हे डोहाळे पुरवावेत का?
एक अजब प्रश्न घेऊन आलोय. काय करणार, बायकोने एकास एक दाखले देऊन कात्रीत नै तर चक्क अडकित्यात पकडलाय. तर प्रश्नामागची पार्श्वभूमी अशी कि, मला ट्रेकिंगची आवड. लग्नानंतर हेच खूळ बायकोच्याही डोक्यात घातलं त्याचे परिणाम आत्ता दिसायला लागलेत. म्हणजे लोकं लग्नानंतर जसे बायकोला घेऊन कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी किंवा कोल्हापूर/ जेजुरला जातात तसे मी तिला नेले कुठे, तर रायगडाला तेही बाईकवर. itar वेळीही फिरायला
म्हटलं कि ट्रेकिंगच अशी आमच्या सहजीवनाची सुरुवात. दरवर्षी हरिश्चंद्रगड वारी हा माझा मागील चार पाच वर्षांचा क्रम, मागल्या वर्षी जेव्हा ग्रुपला घेऊन गेलो तेव्हापासून सगळे पावसाळा संपायची वाट पाहात होते. आता पावसाळा संपल्याबरोबर ग्रुपात चुळबुळ सुरु झाली आणि इकडे आमच्या सौ च्या मनात खळबळ माजलीय. खरंतर तिला पोहणं,
कारण ती गरोदर आहे. आणि डोहाळे लागलेत ट्रेकिंगचे.
तसं सारं काही आलबेल असलं तरीही डॉक्टरांनी सावधानता म्हणून बाईकवर फिरणे, जास्त धावपळ करणे, बाहेरचं खाणं असल्या गोष्टी बंद करायला सांगितल्यात त्यामुळे साहजिकच आम्ही या वर्षी तरी तिला ट्रेकला नेणार नाही आहोत. आणि हेच त्या खळबळीचं कारण. आता तिला डॉक्टरांनी काय सांगितलंय माहितेय ना असा प्रश्न केला कि तिच्याकडे हजार उत्तरे तयार असतात.
हरिश्चंद्रगड काही कठीण नाहीय चढायला,
पूर्वी नाही का बायका रानात जाऊन लाकडं वगैरे आणायच्या गरोदर असतानाही,
तसाही मी रोज कुठे व्यायाम करते? थोडी हालचाल नको का?
मी एवढी लेचीपेची वाटली काहो तुम्हाला?
मला जरा मोकळा श्वस घ्यायचंय....
एक ना अनेक निमित्त हजर आहेत ट्रेकसाठी. आता याला पर्याय म्हणून मी एखाद्या समुद्र किनाऱ्यावर निवांत दिवस घालवण्याचं गाजर दाखवून पाहिलं पण काही उपयोग नाही. त्यामुळे आता उत्तरासाठी मिपाकडे वळण्याशिवाय पर्याय उरला नाही. माझे प्रश्न पुढीलप्रमाणे.
१) बायकोला चार महिन्याची गरोदर असताना ट्रेकला नेणे सुरक्षित आहे का?
(तिचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत आणि कुठलाही त्रास सध्या तरी होत नाहीये तसेच आम्ही राजूर कडल्या मार्गाने जाणार आहोत जो तुलनेने सोपाय.)
२) तुलनेने हरिश्चंद्रगड पेक्षा सोपा गड जिथे वस्ती करता येईल असा कोणता?
(तिथपर्यंत गाडी जात असल्यास उत्तम.)
याद्या
7743
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
पन्हाळ्याला जा.... सगळीकडे
धन्यवाद
In reply to पन्हाळ्याला जा.... सगळीकडे by संजय पाटिल
अभिनंदन रे..!!
२) तुलनेने हरिश्चंद्रगड पेक्षा सोपा गड जिथे वस्ती करता येईल असा कोणता?मला लगेच आठवणारा, आवडणारा आणि फार फिरायला न लावणारा किल्ला म्हणजे विजयदुर्ग - जरा लांब आहे पण सोपा किल्ला आहे. आणखी लिस्ट सवडीने देतो.धन्यवाद
In reply to अभिनंदन रे..!! by मोदक
हरिश्चंद्रगड काही कठीण नाहीय
वाचून दाखवतो.
In reply to हरिश्चंद्रगड काही कठीण नाहीय by सुबोध खरे
अगदी उत्तम प्रतिसाद
In reply to हरिश्चंद्रगड काही कठीण नाहीय by सुबोध खरे
योग्य सल्ला.
लोहगडलि नेउ शकता , १५ मि मधे
तुम्ही पण जाउ नका
+१
In reply to तुम्ही पण जाउ नका by सुखीमाणूस
+१००
In reply to +१ by हर्मायनी
+११११११११
In reply to तुम्ही पण जाउ नका by सुखीमाणूस
अभिनंदन ..
अभिनंदन!
रेवती ताई
In reply to अभिनंदन! by रेवती
होय, तेच सांगण्याचा प्रयत्न
In reply to रेवती ताई by सुबोध खरे
माऊंटन बाईकिंगचेच डोहाळे लागले होते ना
In reply to अभिनंदन! by रेवती
अभिनंदन
सर्वांचे धन्यवाद.
एवढं लिहीताय तर त्यांचाही
In reply to सर्वांचे धन्यवाद. by इरसाल कार्टं
इथे रिझल्ट कळवल्याबद्दल
In reply to सर्वांचे धन्यवाद. by इरसाल कार्टं
योग्य निर्णय! अभिनंदन!
तुमच्या पोटी शिवाजीच जन्मायचा
हा हा हा
In reply to तुमच्या पोटी शिवाजीच जन्मायचा by सिंथेटिक जिनियस
.
अभिनंदन.
तुम्हाला वसईचा किल्लाही जवळच
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा
उलटंच झालं तर...
In reply to गर्भाचे आवडी मातेचा डोहळा by गामा पैलवान
डोंपा आहेच मग.
In reply to उलटंच झालं तर... by इरसाल कार्टं