"या जय भीमवाल्यांचं काहितरी आहे", "उगाच दंगे करतात, काम करा म्हणावं त्यापेक्षा", " काहि नाही, फडणविसाची खुर्ची यांच्या डोळ्यात खुपतेय"
अश्याच सुरातल्या पण संभावित प्रतिक्रिया इथे बघायला मिळत आहेत. आपल्याला कोणत्याही प्रश्नाचा विचार फक्त आपल्या जागेवरूनच करायचा आहे हे खास आहे.
(१) भिमा कोरेगाव हा अभिमानाचा विषयच नाही. : मुळात चारपाच वर्षांपूर्वी हे स्मारक आणि त्याबद्द्ल कोणालाही जास्त महित नव्हते परंतू महार रेजिमेंट याला आपल्या अभिमानाचा विषय मानत होती. कोणत्याही समूहाला मग तो रेजिमेंट सारखा ऑफिशियल लढवय्या समूह असो वा जात, सार्वजनिक अभिमानाचा विषय शोधणं हे आपल्या सु-संस्कृतीचा भाग आहे, नाही का? तसंही भावनिक कढ काढण्याखेरीज काही करावं हे आपल्या सुसंस्कृत मनांना नको वाटतं. गेल्या काही वर्षात प्रत्येक समूहाने आपलं असं सार्वजनिक अभिमानस्थळ शोधून त्याचा उदो उदो करणं हे सुरू केलेलं आहे. आधुनिक विचारसरणीशी तुलना करायला गेल्यास प्रत्येक अभिमान स्थळावर प्रश्नचिन्ह उठवता येतील, पण तसं कोणी करत नाही कारण प्रत्येकामागे आंधळी झुंड असते. त्यामुळे प्रत्येक समूह, जातीगट आपल्या अभिमानस्थळाला जास्तीत जास्त ’टीआरपी" मिळ्वण्याच्या प्रयत्नात असतो, त्यातूनच मग त्या त्या गटाचं नेतृत्व उदयाला येतं. आपण एकंदरीतच समाज म्हणून विवेकी असण्यापेक्षा भावनेच्या लाटेवर हेलकावे खाणं स्वाकारतो.
(१ अ) मुळात भिमा कोरेगावचं युद्ध इंग्रजांनी जिंकलंच नव्हतं: नसेलही. पण महारांना ते आपल्या पूर्वजांच्या लढवय्येपणाचचं प्रतिक वाटतंय तर वाटू द्या नं. तिथे ते शांतपणे इतके वर्षं जातायत तर काय बिघडलं? या संदर्भात तिथे जमलेल्या लोकांना विरोध म्हणून दुकानं बंद केली गेली, त्यांच्यावर दगडफेक झाली अश्या प्रकारच्या बातम्या आहेत, त्याचं काय? जमलेले लोकं काही आता जाऊन इंग्रजांना आवताण देणार नव्हते. मग अश्या प्रकारे त्यांच्या विरूद्ध जनमत तयार करणं कोणत्या संस्कृतीत बसतं?
ब्राम्हण-मराठा सारख्या प्रस्थापित आणि गावपातळीवर मान असणार्या जातींना आपापली प्रतिकं लख्ख कराविशी वाटतात, तिथे झुंडीनं जावं वाटतं तर अजूनही मागास असलेल्या गावकुसाबाहेरच्या लोकांनी एवढा विचार करावा ही सक्ती का?
(२) राजकिय अपरिहार्यता: प्रत्येक गोष्टीत राजकारण्यांना दोष देणं ही फॅशन बनली आहे. कारण ते सोप्पय. आपणही आपल्या व्यक्तीगत पातळीवर हे राजकारण पुरेपूर खेळत असतो. अश्या जाती विभागणीला, उतरंडीला समाजात मान्यता असते, प्रत्येक व्यक्तीच्या मनात ती उतरंड जागी असते म्हणूनच त्याचा फायदा राजकारणी उठवू शकतात. प्रत्येकाने व्यक्ती म्हणून आपण ही उतरंड पाळतो की नाही (मानतो की नाही असं मी म्हटलेलं नाही. कारण ’मी मानत नाही पण नाती तोडून चालत नाहीत, सवय ’, वैगेरे सुटकेचे मार्ग असतात ) हे मनाला विचारावं. खालच्याला वर येण्यासाठी व्यक्तीगत पातळीवर आपण किती आधार दिलाय हे शोधून पहावं. तसं होत नाही. मागासांच्या वागण्यातल्या विसंगती शोधून, त्यांची आधुनिकता किती बेगडी आहे ह्याकडे बोट दाखवणारे आणि त्यांना वेगळे पाडणारेच मोठ्या संख्येने असतात. (इथे या विषयावर ज्या हिरीरीने लिहीलं गेलंय त्यावरून सिद्धच होत.) "जातीने महापुरुष वाटून घेतले आहेत", असं तोंडाने म्हणायचं आणि फक्त आपल्याच जातीतल्या महापुरुषाचा उदो उदो करायचा ही दांभिकता बहुसंख्यांमध्ये असते, म्हणून तर असे अभिमानी गट तयार होतात आणि राजकारण्यांना आयतं खाद्य मिळतं.
जातींनी महापुरुष वाटून घेतलेत म्हणणार्यांपैकी किती जणं आंबेडकर जयंती साजरी करतात? नाहीपेक्षा ती आपल्या सोसायटीत साजरी व्हावी असं किती जणांना वाटतं? उलटपक्षी कोणी करत असेल तर "ते जय भीम वाले" म्हणत आपण त्यातले नाही हे प्रकर्षाने दाखवलं जातं. मग वरील तक्रार करताना आपण दांभिकपणे वागत नाही का? किती जणांनी मुलांना राम-कृष्णासोबत बुद्धाच्या गोष्टी सांगीतल्या? किमान स्वत:तरी जाणून घेतल्या? "ही कसली मिरवणूक आहे?" असं विचारणार्या पहिलीतल्या मुलाला आंबेडकर- जयंतीच्या मिरवणुकीबद्द्ल "ज्यांच्यामुळे मला प्रमोशन मिळत नाहीय ना त्यांची मिरवणूक आहे" असं उत्तर माझ्या एका कलीगनं दिलं होतं. अर्धवट माहिती देऊन पुढील पिढीच्या मनात अशी विषाची पेरणी केली जाते.
(३) पेशवाईत महारांना कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं बांधून वावरावं लागत होतं हे खरं नाही तसा कागदोपत्री पुरावा नाही:- पलीकडल्या संस्थळावरच्या विद्वान (हे उपहासाने म्हटलेलं नाही, आदर खरा आहे) इतिहाससंशोधकांनी तिथे "याला कागदोपत्री पुरावा कुठेय?" असं विचारलं आणि अर्धवट शहाणे पैलवान इथेही ते विचारत सुटलेत. महार इतके महत्वाचे होते का की त्यासाठी एक कागदी फर्मान सुटेल? कोतवालाला तोंडी आदेश दिले असणं ही शक्य आहे ना? हे ही शक्य आहे की सैन्यात मानाच्या ठिकाणी असलेल्यांना यातून सूट असेल पण सर्वसामान्य महारांना हे लागू असेल. मग ते फक्त सामान्य महारांना लागू होतं म्हणत त्याचं समर्थन करता का? झाडू-गाडगं नसेलही पण "बाजू हो शिवशील, सावली पडली तर विटाळ होईल" हे उद्गार तरी महारांसाठी निघत होतेच ना? मग त्याचं समर्थन करताय का? किती वर्षं हे ऐकावं लागत होतं? अजूनही कुठेतरी लागत असेल. कोपर्यातल्या कपात वरून पडलेला चा पिणारी म्हारीण तर आता आतापर्यंत साहित्याचा भाग होतीच ना. ती काय सर्वस्वी काल्पनिक होती?
बरं धरून चालू की हे झाडू-गाडगं प्रकरण खोटं होतं. पण महारांना किती गावात मानाचं स्थान होतं? इथे आपण किती गावच्या मातीतले आहोत हे दाखवण्याची होड लागलेली असते, त्यांना हे गावाचं वास्तव माहित नाही का? आताही त्यांना दिला जाणारा मान किती मनापासून येतो? वेळ येताच "गेले आपल्या जातीवर", "हे असंच अन्कल्चर्ड वागणार", "माजलेत" अशी मुक्ताफळं उधळली जात नाहीत का? आणि "माजलेत, पायरी सोडताय" म्हणत हत्याही घडवल्या जातातच ना?
(४) आरक्षण म्हणजे फुकटचंबूपणा : आरक्षण लागू केल्यावर द्णादण सगळ्या महारांनी आरक्षणाचा लाभ घ्यावा एवढं शिक्षण त्यांच्याकडे होतं का? आरक्षण घेतलेली पहिली पिढी आता कुठे रिटायर होतेय. पिढ्यापिढ्या शिक्षण, मानाचं जगणं नाकारलं गेलेली, स्वत:ची जमीन नसलेली अशी जमात आता कुठे प्रवाहात येऊ लागलीय तर फुकटचंबूपणा दिसतो. मग ब्राम्हणांनाही आरक्षण हवं म्हणत ब्राम्हण मेळावे का भरवता? आमचे पूर्वज कसे वेदशास्त्रसंपन्न होते म्हणत अभिमान मिरवता त्याच पूर्वजांचा (त्यावेळची जनरीत म्हणून का होईना) काहीजणांना जन्मावर आधारीत उपेक्षेची वागणूक देण्यात सहभाग होताच म्हणून लाजही वाटून घ्यावी का वाटत नाही? यालाच दांभिकपणा म्हणतात.
(५) दलितांच्या आंदोलनात नासधूस जाळपोळ होतेच:- इतर आंदोलनात होत नाही का?. स्वघोषित सैनिक काय पुष्पवृष्टी करत आंदोलनं करतात का? जाळपोळीचं समर्थन नाही पण ठराविक समाजाला दोष का देता? रिकामटेकडे आणि समाजकंटक ही नासधूस करतात आणि प्रत्येक आंदोलनात थोडफार होतंच. ते होऊ नये तर ठाम कायद्याचं राज्य हवं (मग त्या राज्यात झुंडीने प्रार्थनास्थळ पाडता येईल का हो? ती सूट द्यायला हवी नाही का? किमान गोमाताचोरांना देहदंड देण्याची गोमातेच्या सुपुत्रांची गुंडगिरी क्षम्य मानायला हवी नाही का? )
(६) प्रकाश आंबेडकरांनी याचा राजकीय लाभ उठवला / त्यांनी चिघळवलं: इथे एवढ्या लिंका फेकल्या गेल्या आहेत. त्यात ही एक ही वाचून पहावी. प्रकाश आंबेडकरांचा ३१ डिसेंबरला प्रकाशित झालेला लेख आहे. त्यात त्यांनी ह्या विजयस्तंभाबद्द्लची मांडणी भावनिक आहे असं म्हटलय. त्यांची मांडणी पोलोटिकली करेक्ट असण्यापेक्शा लॉजिकली करेक्ट असते म्हणूनच निवडणुकीच्या राजकारणात त्यांना स्थान निर्माण करता येत नाही.
प्रकाश आंबेडकरांची राजकीय ताकद ती काय आणि अशी आंदोलनं ते करतातच कशी काय? असा एक सुज्ञ प्रश्न आहे. म्हणजे? जे निवडून येऊ शकतात त्यांना अशी हिंसक आंदोलनं करण्याचा फुकट परवाना मिळतो? जे निवडून येत नाहीत त्यांची अशी काही बाजू नसतेच? आंबेडकरांनी हिंसक आंदोलन करा असं म्हटलं होतं का? कोणाला जमवलेल्या जमावावर नियंत्रण ठेवता येतं? (ठेवता आलं असतं तर बाबरी मशीद पाडली गेली नसती. का ती नियंत्रणाखाली जाणून बुजून घडवलेली घटना होती?)
(७) दरवर्षी एवढे लोक येत नाहीत यावेळेला मुदाम जमवून दंगल माजवली : एवढी माणसं काय एकदम आकाशातून अवतरली का? ही माणसं एवढ्या मोठ्या संख्येनं येणार याची गृहखात्याला खबर लागत नाही का?
[२०० वर्षापूर्वीच्या लढाई बद्द्ल : (१) पेशवे हरले नाहीत त्यांनी गनिमी कावा वापरला
(२) इंग्रज हरले पण त्यांनी स्तंभ उभारला
(३) इंग्रज जिंकले पण त्यांचं खूप नुकसान झालं
इतके किमान पर्याय संभवतात
तेवढ्याच जुन्या झाडू गाडगं प्रथेबद्द्ल (१) ती होती
(२) नव्ह्ती
इतके किमान पर्याय संभवतात
मात्र राम होताच आणि तो अयोध्येत विवक्षित ठिकाणीच जन्मला हे ठामपणे सांगीतलं जातं, जणू रामजन्मानंतर घुगर्या वाटायचं काम कौसल्यामातेनं यांच्याकडेच सोपवलेलं होतं. ]
एखादं उभ असलेलं स्ट्र्क्चर झुंडशाहीने पाडून आर्थिक विकासाकडे वाटचाल करणार्या भारतीय समाजाला थेट पुराणकाळात नेऊन दोन दंगलखोर बनविणार्या, "खतरेमें" ची हूल देत हिंदू समाजाला गेल्या दशकांपर्यंत आणि अजूनही वेठीला धरणार्यांबद्द्ल प्रेम असणार्यांनी दोन दिवसातल्या आर्थिक नुकसानीबद्द्ल गळे काढावे हा शुद्ध दांभिकपणा नाही का?
हे सर्व या संस्थळावर आलेल्या प्रतिक्रियांबद्द्ल आहे. त्या प्रतिक्रिया बघताना एक लक्षात आलं की मुळात एखाद्या ठिकाणी जमाव मोठ्या संख्येनं येतो त्यावर दगडफेक होते, दुकानं बंद ठेवली जातात, त्यांच्याविरोधात वातावरण तयार केलं जातं, या मूळ मुद्द्यावर कोणीही बोलत नाहीय. जणू काही ते चुकीचं स्मारक पुजताहेत म्हणोन त्यांनी दगड खायलाच हवेत. खरंतर "याच लोकांनी दगड आणून आजूबाजूच्या घरातून साठवून ठेवले असतील आम्हाला मारा म्ह्णून", एवढंच सरळसोट म्हणायचं बाकी राहिलं आहे. हे असतं आपल्याला हवं तेच बघण्याचं आणि सांगण्याचं टेक्निक. पिढ्यानपिढ्याच्या सुसंस्कृतपणाचा अभिमान आणि नव्या युगाचं शिक्षण हे यासाठी छानपैकी वापरता येतं.
’बाबासाहेबांना आम्ही मानतो पण हे आहेत का कोणी तसे?" असं सर्रास म्हणणार्या किती जणांमध्ये त्यांच्या त्यांच्या जातीच्या महापुरुषाचे गुण १०% तरी आहेत?
अरे ही गावकुसाबाहेर ठेवलेली माणसं आता प्रवाहात येतायत. आता जगणं शिकलेली ही नवीन पिढी ही आधीच्या पिढीचा अशिक्षित वा अर्धशिक्षितपणा, एकंदरीत जगण्यात वाढलेली स्पर्धा, स्त्री-पुरूष समानता, गावाकड्ची आपली माणसं आणि नवीन सुशिक्षित समाजात वावरताना आजूबाजूला गोळा केलेली माणसं यांच्यात वावरण्याचा तोल सावरणे, आपल्या पूर्वज-काळात फारसं अभिमानास्पद काही नाही किंवा जे आहे असं आपण मानतो त्याला समाज मान देत नाही अश्या अनेक पातळ्यांवर लढत असते. संपन्नतेची सुखं उपभोगतानाही स्वप्निल सोनावणे, नितीन आगे सारखी प्रकरण त्यांना आपण आजूनही गावकुसाबाहेरच आहोत याचं वेदनादायक भान आणून देतात, सैरभैर करून सोडतात. व्यक्तिगत पातळीवर छोटे मोठे संभावित अपमान आणि "तुम्ही ते काय!" च्या नजरा असतातच. मास्लोच्या पहिल्या पायरीवरून आताच वर चढलेल्या या लोकांनी थेट चौथ्यापातळीवरचा विचार करावा अशी अपेक्षा बाळगत समाज यांच्याकडे
(१) आरक्षणाच्या कुबड्या घेतलेले हे लोक (२) संस्कार आहेत का यांच्याकडे (३) मी म्हटलं बाकी कोणीही आण नवरा/नवरी म्हणून पण जय भीमवाला/वाली नको बाई (४) अच्छा तू *** आहेस? वाटत नाही हे असे अनेक खडे येता जाता फेकत असतो आणि त्यांचेच दगड होऊन अश्या आंदोलनातून समाजाकडे भिरकावले जातात. तेव्हा हे असे खडे आपल्याकडून भिरकावले जाणार नाही याची प्रत्येकाने वैयक्तिकरित्या दक्षता घेतली तरी हे असे भडके उडण्याला थोडाबहुत आळा बसेल. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटांनी या स्मारकाला भेट देऊन तिथल्या व्यवस्थेसाठी बैठक घेतली एवढंच फेबुवर पोस्ट केलं. त्या पोस्टवर एवढ्या विखारी प्रतिक्रिया आल्यात की हेच का ते सामान्य मध्यमवर्गीय आणि हाच काय तो ब्राम्हणी सुसंकृतपणा, अशी शंका येते. ( कुंभमेळ्यासाठी दुष्काळातही गोदावरीत पाणी ओतलं तेव्हा ते नाही खटकलं या लोकांना.) हाच मानभावी सुसंस्कृतपणा या मागासवर्गीय शहरी लोकांना पदोपदी भेटत असतो (गावच्यांचे प्रश्न आजून वेगळे.) आणि त्या घाणीत पाय बरबटू न देता त्यांना स्वतःचं जगणं अजून चांगलं करायचं असतं. इथे दणादण प्रतिक्रिया देण्याएवढं सोपे नसतं ते एवढ भान तरी ठेवावं. आपल्याला समाजात मान आहे, आपलया प्रतिकांना ही अखील समाजाची प्रतिकं म्हणून मान मिळतो पर्यायाने आपल्याला मान मिळतो तरिही लहानपणी आपल्याला "बामण भट कढी आंबट" म्हणून चिडवत होते हे शल्य जाणवतं तर आपल्याला मानच नाही आपले आई वडील केवळ जन्माने वरच्या जातीतला म्हणून छोट्या वयाच्या व्यक्तीलाही मान देतात, हात जोडतात (हे आता आता पर्यंत उत्तर, मध्यप्रदेशात होतं की नाही? अजूनही असेल) हे बघताना त्या जातीच्या मुलांना वेदना होत नसतील का? जिथे तिथे आपली लायकी काढली जाते आपल्याला कमी लेखलं जातं हे स्वीकारून आत्मसन्मान कसा जपत असतील ते? पूर्वंजांच्या चार कथा उचलून निरूपणं करत बसण्याएवढं साधं नाही ते.
सफाईकामात अजूनही ठराविक जातीला अघोषित आरक्षण आहे, जाता का हिरीरीने तिथे आरक्षण नको म्हणत? सवर्णांना चांगलं बोलण, वाचणं बाळकडू घरात मिळालेलं असतं. ५० च्या दशकातल्या बहुसंख्य आरक्षितांना ते मिळालं होतं का? पण उच्चारावरून लिहीण्यावरून , वागण्या बोलण्यातल्या रांगडेपणावरून त्यांना खुसूखुसू हसताना ते हे कुठून शिकतील हे भान असतं का? कुणी उच्च्पदस्थ वा परदेशस्थ नातेवाईक, उच्चविद्याविभुषित परिचितांचं मार्ग दर्शन, आईवडिलांनी साठवलेला पैसा, मिळवलेलं ज्ञान या कुठल्याच कुबड्या आपण नाही वापरल्या का? मग ज्यांच्या अगदी एखादया पिढीपलीकडल्या पूर्वजांनी भिका मागत पोटं भरली (ज्याला जोदार असं गोंडस नाव दिलं गेलं होतं.) त्यांनी एखादी कुबडी वापरली तर त्यांना चोर म्हणावं वाटतं? त्या कुबड्याच आहेत हे वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाला माहित असतं पण "ते जय-भीमवाले " असं म्हणत त्यांना आपण "घेट्टोत" ढकलतो. त्या कुबड्या पुढच्या पिढीला वापराव्याश्या वाटू नयेत असं समाज म्हणून आपण काय करतो? आरक्षणाविरूद्ध इथे गळे काढले जातात मग मेडिकलच्या सीटस जातीची खोटी प्रमाणपत्र देऊन मिळवल्याचं प्रकरण उघडकीला आलं होतं त्याचा निषेध किती जणांनी केला या संस्थळावर? मनोमन तरी किती जणांना वाटलं हे चुकीचं झालं म्हणून? एखादा मागासवर्गीय जनरल जागेसाठी अर्ज करू लागला की "आले हे. स्वत:च्या राखीव जागेतूनच करायचा ना अर्ज, इथेपण यांना हवं" अशी बरोबर उलटी भुमिका घेतली जात नाही का? अश्यावेळी तो माणूस स्वत:ला आजमावण्याचं धाडस कसं करेल याचा विचार अश्या पिंका टाकताना केला जातो का? समाज म्हणून ते नाही तर सवर्ण किती मागासलेले आहेत हेच यातून दिसतंय.
आता खरंतर भिमा-कोरेगाव प्रकरणीत ग्रामस्थांनी परस्पर सहकार्याची भुमिका घेतल्याच्या बातम्या आहेत. चूक कोणाचीही असो असं पुन्हा होणार नाही अशी भाषा दोन्ही बाजूकडून झाली आणि ते ही कोणत्याही प्रस्थापित राजकारण्यांच्या नाक खुपसण्याला वाव न देता. ही खूप आशेची गोष्ट आहे. कदाचित इथल्या मंडळीसारखी जानवं या खांद्यावरून त्या खांद्यावर करत सव्यापसव्याला कसरत म्हणण्याची कला त्यांना अवगत नसावी. दोन गटात फूट पडणे हे आपल्या जगणं कठीण होण्याशी थेट निगडीत आहे, याचं गावकर्यांना लवकर भान आलं असावं. पण ते झालं हे खरच चांगलं, समुद्रमंथनातून विषाबरोबर अमृतही निघतं हा दिलासा देणारं आहे. या संस्थळावर मात्र शहाण्यांनी विषाचा प्यालाच दाखवत जो काही एकांगी हैदोस घातलाय तो बघता या समाजातलं असल्याची लाज वाटावी. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही एवढे विष ओकू शकता तर खाजगीत किती विषमय असाल? असो, अश्या बाबतीत यापुढे तरी विवेकाने विचार मांडावा (जमल्यास करावा) एवढीच अपेक्षा. राजकारणी, ब्रिटीश, संघटना या कोणालाही नावं ठेवण्याआधी प्रत्येकाने माझ्याकडून जे मांडलं जातय त्यात तथ्य किती आणि कांगावा किती याचा डोकं स्थिर ठेवून विचार केला तरी अश्या घटना टळायला मदतच होईल. शेवटी समाज म्हणून सगळ्यांनाच पुढे जायचय.
वाचने
123535
प्रतिक्रिया
327
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवाहन...
मित्रांनो , कृपया झाल्या
In reply to आवाहन... by मराठी कथालेखक
सर्व जाती धर्माच्या
In reply to मित्रांनो , कृपया झाल्या by arunjoshi123
सकस लेख..
वैचारिक प्रगल्भता
काहींना जानव्याच्या
अशी वाक्ये असलेले प्रतिसाद
In reply to काहींना जानव्याच्या by अंतरा आनंद
केवळ मळमळ! आणि ती नेहमीच चालू
In reply to अशी वाक्ये असलेले प्रतिसाद by एमी
हो
In reply to काहींना जानव्याच्या by अंतरा आनंद
ते ब्रिटीशांची गुलामीबद्द्लचा
In reply to काहींना जानव्याच्या by अंतरा आनंद
I'm Right, You're Wrong
मुंबई : 'ऍक्शन हिरो' म्हणून
काय राव
In reply to मुंबई : 'ऍक्शन हिरो' म्हणून by पगला गजोधर
व्वा काय जस्टीफिकेशन दिलंय !
In reply to काय राव by ट्रेड मार्क
मी तर म्हणतो, बरें झालें,
In reply to व्वा काय जस्टीफिकेशन दिलंय ! by पगला गजोधर
मी तर म्हणतो, बरें झालें,
In reply to मी तर म्हणतो, बरें झालें, by arunjoshi123
एक बहुत घनघोर वामपंथी थे
In reply to व्वा काय जस्टीफिकेशन दिलंय ! by पगला गजोधर
बरें झालें, ब्रिटिशांनी ह्या भूभागावर राज्य केलें
In reply to व्वा काय जस्टीफिकेशन दिलंय ! by पगला गजोधर
मी तर म्हणतो, बरें झालें,
In reply to व्वा काय जस्टीफिकेशन दिलंय ! by पगला गजोधर
बेसिकमध्येच लोच्या आहे
In reply to व्वा काय जस्टीफिकेशन दिलंय ! by पगला गजोधर
मी तर म्हणतो, बरें झालें, ब्रिटिशांनी ह्या भूभागावर राज्य केलें, निदान 'माणूस' म्हणून जगण्याचा चान्स बहुजनांना मिळाला, नाहीतर 'गळ्यात मडकं पाठीला झाडू' काही सुटलं नसतं...म्हणजे 'गळ्यात मडकं पाठीला झाडू' ब्रिटिशांमुळे सुटला असं तुमचं म्हणणं आहे? काय बोलणार यावर! माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्ही, अॅमी किंवा अंतरा आनंद यापैकी कोणीच दिलं नाही. प्रश्न असा - महार जर एवढे शूर होते तर त्यांनी स्वतःच पेशवाई का उलथवून टाकली नाही? ब्रिटिशांच्या कुबड्या घ्यायची काय गरज होती?आर यु सिरीयस ??
In reply to व्वा काय जस्टीफिकेशन दिलंय ! by पगला गजोधर
बरेच मुद्दे वादग्रस्त असले
उदाहरण देतो
(१) दुसर्या धाग्यावर
In reply to उदाहरण देतो by फारएन्ड
अजून किती ?
In reply to (१) दुसर्या धाग्यावर by अंतरा आनंद
मी तुमच्या लेखाबद्दल बोलतोय
In reply to (१) दुसर्या धाग्यावर by अंतरा आनंद
हो, माझं ते वाक्य निखालस
In reply to मी तुमच्या लेखाबद्दल बोलतोय by फारएन्ड
हे आता अगम्य होत चालले आहे
In reply to हो, माझं ते वाक्य निखालस by अंतरा आनंद
मी ते लिहीण्याआधी दोनदा.
In reply to हे आता अगम्य होत चालले आहे by फारएन्ड
ओके
In reply to मी ते लिहीण्याआधी दोनदा. by अंतरा आनंद
खेडेगावात सर्वसामान्य दलित
In reply to ओके by फारएन्ड
आजच्या प्रासत्ताक लोकशाही
कैच्याकै
In reply to आजच्या प्रासत्ताक लोकशाही by पगला गजोधर
पुरावा द्या
In reply to कैच्याकै by प्रचेतस
ह्याविषयावर लिहायचं म्हणजे एक
In reply to पुरावा द्या by सुखीमाणूस
लेखक: आनंद मोरे
In reply to ह्याविषयावर लिहायचं म्हणजे एक by प्रचेतस
पगसाहेब,
In reply to लेखक: आनंद मोरे by पगला गजोधर
Around 1940, Dr. Ambedkar
In reply to पगसाहेब, by arunjoshi123
अहो भाऊ, त्यांचं तत्त्व
In reply to Around 1940, Dr. Ambedkar by पगला गजोधर
परत बेसिकमध्येच लोच्या
In reply to आजच्या प्रासत्ताक लोकशाही by पगला गजोधर
इंग्रज यायच्या आगोदर हा भूभाग प्रजासत्ताक लोकशाही देश होता....की जे चुक आहे...इंग्रज यायच्या आगोदर हा भूभाग प्रजासत्ताक लोकशाही देश होता असं कोण म्हणालं? त्या काळात विविध राजे त्यांच्या राज्यात राज्य करत होते. जरी राज्य वेगळी असली तरी धर्म आणि संस्कृती एक होती आणि त्यांनी हा खंड बांधला गेला होता. अगदी एखाद्या सम्राटाचा एकछत्री अंमल जरी असता तरी त्याला प्रजासत्ताक लोकशाही देश म्हणता येत नाही. पण भरतखंड हा मुख्यतः हिंदू राजांच्या अमलाखाली होता त्यामुळे एकत्र मानला जायचा.भंकस लेख
धन्यवाद !
In reply to भंकस लेख by arunjoshi123
सहमत अरुण जोशी
In reply to भंकस लेख by arunjoshi123
लेख संतुलित असूनही काहीसा
+१
In reply to लेख संतुलित असूनही काहीसा by प्रचेतस
ब्रिटीश येण्यापूर्वी भारत एक राष्ट्र होता का?
झोपेत असता तुम्ही. अहो, ते
In reply to ब्रिटीश येण्यापूर्वी भारत एक राष्ट्र होता का? by गामा पैलवान
वेगवेगळ्या भ्रमणकक्षा ?
In reply to झोपेत असता तुम्ही. अहो, ते by arunjoshi123
>>>अगदी भारतीय उपखंडाचं
In reply to ब्रिटीश येण्यापूर्वी भारत एक राष्ट्र होता का? by गामा पैलवान
ब्रिटिश राज्य चांगले होते असे
''ब्रिटिश आले ती इष्टापत्ती
In reply to ब्रिटिश राज्य चांगले होते असे by मनो
काय आलं?
In reply to ''ब्रिटिश आले ती इष्टापत्ती by पगला गजोधर
काँग्रेसच्या भक्तांना काँग्रेसच्याच माणसाचा रेफरन्स द्यावा लागतो
In reply to ''ब्रिटिश आले ती इष्टापत्ती by पगला गजोधर
मार्शल रेसेस चा शोध/वापर
In reply to ''ब्रिटिश आले ती इष्टापत्ती by पगला गजोधर
ब्रिटिश नसते व हे सुधारक
In reply to मार्शल रेसेस चा शोध/वापर by sagarpdy
तुमचा ब्राह्मणांवर खूपच
In reply to ब्रिटिश नसते व हे सुधारक by पगला गजोधर
---
In reply to तुमचा ब्राह्मणांवर खूपच by प्रचेतस
:)
In reply to तुमचा ब्राह्मणांवर खूपच by प्रचेतस
तुमच्या अलीकडच्या बऱ्याच
In reply to :) by पगला गजोधर
काय सर ! तुम्ही पण नं,
In reply to तुमच्या अलीकडच्या बऱ्याच by प्रचेतस
काय संबंध? पगो दुसर्या
In reply to तुमचा ब्राह्मणांवर खूपच by प्रचेतस
असो
In reply to ब्रिटिश नसते व हे सुधारक by पगला गजोधर
जयंत कुलकर्णी यांनी दिलेली
In reply to असो by माहितगार
ज्याचे माप त्याच्या पदरात
In reply to जयंत कुलकर्णी यांनी दिलेली by पैसा
"कदाचित" तुम्ही म्हणता तसं
In reply to ज्याचे माप त्याच्या पदरात by माहितगार
हम्म, पेशव्यांचे प्रत्यक्ष
In reply to "कदाचित" तुम्ही म्हणता तसं by पगला गजोधर
होय indeed...
In reply to हम्म, पेशव्यांचे प्रत्यक्ष by माहितगार
ज्ञानोबा, तुकाराम, नामदेव इ.
In reply to होय indeed... by पगला गजोधर
पण ब्रिटिशांना स्वतःस झेपेल आणि रुचेल तेवढाच ना ?
In reply to होय indeed... by पगला गजोधर
पण ब्रिटिशांना स्वतःस झेपेल
In reply to पण ब्रिटिशांना स्वतःस झेपेल आणि रुचेल तेवढाच ना ? by माहितगार
असो
In reply to पण ब्रिटिशांना स्वतःस झेपेल by पगला गजोधर
सहमत, कोरेगावास भेट देणारे
In reply to असो by माहितगार
प.ग. अमेरीकनांना तथाकथित
In reply to होय indeed... by पगला गजोधर
अगेन आपण दुसर्या बाजीरावास
In reply to होय indeed... by पगला गजोधर
Criminal Tribes Act 1871
In reply to "कदाचित" तुम्ही म्हणता तसं by पगला गजोधर
देशहीताचे वहन करणारी राष्ट्र
In reply to ज्याचे माप त्याच्या पदरात by माहितगार
रायनाकाचे मंदिर आणि टाक पुजेत
In reply to जयंत कुलकर्णी यांनी दिलेली by पैसा
आंबेडकर नि भगत सिंग
In reply to ब्रिटिश नसते व हे सुधारक by पगला गजोधर
बाबरी मशीद म्हणजे काय गं ताई?
गामाजी,
In reply to बाबरी मशीद म्हणजे काय गं ताई? by गामा पैलवान
राष्ट्र आणि राज्य
सर्व धागे आणि सर्व प्रतिसाद
इथून पुढे, आपण आपापसातील
In reply to सर्व धागे आणि सर्व प्रतिसाद by एस
चला.
नाहीतरी जीव जायचा
In reply to चला. by राही
परखड आणि निर्भीड विवेचन
In reply to नाहीतरी जीव जायचा by arunjoshi123
अजो ,
In reply to नाहीतरी जीव जायचा by arunjoshi123
"
+1
In reply to " by राही
काय +१? काय बुड शेंडा हाय का
In reply to +1 by विशुमित
तुम्हाला नक्की काय सांगायचं
In reply to काय +१? काय बुड शेंडा हाय का by arunjoshi123
तुम्हाला नक्की काय सांगायचं
In reply to तुम्हाला नक्की काय सांगायचं by विशुमित
हे सगळे स्वतःच्या पैशातून सो
In reply to " by राही
चला तर मग
स्वत:कडे बघायची गरज खरंच आहे का ?
अरे वा, एवढं तुम्हाला कळतय
In reply to स्वत:कडे बघायची गरज खरंच आहे का ? by गामा पैलवान
हात्तिच्या ....
In reply to अरे वा, एवढं तुम्हाला कळतय by अंतरा आनंद
प्रत्येक वेळी प्रत्येकाला
In reply to अरे वा, एवढं तुम्हाला कळतय by अंतरा आनंद
ज्या प्रतिक्रियांमुळे मला
पुन्हा कैच्याकै
In reply to ज्या प्रतिक्रियांमुळे मला by अंतरा आनंद
असो
In reply to पुन्हा कैच्याकै by पैसा
तिथे सामान्यत: तुमच्याविषयी
In reply to ज्या प्रतिक्रियांमुळे मला by अंतरा आनंद
ज्यांच्यापासून आपण
In reply to तिथे सामान्यत: तुमच्याविषयी by arunjoshi123
अर्थातच. तिथे जाऊन
In reply to ज्यांच्यापासून आपण by एमी
आणि प्रत्यक्ष कोरेगावला काय
In reply to अर्थातच. तिथे जाऊन by arunjoshi123
मी माझ्या आयुष्यातली साधारण 2
खरं दुखणं
In reply to मी माझ्या आयुष्यातली साधारण 2 by आनन्दा
पण एकही उजव्या संघटनेतील
In reply to मी माझ्या आयुष्यातली साधारण 2 by आनन्दा
+11111
In reply to पण एकही उजव्या संघटनेतील by एमी
+१११११ पुरोगामी राहिले.
In reply to पण एकही उजव्या संघटनेतील by एमी
पुरोगामी राहिले.
In reply to +१११११ पुरोगामी राहिले. by विशुमित
अगदी सहमत
In reply to पण एकही उजव्या संघटनेतील by एमी
काहीसा असहमत.
In reply to अगदी सहमत by राही
उलट इथल्या काही लोकांना
In reply to काहीसा असहमत. by प्रचेतस
ऐतिहासिक काळात पेडस्टलाचा १००
In reply to अगदी सहमत by राही
आरक्षणवाला एकही सरसकट सगळ्या
In reply to पण एकही उजव्या संघटनेतील by एमी
सर,
In reply to आरक्षणवाला एकही सरसकट सगळ्या by सुबोध खरे
का, का म्हणे?
In reply to सर, by पगला गजोधर
म्हणजे डॉ देवयानी खोब्रागडे
In reply to सर, by पगला गजोधर
जाता जाता -- क्रिमी लेयर फक्त
In reply to म्हणजे डॉ देवयानी खोब्रागडे by सुबोध खरे
"सामाजिक मागासलेपणासाठी
In reply to जाता जाता -- क्रिमी लेयर फक्त by सुबोध खरे
मग या खोब्रागडे ताई ना आरक्षण
In reply to "सामाजिक मागासलेपणासाठी by पगला गजोधर
सरसकट सगळ्या जातींना क्रिमी
In reply to आरक्षणवाला एकही सरसकट सगळ्या by सुबोध खरे
आपल्याला क्रिमी लेयरची
In reply to सरसकट सगळ्या जातींना क्रिमी by एमी
क्रिमी लेअरची कन्सेप्ट
In reply to आपल्याला क्रिमी लेयरची by सुबोध खरे
आरक्षण व आर्थिक -उत्पन्न याचा
In reply to क्रिमी लेअरची कन्सेप्ट by पगला गजोधर
मागासवर्गीयातीलच मलाई
In reply to आरक्षण व आर्थिक -उत्पन्न याचा by सुबोध खरे
टंकन दुरुस्ती
In reply to आरक्षण व आर्थिक -उत्पन्न याचा by सुबोध खरे
मलई खाणे वैगेरे म्हणणे चूक
In reply to टंकन दुरुस्ती by पगला गजोधर
मला वाटलंच असा प्रतिसाद येईल,
In reply to मलई खाणे वैगेरे म्हणणे चूक by arunjoshi123
घटनेनुसार जात, धर्म आणि लिंग
In reply to मला वाटलंच असा प्रतिसाद येईल, by पगला गजोधर
पगले, असल में तुझे इस
In reply to घटनेनुसार जात, धर्म आणि लिंग by arunjoshi123
आणि हो अजून एक पुरवणी
In reply to पगले, असल में तुझे इस by arunjoshi123
कोटा अंतर्गत कोटा मध्ये
In reply to आणि हो अजून एक पुरवणी by पगला गजोधर
आणि हो "स्त्री" ही "स्त्री"
In reply to आणि हो अजून एक पुरवणी by पगला गजोधर
आणि हो "स्त्री" ही "स्त्री"
In reply to आणि हो "स्त्री" ही "स्त्री" by पगला गजोधर
बाय द वे,
In reply to मला वाटलंच असा प्रतिसाद येईल, by पगला गजोधर
आणि हो अजून एक पुरवणी
In reply to बाय द वे, by arunjoshi123
गजोधर बुवा
In reply to टंकन दुरुस्ती by पगला गजोधर
मला वाटलंच असा प्रतिसाद येईल,
In reply to गजोधर बुवा by सुबोध खरे
आपले खरे रूप उघडे पडले.
In reply to मला वाटलंच असा प्रतिसाद येईल, by पगला गजोधर
फक्त नावापुरता खरेपणा आम्ही
In reply to आपले खरे रूप उघडे पडले. by सुबोध खरे
ब्वॉर्र
In reply to फक्त नावापुरता खरेपणा आम्ही by पगला गजोधर
समता आंदोलन समिती या अनुसूचित
In reply to ब्वॉर्र by सुबोध खरे
घटनेतील आरक्षणामागची कन्सेप्ट
In reply to क्रिमी लेअरची कन्सेप्ट by पगला गजोधर
घटनेतील आरक्षणामागची कन्सेप्ट जाणून घेण्याची तसदी घ्या.ही गंडवा गंडवी आहे. घटनेत आरक्षण दलित आणि आदिवासीयांच्यासाठीच होतं. ओबीसी आरक्षणापासून आरक्षणाचं राजकारण सुरू झालं. ओबीसी आरक्षण घटनेत नाही. आणि क्रीमी लेयरचा नियम फक्त ओबीसी आरक्षणासाठी आहे. माझ्यामते ओबीसी आरक्षण हे केवळ राजकीय फायद्यासाठी आणलं गेलं आणि मेन प्राब्लेम तो आहे.मी बऱ्याचदा तुमच्याशी संवाद
In reply to आपल्याला क्रिमी लेयरची by सुबोध खरे
+१००००
In reply to सरसकट सगळ्या जातींना क्रिमी by एमी
मी तुम्हाला RTE धाग्यांवर
In reply to +१०००० by sagarpdy
तुमचा पर्याय बराच गंडलेला आहे
In reply to सरसकट सगळ्या जातींना क्रिमी by एमी
लेखिकेच्या प्रतिसादांचे
In reply to तुमचा पर्याय बराच गंडलेला आहे by पिलीयन रायडर