मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ई. पी. एफ. पेन्शन ...... काय गडबड आहे.... ?

चौकटराजा · · काथ्याकूट
माझे ई पी एफ पेन्शन रू ८४१ .०० इतके आहे. ( आपल्या प्रिय देशात हे जास्तच आहे. तेंव्हा कृपया " आकड्यास" हसू नये . ) मला नुकतेच माझ्या बचत खात्याचे पासबुकचे पान ई-मेलवरून धाडण्यात आले आहे. त्यात नीट पाहिले असता जून व जुलै चे पेन्शन न मिळता एकदम ३ ऑगस्टला रू २०८७२ .०० पेन्शन या नावाखाली भरण्यात आले आहेत. व त्या नंतर पेन्शन बंद झाले आहे. हा काय प्रकार आहे....? कुणाचे असे काही झाले आहे का..... ? की पेन्शन वाढलेले असून ते आता दर तीन महिन्यानी मिळणार आहे .नोव्हेम्बर मधे कदाचित आणखी २०८७२.०० जमा होतील अशी गोड स्वप्ने पहायला हरकत आहे का की कसे....... ? कोणी मिपाकर जर पूर्वी खाजगी कंपनीतून निवृत्त झाले असतील त्यांचे पासबुक काय म्हणतेय..... ?

वाचने 4649 वाचनखूण प्रतिक्रिया 11

कंजूस Wed, 10/25/2017 - 19:48
इपीएफ पेन्शन नसून फॅमिली पेन्शन असावे. जून महिन्यात आधार जोडायचे होते त्यावेळी सगळा गोंधळ होऊन काहीही रकमा येत आहेत. पण त्या खय्रा नाहीत. यापुढे नोव्हेंबरमध्ये फिंगर्प्रिंट प्रुफ-आधार हेच जिवित प्रमाण धरण्यात येईल.

एस Wed, 10/25/2017 - 21:07
नुकतेच एक कळले की किमान निवृत्तीवेतनहे रु. तीन हजार इतके केले गेले आहे. आता ऑगस्टपासून लोकांच्या खात्यात पेन्शन जमाच न झाल्यामुळे नक्की सांगता येणे अवघड आहे.

In reply to by एस

रामदास२९ Tue, 10/31/2017 - 15:30
हा मेसेज व्होट्स अप वर फिरत आहे. खरा कि खोटा माहित नाही ------ GOOD NEWS The Central Board of Trustees are meeting on 29th October to finalize the enhancement of pension of minimum Rs. 3000/- and the PF Office is gearing up to update the pension. Most probably, all the pensioners may get this enhanced Pension from November 2017 onwards i.e. this will be credited 1st of December, 2017. ------

चौकटराजा गुरुवार, 10/26/2017 - 19:43
चौकशी अंती असे कळले की जेंव्हा मी स्वेच्छा निवृत्ती पत्करली तेंव्हा मूळ पगार रू १६००० धरून पेन्शनचा हिशेब झाला नव्हता. त्यो नंतरच्या लोकाना मिळाला. म्हणून २००३ पासूनचे हे १४ वर्षाचे उरलेले फरकाचे पैसे आहेत. बाकी मस्त बातमी वगैरे काही नाही. माझ्या अंदाजाने मोदीनी किमान पेन्शन रू १००० ची जी घोषणा केली आहे त्याप्रमाणे मी व तत्सम याना रू १००० पेन्शन ( म्हन्जे अनलिमिटेड नेट प्लान महिन्याचा ) आता मिळू लागेल.

होय माझ्याही बाबतीत असे घडले आहे. जून २०१५ पावेतो रु. १३३९/- एव्हढे घसघशीत ( ! ! ) पेन्शन माझ्या खात्यात जमा होत होते. जुलै २०१५ मध्ये अचानक त्यात ( स्व.दादा कोंडके यांच्या भाषेप्रमाणे " आपोआप " ) वाढ झाली. मी कोणताही अर्ज केला नव्हता. जुलै २०१५ ला १३३९/- ऐवजी रु. १५०१/-जमा झालेत.त्याच तारखेस म्हणजे १ ऑगस्ट २०१५ ला ' weekly June 2015 ' या नावाने रु. १५,४९८/- जमा झालेले होते. आणि तेथुन नियमितपणे रु. १५०१/- जमा होत आहेत. बँकेचा क्लार्क म्हणाला, थकबाकी जमा केली असेल, असे वाटते. मी सुद्धा फार चौकशी केली नाही, कारण पैसे " जमा " झाले होते ना ! !

टिलू Mon, 10/30/2017 - 17:57
माझा पी.एफ/पेन्शन ट्रान्स्फर क्लेम गेली ७ वर्ष चेन्नई पी.एफ ऑफिस मध्ये पेंडिंग आहे. ३ वेळा अर्ज (१ ऑनलाईन + २ वेळा फॉर्म १३ भरून) करूनहि अजून तो ट्रान्स्फर झाला नाही. ऑफिस चा फोन कधीही कुणीही उचलत नाही. grievance हि २ वेळा करून पहिला पण प्रत्येक वेळी काहीतरी थातुर माथूर कारण देऊन तो क्लोज करतात आणि पुन्हा अर्ज करायला सांगतात. या एका क्लेम मुले पुढचे सगळे क्लेम पेंडिंग आहेत. जुन्या कंपनी च्या माहिती नुसार माझा दुसरा अर्ज डिसेम्बर २०१६ लाच चेन्नई ऑफिस ला पोचला आहे. काय प्रॉब्लेम आहे काही कळत नाही. असा अनुभव कुणाला आला आहे का? यामध्ये कुणी जाणकार मदत करू शकेल का? धन्यवाद.

In reply to by टिलू

मराठी_माणूस Tue, 10/31/2017 - 10:26
आजच्या पेपर मधे तक्रारी साठी काहीतरी सोय केली आहे अशी एक जाहीरात आहे, उपयोगी आहे का पहा http://epaper.loksatta.com/1412806/indian-express/31-10-2017#page/13/2

कंजूस Tue, 10/31/2017 - 07:39
तुमच्या जुन्या कंपनीचा पीएफ नंबर घेऊन त्याची कुंडली काढा. त्यांनी पीएफ जमा केला होता का किती सालापर्यंत हे कळेल. ते डिफॅाल्टर असल्यास सर्वांचा पीजफ अडकतो.

In reply to by कंजूस

टिलू Tue, 10/31/2017 - 16:56
धन्यवाद मराठी_माणूस. चेक करतो. कंजूस - माहिती बद्दल धन्यवाद. जुन्या कंपनी चे रेकॉर्ड क्लिअर आहे. त्यांनी Annexure K सुद्धा पाठवले आहे ज्यामध्ये असे नमूद आहे कि पी एफ चेन्नई ऑफिस कडे पोचला आहे. पेन्शन+पी एफ असे दोन्ही ट्रान्सफर झाले आहेत पण चेन्नई ऑफिस कडून पुढे कसलीच कारवाई होत नाही आहे. कुठे escalate करता येईल हेही समजत नाही. सगळा typical सरकारी मामला आहे.