रामराम मंडळी.
पूज्य (*१) आसारामबापूंबद्दल निरनिराळे प्रवाद ऐकू येत आहेत. वस्तुस्थिती माहीत व्हावी व नोंदी राहाव्या म्हणून हा लेख लिहितो आहे. हा लेख म्हणजे रूढ अर्थाने लेख नसून उपस्थित केलेल्या प्रश्नांचं संकलन आहे. प्रश्न मुख्यत: दोन हिश्श्यांत विभागले आहेत. एकात पूज्य बापूंविषयी प्रश्न आहेत तर दुसऱ्यात प्रसारमाध्यमांविषयी आहेत. लेखाचा स्रोत बापूंच्या अटकेच्या वेळचा म्हणजे २०१३ सालचा म्हणजे जुनाच आहे.
तर होऊ जाऊ द्या :
लेखन दिनांक : २३ सप्टेंबर २०१३ वेळ २२३० जीएमटी
पूज्य आसाराम बापूंच्या बाबतीत उपस्थित केले गेलेले प्रश्न :
१. तक्रारीत पीडित मुलीने पूज्य बापूंनी दीड तास माझे तोंड दाबून धरल्याचे सांगितले आहे. तर मग मुलीच्या तोंडावर कसल्याच खुणा कशा नाहीत? दीड तास जर गुन्हा घडत होता तर ती मुलगी ओरडली का नाही?
२. पीडित मुलीच्या मैत्रिणीने खुलेआम सर्व वाहिन्यांसमोर विधान केलंय की (तथाकथित) पीडित मुलीने हे तिच्या आईबापांच्या आग्रहावरून रचलेलं नाटक आहे. पोलीस या मैत्रिणीची जबानी नोंदवणार का?
http://www.youtube.com/watch?v=aBeMMvk89-E
३. या खटल्यात पीडित मुलीसोबत शासनही वादी आहे. गुन्हा केवळ विनयभंगाचा असतांना शासनाला यात लक्ष घालण्याची गरज काय?
४. पूज्य आसाराम बापूंना त्रिनाडी शूल (ट्रायजेमिनल न्यूराल्जिया) या विकारावर उतार पडायला शिरमालिश करण्यासाठी नेहमीची वैद्येला तुरुंगात प्रवेश का नाकारण्यात आला? काय कारण आहे त्यामागे? हा ज्ञात विकारांतील एक सर्वोच्च वेदनादायी विकार समजला जातो. यास इंग्रजीत स्युसाईड डिसिझ असंही म्हणतात. रोगी वेदना असह्य झाल्याने आत्महत्या करतात (http://news.medill.northwestern.edu/chicago/news.aspx?id=79817). तर मग पूज्य बापूजींनी वेदना सहन करीत पडून राहवे काय? त्यांना उपचारांचा हक्क का नाकारण्यात येत आहे?
५. दिल्ली पोलिसांनी भादंवि ३७६ कलम (बलात्कार) लावलं आणि नंतर राजस्थान पोलिसांनी आक्षेप नोंदवल्यावर काढून घेतलं. या ढिसाळपणामुळे खटला खोटा आहे अशी शंका येते.
६. केवळ विनयभंगाचा गुन्हा आहे तर पौरुषत्व चाचणी का घेण्यात आली?
७. न्यायालयीन कोठडी दोनदा वाढवण्यात आली आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यासाठी २५+ दिवसांची कोठडी कशासाठी? नेमका कसला तपास चालला आहे? साध्वी प्रज्ञासिंह व प्रसाद पुरोहित यांच्यावर आरोपपत्र दाखल नसतांना गेले कित्येक वर्षे दोघे कच्च्या कैदेत आहेत. कशावरून पूज्य बापूंवर असाच प्रसंग ओढवणार नाही?
प्रसारमाध्यमांच्या वार्तांकनाच्या बाबतीत उपस्थित केले गेलेले प्रश्न :
१. पूज्य बापूजी व/वा त्यांचे सहायक कधीच फरार नव्हते. मात्र वाहिन्या सदैव त्यांना फरार म्हणत होत्या. हा अपप्रचार का करण्यात आला? अटकाज्ञा (वॉरण्ट) नसतांना फरार म्हणून उल्लेख कशासाठी? पूज्य बापूजींवर बजावली गेली ती उपस्थिती आज्ञा (समन्स) होती. अशा वेळी सदर मनुष्य पोलिसांकडे अधिक वेळ मागून घेऊ शकतो.
२. बलात्काराचा गुन्हा दाखल नसतांना माध्यमे बिनदिक्कीतपणे ३७६ कलम लावल्याचं सांगत आहेत.
३. पूज्य आसाराम बापूंची अश्लील चकती अस्तित्वात नसतांना ती असल्याच्या वार्ता माध्यमे का देत आहेत? अशी कुठलीही चकती पोलिसांकडे नाही. https://www.youtube.com/watch?v=qFYUYIBUMpg&noredirect=1
५५ सेकंद - व्हिडीयो तथ्यहीन,
१ मिनिट १५ सेकंद - अहमदाबाद सीडी नाही
४. गेल्या १३ वर्षांपासून पूज्य बापूजींन त्रिनाडी शूल नामक अतिवेदनादायी विकार आहे. यावर उतार पडावा म्हणून वैद्या नीता गेले दोनतीन वर्षे शिरमालिश करीत होत्या. तो उपचार तुरुंगात चालू राहावा म्हणून विनंती अर्ज करण्यात आला. यावर पूज्य बापूजी स्त्रीसहवासासाठी हपापलेले आहेत असं चित्र का रंगवण्यात आलं? प्रसारमाध्यमांनी केलेलं एकांगी वर्णन नीतिमात्तेत कितपत बसतं? उपचार चालू असतांना तिथे इतर लोकंही उपस्थित असणार होते याकडे दुर्लक्ष का? तसेच उपचार डोक्यावर आहे, इतर जागी नाही. हाही मुद्दा विचारात घेतलेला दिसत नाही. इथे स्त्री की पुरुष हा प्रश्नच मुळातून उपस्थित व्हायला नको.
http://daily.bhaskar.com/article/RAJ-JPR-exclusive-actor-salman-khan-and-asaram-bapu-suffer-from-same-suicide-disease-cal-4379596-NOR.html
तसेच पूज्य बापूजींनी विनंती केली तर त्यास मागणी असं का संबोधण्यात आलं?
५. पौरुषत्व चाचणी होकारार्थी आल्यावर पूज्य बापू बलात्कारी आहेत अशी प्रसारमाध्यमांनी बदनामी का केली? बलात्काराचा गुन्हा दाखल नाहीये.
६. श्याम नावाच्या तथाकथित सहायकाने पीडितेच्या आईवडिलांना धमकीचा फोन केला. त्याची फीत न्यूजएक्स नामक वाहिनीकडे आहे. (http://www.newsx.com/speak-out-india/item/10369-does-the-cd-now-conclusively-nail-asaram-lies) वाहिनीने पोलिसांना याबाबत कळवलं का? ही फीत किती खरी किती खोटी? श्याम हा मनुष्य खरोखरीच आश्रमात सहायक आहे का? का पूज्य बापूजींना जामीन मिळू नये म्हणून मुद्दाम बनाव रचला आहे?
असो.
मिपावर एके ठिकाणी मी पूज्य आसारामबापूंचा अंधभक्त असल्याचं विधान केलंय. त्याचं खंडन करणं हाही एक हेतू आहे. मी पूज्य बापूंचा भक्त कधीच नव्हतो व आत्ताही नाही. ज्याअर्थी मी कसून प्रश्न केले आहेत त्याअर्थी मी अंध नाही.
आपला नम्र,
-गामा पैलवान
(*१) आसारामबापूंना पूज्य म्हंटल्याने काही लोकांना उचक्या लागतील. त्या तशा लागाव्यात म्हणूनच बापूंना पूज्य म्हंटलंय. उचक्या लागल्या तरी त्या निमूटपणे गिळाव्यात. उगीच आकांडतांडव करून स्वत:ची शोभा करवून घेऊ नये. उचकीबहाद्दरांचा संयम पक्का व्हावा म्हणून ही योजना केलीये, असं समजावं.
याद्या
16890
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
बघू , किती वेळ चालतोय तमाशा
आसाराम बापू विषयी मनात
पूर्ण केसचा अभ्यास नाही,
In reply to आसाराम बापू विषयी मनात by साहना
निसटत्या बाजू १
In reply to आसाराम बापू विषयी मनात by साहना
* अर्थातच उत्तरदायीत्वास नकार
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
आसाराम साहेबांनी
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
औघडय...
गामांचे युक्तिवाद पाहून हसू आले.
छान
अस्स!
In reply to छान by manguu@mail.com
कसाब , अफजलला
In reply to अस्स! by भंकस बाबा
Calling अभ्या.. to
In reply to कसाब , अफजलला by manguu@mail.com
त्यानं काय होणार??
In reply to Calling अभ्या.. to by श्रीगुरुजी
कदाचित?
In reply to त्यानं काय होणार?? by विशुमित
अभ्यादादा, ते बाकी जाउंदे.
In reply to Calling अभ्या.. to by श्रीगुरुजी
होय ना,
In reply to कसाब , अफजलला by manguu@mail.com
कन्हैय्याला
In reply to होय ना, by भंकस बाबा
एकतर्फी काय संबंध जोडताय ?
In reply to कसाब , अफजलला by manguu@mail.com
सोईचे चित्र ?
In reply to एकतर्फी काय संबंध जोडताय ? by माहितगार
छान
In reply to सोईचे चित्र ? by माहितगार
कसाब , अफजलला मी पाठिंबा कधीच
In reply to कसाब , अफजलला by manguu@mail.com
उलट हे चांगले आहे..
In reply to अस्स! by भंकस बाबा
मख्तूब मख्तूब ...
मग २०१८ का उजाडलं?
In reply to मख्तूब मख्तूब ... by चित्रगुप्त
समजा असे जरी गृहीत धरले की
कोर्टाच्या खटल्यात नक्की काय
न्यायालयीन निर्णयांच्या
In reply to कोर्टाच्या खटल्यात नक्की काय by कंजूस
मूळ तक्रारीचे भाषांतर
वरील तक्रारीतील शिवा निर्दोष
निसटत्या बाजू २
In reply to वरील तक्रारीतील शिवा निर्दोष by जानु
आसाराम, नित्यानंद, रामरहीम,
नित्यानंद महाराजांना ह्यांच
In reply to आसाराम, नित्यानंद, रामरहीम, by श्रीगुरुजी
स्ट्रीक्ट कोड ऑफ कंडक्ट ची गरज
In reply to आसाराम, नित्यानंद, रामरहीम, by श्रीगुरुजी
तसे करणे घटनाबाह्य ठरेल.
In reply to स्ट्रीक्ट कोड ऑफ कंडक्ट ची गरज by माहितगार
तसे करणे घटनाबाह्य ठरेल.
In reply to तसे करणे घटनाबाह्य ठरेल. by श्रीगुरुजी
तुरुंगातून ऑडिओ क्लिप ?
खरी असणे हा वेगळा प्रश्न ,
In reply to तुरुंगातून ऑडिओ क्लिप ? by manguu@mail.com
षडयंत्र,
In reply to तुरुंगातून ऑडिओ क्लिप ? by manguu@mail.com
संत कोणाला म्हणावे? केवळ
भारतीय धार्मिक परंपरेत
२००८ च्या आसपास आसाराम जेव्हा
मला वाटत ह्यात काँग्रेस
In reply to २००८ च्या आसपास आसाराम जेव्हा by arunjoshi123