Skip to main content

तुम्हाला किती मार्क पडले होते दहावीला ?

लेखक सतिश पाटील यांनी गुरुवार, 15/06/2017 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याही घरी, शेजारी किंवा नात्यागोत्यात कोणाचातरी 'निकाल' लागलाच असेल. अपेक्षेप्रमाने काही जणांनी पेढे वाटले असतील , काही जणांना अपेक्षेपेक्षा जरा कमी गुण आले असतील. निकालाच्या निमित्ताने मी देखील १७ वर्ष पूर्वीच्या आठवणीत हरवलो. गणितात नापास झालो होतो मी. धाग्याचा उद्देश हाच की इथल्या सदस्यांनी देखील त्यांचे १० वीचे खरे मार्क सांगावेत. त्याच सोबत आज ते व्यवसायिक आयुष्यात कुठपर्यंत पोहोचलेत हे ही सांगावे. इतरांचे निकाल पाहताना बर्याच चर्चा केल्या असतील आता जरा स्वतःच्या निकालाची चर्चा सुद्धा होऊ दे की.

वाचने 40157
प्रतिक्रिया 85

प्रतिक्रिया

In reply to by चिगो

आपलं यश स्पॄहणीय आहे. दहावी-बारावीच्या मार्कांवर आयुष्य आणि यश अवलंबून नसतं हेच खरं. आयएएस होणं ही खरोखर खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आपले उदाहरण प्रेरणादायी आहे. इथे सगळ्यांचीच उदाहरणे प्रेरणादायी आहेत. परिस्थिती, आवड-निवड, स्पर्धा, पालकांचा आणि समाजाचा दबाव, आरोग्यविषयक समस्या, पैशांशी संबंधित समस्या, संगत अशा बर्‍याच आव्हानांचा आणि खडतर प्रवासाचा सामना करून सगळ्यांनीच कौतुकास्पद यश मिळवले आहे आणि सगळे आयुष्यात स्थिर, समाधानी, आणि आनंदी आहेत. इथले अनुभव वाचूनच इतकं सकारात्मक वाटतं की सकारात्मक अ‍ॅटिट्यूड कसा असतो हे समजण्यासाठी पुन्हा दुसरं काही करायची गरजच नाही. अजून येऊ द्या!

In reply to by समीरसूर

आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद, समीरसूर.. पण तुम्ही म्हणाल्याप्रमाणेच, इथे सगळ्यांचीच उदाहरणे प्रेरणादायी आहे. भूतकाळातील कमतरतेवर, अपयशावर मात करुन किंवा पुर्वी मिळालेल्या यशाला आणखी तेजस्वी करत जी व्यक्ती सुखी आयुष्य जगत आहे, ती प्रत्येक व्यक्ती माझ्यामते यशस्वी आहे. तुम्ही स्वतःदेखील 'वेव्ही बॉब' सारखी कादंबरी लिहीली आहे. आपापले छंद, आवडी सुखनैवः पुर्ण करु शकणे, हा पण एक माईलस्टोन आहे. मुद्दा एवढाच आहे, की अपयशात अडकण्यात आणि अडकून राहण्यात काहीच अर्थ नाही, कारण यश-अपयश हे नेहमीच सापेक्ष असतं.

In reply to by चिगो

शालेय जीवनात काही विषयात नापास होवून सुधा तुम्ही मनाने खचला नाही . आणि आता काय करायचे ,माझे कसे होणार असल्या निराशावादी विचारणा स्वतः पासून लांब ठेवून आयुष्य यशस्वी करून दाखवलं हे खूप मोठं यश आहे

In reply to by चिगो

आयएएस, म्हणजे च्यायला विषयच कट, पुढली कथा प्रशासन विरुद्ध गावकरी लिहिणार होतो, आता काय त्यो विषय घेऊन लिहायची हिम्मत नाय आपली. कॅडर कुठलं चिगो सर? एकेकाळी एमपीएससी करायची प्रचंड इच्छा होती, करंट अफेयर्स वगैरे वाचत असे पण वर्ष वर्ष रिपीट करायचा पेशन्स नव्हता म्हणून सरळ पदरात पडलेली नोकरी करत बसलोय.

In reply to by जेम्स वांड

पुढली कथा प्रशासन विरुद्ध गावकरी लिहिणार होतो,
कृपा करुन लिहाच.. सरकारी नोकरीत असलो, तरी डोळ्यांवर कातडं ओढलेलं नाहीयं मी.. आणि तुमचं लेखन ही सगळ्या मिपाकरांसाठी मेजवानी आहे, तेव्हा लिहाच. विषय कट करायला कारणच नाही ना काही.. मी आसाम-मेघालय कॅडरमध्ये आहे, मेघालयला.

साल २०००, दहावी - ८७%. आजूबाजूचे सायन्सला गेले म्हणून मी सुद्धा गेलो. पाठांतर करून १२ वी त पीसीएम ला ९४% मिळाले. आपल्याला ह्यातलं काहीही समजत नाही हे कळत असून सुध्दा बेअक्कलपणे इंजिनिअरिंग ला गेलो. ओ का ठो कळत नसून सुद्धा कसाबसा पास होत गेलो. आता एका सॉफ्ट्वेअर कंपनीत पाट्या टाकतोय...

शाळेत असताना हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्धी(?) होती. अकरावी पर्यंत कधीही खास अभ्यास करावासा वाटला नाही, केलाही नाही. विशेष समजही नव्हती. ४२.६७% एवढ्या प्रचंड गुणांनी मा. शा. परीक्षा उत्तीर्ण झालो. कॉलेजच्या पहिल्या वर्षीच नापास झालो. नापास झाल्यावरही वडलांनी काहीच दम दिला नाही, ओरडले नाहीत त्या मुळे की काय अभ्यास न केल्याचे अतिशय दुःख झाले. ओटीस एलेव्हेटर कम्पनीत अँप्रेंटीस म्हणून लागलो. दोनच महिन्यात एका सहकारी बँकेत कारकुनाची नोकरी मिळाली. पुढे तिथल्या सर्व परीक्षा देत शाखा व्यवस्थापक पदावरून निवृत्त झालो. आत्ता पर्यंतचे आयुष्य नक्की आनंदात गेले ( यात पत्नी आणि मुलाचा मोठा सहभाग आहे). .... योग्य वयात कान पिचक्या न मिळाल्याने शिक्षण अर्धवट राहिल्याची खंत नक्की जाणवते.

१९८७ साली दहावीत ७६% मिळाले. सगळे मित्र सायन्सला गेले मी मात्र कॉमर्स कॉलेजला ऍडमिशन घेतली. बारावीत ७२% मिळाले. बी कॉमनंतर लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. एलएल बी फायनलमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये पहिला क्रमांक आला. त्यानंतर लॉमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. तेंव्हाही युनिव्हर्सिटीमध्ये पहिला क्रमांक आला. त्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या केल्या. सध्या टॉप 5 मधील एका आयटी कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहे. थोडीफार समाज सेवा करायचा प्रयत्न चालू आहे. बाकी चांगलं चाललं आहे.

शालेय जीवनात आणि पुढे शिक्षण पूर्ण होईतो सातत्याने अव्वल क्रमांक त्यामुळे स्कॉलर वर्गात गणना परंतु आज सिंहावलोकन करता आणि बेंच मार्किंग (मराठी प्रतिशब्द ?) करता असे दिसते की तेव्हा मार्कांमध्ये माझ्या मागे असणारी काही मित्रमंडळी आज तौलनिक दृष्टया जीवनामध्ये अधिक यशस्वी आहेत. अर्थात त्याचा आनंदच आहे "सक्सेस इन लाईफ" इज नॉट नेसेसरिली प्रोपोर्शनल टू "मार्क्स ऑन मार्कशीट", हेच खरे. पुस्तकी हुशार असण्यापेक्षा "स्ट्रीट स्मार्ट" (पुनःश्च मराठी प्रतिशब्द ?) असणे हे जीवनात यशस्वी होण्यासाठी जास्त गरजेचे आहे.

1989 बैच, आर.एम.भट हाईस्कूल हुशार मुलगा म्हणून ओळखत होते शाळेत सर्व शिक्षक! त्यांना तर धक्काच बसला, खरी गोम अशी होती कि अभ्यासाची पुस्तके सोडून बाकी काहीही वाचायची आवड़ होती, अगदी पाककलेवरील पुस्तके सुद्धा! एका सर्वेक्षण कंपनीत सुपरवाइजर होतो, अचानक नोकरी सोडून एका फार्महाउसवर देखभालकर्ता म्हणून लागलो. आता एका डायग्नोस्टिक फर्मकरता मार्केटिंग करतो. कधी असे वाटते की अभ्यास केला असता तर चांगली नोकरी, पैसा, आराम मिळाला असता. गणित केले तेव्हा समजले की आता पण तेच करत आहे. माझ्या मुलाला पण जमेल तशी पुस्तके आणून देतो. परदेशी महागड़ी पुस्तके रद्दिमधे स्वस्तात मिळतात. गमतीची गोष्ट म्हणजे माझ्या मुलाला पण शाळेमधे हुशार मुलगा म्हणून ओळखले जाते. इतिहासाची पुनरावृत्ती होणार बहुतेक?

1989 बैच, आर.एम.भट हाईस्कूल हुशार मुलगा म्हणून ओळखत होते शाळेत सर्व शिक्षक! त्यांना तर धक्काच बसला, खरी गोम अशी होती कि अभ्यासाची पुस्तके सोडून बाकी काहीही वाचायची आवड़ होती, अगदी पाककलेवरील पुस्तके सुद्धा! एका सर्वेक्षण कंपनीत सुपरवाइजर होतो, अचानक नोकरी सोडून एका फार्महाउसवर देखभालकर्ता म्हणून लागलो. आता एका डायग्नोस्टिक फर्मकरता मार्केटिंग करतो. कधी असे वाटते की अभ्यास केला असता तर चांगली नोकरी, पैसा, आराम मिळाला असता. गणित केले तेव्हा समजले की आता पण तेच करत आहे. माझ्या मुलाला पण जमेल तशी पुस्तके आणून देतो. परदेशी महागड़ी पुस्तके रद्दिमधे स्वस्तात मिळतात. गमतीची गोष्ट म्हणजे माझ्या मुलाला पण शाळेमधे हुशार मुलगा म्हणून ओळखले जाते. इतिहासाची पुनरावृत्ती होणार बहुतेक?

बोर्डात. आलेलो . इंजिनिअर झालो त्यात रस नाही वाटला. परत पोलिटिकल सायन्स आणि कंपनी कायदा शिकलो. सध्याचे काम इंजिनिअरिंग सोडून फार वेगळे आहे.

१० वी पर्यंत सर्व शिक्षण मराठी माध्यमातून झाले , ११ वी व नंतर सर्व विषय इंग्रजी माध्यमामधून होते परंतु काही अडले नाही. मातृभाषेतून शिक्षण घ्यावे या मताचा मी आहे पण माझी दोन्ही मुले इंग्रजी शाळेत जातात, असो काळानुरूप बदल आवश्यक (पण खरच गरज आहे का ,या विषयावर वेगळा धागा उघडता येईल.) दहावीच्या निकालाविषयी चर्चा म्हणून एक आठवण नमूद करावीशी वाटते- बी. एम. जोशी (उत्कर्ष मंदीरचे अतिशय कडक शिक्षक, मुले काय मुलींना पण धोपटून काढायचे चुकले तर. तरीही विद्यार्थीप्रिय) सरांनी माझी गणिते तपासताना म्हटले होते तु ८० टक्क्याच्या आसपास जाणार आणि सरांचे भाकीत तंतोतंत खरे ठरले. मी कधी मार नाही खाल्ला पण दुसर्याचा मार बघून फाटायची. मुलांना यावे ही कळकळ मी इतर कोणत्याही शिक्षकामध्ये एवढी पाहिली नाही. नंतर अभियांत्रिकी शिक्षण पुर्ण करून मी आज हिंजवडी येथील एका माहीती तंत्रज्ञान कंपनी मध्ये उच्च प्रबंधक पदावर आहे. ठीक चालू आहे, अजून काही चांगले करता आले असते असे वारंवार वाटते. नोकरी बास असाही विचार डोकावत असतो. बाकी बघू स्वप्रयत्न आणि परमेश्वराची क्रुपा!