मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महिने आणि नक्षत्रांच्या नावांच्या व्युत्पत्ती काय आहेत ?

माहितगार · · काथ्याकूट
प्रत्येक महिन्यांची नावे ही त्या त्या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा पौर्णिमेच्या मागे पुढे येणाऱ्या नक्षत्राच्या नावावरून त्या महिन्याचे नाव पडलेले आहे. मराठी विकिपीडियावर अशी माहिती दिसली. नक्षत्राचे नाव → महिना चित्रा → चैत्र विशाखा → वैशाख जेष्ठा → जेष्ठ पूर्वाषाढा → आषाढ श्रवण → श्रावण पूर्वाभाद्रपदा → भाद्रपद अश्विनी → अश्विन कृतिका → कार्तिक मृगशीर्ष → मार्गशीर्ष पुष्य → पौष मघा → माघ पूर्व फाल्गुनी → फाल्गुन २७ नक्षत्रे अश्विनी • भरणी • कृत्तिका • रोहिणी • मृगशिरा • आर्द्रा • पुनर्वसु • पुष्य • अश्लेषा • मघा • पूर्वाफाल्गुनी • उत्तराफाल्गुनी • हस्त • चित्रा • स्वाती • विशाखा • अनुराधा • ज्येष्ठा • मूल • पूर्वाषाढ़ा • उत्तराषाढा • श्रवण • धनिष्ठा • शतभिषा • पूर्वाभाद्रपद • उत्तराभाद्रपद • रेवती + २८वे अभिजित तरीही नक्षत्रांना आणि महिन्यानां हिच नावे का निवडली गेली आणि यातील प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती काय असेल याचे कधी कधी कुतूहल वाटते. भारतीय सवंत्सरातील महिन्यांची नावे आणि नक्षत्रांच्या नावांच्या व्युत्पत्ती काय आहेत अथवा असू शकतील ? प्रतिसादांसाठी आभार

वाचन 9362 प्रतिक्रिया 18