परवा गावातल्या परसूआबाचे दाजी जे मुंबईला असतात ते आले होते. दाजीसाहेब मुंबईला पोलिसात मोठ्या हुद्यावर आहेत. चारचाकिने संपुर्ण परिवारासोबत ते आले होते. असाच परसुआबाला भेटायला गेल्यावर त्यांची भेट झाली. गाडित बसुन मुंबईला परत जायची त्यांची तयारी चालली होती. अचानक माझी नजर गाडिच्या काचेला आतुन लावलेल्या पीवीसी पाटीवर गेली. त्या पाटीवर मोठ्या लाल अक्षरात पोलिस असे लिहले होते. मला खुप विचित्र वाटलं. तुमच्या खाजगी प्रवासात, जेव्हा तुम्ही कामावर (ड्युटीवर) नाहीत तेव्हा तुम्हाला तुमच्या नोकरीच्या हुद्याची पाटी लावुन फिरावेसे का वाटावे?
शहरात गेल्यावर मला बर्याच गाड्यांवर पोलिस, आर्मी, डिफेन्स, इत्यादि असे नावे लावलेली दिसतात. या सगळ्यामागे त्याना त्यांच्या नोकरीचा अभिमान असावा हे कारण असु शकते. पण याव्यतिरिक्तही काही उद्देश असु शकतो का? असा मनात विचार येतो. जसे 'पोलिस' हे नाव लावल्याने त्याना विशेष वागणुकीची अपेक्षा तर नसावी? जसे गाडीवर अँबुलंस असे लिहिले असेल तर त्या गाडीला सगळ्यानी वाट करुन द्यावी असा नियम आहे. तसं काहीसं अपेक्षित असावं का? रस्त्यावर चालणारी सारीच वाहने वाहन कर भरुन चालवली जातात. त्यामुळे तुम्ही पोलिस, आर्मी, डिफेन्स लिहुन काही अतिरिक्त कर भरुन विशेष अधिकार प्राप्त करतात काय? असा सवाल मनात येतो. बरं सरकारने स्वतः तुम्हाला तसे वाहन दिले आणि त्यावर तुमचा हुद्दा लिहिला तर आपण मानु शकतो कि याना काही विशेष अधिकार आहेत. पण उगाच आपण आपल्या हाताने अशी नावे टाकण्यात काय अर्थ आहे. पण असो, तुम्ही लाखो रुपये खर्चुन गाड्या विकत घेतात म्हणजे तो तुमचा खाजगी प्रश्न आहे कि त्या गाड्यांवर तुम्ही काय लिहावे आणि काय नको.
अजुन असे बरेच प्रकार बघण्यास मिळतात. जसे, सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, अध्यक्ष, भावी आमदार, इत्यादी. आमच्या गावच्या सरपंचाने मागे जुनी अँबेसेडॉर विकत घेतली आणि लगोलग गाडीवर "सरपंच, खवचटवाडी बु." नावाची पाटी लावुन घेतली. हे बघुन सरपंचाचा सालदार आणि माझा परममित्र काभ्या (खरं नाव कारभारी) याने उस्फुर्तपणे सरपंचाच्या म्हशीच्या पाठीवर सफेदीने "सरपंच, खवचटवाडी बु." लिहीलं आणि गावभर म्हशीला फिरवलं. सार्या गावात हश्या झाला. काभ्याला बिचार्याला काही कळत नव्हतं. सरपंचाने त्याला बोलावून कामावरुन काढुन टाकलं.
तुम्हाला ह्या पाटी लावण्याच्या प्रकाराबाबत काय वाटते? राग येतो? चांगलं वाटतं? काहीच वाटत नाही? जरुर कळवा.
वर्गीकरण
वाचने
5368
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
राग येतो...
हो येतो राग
रस्त्याला बर्याच वेळेला कट
ह्म्म्म !!!
एखादा हुद्दा /नोकरी मिरवावेसे
मी
दिव्या ऐवजी भोंगा
एकंदर पाहता असे दिसते कि
पोलीस चे काय घेऊन बसलात काही
किस्सा छान
In reply to पोलीस चे काय घेऊन बसलात काही by साहना
तेलपाणी संपल का?एकदम सही !
In reply to पोलीस चे काय घेऊन बसलात काही by साहना
एकदम सही !
In reply to पोलीस चे काय घेऊन बसलात काही by साहना
सही किस्सा..
In reply to पोलीस चे काय घेऊन बसलात काही by साहना