Skip to main content

स्विकारावं का हे?

लेखक उपयोजक यांनी गुरुवार, 08/06/2017 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
Vadpujan सदर फोटो फेबुच्या कृपेने मिळाला आहे.फोटो पाहिल्यावर आधी लक्ष जातं ते टी शर्ट आणि शॉर्टस् घालून वडाची पुजा करणार्‍या या स्त्री कडे! कदाचित ती कोणासोबत मदतीसाठीही आलेली असू शकते;पण समजा ती याच पोषाखात पुजेसाठी आली असेल तर? आपण असे बदल स्विकारावेत का? स्विकारावेत असं वाटत असेल तर का स्विकारावेत? स्विकारु नयेत असं वाटत असेल तर का स्विकारु नयेत? की वेळ लागेल असे बदल स्विकारायला? अनेक कंपन्यांमधे फॉर्मल पोषाखात न घालता कर्मचारी आल्यास तो कामाबाबत गंभीर नाही असं समजलं जातं पंचताराकीत हॉटेल्समधे स्त्रीयांनी नऊवारी नेसून गेल्यास ड्रेसकोडचं कारण सांगून प्रवेश नाकारला जातो. काय वाटतं तुम्हाला?झडू द्या चर्चा!!

वाचने 26047
प्रतिक्रिया 107

प्रतिक्रिया

In reply to by गामा पैलवान

वडाला दोरे गुंडाळून फेरे मारल्याने कोणता अध्यात्मिक लाभ होतो व फोटोतील स्त्रीने पारंपारिक वस्त्रे परिधान न केल्याने तिला हा लाभ का मिळणार नाही याबद्दल मौलिक मार्गदर्शन करावे.

In reply to by गामा पैलवान

दक्षिणेत प्रत्येक शुभप्रसंगी तांदळाची खीर करतात अन महाराष्ट्रात तर तांदळाची खीर म्हणजे श्राद्धाचं काम, कसं साधावं? हे तर एक उदाहरण झालं असं एक पोतंभर उदाहरणे असतील.

In reply to by जेम्स वांड

देशावर तांदुळाची खीर सणासुदिनासाठी वर्ज्य असेल पण उर्वरित भारतात मात्र तसे अजिबात नाही. संपूर्ण कोंकणपट्टी आणि गोवा इथल्या बहुसंख्य समाजांत तांदुळाची खीर केव्हाही केली जाते. गुजरात, राजस्थान, बिहार, बंगाल, उडिशा,उ.प्र.,म.प्र. मध्येही ही खीर, फिरनी ही आवडती पक्वान्ने आहेत. दक्षिण भारतात तर तांदूळ हेच मुख्य अन्न असल्याने सणाच्या दिवशी त्याचेच पक्वान्न असणे साहजिकच आहे. भले नेहमीच खीर नसली तरी.

अध्यात्मिक लाभाचा कपड्यांशी संबंध नसतो, नाहीतर उघडे नागडे साधू, ते भगवे कपडे अंगभर घालणारे यांच्या अध्यात्मिक लाभाबद्दल काय बोलणार? कपडे व त्याच्या पद्धती केवळ समूह, संघ स्वरूप जपण्यासाठी असते, संघ पद्धती (आरेरेस नाही) मध्ये एकसारखे कपडे, वर्तन, आहार, चालीरीती ह्या समूहाचे एकजिनसीपण जपण्यासाठी असते. त्याचा अध्यत्माशी संबंध येत नाही. ईश्वरप्राप्ती कपड्यांवर अवलंबून नसते, चित्तदशेवर असते.

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे, समूहाचं एकजिनसत्व? हे कशाशी खातात? वरच्या चित्रात पारंपरिक कपडे घातलेल्या बायकांना समूहाचं एकजिनसत्व सांभाळण्यात काडीमात्र रस नाही. तुम्ही म्हणता ती चित्तदशा येईस्तोवर कपडे सांभाळावे लागतातंच. जर सार्वजनिक ठिकाणी उपासना करायची असेल तर योग्य कपड्यांत जावं. मनमानी करायची असेल तर घरच्या घरी खुशाल करावी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

जर सार्वजनिक ठिकाणी उपासना करायची असेल तर योग्य कपड्यांत जावं. मनमानी करायची असेल तर घरच्या घरी खुशाल करावी. >> ह्यालाच तालिबानी वृत्ती म्हणतात. असो. हेच तत्त्व नागा साधूंना लागू होत नाही ते का?

वाक्यागणीक त्या स्त्रिला माऊली म्हणायच पण सगळी चर्चा तिच्या वस्त्रांबद्द्लच ! हे बरे नव्हे ! या देशात योनीपुजा चालते, नग्नपुजा चालते तर इकडे काय मोठा प्रॉब्लेम आहे ? तिने संस्कार धुडकावून लावले असतीलही कदाचित पण तुमच्या घरी तेच संस्कार येण्याची भिती कशाला बाळगता ? तुम्ही तुमच्या घरच्यांना जे संस्कार देऊ शकता त्यापेक्षा बाहेरुन येणारे आक्रमण अधिक बलवान आहे आणि त्यात तुमचे संस्कार पालापाचोळ्यासारखे उडून जाण्याची भीती वाटते काय तुम्हाला ??

In reply to by धर्मराजमुटके

एकिच मारा पर क्या सॉलिड मारा है!

In reply to by धर्मराजमुटके

वाक्यागणीक त्या स्त्रिला माऊली म्हणायच पण सगळी चर्चा तिच्या वस्त्रांबद्दलच ! :)

वरची चर्चा वाचून हा फोटो कुठून आला आहे याची मला उत्सुकता वाटली. या साइटवर images.google.com गेलो आणि Search by Image वर क्लिक केले. तिथे फोटोचा url दिला. गुगल ने जे रिझल्ट दिले त्यातला सगळ्यात जुना रिझल्ट जून 2016 चा आहे. पण आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे तो एका अतिशय घाणेरड्या साइटवर आहे. त्या साईटवरील फोरम वर एकाने म्हटले आहे मला स्त्रियांना पाठमोरे बघायला आवडते आणि असे कोणते फोटो तुमच्याकडे आहेत का असे विचारले आहे. त्या थ्रेडवर वरचा फोटो जालावर सर्वप्रथम आलेला दिसतो. त्या थ्रेडमध्ये अजूनही बऱ्याच स्त्रियांचे परवानगी न घेता , सार्वजनिक ठिकाणी घेतलेले फोटो आहेत.

In reply to by अत्रे

तुम्ही पाहिलेल्या साईटवर हा फोटो कोणत्याही उद्देशानं येवो.इथं हा फोटो कोणत्या उद्देशानं टाकलेला आहे ते वर स्पष्ट केलं आहे.

In reply to by उपयोजक

ते ठीक आहे पण जे लोक अशा सायटीवर पडीक असतात (तुमच्या फेसबुक ग्रुप वर ज्याने हा फोटो टाकला तो) त्यांनी परंपरा जपण्याची चर्चा करावी हे हास्यास्पद आहे ( फेबु ग्रुप वर पण परम्परा जपण्यावरच चर्चा झाली असे मी गृहीत धरतो. असे नसल्यास त्या फेबु ग्रुप वर "कोणत्या" उद्देशाने हा फोटो टाकला हे कृपया स्पष्ट करावे)

In reply to by अत्रे

ते संपादक अन धागाकर्ते बघून घेतील आपापसात, तुम्ही मधल्यामध्ये काहीतरी भयंकर घडल्याचा आव आणू नका.. (नुकतीच मिळालेला कृपाप्रसाद म्हणले चार घास हा अध्यात्मिक लाभ तुमच्यासोबत वाटून घ्यावा)

In reply to by जेम्स वांड

नुकताच मिळालेला कृपाप्रसाद म्हणले चार घास हा अध्यात्मिक लाभ तुमच्यासोबत वाटून घ्यावा) हे फार आवडले :)

संदीप डांगे,
ह्यालाच तालिबानी वृत्ती म्हणतात. असो. हेच तत्त्व नागा साधूंना लागू होत नाही ते का?
तालिबानी बायकांचे हातपाय दिसले तर कापून टाकतात. उपरोक्त स्त्रीस थोटीलंगडी करावी असं मी कुठेही लिहिलेलं नाहीये. असो. नागा साधू गृहस्थाश्रमी नाहीत. भारतात उपासनास्वातंत्र्य आहे. उपरोक्त स्त्रीने स्वत:स नागासाध्वी म्हणून जाहीर करून खुशाल नग्न बसावे. काहीही आक्षेप नाही. आ.न., -गा.पै.

जेम्स वांड,
दक्षिणेत प्रत्येक शुभप्रसंगी तांदळाची खीर करतात अन महाराष्ट्रात तर तांदळाची खीर म्हणजे श्राद्धाचं काम, कसं साधावं? हे तर एक उदाहरण झालं असं एक पोतंभर उदाहरणे असतील.
धर्मशिक्षण ठोकळेबाज नाही. कारण प्रत्येकाची उपासना वेगवेगळी आहे. ज्या लोकांची उपासना साधारणत: एकसारखी आहे अशा लोकांचा संप्रदाय बनतो. संप्रदायाचं धर्मशिक्षण बऱ्यापैकी एकसंध असतं. निदान तशी अपेक्षा आहे. अर्थातंच धर्मशिक्षण फक्त उपासकांसाठी आहे. ज्याला उपासनेत रस नाही त्याने धर्मशिक्षण घेण्यात वेळ दवडू नये, असं माझं मत आहे. आ.न., -गा.पै.

स्रोत आनंद पाटील https://www.facebook.com/anandpatil4/posts/१५४५९९८८१५४७४३९० आजोबा आले, स्कुटर थांबवली, बायकोनं वडाला गुंडाळलेला दोर काढून टाकला आणि गेले सुद्धा.. ( आणि मी गुपचूप पकडलं)@शुक्रवार पेठ. df

In reply to by एकुलता एक डॉन

दोराला काय जीपीएस ट्रॅकर वगैरे होता का? आपल्याच बायकोने बांधलेला हा दोर आहे हे शंभर दोरांतून कसं ओळखू आलं? काकांच्या पैजाम्याची नाडी तुटली असण्याची शक्यता जास्त वाटते आहे.

कोल्हापुरच्या महालक्ष्मी ला घागरा चोळीचा पेहराव .. स्वीकारवं का हे ? अधिक बातमी इथे

In reply to by धर्मराजमुटके

घागरा चोळी भारतीय वेष असल्यामुळे त्यातून अध्यात्मिक लाभ मिळत असावा, हे देवीला खणापातळाच्या ओटी ऐवजी घागरा चोळीची ओटी येणे कदाचित धागाकर्त्यांच्या 'वेगळे' ह्या परिभाषेत बसावे, पण अध्यात्मिक लाभ परिभाषाकारांच्या परिभाषेनुसार चालून जावे... असे वाटते.

In reply to by जेम्स वांड

जेम्स वांड, मला एक तंत्रज्ञानाशी संबंधित प्रश्न पडलाय. त्याचं काय आहे की मोठमोठाले पंखे फिरवून वीज उत्पन्न करतात. मग हीच वीज तारांनी दूरवर वाहून नेली जाते. तीच वीज घराघरांत येते. शहरातले अनेक ग्राहक त्याच विजेवर पंखे फिरवतात. हा खटाटोप करायचं कारणच काय मुळातून? पंखाच फिरवायचा आहे तर सरळ हाताने फिरवून वारा घ्यावा म्हणतो मी. घरी विजेवर पंखा फिरवण्यात काय लाभ आहे? जमल्यास उत्तर द्या. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आपल्याला असं रूपक रूपक खेळणं जमत नाय हो गापै, विषय संबंधित प्रश्न थेट विचारला तर काही बोलता येईल....

In reply to by जेम्स वांड

जेम्स वांड, हे रूपक कुठनं उपटलं ते माहित नाही. त्याचं जाऊ द्या. माझा प्रश्न सरळ आहे. घरी पंखे फिरवण्यासाठी धरणाच्या पाण्यावर भलाथोरला पंखा फिरवावा का? घरी पंखे फिरवण्यामागे काय लाभ आहेत? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

... दोन्ही प्रचंड comfortable असतं असं स्वानुभवावरून सांगतो. - तोकडी चड्डी (शॉर्ट्स) घालून पंख्याखाली बसलेला

In reply to by धर्मराजमुटके

स्थानिक बातम्यांमधे श्रीपुजकांच म्हणणं दाखवलं की राजस्थानमधल्या खोडीयार माता या देवीला अशाच वेषात भक्तांपुढे सादर केलं जातं.खोडीयार माता ही हिंदु देवीच आहे.

In reply to by रातराणी

हो मग.... रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी अन फावल्या वेळात मुवि प्रतिसाद्/लेख टाकी.... (आम्ही फक्त आमच्याबद्दल लिहू शकतो.) उद्या कुणी जर टिंबक्टूच्या एखाद्या जमीनदाराच्या १४व्या कुत्र्याच्या शेपटीवरील केसात आणि ३-१३ ग्रहावरील पंचपेशीय प्राण्याच्या शेपटीवरील केसात साम्य कसे? असा जरी प्रबंध टंकला तरी आम्ही एक तरी प्रतिसाद देवूच. ५-६ महिने, कळफलका शिवाय काढून दाखवा, म्हणजे कळेल.

मुक्तविहारीजी आपण आपल्या लेखनामुळे मला आदरणीय आहात . परंतु आपण एखाद्या जातीची अशी हेटाळणी करणे पटले नाही. आपल्याकडे वेळ असेल तर कितीही लेख टाका, प्रतिसाद टाका, वट्ट प्रॉब्लेम इल्ले. पण जातीवाचक उल्लेख नको.

१००