना देणार नाहीत.त्यांना स्वतःच्या मुस्लिम लोकांचा प्रश्न सोडवता येत नाहीये. अमेरिका निघून गेल्यामुळे सुरुवातीला तुमच्याकडे दहशतवादी कारवाया वाढतील पण कालांतराने "पैसे नसल्या"मुळे परत कमी होतील. ते सोडवण्यासाठी तुम्ही स्वतःचे मनगट बळकट ठेवणे आवश्यक आहे.

प्रसाद_१९८२'s picture

25 Dec 2018 - 7:58 pm | प्रसाद_१९८२

अमेरिकेने कोणत्याही देशात हस्तक्षेप केला तो केवळ अमेरिकेचा फायदा गृहीत धरूनच केला आहे. मग ते व्हिएटनाम असो किंवा कोरिया असो कि इराक अफगाणिस्तान असो.
--
सर,
ओसामा बिन लादेनने अमेरिकेवर दहशतवादी हल्ला चढवला म्हणून अफगाणिस्तान युद्धात, अमेरिका उतरली हे समजू शकतो मात्र अगदी पुर्वेकडील व्हिएतनाम सारख्या चिमुकल्या देशाविरुद्ध युद्धात उतरण्याचे अमेरिकेला काय कारण होते ? त्यांच्याकडे ना नैसर्गिक साधनसंपत्ती ना इतर काही. तरिही अमेरिका हे युद्ध पंचविस वर्षे का लढत होती हे जाणून घ्यायला आवडेल.

सुबोध खरे's picture

25 Dec 2018 - 8:07 pm | सुबोध खरे

कम्युनिझमचा द्वेष

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Dec 2018 - 9:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

कम्युनिस्ट हो ची मिन्हच्या नेतृत्वाखाली पाडाव केलेल्या फ्रान्सने व्हिएतनाममधून पळून जायचे ठरवले. तेव्हा, कॅपिटॅलिस्ट जगाचा नेता समजणार्‍या अमेरिकेला हा कॅपिटॅलिझमचा कम्युनिझमकडून होणारा पराभव म्हणजे वैयक्तिक अपमान वाटला तर नवल नव्हते. तसेच, वसाहतवादी देशांना मागे टाकून जागतिक महासत्ता असण्याचा किताब मिळविण्यासाठी अमेरिकेने अनेक ठिकाणी युद्धे केली, सामरीक व गुप्त कारवायांनी ढवळाढवळ केली व अनेक देशांतील गैरसोईच्या वाटणार्‍या सत्ता उलथवून टाकल्या. व्हिएतनाम युद्ध, कोरियन युद्ध, क्युबाची नाकेबंदी, मध्य व दक्षिण अमेरिकेतील देशांच्या अंतर्गत गोष्टींत ढवळाढवळ, इत्यादी अनेक कृती अमेरिकेने जगावर आपले वर्चस्व (हेजेमोनी) स्थापन करण्यासाठी केलेल्या आहेत.

माहितगार's picture

25 Dec 2018 - 10:07 pm | माहितगार

....ते सोडवण्यासाठी तुम्ही स्वतःचे मनगट बळकट ठेवणे आवश्यक आहे.....

म्हणजे काय ? किंवा म्हणजे कसे ? मागे १९९९ मध्ये भारतात वाजपेयी पंतप्रधान असताना आणि अफगाणीस्तानात तालीबान असताना इंडियन एअरलाईनचे विमान अपहरण करून कंदाहारला नेल्या नंतर अपहरण कर्ते आणि सोडवलेले अतीरेकी मजेत पाकीस्तानात पोहोचले त्यातल्या एकाचेही बोट अद्याप भारत वाकडे करू शकलेला नाही.

...अमेरिका निघून गेल्यामुळे सुरुवातीला तुमच्याकडे दहशतवादी कारवाया वाढतील पण कालांतराने "पैसे नसल्या"मुळे परत कमी होतील....

दहशतवाद हे लो कॉस्ट वॉर समजले जाते, पाकीस्तान डझनवार वेळा आय एम एफ कडे मागे पण गेले , तेव्हाही पाकिस्तानकडे पैसा कमी पडला असणार तरीही पाकिस्तानने दहशतवाद पूर्णपणे कधीच थांबवलेला दिसत नाही.

....चीनला स्वतःच्या मुस्लिम लोकांचा प्रश्न सोडवता येत नाहीये.....

चीनने प्रत्येक उघ्युराच्या घरात एक सरकारी पाहुणा चक्क म्हणजे शब्दशः रहाण्यास पाठवला आहे, तर दुसरीकडे रशियाने स्वतःच्या चेचन्यातील बंड निर्दयपणे चिरडले तरी इस्लामिक देशांची भुवईवर करण्याची हिम्मत झाली नाही; एवढेकरून हे दोन्ही देश वेळप्रसंगी दहशतवादी इस्लामिक देशांची कड अगदी उघडपणे घेतात. चीनने पाकीस्तानातील दहशतवाद्यांवर आणण्याच्या निर्बंधाबाबत भारतीय बाजू उचलून धरणे व्यवस्थितपणे टाळले आहे. (भारतीयांनी स्वतःच्या बोटचेपेपणावरून चीनचे मोजमाप काढण्यात फारसे हशील वाटत नाही)

( बादवे डॉ खरे साहेब आमचा अलिकडील चर्चा धागा 'सांस्कृतिक एकात्मिकरण आणि कट्टरता निर्मुलनाचा चिनी प्रयोग' आपल्या नजरेतून सुटला असल्यास त्यास भेट देण्याचा अवश्य प्रयत्न करावा)

....चीन आपला पैसे व्याजासकट वसूल करून घेतो हा इतिहास आहे.ते सहजासहजी आपला पैसा इस्लामी दहशतवाद्यांना देणार नाहीत...

चीन आपला पैसे व्याजासकट वसूल करून घेतो हा इतिहास आहे हे बरोबर आहे पण पैसे नाही मिळाले तर श्रीलंकेत केले तसे इस्ट इंडिया कंपनी स्टाईल चीन बंदर स्वतःच्या नावावर करून घेणार आणि त्या बंदरात स्वतःची लष्करी जहाजे बिनदिक्कत लावणार. यामुळेच मालदिव्हजवरचे चीनी कर्ज भारताने फेडण्यास घेतल्याची ताजी बातमी आहे.

चीनी तत्वज्ञान शत्रूचा शत्रू तो आपला मित्र एवढे साधे तत्वज्ञान बाळगते भारत विरोधी दहशतवाद्यांना अद्याप पैसा दिला नसेल तरी आंतरराष्त्रीय मंचांवर त्याच दहशतवाद्यांना चीन ने उघडपणे पाथीशीही घातले आहे. पाकीस्तानला आनी भारत विरोधी दहशतवाद्यांना चीन वापरून घेणार नाही ही आशा आता पर्यंतच्या चीनी वागण्यावरून बर्‍या पैकी भाबडी वाटते.

pakistan is a nation needed for their army. तेथे सामान्य माणसाला कुत्रं विचारत नाही. पदच्युत राष्ट्राध्यक्षाला फासावर लटकावणे पासून वर्षानुवर्षे तुरुंगात टाकणे या गोपिष्टी इतक्या सहज होतात कि न्यायपालिका सुद्धा हे कि नाही अशी स्थिती असलेला हा देश.अगोदरच कर्जबाजारी आहे. आय एस आय ला काय जे करायचं आहे ते करु द्या.अमेरिकेचा पैसा बंद झाल्यामुळे त्यांची पण गोची झाली आहे

आमेरीकेने इराणवर कदक व्यापारी निर्बम्ध लादले तसे अद्याप पाकिस्तान बाबत झालेले नाही. आमेरीकेला पाकिस्तानातून आणि अफगाणिस्तानातून युरोमेरीकेत दहशतवादी पोहोचले नाही म्हणजे पुरेसे असणार आहे. तेवढ्या आश्वासनावर आयएमएफ आणि युरोमेरीका पुन्हा एकदा पाकिस्तानला साथ देईल. पाकिस्तानची आर्थीक नाकेबंदी केवळ युरोमेरीकेचे हित संबंध जपण्यापुरती असेल आणि तेवढी तडजोड पाकिस्तान करेल पण भारतातील दहशतवाद सध्या उघडपणे चालू आहे तसाच तो चालू राहील किंवा वाढेल अशिच शक्यता तुर्तास अधिक वाटते.

भारतीय खूपच भाबडे असतो

सुबोध खरे's picture

26 Dec 2018 - 10:04 am | सुबोध खरे

सुरुवातीला तुमच्याकडे दहशतवादी कारवाया वाढतील
हे मी लिहिलेले आहेच.
पाकिस्तानचे धोरण अनेक जखमांनी रक्तस्त्राव आहे (bleeding by thousand cuts) हे आहे तर भारताचे धोरण वेगळे आहे.चीनचा बागुलबुवा दाखवून भारत आपली शस्त्रसज्जता करतो तेंव्हा पाकिस्तानला घोषणाबाजीसाठी आपली शस्त्रास्त्रे पण वाढवावी लागतात. आज पाकिस्तानच्या सकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या ६० % भाग हा कर्जफेडीत आणि लष्करावर खर्च होतो आहे. यामुळे पाकिस्तानची भारताशी युद्ध करण्याची क्षमता पाच दिवसापेक्षा जास्त नाही हि वस्तुस्थिती आहे.
राहिली गोष्ट ऊईगुर मुसलमानांची. आपला धागा मी वाचून पाहतोच पण तेथे प्रत्येक घरात एक सरकारी अधिकारी राहायला पाठवायचा त्याच्या रहायचा खायचा प्यायचा वर त्या कुटुंबाला दिलेल्या हातखर्च असा सगळं खर्च हा फुकटचा(nonproductive) चीनच्या बोडक्यावर बसतोच आहे. (हि बातमी मी मागेच वाचली आहे). शिवाय अन्याय झालेले हे मुसलमान लोक उद्या दहशतवादाच्या आसऱ्याला गेले तर काय हि भीती चीनला वाटतेच आहे. यामुळेच त्यांची मस्तिष्कसफाई (ब्रेन वॉशिंग) त्यांनी मोठ्या प्रमाणावर चालू केली आहे. पण रशियासारखी ती फोल ठरेल हि भीती चिनी राज्यकर्त्यांना कायम वाटत असते.
चीनला जगात सर्वात जास्त भीती भारताची वाटते. कारण त्यांची शक्ती जे "शिक्षित मनुष्यबळ" आहे त्यात भारत त्यांना तोडीस तोड असून तंत्रज्ञानात भारत त्यांना केंव्हां तरी मागे टाकेल आणि त्यांच्यावर कुरघोडी करेल हि कायम भीती त्यांना आहे. व्यापार उत्पादकता शेती तंत्रज्ञान इ. गोष्टीत भारत चीनला टक्कर देऊ शकेल (sleeping giant) हे भाकीत अनेक तज्ज्ञांनी केलेले आहे.
त्यातून शेजारचा "प्रचंड लोकसंख्या असुनही लोकशाही असलेला" देश उद्या चिनी लोकांना कम्यूनीझम उलथून टाकण्यास बळ देईल हीपण भीती वाटते. (कोणताही हुकूमशहा हा आपली राजवट उलथून टाकण्याचा कट चालू आहे असा भयगंड(paranoia) बाळगून असतो. यामुळेच मानवसंहार हा सर्वात जास्त हुकूमशाही मध्ये होत असतो)

ट्रंप आता तोंड देखले अफगाणीस्तानात इतर देशांनी सैन्य पाठवावे म्हणताहेत. इतर आमेरीकेने बाहेर पडण्यापुर्वी इतर अफगाणिस्तान तालीबानच्या ताब्यात देण्यापेक्षा इतर देशांचे सैन्याच्या ताब्यात देण्याची कल्पना चांगली असेल पण तसे नाटोच्या झेंड्याखाली कोणी कसे करू शकेल. भारताने ताजिक/ उझबेक/ अझरबैजान पैकी कोणी अफगाणीस्तानात सैन्य पाठवत असल्यास खर्च उचलण्यास हरकत नसावी.

सुरक्षा न देता डेव्हेलपमेंटवर खर्च करण्यात कोण शहणपणा आहे ?

India responds after Trump's "library in Afghanistan" dig at PM Modi

India responds after Trump's "library in Afghanistan" dig at PM Modi

नंदन's picture

9 Jan 2019 - 5:18 pm | नंदन

खी: खी: खी:!

'Trump gets his facts wrong. Again!' हे कॅप्शनच पुरेसं बोलकं आहे. दीर्घकालीन गुंतवणूक, सॉफ्ट पॉवर इत्यादी गोष्टींकडे दुर्लक्ष करणे; भारतासारख्या देशाची जिथे मदत होते आहे आणि होऊ शकेल, त्याला निष्कारण टोमणे मारणं (नेमकी कुठली लायब्ररी ही आहे, देवच जाणे!) आणि भरीस भर म्हणजे रशियाने १९७९ साली अफगाणिस्तानावर केलेल्या आक्रमणाचं समर्थन करणं! (बिच्चारे रेगनआजोबा आपल्या कबरीत तळमळत असतील आता!)

याच कॅबिनेट मीटिंगमधले ट्रम्पतात्यांचे हे उद्गारः

“Russia used to be the Soviet Union. Afghanistan made it Russia, because they went bankrupt fighting in Afghanistan. Russia. … The reason Russia was in Afghanistan was because terrorists were going into Russia. They were right to be there."

हे म्हणजे, भारतीय पंतप्रधानांनी - 'मुक्तीवाहिनीच्या अतिरेकी कारवायांना आळा बसावा, म्हणून पाकिस्तानने १९७१ साली ढाक्यात सैन्य पाठवलं; ते योग्यच होतं' असं म्हणण्याइतकं धक्कादायक, उथळ, सवंग, ऐतिहासिक तथ्यांच्या विपरीत आणि धडधडीत चुकीचं आहे. त्या तुलनेत भारतीय मदतीचा उपमर्द करणं, म्हणजे डाव्या हातचा मळ!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jan 2019 - 5:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

ट्रंपतात्या हल्ली हल्ली जरा जास्तच (झाली आहे असे) बोलत आहेत. =)) :(

ट्रंपतात्या हल्ली हल्ली जरा जास्तच (झाली आहे असे) बोलत आहेत. =))

:D, खरंय. 'माझे जनरल्स दिसायला टॉम क्रुझपेक्षाही देखणे आहेत', 'मनात आणलं, तर मला युरोपातलं कुठलंही राजकीय पद मिळेल', 'मी आजवरचा सगळ्यात लोकप्रिय रिपब्लिकन अध्यक्ष आहे', 'ड्रोन्सबद्दल सर्वाधिक माहिती मलाच आहे' - इत्यादी गोष्टी टिपिकल ट्रम्पियन नार्सिसिझम म्हणून एक वेळ सोडून देता येतील; पण गेल्याच महिन्यात रशियन संसदेने अफगाणिस्तानवरील आक्रमण हे योग्य आणि कायदेशीरच होतं, असा ठराव पास करणं (दुवा: https://www.interfax.ru/russia/638844. बातमी रशियनमध्ये आहे, पण गूगल ट्रान्स्लेटरने इंग्रजीत वाचता येईल) आणि लगेच पुढच्या महिन्यात ट्रम्पतात्यांनी त्याची री ओढणं, हा योगायोग रोचक आहे!

नेमकी कुठली लायब्ररी ही आहे, देवच जाणे!

बघ तरी! म्हायती असती तर जावक झाला असता, नाय? =))
इकडे तरी पुण्यात बांधूची होती एक अशी ४-५ मजली लायब्ररी!

नंदन's picture

9 Jan 2019 - 8:02 pm | नंदन

इकडे तरी पुण्यात बांधूची होती एक अशी ४-५ मजली लायब्ररी!

हाहाहा! ट्रम्पतात्या बांधूचा आश्वासान दितीत पण हा आता पैशे इले की मेक्सिकोकडसून. (दोन वर्षा रिपब्लिकन हाऊस आणि सिनेट असानपण इन्फ्रास्ट्रक्चर बिलबद्दल काय्येक ऐकूक मिळाक नाय, असले अडचणीत टाकणारे प्रश्न मात्र विचारूचे नाय हा! गो फिगर!!!)

अर्थात, त्यातपण एक गोची आसा. भिंतीचा झाला तसा कायतरी त्रांगडा होईत. आधी म्हणतीत मी लायब्ररी बांधतंय आणि पैशे मेक्सिको देईत म्हणान. लायब्ररीची भिंत सुरुवातीक काँक्रिटची ५५ फूट उंच, मग मधेच पारदर्शक, परत मग कधी दहा फूट कॉन्क्रिट वाढता नि पंचवीस फूट कमी होता, कधी त्यावर सोलार पॅनल बसतंत, मग नुस्तीच स्टीलच्या पट्ट्यापट्ट्यांची.

काय भिंत आसा की इच्छाधारी नागिन!

शेवटी म्हणतीत, पुणे मनपानं पैशे देऊक होये नायतर मनपाचो कारभार ठप्प पाडतलंय म्हणान. त्यापेक्षा मॅजेस्टिक, इंटरनॅशनल, अक्षरधारा, पुस्तकपेठ बेश्ट!! :):)

मदनबाण's picture

7 Jan 2019 - 7:52 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हुस्न परचम... ;) :- ZERO

खालील मजकूर आजच्या 'वॉल स्ट्रीट जर्नल'मधल्या बातमीतला आहे. (करिता माहितीस्तवः 'वॉल स्ट्रीट जर्नल' हे रुपर्ट मर्डॉक ह्या कट्टर कॉन्झर्व्हेटिव्हाच्या मालकीचे आहे. 'फॉक्स न्यूज' नामक लाळघोटू प्रकारही त्यांच्याच मालकीचा. तेव्हा नेहमीचा फेक न्यूज/मेनस्ट्रीम मीडिया इ. पलायनवादी कांगावा इथे लागू पडणार नाही. त्यातूनही कानात बोटं घालून 'अगा जे घडलेचि नाही' असा पवित्रा घेणारे महाभाग असतीलच म्हणा.)

दुवा: https://www.wsj.com/articles/turkeys-erdogan-slams-u-s-demand-on-syria-a...

... U.S. pullout could be postponed indefinitely—and it opened a new rift between two North Atlantic Treaty Organization allies who have frequently clashed over the U.S.’s Middle East policies.

It also exposed weaknesses in the Trump administration’s shifting struggles to implement the president’s abrupt decision in December to quickly end the U.S.’s four-year military campaign against Islamic State in Syria.

The Trump administration has been working to craft a new policy since mid-December, when Mr. Trump surprised his national-security team by agreeing in a call with Mr. Erdogan to rapidly pull all U.S. forces out of Syria and hand over the fight against Islamic State to Turkey.

Mr. Trump’s policy shift triggered widespread opposition from lawmakers in Washington, Western allies in the fight against Islamic State, and Kurdish fighters working alongside U.S. forces to crush the militant group’s remaining Syrian sanctuaries.

Critics said the move would embolden Russia and Iran, two countries looking to challenge the U.S.’s influence across the Middle East.

Defense Secretary Jim Mattis and the head of the U.S. campaign against Islamic State, Brett McGurk, swiftly resigned after Mr. Trump announced the exit plan. Mr. Trump left it to Mr. Bolton to oversee the U.S. withdrawal.

Initial plans for a rapid withdrawal were slowed amid stiff resistance from the Pentagon, Congress and U.S. allies.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jan 2019 - 5:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांचे तेल विकत घेऊन त्यांना पैसा पुरवणारे टर्कीमध्ये बसुन हे काम निर्धास्तपणे करत होते. हा इतिहास पाहता, टर्कीकडे इस्लामिक स्टेटला संपवण्याचे काम देणे म्हणजे, "मल्ल्याकडे भारतिय बँकांमधला भ्रष्टाचार संपविण्याचे काम देण्यासारखे आहे" ! =))

नंदन's picture

9 Jan 2019 - 7:45 pm | नंदन

हाहाहा, एक नंबर!

बाकी १९ डिसेंबरच्या ट्विटनुसार आयसिसचा खातमा झाला होता, आणि अमेरिकन सैनिक ताबडतोब परतणार होते.

आता, इस्रायलमधलं सर्वात जुनं वृत्तपत्र (Haaretz) म्हणतंय की नेतान्याहूंनी कानउघडणी केल्यावर ट्रम्पतात्या चार महिन्यांवर आलेत आणि आयसिसचा खातमा होईतो थांबायचं म्हणताहेत. निस्ता सावळा गोंधळ!

बरं, ते करतानाही इराणला निष्कारण मोकळं रान जाहीर करून टाकलंय!

दुवा: https://www.haaretz.com/middle-east-news/iran/iran-can-do-what-they-want...

U.S. President Donald Trump said on Wednesday that as far as he’s concerned, Iran "can do what they want" in Syria.

Trump made the comment during a conversation with reporters at the end of a cabinet meeting in the White House. “Iran is pulling people out of Syria, but they can frankly do whatever they want there,” the U.S. president said.

Trump also refused to directly answer a question about the timeline of the U.S. withdrawal from Syria, saying only that it will happen “over a period of time."

"I don't know, somebody said four months but I didn't say that either," Trump added.

म्हणजे मला काय माहीत नाय ब्वॉ, कुणीतरी बोलला चार म्हैने लागतील! ("आमाला पावर नाय!" म्हणाले तात्या, तरी आता आश्चर्य वाटायचं नाही :):):)

सुबोध खरे's picture

10 Jan 2019 - 11:32 am | सुबोध खरे

हायला

हे ट्रम्प तर रागाला लाजवतील असंबद्ध बोलण्यात.

भारतीयांचे सुदैव "रागा" आपले पंतप्रधान नाही

आणि

अमेरिकनांचे दुर्दैव त्यांचे अध्यक्ष असं असंबद्ध बोलतात.

ट्रम्पतात्यांनी भक्तांना तोंडघशी पाडण्याचा चंगच बांधलाय बहुतेक! वॉल स्ट्रीट जर्नल'मधली ही आजची बातमी:

White House Sought Options to Strike Iran
State and Pentagon officials were rattled by the request
(दुवा)

जेम्स मॅटिससारख्या इराक युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या डिफेन्स सेक्रेटरींनी या आततायीपणाला विरोध केला, म्हणून हा बेत तडीस गेला नाही. आता जनरल मॅटिस यांनी सीरियाविषयक लहरी धोरणाचा निषेध म्हणून राजीनामा दिला आणि जॉन बोल्टनसारख्या युद्धखोरांचं प्रस्थ बळावलं आहे.

शिवाय येमेनमध्ये सौदीसोबत लावलेला पाट, आफ्रिकेतल्या निजेरमध्ये गेल्या वर्षी अमेरिकन सैन्यावर झालेला हल्ला, लिबिया-सोमालिया-जिबुती-युगांडा इथे चाललेल्या छोट्या-मोठ्या मोहीमा आहेतच. (उत्तर कोरिया आणि ट्रम्पतात्यांचा 'फायर अँड फ्युरी' ते 'लव लेटर' हा प्रवास हे तर निराळंच प्रकरण आहे. ते एक असो.) म्हणजे ट्रम्पतात्या एकच नव्हे तर अनेक ठिकाणी लष्कराच्या भाकर्‍या भाजत आहेत आणि वर शिवाय, इराणमध्येही अजून एक चूल - चूल कसली आगडोंबच तो - पेटवण्याचा प्रयत्न चालू आहे; असं दिसतंय. थोडक्यात, भक्त म्हणतात 'मी नाही त्यातली' आणि सरकारी खाक्या मात्र 'कडी लावा आतली'! :):):)

अर्थात, "सुरक्षेसाठी हे आवश्यकच आहे. हल्ल्याचे ऑप्शन्स मागितले, म्हणजे हल्ला तर नाही ना केला? तयारी नको का असायला?" इत्यादी केविलवाणी सारवासारव यावर होईलच म्हणा!

***********************************************************************

ता.क. - अजून एक "प्रॉमिसेस केप्ट" म्हणून हरखून भावविव्हल झालेल्या ट्रम्पतात्यांच्या भक्तांसाठी खास! सो मच विनिंग!!!

China’s Annual Trade Surplus With U.S. Hits Record Despite Trump’s Tariff Offensive
China posted a trade surplus of $323.32 billion with the U.S. in 2018

(दुवा)

ता.ता.क. - ट्रम्पतात्यांनी, कुणाला न सांगता बेधडक, ऑक्टोबर महिन्यात मध्यमवर्गासाठी १०% करकपात जाहीर केली होती; त्याचं काय झालं म्हणे? :):):) का नेहमीप्रमाणे आताच्या डेमोक्रॅटिक काँग्रेसवर ढकलून कांगावा करायला मोकळे होणार?

भक्तांना पुन्हा प्रेट्झेल-लॉजिक-कसरत करावी लागू नये म्हणून ट्रेजरी सेक्रेटरी मनुचिन यांच्याच शब्दांतः
“I’m not going to comment on whether it is a real thing or not a real thing,”

थोडक्यात: ते काय बडबडतं, ते त्यांचं त्यांनाच ठाऊक! :):):)

ट्रम्पतात्यांचा अट्टल खोटारडेपणा आणि ढोंगीपणा सिद्ध करणार्‍या ह्या प्रतिक्रियेवर अद्याप त्यांच्या समर्थकांची एकही प्रतिक्रिया आलेली नाही, हे पुरेसं बोलकं आहे! ;) ;) ;)

अरे हो, यात अजून दोन ताज्या उदाहरणांची भर घालायची राहूनच गेली. ढोंगीपणाच्या ह्या ट्रम्पवनात अजून दोन वृक्षांची भर!

१. All 4 living ex-presidents indicate Trump's claim that 'some of' them agree with him about the wall isn't true. (दुवा)

२. दहा वर्षांत प्रथमच सैन्याला पगारवाढ दिल्याचा दावा:

मिलिटरीटाईम्सने सौम्य शब्दांत केलेला पंचनामा :) :) ;) -
Trump seems confused about military pay, claims troops received no raises for a decade

अन्यत्रः Fact check: Trump brags to troops about 10 percent pay raise he didn't actually give them

बाकी काही असो - ट्रम्पतात्यांइतक्या सातत्याने, आत्मविश्वासाने आणि बेधडकपणे खोटं बोलणारा अजून कुणी नाही!

अफगाणिस्तान ऐक मुस्लिम देश आहे .
रशिया आणि अमेरिका ह्या दोन्ही देशांनी त्या देशात हस्तक्षेप केला त्या मागे त्यांचा नक्कीच काही तरी राजकीय हेतू होता .
आणि फायदा सुधा असेल त्यांचा हेतू साध्य झाला की त्यांनी अफगाणिस्थन मधून अंग काढून घेतलं हे त्यांच्या देश हिताचा विचार करूनच .
पण भारता ल अफगाणिस्तान मध्ये कोणता देशहिताचा फायदा दिसत आहे हे काही समजलं नाही .पाकिस्तान आणि Afghanistan ह्यांचे प्रेमाचे संबंध नाहीत मग शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हा विचार आहे का .समजा असला तरी तो देश खूप कमजोर आहे तो भारताला काय मदत करणार .
मग आपण कशाला त्या मध्ये पडायचं

डँबिस००७'s picture

14 Jan 2019 - 8:57 pm | डँबिस००७

भारताला अफगाणिस्तानमध्ये कोणता देशहिताचा फायदा दिसत आहे हे काही समजलं नाही

निर्यात वाढवण्याच्या दृष्टीने नविन बाजार पेठ नेहमी काबिज करण्याच्या प्रयत्नात रहाव लागत ! त्याच बरोबर सर्व देशाबरोबर आपले संबंध
चांगले ठेवणे ही राजकिय दृष्टीने महत्वाच ठरत.

भारताच्या वायव्य दिशेने पाकिस्तान, अफघानिस्तान, कझागस्तान, किरगीझस्तान, ताजिकीस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान हे सात देश आहेत. हे देश लँड लॉक्ड देश असुन ह्या देशाचा फारसा विकास झालेला नाही. हे सर्व मिनरल्स तेल व वायु संपन्न देश आपल्या अन्न पुरवठ्यासाठी बाहेरच्या देशांवर अवलंबुन असतात. ह्या देशात फारस काही पिकत नाही. आता पर्यंत अफघानिस्तानला गहु पाकिस्तान मधुन जात होता. आफघानिस्तानचा तो एक नाईलाज होता. पण आता भारताचा गहु चाबहार बंदराच्या मार्फत ईराण अधुन अफघानिस्तानला पोहोचत आहे. चाबहार बंदर हे ईराणच्या भुमिवर भारताच्या मदतीने विकसीत केलेले आहे. चाबहार ते अफघानिस्तानपर्यंत रेल्वे व रस्ता विकास करुन द्यायचा भारताचा प्रकल्प आहे. जस चीन देशाच्या विकासात आपला वाटा उचलतो व त्या प्रमाणात त्या देशाचे रिसोर्सेस वापरतो, देशाला कर्जात बुडवतो त्या प्रमाणे भारत करत नाही.

TAPI PIPELINE : Turkmenistan–Afghanistan–Pakistan–India Pipeline १९९० साली ह्या प्रकल्पाची रुपरेषा तयार झाली. मुळात तु र्कमेनिस्तान मधला गॅस हा अफघानिस्तान पाकिस्तान मार्फत पाईप लाईनने भारतात येणार होता. पाकिस्तान व अफघानिस्तानच्या व पाकिस्तान भारताच्या संबंधांमुळे हा प्रकल्प कधीही सुरुच झाला नाही. ह्याचा तोटा त्या प्रकल्पात असलेल्या प्रत्येक देशाला झाला. पण भारताला त्याचा तोटा जास्त झाला कारण भारत विकासाच्या मार्गावर सर्वात पुढे ( ह्या देशांच्या मानाने तरी ) आहे.
देशाची उर्जा गरज ही मोठी आहे. त्या मुळे असे प्रकल्प व अश्या देशांवर लक्ष ठेवुन रहाव लागत.

चीनला शह :

माहितगार's picture

14 Jan 2019 - 9:57 pm | माहितगार

इतर मध्य आशियायी देश, इराण आणि आमेरीकेचा दबाव वापरून भारत विरोधी दहशतवादी कारवायांसाठी अफगाण भूमी वापरली जाणार नाही हे भारताचे प्राथमिक लक्ष्य असावे असे वाटते. जमल्यास भविष्यात अफगाणीस्तानातील ड्रग्सचे उत्पादन आणि पुरवठ्यास आळा घालणे दुसरे लक्ष्य असावे.

आयात असो वा निर्यात प्रश्न तेथिल सरकार मैत्रिपुर्ण असण्याचॉ ग्वाही असे पर्यंतच येतो. येत्या काळात अफगाणीस्तानातील तालीबान > पाकीस्तान > चीन हा प्रभाव वाढणे आणि भारताचा पत्ता कट होणे बर्‍यापैकी अपेक्षीत असावे. त्यामुळे मिनरल्सची उपलब्धतेचा फायदा आणि निर्यात सवलतींचा फायदाही चीनला अधिक पोहोचणे स्वाभाविक असावे .

माहितगार's picture

14 Jan 2019 - 9:40 pm | माहितगार

हे ज्ञान की निरागसता ?

अफगाणीस्तान मध्ये दिड (कि तीन?) हजार कोटी भारत सरकारने का ओतले ? अशा अंगाने प्रश्न असेल जिथे बाँब लावून रस्ते उध्वस्त केले जातात तिथे रस्त्यांवर आणि जिथे लोकशाहीची किंमत नाही तिथे त्यांच्या संसद सभागृह बांधून देण्यावर - जे त्यांच्या आपापसातल्या गृहयुद्धात केव्हा कोसळेल माहित नाही - त्या वर भारत सरकारने अव्वाच्या सव्वा खर्च का करावा या अंगाने आपला प्रश्न असेल तर फारसा चूक नाही.

अफगाणी गृहयुद्धात तालिबान वर्चस्व वाढल्याने भारता समोर आव्हाने उभी रहाणार नाहीत असे समजणे निरागसता ठरणार नाही ह्यासाठी तसेही केवळ देवाची करुणा भाकणे आणि इराण आणि मध्य आशियायी देशांशी मैत्रिपूर्ण संबंध जपण्या पलिकडे भारत अधिक काही करू शकेल अशी स्थिती नाही. भारताने त्यात कशाला पडावे असे विचारण्या एवढी भारताची क्षमता असेल तर अशा प्रश्नास प्रयोजन असावे, अन्यथा किंवा कसे.

अर्थात भारत विरोधी अतिरेक्यांना प्रशिक्षण आणि लपण्याच्या जागा अफगाणीस्तानात उपलब्ध होऊ नयेत. भारतीय विमानांचे अपहरण होऊन भारतीय नागरीकांना अफगाणी भूमीवर वेठीस धरले जाऊ नये . अफगाणीस्तानात उत्पादन होणारी ड्रग्स उत्पादने भारतात विकली जाऊ नयेत अशा जुजबी अपेक्षा भारतीय नागरीकांच्या आणि त्यांचे प्रतिनिधीत्व करणर्‍या भारत सरकारच्या असाव्या की नको ? आपणच ज्यांना मदत करतोय त्यांच्याकडून पदरी काही पडावे अशी अपेक्षा असण्याचे कारणच नाही. केवळ दहशतवाद अणि ड्रग्सचे कुत्रे आवरलेले राहीले तरीही पुरेसे ठरावे. पण पाकिस्तानच्या कळसुत्री बाहुल्या असलेले तालीबानी नेमकी हिच ड्रग्स आणि दहशतवाद भारताच्या माए लावतील हा सामान्य चिंतेचा विषय असावा किंवा कसे ?

वीणा३'s picture

14 Jan 2019 - 11:29 pm | वीणा३

तो ट्विटरवर अमुक गोष्ट म्हणाला म्हणून ती वाईट ठरते का
- अमेरिकन अध्यक्षनी कुठलाही मोठा निर्णय ट्विटर वर जाहीर करायची सरकारी पद्धत नाही. त्यांची नियमित प्रेस ब्रीफ असतं त्यात (आधी सगळ्यांबरोबर बोलून, कल्पना देऊन ) हे निर्णय सांगतात. त्यांची गेल्या ३ वर्षाची कारकीर्द बघितली तर ज्या प्रकारे महत्वाच्या पदावरच्या लोकांनी राजीनामे दिलेत (अजूनही देतायत), ते बघून ट्रम्पतात्या अमेरिकेचं हित तरी बघतायत का याबद्दल शंका आहे. त्यांची ३ वर्षाची ट्विटर कारकीर्द बघितलेत तर सातत्याने त्यांनी कितीतरी उलट सुलट ट्विट्स टाकलेली आहेत. स्वतःचीच ट्विट्स "अर्रर्र गोंधळ झाला, असं नव्हताच बोललो " म्हणून मागे घेतलेली आहेत.

"मी आजवरचा सगळ्यात लोकप्रिय रिपब्लिकन अध्यक्ष आहे"
दुर्दैवाने रिपब्लिकन लोकांच्या रॅलीस बघतल्या तर हे विधान खार आहे असं वाटतंय :(

ट्रम्पतात्यांची एकूण बडबड ऐकलीत तर रागानी नुकताच बडबड बालवाडीत प्रवेश घेतलाय असं वाटेल.

नंदन's picture

15 Jan 2019 - 1:37 am | नंदन

ट्रम्पतात्यांची एकूण बडबड ऐकलीत तर रागानी नुकताच बडबड बालवाडीत प्रवेश घेतलाय असं वाटेल.

अगदी, अगदी. शिवाय वासनापीडितलिंगपिसाटपणा, रेसिस्ट वृत्ती, खोटारडेपणा, कांगावखोर रडूबाबापणा याबाबतीत रागांना, ट्रम्पतात्या दृष्टोत्पत्तीस पडेपर्यंत कित्येक योजने मजल मारावी लागेल!

अगदी ताजी उदाहरणं:

१. तुर्कस्थानला (जे अमेरिकेचं मित्रराष्ट्र आहे) दिलेली ट्विटर धमकी. आता हाही बहुधा योजनाबद्ध परराष्ट्रधोरणाचा आखीवरेखीव आणि सुनियोजित भाग असेलच! ;);)

२. 'वुंडेड नी' हत्याकांड हे जालियनवाला बाग हत्याकांडासारखं अमेरिकेत कुप्रसिद्ध आहे. सुमारे तीनशेहून अधिक मूलनिवासी लाकोटा नेटिव्ह अमेरिकनांची (ज्यात दोनशेहून अधिक नि:शस्त्र स्रिया आणि लहान मुलं होती), तत्कालीन अमेरिकन सैन्याकडून हत्या करण्यात आली होती. व्हाईट हाऊसमध्ये रिकामटेकड्या बसलेल्या ट्रम्पतात्यांनी तोडलेले हे तारे आणि मूलनिवासींच्या प्रतिक्रिया:

शेंडेनक्षत्र's picture

15 Jan 2019 - 9:13 pm | शेंडेनक्षत्र

वरील ट्वीटमधे मूलनिवासी लोकांच्या हत्येची टिंगल केली आहे असे म्हणणारा एकतर खोटारडा आहे किंवा मूर्ख!
त्यात मुख्य टिंगल ही एलिझाबेथ वॉरन ह्या ढोंगी बाईची केलेली आहे. तिने अनेक वर्षे असा दावा केला की ती मूलनिवासी अमेरिकन आहे आणि जनुकीय चाचणीत तो पार खोटा असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे त्या बाईची छी थू झाली आहे. ट्रंप अनेक वर्षे ह्या बाईच्या ह्या हास्यास्पद दाव्याची चेष्टा करत आलेला आहे आणि हे ट्वीट त्यातलेच आहे.

तुर्की हा इस्लामी बंडखोरांना सहाय करत आहे आणि असादची राजवट उलथून टाकायचा प्रयत्न करत आहे. सद्दाम (बुश) आणि गदाफी (ओबामा) ह्यांच्या सत्ता उलथवल्यामुळे ते भूभाग कायमचे अस्थिर, हिंस्र आणि आयसीससारख्या घातक शक्तीचे वास्तव्यस्थान बनले आहेत. सिरियाही त्याच मार्गाने जाऊ नये अशी ट्रंपची इच्छा आहे. त्याकरता तुर्कीचा विरोध केला तर इतके आकांडतांडव करण्यासारखे काय आहे? कुठलीही परकीय शक्ती ही कायमची मित्र वा शत्रू नसते हे मूलभूत तत्त्व ट्रंपद्वेष्ट्यांना शिकवावे का लागावे?

वरील ट्वीटमधे मूलनिवासी लोकांच्या हत्येची टिंगल केली आहे असे म्हणणारा एकतर खोटारडा आहे किंवा मूर्ख!

ट्रम्प आणि ट्रम्पसमर्थकांनी चर्चेची पातळी किती खालच्या थराला नेऊन ठेवली आहे, याचं हे एक बोलकं उदाहरण आहे!

मी प्रतिसादात उल्लेख केलेलं ट्विट हे मूलनिवासी स्त्रीचं आहे. ज्या ठिकाणी, तिच्या ट्राईबमधल्या तीनशेहून अधिक लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली; त्या ठिकाणाचा कुचाळक्या करताना केलेला उल्लेख [तेही अशा प्रेसिडेंटकडून जो नेटिव्ह अमेरिकन ग्रुप्सना व्हाईट हाऊसमध्ये बोलावून मुद्दाम अँड्र्यू जॅक्सनच्या (ज्याने मूलनिवासींना विस्थापित करण्याचा कार्यक्रम निर्दयपणे राबवला) पोर्ट्रेटखाली त्यांच्यासोबत फोटो काढून घेतले!], हा तिला टोचण्यासारखा वाटला तर त्यात काही नवल नाही. इंग्लंडमधल्या एखाद्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या पंजाबी उमेदवाराने त्याची उमेदवारी जालियनवाला बागेतून जाहीर करायला हवी; असं एखाद्या गोर्‍या इंग्रजाने म्हटलं तर ते खपवून घेतलं जाईल का?

स्टॉर्म रेयेस ह्या अजून एका मूलनिवासीचं म्हणणं:
“As a Native, Trump’s tweet was equivalent to making a ‘joke’ about 9/11, Pearl Harbor or the Holocaust,” she said. “I found it awful that not only did Trump use this tragedy as a joke, weapon and insult, but that his ignorance of American history is so great that he didn’t even know that Wounded Knee was a massacre and not a battle.”

तेव्हा त्या मूलनिवासी स्त्रीला खोटारडं वा मूर्ख म्हणण्याचं प्रयोजन दिसत नाही. उलट यातून 'डिअर लीडर'च्याच क्षुद्र मनोवृत्तीची प्रचीती येते!

मला खोटारडा किंवा मूर्ख म्हणत असाल, तर काहीच हरकत नाही. अद्वातद्वा बोलण्याऐवजी, या चर्चेत, मी योग्य ती पार्श्वभूमी/माहिती दुव्यांसहित दिली आहे. तेव्हा कोण खोटारडा वा मूर्ख आहे, हे ठरवायला वाचक समर्थ आहेत.

आता तुमचा बाकीचा प्रतिसाद पाहू:

आणि जनुकीय चाचणीत तो पार खोटा असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे त्या बाईची छी थू झाली आहे

आँ? हे फॉक्स न्यूजच्या किंवा ट्रम्पच्या ट्विटर फीडच्या अल्टर्नेट युनिव्हर्समध्ये घडलं असेल कदाचित. वास्तवात मात्र, स्टॅनफर्डच्या जेनोमिक्स आणि डेटा सायन्स डिपार्टमेंटने केलेल्या चाचणीचे निष्कर्ष जालावर उपलब्ध आहेत -
https://web.archive.org/web/20181015162140/https://mk0elizabethwarh5ore....

त्यातला महत्त्वाचा भागः
Executive Summary. We find strong evidence that a DNA sample of primarily European descent also contains Native American ancestry from an ancestor in the sample’s pedigree 6-10 generations ago. We find little or no evidence of African ancestry in this sample.

त्यापूर्वीही, हा परिस्थितीजन्य पुरावा उपलब्ध होताच:

Genealogist Chris Child has been digging through the Census, birth and death records of Warren's family. Child eventually unearthed a document stating that Warren's great-great-great-grandmother was Native American. The document is from the woman's son.

"In 1894 on his application for a marriage license, he listed his father as Jonathan Houston Crawford and his mother as O.C. Sarah Smith, Cherokee Indian."

शिवाय, एलिझाबेथ वॉरनने आपण संपूर्णपणे नेटिव्ह अमेरिकन आहोत असा दावा (किंवा त्या अनुषंगाने मिळणारे फायदे पदरात पाडून घेणं) केलेला नसून भाषणाच्या ओघात आपल्या मिश्रवंशीय परंपरेचा उल्लेख केला आहे (Warren says that when she was growing up in Oklahoma, her family always told her that she's part Cherokee.

"I am very proud of my heritage," she says. "These are my family stories. This is what my brothers and I were told by my mom and my dad, my mamaw and my papaw. This is our lives. And I'm very proud of it.")

पण यातली ग्यानबाची मेख अशी आहे, की ह्या खर्‍याखोट्याच्या फंदात ट्रम्प आणि ट्रम्पसमर्थक पडत नाहीत. ट्रम्प एखाद्या वाया गेलेल्या शाळकरी मुलासारखा ट्विटरवरुन आल्यागेल्याशी भांडत बसतो (Adam Schiff ह्या विरोधी पक्षनेत्याला Adam Schitt म्हणणं, किंवा अमेझॉनच्या जेफ बेझोसला बोझो म्हणणं - इतकी याची गलिच्छ पातळी) आणि ह्या भांडणांमुळे आणि खोट्यानाट्या प्रचाराला बळी पडून, पूर्ण माहिती करून न घेता, वसकन अंगावर येणार्‍या ट्रम्पभक्तांमुळे - मुख्य मुद्द्यांकडून इतरत्र लक्ष वळवण्याचा ट्रम्पतात्यांचा हेतू साध्य होतो.

बाकी, जाताजाता ट्रम्पतात्यांचा या संदर्भातला अजून एक खोटारडेपणा:

५ जुलै २०१८ - Trump Offers $1 Million to charity, For Elizabeth Warren To Take DNA Test To Prove Indian Ancestry (भक्तांचा विश्वास नसेल, तर याचा व्हिडिओ जालावर उपलब्ध आहे)

१५ ऑक्टो २०१८ - Trump said he would give $1 million to charity if Elizabeth Warren took a DNA test. Now she wants him to pay up

१५ ऑक्टो २०१८ - Trump says 'who cares' after Warren takes DNA test, denies $1 million offer to charity

हा घटनाक्रम पुरेसा बोलका आहे. शिवाय चॅरिटीचा विषय निघालाच आहे, तर ट्रम्प फाऊंडेशनच्या चॅरिटीला गैरप्रकारांच्या आरोपांखाली गाशा गुंडाळावं लागण्याचं प्रकरण पुरेसं ताजं आहे:

Trump agrees to shut down his charity amid allegations that he used it for personal and political benefit (दुवा)

How Donald Trump Shifted Kids-Cancer Charity Money Into His Business
(दुवा)

(दुवा क्र. , , )

त्याकरता तुर्कीचा विरोध केला तर इतके आकांडतांडव करण्यासारखे काय आहे? कुठलीही परकीय शक्ती ही कायमची मित्र वा शत्रू नसते हे मूलभूत तत्त्व ट्रंपद्वेष्ट्यांना शिकवावे का लागावे?

ह्या विधानांमध्ये - (१) इथे लिहिणारे सदस्य ट्रम्पद्वेष्टे आहेत. (२) ते आकांडतांडव करतात. (३) परकीय धोरणाची मूलतत्त्वे त्यांना ठाऊक नाहीत; इत्यादी चुकीची गृहीतकं आहेत. तेव्हा ह्या विधानांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. असले बिनबुडाचे आरोप करण्यापूर्वी, डॉ. सुहास म्हात्रे यांनी लिहिलेले परराष्ट्रधोरणाविषयीचे लेख वाचावेत, अशी एक नम्र सूचना.

शेंडेनक्षत्र's picture

16 Jan 2019 - 8:23 pm | शेंडेनक्षत्र

==
ह्या विधानांमध्ये - (१) इथे लिहिणारे सदस्य ट्रम्पद्वेष्टे आहेत. (२) ते आकांडतांडव करतात. (३) परकीय धोरणाची मूलतत्त्वे त्यांना ठाऊक नाहीत; इत्यादी चुकीची गृहीतकं आहेत. तेव्हा ह्या विधानांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. असले बिनबुडाचे आरोप करण्यापूर्वी, डॉ. सुहास म्हात्रे यांनी लिहिलेले परराष्ट्रधोरणाविषयीचे लेख वाचावेत, अशी एक नम्र सूचना.
==
आपणाला उत्तर देता येत नाही याची कबुली दिल्याबद्दल आभार. बाकी कुणाचे उत्तर वाचण्याची गरज नाही. आपले उत्तर पुरेसे बोलके आहे.

एलिझाबेथ वॉरन ही जनुकीय चाचणीत पार नापास झालेली आहे. १/६४ ते १/१०२४ इतक्या "प्रचंड" प्रमाणात त्या बाईच्या अंगात मूलनिवासी रक्त आहे. आता ह्याला मूलनिवासी असणे म्हणत असतील तर वाघाच्या मिशीला पूर्ण वाघ म्हणता येईल! आणि इतक्या "प्रचंड" प्रमाणात मूलनिवासी असणार्‍या बाईने विविध क्षेत्रात आपण मूलनिवासी असल्याचा दावा केला आहे. आपण फॉक्स वाहिनीचा द्वेष करता ना? ही पहा एक लिंकः
https://www.washingtonpost.com/politics/2018/10/16/elizabeth-warren-nati...

आता स्टॉर्म रेज ह्या बाईकडे वळू. त्या बाईला ट्रंप कधीच आव डत नव्हता. त्यामुळे ते विधानही आवडले नाही ह्यात आश्चर्य नाही. पण त्या विधानाच्या अर्थाकडे न बघता केवळ स्थानिक अमेरिकन लोकांची कत्तल झालेल्या जागेचे नाव घेतले म्हणून आमच्या भावना दुखावल्या गेल्या असा कांगावा करणे ढोंगीपणाच आहे. केवळ मूर्खांच्या नंदनवनात रहाणारे लोक ह्या वाक्यातून असा निष्कर्ष काढू शकतात की ट्रंपने मूलनिवासी लोकांच्या कत्तलीची टर उडवली आहे. साधी सोपी गोष्ट आहे. त्याने ढोंगी वॉरनची टर उडवली आहे. आणि निव्वळ एका वाक्यामुळे कुणी वंशद्वेष्टा ठरत नाही. ट्रंपने मूलनिवासी अमेरिकन लोकांचा अपमान केल्याचा इतिहास आहे का? माझ्या माहितीप्रमाणे नाही. उगाच कुणी स्टॉर्म बाई मूलनिवासी आहे म्हणून ती ढोंग, कांगावा वगैरे वैगुण्यापासून अलिप्त अशी कुणी हिमकण (स्नोफ्लेक) आहे असा आव आणणे खोटारडेपणाचे आहे. केवळ त्या बाईला खूप खूप दु:ख झाले म्ह्णून ट्रंप वंशद्वेष्टा असल्याचे सिद्ध झाले वगैरे दावे फोल आहेत. तथाकथित लोक सोयीचे असते तेव्हा अल्पसंख्य आणि त्यांच्या हळव्या भावनांना डोक्यावर घेऊन नाचतात हे नवीन नाही.

आपणाला उत्तर देता येत नाही याची कबुली दिल्याबद्दल आभार.

अहो पानभरुन तर ट्रम्पतात्यांच्या मूर्खपणाची, खोटारडेपणाची आणि ढोंगीपणाची लक्तरं वेशीवर टांगली आहेत! तीदेखील ट्रम्पभक्तांच्या लाडक्या फॉक्स आणि वॉल स्ट्रीट जर्नलमधल्याच बातम्या देऊन!! असो, असो, तुम्हांला चर्चेतून यशस्वी माघारीचा आभास निर्माण करायचा असेल तर चालू द्या!! :):):)

एलिझाबेथ वॉरन ही जनुकीय चाचणीत पार नापास झालेली आहे.

लोल! बरं, बरं, तुम्ही म्हणता तर आपण स्टॅनफर्डच्या तज्ञांचा रिपोर्ट नजरेआड करू हं!

बाईने विविध क्षेत्रात आपण मूलनिवासी असल्याचा दावा केला आहे.

तुम्हीच दिलेली वॉशिंग्टन पोस्टची लिंक ह्या म्हणण्याला खोटं पाडते (आणि ट्रम्पचे घूमजाव अधोरेखित करते!!). मी दिलेले इतके दुवे सोडाच, निदान स्वतः दिलेले दुवे तरी नीट वाचत चला हो :).

आपण फॉक्स वाहिनीचा द्वेष करता ना?

ह्या अजून एका जावईशोधाबद्दल अभिनंदन! फॉक्ससारखी मनोरंजक वाहिनी दुसरी नाही ;)

पण त्या विधानाच्या अर्थाकडे न बघता केवळ स्थानिक अमेरिकन लोकांची कत्तल झालेल्या जागेचे नाव घेतले म्हणून आमच्या भावना दुखावल्या गेल्या असा कांगावा करणे ढोंगीपणाच आहे. केवळ मूर्खांच्या नंदनवनात रहाणारे लोक ह्या वाक्यातून असा निष्कर्ष काढू शकतात

ही निव्वळ जजमेंटल विधानं आहेत. तथ्याचा आधार नसला की असलं अद्वातद्वा बोलणं, हे 'यथा राजा तथा प्रजा' तत्त्वास अनुसरूनच आहे म्हणा.

बाकी, झापडं न लावलेल्यांसाठी अधिक पुरावे:

the National Congress of American Indians (NCAI), the oldest, largest, and most representative American Indian and Alaska Native organization in the country, denounced President Donald Trump’s invoking of the Wounded Knee Massacre and the Battle of Little Bighorn in his latest Twitter attack against Senator Elizabeth Warren.

“We condemn in the strongest possible terms the casual and callous use of these events as part of a political attack. Hundreds of Lakota, Cheyenne, and Arapaho people lost their lives at the hands of the invading U.S. Army during these events, and their memories should not be desecrated as a rhetorical punch line,” said NCAI President Jefferson Keel.

“The President referenced the Wounded Knee Massacre, one of the darkest and most tragic chapters in the history of the Sioux Nation, to mock Senator Warren. On behalf of the Rosebud Sioux Tribe, I condemn President Trump’s racist and disrespectful tweet about this brutal incident, in which an estimated 300 unarmed men, women, and children were rounded up and slaughtered,” said Rodney Bordeaux, Chairman of the Rosebud Sioux Tribe and NCAI Great Plains Alternate Area Vice President. “President Trump should remember that the United States has broken and continues to dishonor the treaties of peace made with our nation and other tribal nations of this country, and he should apologize immediately to the people of the Rosebud Sioux Tribe and other Lakota, Dakota, and Nakota nations for his shameful and ignorant misstatement.”

http://www.ncai.org/news/articles/2019/01/14/ncai-denounces-president-tr...

अर्थात, ट्रम्पतात्यांच्या मागे तस्त घेऊन धावणार्‍या भक्तांच्या मते; ही राष्ट्रीय संघटनाही ढोंगी, खोटारडी आणि कांगावाखोर असणार - नाही का? :)

आणि निव्वळ एका वाक्यामुळे कुणी वंशद्वेष्टा ठरत नाही.

आग्गोब्बाई!!! एलिझाबेथ वॉरन तिच्या एका वाक्यामुळे ढोंगी ठरते आणि थेट निक्सन प्रशासनापासून रेसिझमचे आरोप असलेला आणि आपल्याच पक्षाच्या हाऊस स्पीकरने (पॉल रायन) "textbook definition of a racist" असा गौरवलेला ट्रम्प मात्र वंशसमानतेचा झेंडा खांद्यावर घेऊन अविरत समाजोन्नतीसाठी झटणारा - नाही का!

असो. या पानावर मी ढीगभर उदाहरणं दिली आहेत. अधिक गीतापठणाची इच्छा नाही. पण ट्रम्पसाहेब "I Could Stand In the Middle Of Fifth Avenue And Shoot Somebody And I Wouldn't Lose Any Voters" असं म्हणाले होते; त्यामागची मानसिकता मात्र ध्यानी येऊ लागली आहे.

एलिझाबेथ वॉरन ने अनेक वेळा तिच्या खोट्या मूलनिवासी असण्याचा फायदा घेतला आहे. हार्वर्डने आमची पहिली मूलनिवासी प्राध्यापक असा तिचा "गौरव" केला होता.
१/६४ ते १/१०२४ इतक्या सूक्ष्म प्रमाणात मूलनिवासी रक्त आढळलेल्या व्यक्तीने स्वतःला मूलनिवासी असल्याचे सांगणे (माझ्या गालाची ठेवण अगदी मूलनिवासी धाटणीची आहे अशी माझी आजी म्हणायची हो!) हे नि:संशय ढोंगीपणाचे आहे. विषय संपला.

एलिझाबेथ वॉरनचे टिंगल करण्याची उदाहरणे सोडून ट्रंपने मूलनिवासी लोकांची वंश म्हणून टिंगल केल्याची किती उदाहरणे आहेत?
उगाच बाकी फापटपसारा मांडू नका. ठोस उदाहरण द्या नाही तर हार मान्य करा.

नंदन's picture

19 Jan 2019 - 1:19 am | नंदन

वॉरनने तिच्या मूलनिवासी असण्याचा घेतलेला फायदा मला कुठे आढळला नाही. तुम्ही दिलेल्या दुव्यातही नाही. नोकरी किंवा पदोन्नती किंवा अन्य लाभ तिला मिळाल्याचा वा त्यासाठी प्रयत्न केल्याचा कुठेही उल्लेख नाही. हार्वर्डने चुकीचा गौरव केला असेल तर त्याबद्दल हार्वर्डवर जरुर बदनामीचा खटला भरावा. बाकी हा वाद पेटता ठेवण्यामागे काय राजकीय कारण आहे, हे मी धाग्याच्या खाली स्पष्ट केलंच आहे (CFPB); तिकडे आपण सोयीस्कर दुर्लक्ष केलेलं दिसतंय! तिकडे ट्रम्पतात्यांची हाटेलं आणि मार-आ-लागो सारखे रिसॉर्ट्स तुंबड्या भरताहेत करदात्यांच्या पैशाने - तुम्ही बसा अपूर्णांकांची गणितं सोडवत!

माझ्या मूळ प्रतिसादातला मुद्दा हा 'वुंडेड नी' मासएकरच्या रेसिस्ट उल्लेखाचा होता. याबद्दल दिलगीरी दाखवावी, ट्विटमध्ये बदल करावा - इतपत सुसंस्कृतपणाची ट्रम्पतात्यांकडून अपेक्षा करणंच चुकीचं आहे. पण काहीही करून ट्रम्पचं समर्थन करायचं असल्यामुळे आपणही त्या नादात वाहवत गेला आहात; हे इथे नमूद करू इच्छितो. वॉरनच्या तथाकथित ढोंगीपणावरच पिन अडकून पडणं; तुलनेने गेल्या चोवीस तासांतच ट्रम्पच्या ढोंगीपणाची इतकी उदाहरणं समोर आली आहेत - त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणं; मूर्खांचं नंदनवन यासारखे शिखंडी शब्द वापरणं; ट्रम्पने चूक केली हे मान्य न करता - सामान्य माणसाच्या म्हणण्याचा दुवा दिला तर ती व्यक्ती ट्रम्पद्वेष्टी आणि राष्ट्रीय संघटनेच्या म्हणण्याचा दुवा दिला की तोंडात मिठाची गुळणी आणि वर परत दुसर्‍या दिवशी अधिकाधिक पुरावे मागण्याचा 'गिरे तो भी टांग उपर'पणा असा प्रकार चालू आहे.

मला या पातळीवर उतरायची इच्छा नाही. तेव्हा माझ्याकडून या उपचर्चेला पूर्णविराम.

वीणा३'s picture

15 Jan 2019 - 10:25 pm | वीणा३

ट्रम्प जे काय करतो ना त्यामागे तो काहीही विचार करतोय (भले तो माझ्या विचार पद्धतीच्या विरुद्ध का असेना ) तरी मी समजू शकले असते. किमान त्या विचारपद्धती मुले कुठल्या तरी समूहाचं भलं झालं असतं. हा सगळीच वाट लावायला बसलाय.
पण मी जे काय २०१६ पासून त्याच्या बद्दल बघत्ये (त्याची भाषण, वेग वेगळ्या ठिकाणचे उद्गार, ट्विटर, सतत लोकांचे राजीनामे) त्यावरून तो कुठलाही सलग विचार करू शकतो का याबद्दलच संशय येतो. तो इतका इंप्रेडिक्टबल आहे कि मला नाय वाटत त्या पुतिनला शोधून सुद्धा असा नमुना सापडला असता. ट्रम्प बद्दल वाद चालू झाला कि "common sense is not that common" ह्याचा पदोपदी प्रत्यय येतो. जाऊदे कंटाळा आला.

नंदन's picture

16 Jan 2019 - 4:21 am | नंदन

ट्रम्प बद्दल वाद चालू झाला कि "common sense is not that common" ह्याचा पदोपदी प्रत्यय येतो. जाऊदे कंटाळा आला.

सहमत आहे.

उदाहरण १) #TrumpShutdown

११ डिसेंबरच्या मीटिंगमधले ट्रम्पतात्यांचे हे उद्गार पहा:

"I am proud to shut down the government... I will take the mantle. I will be the one to shut it down. I'm not going to blame you for it."

मूर्खपणा = वाटाघाटी सुरु व्हायच्या आधीच 'I am proud to shut down the government' जाहीर करणं! (आणि ट्रम्पभक्त दुसर्‍याकरवी लिहून घेतलेल्या 'आर्ट ऑफ द डील'बद्दल आणि तात्यांच्या तथाकथित वाटाघाटीकौशल्याबद्दल डिंग्या मारतात! :):))

खोटारडेपणा = 'I'm not going to blame you for it' म्हणून मग सतत त्याच व्यक्तींना दोष देणे!

उदाहरण २) पुतिनपावन सीताराम!

मूर्खपणा = हेलसिंकीत सगळ्या जगातल्या माध्यमांसमोर जाऊन "I have President Putin; he just said it’s not Russia,” Mr. Trump had said on Monday. “I don’t see any reason why it would be.” असं बिनदिक्कत जाहीर करणं.

खोटारडेपणा = दुसर्‍या दिवशी मारलेली केविलवाणी कोलांटउडी: “The sentence should have been, ‘I don’t see any reason why it wouldn’t be Russia,’” Mr. Trump said. “Sort of a double negative.”

ही यादी अशी बरीच वाढवता येईल. युनायटेड नेशन्ससमोरच्या भाषणात सगळ्या जगासमोर झालेलं हसं आणि त्यानंतरची हास्यास्पद सारवासारव, मेक्सिकोकडून येणारे भिंतीचे पैसे आणि तिचं दरेक महिन्याला पालटणारं स्वरुप, फार्मा कंपन्यांना वेसण घालण्याची केलेली भाषा आणि नुकतेच इन्शुलिनसकट अनेक औषधांचे वाढलेले दर, कोळसा खाणींतल्या नोकर्‍या परत येणार असं तोंडभरुन दिलेलं आश्वासन आणि तरीही दुप्पट वेगाने बंद पडत चाललेल्या कोळशाच्या खाणी... अशी कितीतरी.

आणि हे जाणवायला डेमोक्रॅट/रिपब्लिकन/इंडिपेंडंट/ट्रम्पसमर्थक/ट्रम्पविरोधक असण्याची काही आवश्यकता नाही. झापडं न लावता पाहिलं, तरी पुरेसं आहे!

शेंडेनक्षत्र's picture

18 Jan 2019 - 9:54 pm | शेंडेनक्षत्र

ट्रंप द्वेषापायी देशाच्या सीमाही नष्ट करायचा तथाकथित पुरोगाम्यांनी चंग बांधलेला आहे. हिंमत असेल तर कायद्याने अमेरिकेच्या सीमा मोकळ्या करा. हवे त्याला हवे तसे हवे तितका वेळ अमेरिकेत येऊ द्या. कागदपत्रे नाहीत, नियम नाही, तपासणी नाही. एकदा असा कायदा झाला तर मग ट्रंप काय कुणाचीच टाप रहाणार नाही भिंत वगैरे बांधायची. पण असा कायदा आणून पास करण्याचे धाडस कोण करेल का?

नंदन's picture

19 Jan 2019 - 12:35 am | नंदन

गंमतच आहे. आपणच चुकीची समजूत करून घ्यायची आणि त्यावर आपणच त्रागा करायचा!
ट्रम्पच्या मूर्खपणाची, खोटारडेपणाची आणि ढोंगीपणाची अनेक उदाहरणं दिल्यामुळे आणि त्यांचा प्रतिवाद करता न आल्यामुळे, आलेलं फ्रस्ट्रेशन समजण्यासारखं आहे :):):). तेव्हा चालू द्या!

वर एका मान्यवर सदस्याने असंच जाताजाता ढोंगीपणाचा उल्लेख केला आहे; तर आता आपण ट्रम्पतात्या आणि त्यांच्या कॅबिनेटचा ढोंगीपणा आणि 'ड्रेन द स्वॅम्प' ह्या जाहीरनाम्यात गाजावाजा केलेल्या घोषणेचा पोकळपणा आणि ढोंगीपणा पाहू.

१. सरकारी पैशाने तुंबड्या भरणे

२०११ मध्ये ट्रम्पतात्या: “@BarackObama played golf yesterday. Now he heads to a 10 day vacation in Martha’s Vineyard. Nice work ethic!

२०१५ मध्ये ट्रम्पतात्या: “I would rarely leave the White House because there’s so much work to be done,” Trump, tells ITK. "I would not be a president who took vacations. I would not be a president that takes time off.” (दुवा)

निवडून आल्यावर पहिल्याच वर्षी: President Trump Spent Nearly One-Third of First Year in Office at Trump-Owned Properties (दुवा, वॉल स्ट्रीट जर्नल)

आता कोण आहे बुवा ढोंगी? :):):)

शिवाय, खरी गंमत तर पुढेच आहे - ट्रम्पतात्या वर्षांतून शंभर दिवसांहून अधिक आपल्या हाटिलांत, सरकारी लवाजमा घेऊन जातात आणि त्या लवाजम्याचा त्या हॉटेलांतला रहायचा खर्च अमेरिकन सरकार देतं. करदात्यांचा पैसा असा छानपैकी ट्रम्पतात्यांच्या खासगी तिजोरीत जमा होत राहतो. (हवाई भाडं, सुरक्षेचा खर्च इत्यादी गोष्टी वेगळ्याच!)

Many of Mr. Trump’s businesses have raised their rates in the first year of his administration. The Trump International Hotel in Washington—where members of the Trump administration often drink and dine—raised its rates in the months after he became president to about 60% higher from what it had planned to charge, the Journal has reported. Mar-a-Lago this year doubled its initiation fee for members to $200,000.

The company said this year that it would transfer profits earned from foreign government payments by guests at his properties to the U.S. Treasury, but has declined to provide information on how it will track that money and whether it would disclose when and how much money it transfers.

पुन्हा एकदा: एका कट्टर कन्झर्व्हेटिव्ह मालकीच्या वृत्तपत्रात आणि अन्य अनेक ठिकाणी आलेली ही फॅक्ट्स आहेत.

२. ड्रेन द स्वॅम्प!

चक्क चक्क चक्क, फॉक्स न्यूजने (हातचं राखून का होईना) याबद्दल काढलेले ट्रम्पतात्यांचे वाभाडे! (हे म्हणजे 'सामना'च्या संपादकांनी उधोजीरावांना चार गोष्टी सुनावण्यासारखं झालं ;););))

How can you drain the swamp if you're the one who keeps muddying the waters?

आता कोण आहे बुवा ढोंगी? :):):)

३. कन्झ्युमर फायनान्शियल प्रोटेक्शन ब्युरो (CFPB) / ग्राहक मंच

- २००७/८ सालच्या आर्थिक मंदी आणि गैरव्यवहारांच्या पार्श्वभूमीवर, हार्वर्ड लॉ स्कूल मधल्या तत्कालीन प्राध्यापिका एलिझाबेथ वॉरन यांनी कन्झ्युमर फायनान्शियल प्रोटेक्शन ब्युरो (CFPB)ची कल्पना मांडली.

- हातावर पोट असणार्‍या वर्गाला अन्य पर्याय नसल्याने नाइलाजाने घ्यावी लागणारी Payday loans आणि त्यांतून होणारी पिळवणूक (४००% किंवा त्याहूनही अधिक APR; कर्जासोबत इन्शुरन्स पॉलिसी घ्यायची सक्ती; गुंडांकडून वसूली इ.); शैक्षणिक कर्ज; क्रेडिट कार्डांच्या अटींबाबत चालणारी मनमानी इत्यादी गोष्टींना आळा घालणं, हे याचं उद्दिष्ट. (ट्रेजरी डिपार्टमेंटशी संलग्न)

- यामागचा धोका ओळखून, रिपब्लिकन जॉर्ज बुशच्या काळात, अमेरिकन सैनिकांना दिल्या जाणार्‍या असल्या पठाणी व्याजाच्या कर्जांवर बंधनं आणण्यात आली होती. मात्र, सामान्य जनतेसाठी अशी काही नियमांची चौकट नव्हती.

- मात्र Payday loan इंडस्ट्रीकडून रिपब्लिकन काँग्रेसमन्सना बक्कळ कॅम्पेन काँट्रिब्युशन येतं (ओपनसिक्रेट्स. ऑर्ग ह्या संकेतस्थळाचा इच्छुकांनी लाभ घ्यावा!). त्यामुळे बहुसंख्य रिपब्लिकनांचा या सर्वसामान्य जनतेला उपलब्ध अशा ग्राहक मंचाला विरोध होता. इतका तीव्र की, ही कल्पना ज्यांनी मांडली त्या एलिझाबेथ वॉरन यांना CFPBचे अध्यक्षपद मिळू न देण्याचा चंग बांधला होता. (प्लीज नोटः वॉरन तेव्हा सिनेटर नव्हत्या, तर हार्वर्डमध्ये प्राध्यापिका होत्या). परिणामी, ओबामाने तडजोड म्हणून रिचर्ड कोर्डरे यांची २०११/२०१२ साली नेमणूक केली. (तोवर CFPB कडे सामान्य जनतेकडून तब्बल साडेसात लाख तक्रारी आल्या होत्या.)

- २०१२ साली वॉरन यांनी सिनेटची निवडणूक लढवली आणि मॅसॅच्युसेट्समधून स्कॉट ब्राऊन यांचा पराभव केला. या निवडणुकीदरम्यान नेटिव्ह अमेरिकन अ‍ॅन्सेस्ट्रीबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं आणि त्याचं निराकरण, याबद्दल मी वरच्या प्रतिसादात माहिती दिलीच आहे - पण अर्थातच, टपून बसलेल्या वॉरेनद्वेष्ट्यांना एवढीशी संधी पुरेशी होती. अजूनही एलिझाबेथ वॉरनशी ग्राहक मंच वा ग्राहकहितासंबंधी चर्चा करण्याची कुवत/हिंमत नसल्याने या अशा शाळकरी कुचाळक्या चालू आहेत. काही सुशिक्षित ट्रम्पसमर्थकांनाही (सन्माननीय मिपाकरांनी वाटल्यास स्वतःला यातून वगळावं) असल्या गोष्टींचा अभिमान वाटतो, यात आश्चर्य वाटत नसलं तरी खेद जरूर वाटतो.

- ट्रम्पतात्या सत्तेत आल्यावर Environmental Protection Agency पासून ते डिपार्टमेंट ऑफ इंटिरियरमधल्या तेलविहीरींची काळजी घेणार्‍या Bureau of Safety and Environmental Enforcement पर्यंत पद्धतशीर खच्चीकरण चालू आहे.
(वानगीदाखल हे पहा: Angelle has frequently traveled to Texas and Louisiana to meet with industry executives and has encouraged them to directly call his cellphone to avoid disclosure in public records requests.[14][28][29] Angelle's rule changes are forecast to save the oil and gas industry over $1.3 billion in regulatory compliance costs over the next decade.

In 2017, the Interior Department withdrew its sole liability bonding requirement on rig owners, which had required offshore drillers to post guarantees that they would pay for the ultimate removal of their rigs. The change was lobbied for by Trent Lott and John Breaux, and will save the industry hundreds of millions of dollars.)

- यातून ग्राहक मंच अर्थात CFPB तरी कसा सुटेल म्हणा! ट्रम्प यांनी Mick Mulvaney यांची तिथे नियुक्ती केली. वर म्हटल्याप्रमाणे, मल्वानी हे पठाणी व्याज आकारणार्‍या Payday loan इंडस्ट्रीचे लाभार्थी. त्यांच्या ढोंगीपणाचा कालक्रम पहा:

(अ) डिसें २०१७: डिनायल --> Mick Mulvaney: Payday lending campaign contributions pose no conflicts of interest (दुवा)

(ब) जाने - एप्रिल २०१८: खायचे दात दिसू लागले -->

Under Trump Appointee, Consumer Protection Agency Seen Helping Payday Lenders (दुवा)

Mulvaney Is On the Hot Seat For His Stunning 'Pay To Play' Remarks
(दुवा)

A payday lender is accused of stealing millions from customers. Trump’s CFPB is now letting them off the hook.
The consumer bureau is playing nice with payday lenders under the leadership of Mick Mulvaney.
(दुवा)

(क) जून २०१८: न्यायालयाकडून चपराक --> Federal judge rejects CFPB's effort to halt payday rule (दुवा)

(ड) आजच्या घडीला: पदोन्नतीचं बक्षीस --> तर इतकी उज्ज्वल कामगिरी करणारे मिक मल्वॅनी यांना अध्यक्ष ट्रम्प यांचे 'चीफ ऑफ स्टाफ' व्हायचा बहुमान (अन्य एकदोघांनी नाकारल्यावर) मिळाला आहे; आणि गंमत म्हणजे त्यांना अडचणीत टाकणार्‍या गोष्टी हळूहळू उघड होत आहेत. तब्बल अडीच मिलियन डॉलर्सचं थकवलेलं कर्ज, अन्य रिअल इस्टेटचे व्यवहार इ.

- हे सारं 'ड्रेन द स्वॅम्प' ह्या ट्रम्पजाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाच्या उलट आहे. विशेषत:, हा ग्राहकहिताचा आणि CFPB सारख्या मंचाचा विषय रस्ट बेल्टमधल्या श्रमजीवी आणि कॉलेजशिक्षण नसलेल्या वर्गाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. गेल्या निवडणुकीत याच वर्गाच्या असंतोषाचा फायदा उठवत ट्रम्प निवडून आले आणि एलिझाबेथ वॉरनची या वर्गातली लोकप्रियता आणि त्यांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे उचलून धरणारा त्यांचा जाहीरनामा, या गोष्टी ट्रम्प यांच्या पुनर्निवडणुकीत मोठा अडथळा निर्माण करू शकतात. या विषयांवर सखोल चर्चा (मग मतभेद का असेनात), करण्यापेक्षा असली शाळकरी टोपणनावं देऊन आणि नेटिव्ह अमेरिकनांना रेसिस्ट वाटतील अशा गोष्टी चर्चेत आणून, सततचं डायव्हर्जन निर्माण करणं कितीतरी सोपं!

नंदन's picture

18 Jan 2019 - 12:02 pm | नंदन

ह्या फक्त गेल्या चोवीस तासातल्या बातम्या आहेत. ट्रम्पतात्यांचा ढोंगीपणा आणि झापडं लावून फिरणार्‍या, त्यांच्या भांडकुदळ भक्तांचा भोंदूपणा (पुनश्च - सन्माननीय सदस्यांनी स्वतःला यातून वगळावं. किंवा वगळू नये. ज्याची त्याची जाण, समज, मर्जी इ. :):) उघड करणार्‍या.

[अर्थात; तरीही नेमेप्रमाणे डिनायल, व्हाटअबाऊटरी, वसकन अंगावर येऊन चर्चेची पातळी हमरीतुमरीवर न्यायचा प्रयत्न करणं, केविलवाणं समर्थन इत्यादी नेहमीचे बचावाचे मार्ग चोखाळले गेलेले दिसतीलच! जय शॉन हॅनिटीकाका! :).]

१. मतचाचणीत पैसे चारून घोटाळे! -
Cohen Hired IT Firm to Rig Early CNBC, Drudge Polls to Favor Trump (दुवा)

२. कोल्युजनो वा न कोल्युजनो वा!
Rudy Giuliani: ‘I never said there was no collusion’ between Trump campaign and Russia
(दुवा)

३. चीनपुढे शेपूट घालून माघार? -
U.S. Debates Lifting China Tariffs to Hasten Trade Deal, Calm Markets.
New tactic under discussion would be aimed at giving Beijing incentives to make long-term concessions (दुवा)

गामा पैलवान's picture

17 Jan 2019 - 11:09 pm | गामा पैलवान

नंदन,

पण गेल्याच महिन्यात रशियन संसदेने अफगाणिस्तानवरील आक्रमण हे योग्य आणि कायदेशीरच होतं, असा ठराव पास करणं (दुवा: https://www.interfax.ru/russia/638844. बातमी रशियनमध्ये आहे, पण गूगल ट्रान्स्लेटरने इंग्रजीत वाचता येईल) आणि लगेच पुढच्या महिन्यात ट्रम्पतात्यांनी त्याची री ओढणं, हा योगायोग रोचक आहे!

अफगाणिस्तानच्या अधिकृत सरकारच्या मते त्यांनी सोव्हियेत फौजांना निमंत्रण धाडलं होतं : https://en.wikipedia.org/wiki/Soviet%E2%80%93Afghan_War#cite_ref-44

इथे थोडी माहिती आहे : https://www.rbth.com/international/2017/01/12/7-things-you-probably-didn...

ट्रंप व पुतीन यांचं एकमत होणं अमेरिकेतल्या एका गोटास आजीबात रुचणारं नाही.

आ.न.,
-गा.पै.

नंदन's picture

18 Jan 2019 - 11:41 am | नंदन

अर्थातच, अफगाण कम्युनिस्ट पार्टीच्या कठपुतळी सरकारने परिस्थिती हाताबाहेर जायला लागल्यावर आपल्या ओरिजिनल सूत्रधारांना मदतीसाठी पाचारण केलं होतं.

पण हा जावईशोध ट्रम्पतात्यांनी कुठून लावला, ते पुतिनलादेखील सांगता यायचं नाही! :) -
"The reason Russia was in Afghanistan was because terrorists were going into Russia."

नंदन,

तुम्ही ज्याला जावईशोध म्हणताहात ते खरंतर एका केजीबी अधिकाऱ्याचं जाहीर विधान आहे.

As KGB General Philipp Bobkov later testified, “Long before the festival's opening, Afghan militants were trained in Pakistan by the CIA, and one year before the festival they were illegally sent to settle in the Soviet Union. They were provided with money, and waited to receive explosives, plastic bombs and weapons that they would then set off in crowded places (Luzhniki, Manezh Square, and etc). These actions were thwarted, thankfully.”

जगाचा जो समज करवून दिला आहे त्यापेक्षा सोव्हियेत-अफगाण मामला बराच गुंतागुंतीचा आहे.

आ.न.,
-गा.पै.

अफगाणिस्तान मध्ये तालिबान संघटनेची नक्की मागणी काय .त्यांचा जो लढा चालू आहे ती कशासाठी आणि कोणाविरुद्ध .स्वसारकर hatwal पाहिजे हे त्यांना का वाटत आहे .
बाहेरचे देश अफगाणिस्तान जास्त इंटरेस्ट का घेत आहेत त्या पण जगातील दोन महासत्ता रशिया आणि अमेरिका .
आणि ह्या दोन्ही महासत्ता परस्पर विरोधी भूमिका घेवून अफगाणिस्तान मध्ये हस्तक्षेप करत आहेत त्याचा अर्थ काय

अमेरिकेने अफगाणिस्तानात हात पोळून घेतले, पण काही दशकांपूर्वी अमेरिकेने विएतनाममध्ये हात जाळून घेतले होते त्यामानाने अफगाणिस्तान युद्ध तस अमेरिकेसाठी ok च होत. कोरियन युद्धाने सुरु झालेली डॉमिनो थेयरी अमेरिकेचे विएतनाममध्ये हात पोळलाल्यानंतरच बंद झाली. आता अफगाणिस्ताना नंतर अमेरिका जगाचा मोरल पोलीस बनण्याचा भंपकपण बंद करेल ही आशा.

शशिकांत ओक's picture

29 Jan 2019 - 10:21 pm | शशिकांत ओक

मला जरा वेगळा प्रकार आहे असे वाटते...
आपल्याला ते अमान्य असेल कारण ज्या पद्धतीने ते घडते आहे त्यातून मानावे का नाही ते आपल्या मतानुसार ठरवावे.
पिंकी पीरनी यांच्या काळ्या जादूटोणा करामतीचा प्रकार आहे...
कोण ही पिंकी पीरनी? इम्रान खान यांनी तिसर्‍या वेळी ज्या विवाहितेशी निकाह केला. ती.
तिच्या बद्दल पाकिस्तानात बर्‍याच लोकांनी यावर ती काय काय करते ते पहा पुढे पुढे... तीन महिने थांबा. मग पहा असे म्हटले जाई ते आता प्रत्ययास येते आहे...
काही महिन्यांपूर्वी पाकिस्तान अर्थिक डबघाईला आली होती.
सौदी सलमान पाकिस्तानी लोकांशी फटकून होते ते आता ग्वादर पोर्टवर रिफायनरी टाकून त्यांनी कदम मस्त पलटी खाल्ली. युएईने आयएमएफ कडे जायच्या आधी आम्ही पैसे देतो म्हणून आधीच्या धमक्या की जास्त आवाज केला तर तिथल्या कामकरूंना परत पाठवू. या वरून पलटी खाल्ली आहे.
मोडी (मोदींना संबोधून) भारतात पुन्हा वझीरे आझम बनणार नाहीत. असे बरेच काही तिने आपल्या विद्येच्या जोरावर शोहर इम्रान खान यांना संकेत दिले आहेत.
अमेरिकन प्रेसिडेंट धमक्या देत होते ते पाकिस्तानला आता तालेबानशी बोलणी करायला इम्रान खान यांनी मध्यस्थी करण्याची विनंती करायला आपल्या लोकांना पाठवून मनधरणी करावी लागते आहे. अफगाणिस्तान मधून जाऊदे, कोरियन लोकांना धमकाऊन मग पुन्हा भेटायला फेब्रुवारीत जायचे ठरते आहे... या प्रकारामुळे एकदम पलटी खायची मानसिकता निर्माण करायला ती कामे करते. मानो या ना मानो.

एकुलता एक डॉन's picture

3 Feb 2019 - 4:48 pm | एकुलता एक डॉन

same pinch for sanjay dutt
mnyata dutt hiche total 3 lagna jhale
tinhi navre jailmadhe gele