Skip to main content

CPT IPCC CA Final ह्यांचे गौड बंगाल !

लेखक अत्रन्गि पाउस यांनी सोमवार, 30/07/2018 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
सी ए होण्यातल्या cpt / IPCC / CA फायनल ह्या परीक्षा सध्याच्या कॉमर्स शाखेतील एक मोठा विद्यार्थ्यांचा गट ह्या दुष्ट चक्रात अडकलेला आहे ... काही दिवसांपूर्वी सी ए झालात असे सांगून काही तासात तुम्ही सी ए झालेले नाही आहात असा निर्णय दिला : शेकडो विद्यार्थी भ्रमिष्ट व्हायचे बाकी होते काल सुमारे ३२ हजार विद्यार्थ्यांपैकी फक्त ३२० (फक्त १ टक्का) विद्यार्थी IPCC चे दोन्ही ग्रुप पास झाले ..झाले नाही केले ह्या संस्थे वर कुणाचाही कंट्रोल नाही कायद्याने, ह्यांच्या निर्णयाला म्हणे कोर्टात सुद्धा अपील करता येत नाही ! ह्यांचे पेपर तपासणारे अधिकृत सी ए तपासनीस आपले पेपर्स अन्य कुणाकडून तपासून घेतात अशी वदंता आहे सी ए आर्टिकल शिप करणारे बहुतेक तरुण मुळे मुली त्यांच्या सिए फर्म्स कडून अत्यंत अल्प दरात पिळून घेतले जात आहेत आणि ह्यावर कुणाचेहि अपील नाही .. हे सगळे काय चालू आहे ? अजून किती दिवस ? आणि का हि मनमानी चालू आहे ? ह्याच्यावर उपाय काय ? फेसबुक वार ह्या वेळच्या सिए टोपर चा इंटरव्यू बघितला (तो खरा टोपर असेल तर) त्याचे एकंदर अवतार आणि भाष्य बघून हसावे कि रडावे कळत नव्हते भारतीय सिए लोकांच्या सही ला आंतरराष्ट्रीय स्तरावर "फक्त सिए" म्हणून कितपत किंमत आहे ? मुळात किती सिए हवे आहेत, एकूण उत्तरांमध्ये नेमके काय अपेक्षित आहे ? मार्क मिळाले तर का मिळाले आणि कापले तर नक्की का कापले ह्याचे कुठलेहि उत्तर कुणीही कधीही देत नाहीत माकेंझी सारख्या लोकांनी सिए ह्या क़्वलिफ़िकेश्न्ल मान्यता देणे बंद केले आहे हे खरे का ?? ह्या सगळ्यात काही पारदर्शकता का येऊ शकत नाही ? तज्ञांचे काय मत आहे ?? शेकडो हजारो तरुण उत्साही विद्यार्थ्यांच्या मनस्थिती शी हा अक्षम्य खेळ कुणीतरी आवरलाच पाहिजे

वाचने 21659
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरला जर ...... डॉक्टर इंटर्नशिप कधी करतो? शिकून एमबीबीएस झाल्यावर का अगोदर?

In reply to by कंजूस

वर लिहिलं आहे एम बी बी एस ची पदवी इंटर्न शिप पूर्ण केल्यावरच मिळते.

आर्टिकलशिप करत असताना पहिल्या/दुसऱ्या /तिसऱ्या वर्षात विद्यार्थ्यास स्वतंत्रपणे कंपन्यांचे हिशेब आणि सेक्रटेअरिअल कामकाज तपासून शेरा मारण्याइतकं ज्ञान प्राप्त झालेलंच असतं असं म्हटता येईल का?

In reply to by कंजूस

इंटर्नशिप मध्ये त्या डॉक्टरला औषधाचे प्रिस्क्रिप्शन देण्याचे किंवा सर्टिफिकेट देण्याचे कोबतेही अधिकार नसतात तरीही सन्मान्य विद्यावेतन दिले जाते. आपण आपला मुद्दा पुढे ढकलण्यासाठी लंगडे समर्थन देत आहात असे वाटते.

In reply to by कंजूस

संस्थेचे चालक आपल्या लोकांना स्वस्तात वेठबिगार मिळावेत म्हणून या विरुद्ध काही करतील असे वाटत नाही. कारण कितीही उदाहरणे दिली तरी त्यांना ते पटवूनच घ्यायचव नाही. मग आपल्या स्वार्थासाठी किती ही तरुणांचा बळी गेला तरी चालेल हीच आजची संस्कृती झाली आहे. मग ते शिक्षण क्षेत्र असो की राजकारण.