अलिस्टेर परेराने २००६च्या नव्हेंबर महिन्यात दारूच्या धुंदीत बेफामपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्या कांहीं निष्पाप लोकांना चिरडून मारले. त्याच्यावर रीतसर खटला झाला, तो दोषी सिद्ध झाला व त्याला तीन वर्षे मुदतीची सक्त मजूरीची शिक्षाही झाली. एवढेच नव्हे तर त्याने केलेला जामिनाचा अर्जही सुनावणीसाठी आला व नाकारलाही गेला.
असाच गुन्हा "सुपरर्ब्रॅट" समजल्या जाणार्या"सलमान खानने कांहीं वर्षापूर्वी केला, तोही त्याच्या शेजारी बसलेल्या पोलीसखात्याने दिलेल्या शरीर संरक्षकाच्या उपस्थितीत. पण त्या गुन्ह्याचा खटला अजून न्यायालयासमोर आलेला नाहीं, मग शिक्षा होणे दूरच.
हे सलमान खानला कसे साध्य झालेले आहे? बडे-बडे वकील देऊन तो सारख्या तारखा "पाडत" असतो कीं पोलीस पुरावा असूनसुद्धा गप्प बसले आहेत? म्हणजे इथेही शेवटी त्याची सिलेब्रिटी स्टेटस त्याला तुरुंगाबाहेर राहू देते आहे का?
हे सपशेल चूक आहे. दारूच्या नशेत गाडी चालवून पोलिसाच्या उपस्थितीत निरपराधी लोकांना जिवे मारणार्या नराधम सलमानला शिक्षा झालीच पाहिजे व तीही विनाविलंब!
नाहीं तर लोक म्हणतील कीं न्यायदेवतेसमोर सारे सारखे नाहींत.
सुधीर काळे
वाचने
12056
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया