कर्जमाफी करताना बोके कसे वगळायचे ?
कर्जमाफी या विषयावर दुसरी बाजू मांडताना काही जणांचे मुद्दे विचारात घ्यावेसे वाटले. त्यात दम आहे.
शासनाला आणि संपक-यांना देण्यासाठी एक प्रस्ताव तयार करायचा आहे. अगदीच कच्चा आराखड्याचा चर्चाप्रस्ताव आपणासमोर ठेवत आहे. या आराखड्याचे नेमक्या प्रस्तावात रुपांतर करण्यासाठी आलेल्या सूचनांचे स्वागत आहे.
आराखडा
अपेक्षा
१. सरसकट करमाफी करताना ज्यांना भाव पडल्याचा फटका बसलेला नाही त्यांना कर्जमाफी नको.
२. मोठे बागायतदार , ज्यांच्या जमिनी बागायती आहेत आणि वेगवेगळी पीके घेतली जातात, त्यातील एक दोन पिकाचे भाव पडले असल्यास संपूर्ण क्षेत्रासाठी घेतलेल्या कर्जाची सरसकट कर्जमाफी नको.
३. ज्यांच्या नावे कारखाने आहेत, शाळा कॉलेजेस आहेत, ग्रामपंचायत सदस्य ते वरची पदे भूषविली आहेत, भूषवत आहेत अशा सधन व मातब्बर लोकांचा समावेश कर्जमाफीत नको
अर्हता :
कर्जमाफीसाठी अर्हता ठरवणे हा ग्रे एरिया आहे. कुणाला फटका बसला व कुणाला नाही हे ठरवणे जिकीरीचे आहे. हे कसे ठरवावे यासाठीच सूचना अपेक्षित आहेत. अर्हता निश्चित करण्यासाठी कृतीआराखडा बनवावा लागेल. त्याची कच्ची रूपरेषा खालीलप्रमाणे. प्रस्तावक या विषयात ढ आहे. फक्त कल्पना मांडतो आहे. तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याबाबत विकलांग आहे. त्यामुळे ही बाजू माहीतगारांनी सावरावी ही विनंती.
कृती आराखडा :
१. मोदींनी किसान कार्ड आणले आहे. त्याचे स्वरूप काय आहे याची कल्पना नाही. पण या किसान कार्डाचा विकास करून प्रत्येकाचे क्षेत्र किती, त्यात कुठले पीक किती क्षेत्रात आहे याची माहिती अपडेट केली जावी.
२. बी बियाणे खरेदी करण्यासाठी किसान क्रेडीट कार्डाचा वापर व्हावा. ही कार्डे जोडली जावीत अथवा एकाच कार्डात सगळी कामे व्हावीत. यामुळे कुठले बियाणे प्रत्यक्षात कुणी किती खरेदी केले हे समजेल.
३. याचा उपयोग या वर्षी कुठले पीक किती येईल याचा अंदाज घेण्यासाठी होईल
४. बाजारात मागणीपेक्षा एखादे पीक आल्यास निर्यातीसाठी स्कोप आहे का हे पाहणारी यंत्रणा असावी जेणेकरून शासनावर हमीभावाचा बोजा पडणार नाही.
५. मागणीपेक्षा लागवड जास्त होत असल्यास पुढच्या शेतक-यांना बियाणे मिळणार नाही असा प्रोग्राम कार्डाशी संलग्न असावा. प्रथम येईल त्यास प्रथम हे तत्त्व आंतरजालाच्या मदतीने अंमलात आणावे. त्यामुळे एकाच पिकाने लागवडीचे क्षेत्र अडवून दुस-या मालाची टंचाई होते हे थांबेल.
६. कुठे अवर्षण होते, कुठे पाऊस माफक झाला , कुठे पीके वाया गेली हा डेटा कृषी खात्याने अपडेट करावा. सबसिडी अथवा कर्जमाफी करताना त्याचा वापर व्हावा.
७. यासाठी कायदा व्हावा. एकदा कर्जमाफी झाल्यानंतर पुढे किती वर्षे कर्जमाफ होणार नाही याचा सभागृहात चर्चा करून निकष निश्चित करावा. कर्जमाफीतून वगळायचे घटक याचाही समावेश कायद्यात असावा.
८. पीक विक्रीला नेताना कार्डाशिवाय खरेदी विक्री होऊ नये. पैसे रोखीने ने देता चेक अथवा ट्रान्स्फरने दिले जावेत. त्यामुळे शेतक-याचाही फायदा होईल व पारदर्शकता आल्याने नेमके किती कर्ज माफ करायचे याचा अंदाज येईल.
९. नुकसानीची निश्चिती ही प्रत्येक करण्यासाठी यंत्रणा उभारावी. तीत सरकारी अधिकारी, संस्था, व्यक्ती यांचा समावेश असावा.
१०. वरील त्योजनेत भ्रष्टाचार होऊ नये यासाठी लूपहोल्स शोधून ती बुजवणे.
इतकाच विषय अपेक्षित आहे.
टीप : फोकस या विषयावरच राहू द्यावात ही नम्र विनंती.
तळटीपः कुणी कुणाची गाय मारली, कुणी घोडा मारला मग आम्ही कसे बरोबर हे दळण दळण्यासाठी नवा धागा काढता येईल किंवा मागणी झाल्यास काढून देईन. तिथे जे धारातिर्थी पडतील त्यांच्या येईल मिपावर दगड उभारण्यात येईल. जखमींना मोलाचे सल्ले मिळतील.
अर्धटीप : विषय बोके गाळणे इतकाच आहे. उगीच कर्जमाफीसाठी सनीताई लहाने यांच्यासारख्या समाजसेवकांनी चॅरिटी शोज करून निधी जमवावा असे सल्ले देऊ नयेत.
याद्या
20721
प्रतिक्रिया
66
वर्गीकरण
मिसळपाव
कृतीआराखड्यात कार्डाचे किती
क्र. १ ते ४ मान्य.
क्र. ५ चा खुलासा राहून गेला
In reply to क्र. १ ते ४ मान्य. by जयंत कुलकर्णी
हे आत्ता ही होते, तुमच्याकडे
In reply to क्र. ५ चा खुलासा राहून गेला by खटासि खट
मला माहीत नाही.
In reply to हे आत्ता ही होते, तुमच्याकडे by संदीप डांगे
अजुन एक महत्वाचा मुद्दा
तसे केल्यास कसणारा ताबडतोब
In reply to अजुन एक महत्वाचा मुद्दा by जयंत कुलकर्णी
पण हा विषय बाजूला ठेवूयात.
In reply to तसे केल्यास कसणारा ताबडतोब by खटासि खट
५. मागणीपेक्षा लागवड जास्त
सुरुवात कर्जापासून करतो.
दुसऱ्या आणि तिसऱ्या
In reply to सुरुवात कर्जापासून करतो. by amit१२३
हि माझी कल्पना आहे ..दुसऱ्या देशाबद्दल माहित नाही.
In reply to दुसऱ्या आणि तिसऱ्या by संदीप डांगे
एकदा ..
१ मुद्दा
चर्चा उत्तम चालावी आहे...
In reply to १ मुद्दा by लिओ
एकदाच फक्त
In reply to चर्चा उत्तम चालावी आहे... by विशुमित
मस्त विषय....
चांगला धागा . व माहिती पूर्ण
चांगली चर्चा.
२. शेतकर्याला अॅडीशनल
In reply to चांगली चर्चा. by अप्पा जोगळेकर
शेतकर्याला अॅडीशनल शेतजमीन
अल्पभूधारक
एक वेगळा विचार
सूचना चांगली आहे.
In reply to एक वेगळा विचार by सुबोध खरे
नवीन कर्जात( सवलतीच्या
In reply to सूचना चांगली आहे. by खटासि खट
या सूचनेचा उपयोग अन्यत्र
In reply to सूचना चांगली आहे. by खटासि खट
एखादा माणूस पुढील पाच वर्षात
In reply to एक वेगळा विचार by सुबोध खरे
मित्रहो
असे असेल तर माझी सूचना मुख्यमंत्र्यांसाठी...
In reply to मित्रहो by खटासि खट
फारतर
In reply to असे असेल तर माझी सूचना मुख्यमंत्र्यांसाठी... by चौकटराजा
साहेब
In reply to फारतर by चौकटराजा
डॉ स्वामिनाथन यांनीच
In reply to साहेब by सुबोध खरे
साहेब
In reply to डॉ स्वामिनाथन यांनीच by मार्मिक गोडसे
माझ्या फेबु वर आलेली ही पोष्ट
साहेब या पोस्टचा आणि आपल्या
In reply to माझ्या फेबु वर आलेली ही पोष्ट by मामाजी
ज्या घरात सरकारी
अवांतर होईल पण मला एक
भारत शेतीप्रधान देश
In reply to अवांतर होईल पण मला एक by कानडाऊ योगेशु
हाच विचार सर्वच उत्पादन लावला तर भारतीय उद्योग उभाच राहणार नाही
In reply to अवांतर होईल पण मला एक by कानडाऊ योगेशु
एक टिपिकल मिपीय प्रश्नः या
(No subject)
In reply to एक टिपिकल मिपीय प्रश्नः या by आदूबाळ
पोस्टच्या गाभ्यामधे लिहीलेले
In reply to एक टिपिकल मिपीय प्रश्नः या by आदूबाळ
बरं, बरं! शुभेच्छा!
In reply to पोस्टच्या गाभ्यामधे लिहीलेले by खटासि खट
कर्जमाफीचा प्रकार हा पश्चिम
100% सत्य
In reply to कर्जमाफीचा प्रकार हा पश्चिम by जानु
साहेब या पोस्टचा आणि आपल्या
In reply to कर्जमाफीचा प्रकार हा पश्चिम by जानु
तुमच्या प्रश्नांची उत्तरे
बॅलन्स संपवीत अर्धा व्हिडीओ
In reply to तुमच्या प्रश्नांची उत्तरे by संदीप डांगे
आण्णा, मागील कर्जमाफीत विदर्भ
ते म्हणतायत तसे झाले तर पेढे
आपल्या पोस्टच्या विषयानुसार
हा प्रतिसाद बोक्यांच्या
ECON १०१ दृष्टिकोनातून
सरपंचा बद्दलचा मुद्दा मान्य.
In reply to ECON १०१ दृष्टिकोनातून by साहना
आपणा सर्वांचे आभार.
फ्युचर ऑप्शन शेतमालाला लागु
आडत्यांच्या माध्यमातून
In reply to फ्युचर ऑप्शन शेतमालाला लागु by अनुप ढेरे
मधला कावळा म्हणजे एक्श्चेँज
In reply to आडत्यांच्या माध्यमातून by आदूबाळ
मी शेतकरी विरोधात नाही पण
गांधीजींचा विचार !
कर्जमाफी करताना बोके कसे
सर्वांचे आभार.
मिपावर चित्रे टाकण्याची कृती
In reply to सर्वांचे आभार. by खटासि खट
लोकसत्ता वरून..
पारदर्शक कर्जमाफीची प्रोसेस
मुळात शेतकरी कर्जबाजारी का होतो.