Skip to main content

PAKISTAN DIDN’T KILL MY DAD “WAR” DID !!

लेखक डँबिस००७ यांनी बुधवार, 01/03/2017 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
एका राम सुब्रमण्यम नावाच्या बेकार माणसाने एका बिंडोक मॉडेलला घेऊन " वॉईस ऑफ राम " या बॅनरसाठी एक फिल्म बनवली. त्यानंतर हा उठलेला गदारोळ !! PAKISTAN DIDN’T KILL MY DAD “WAR” DID !! ह्या वाक्याचा अर्थ कोणी मला समजुन सांगेल का ? ह्या राम सुब्रमण्यंम चे काम : While the Profile for Peace campaign found many takers from both the neighbouring countries, celebrities like filmmaker Mahesh Bhatt and music composer Vishal Dadlani also extended their support. It was relaunched last year after Indian army’s surgical strike across the Line of Control (LoC) into Pakistani territory. Subramanian who has volunteered for Arvind Kejriwal’s anti-corruption political movement claims that he is not a member of the Aam Aadmi Party. गुरमेहर कौरचे वडिल पाकिस्तान बरोबर झालेल्या कारगील युद्धात शहीद झाले, तेंव्हा ही गुरमेहेर फक्त २ वर्षांंची होती.

वाचने 28905
प्रतिक्रिया 144

प्रतिक्रिया

In reply to by गामा पैलवान

त्यासाठी लोकशाहीत संस्था निर्माण करणे, त्यांना पुरेसे स्वातंत्र्य देऊन सक्षम करणे, कायद्याची अंमलबजावणी निर्भयपणे करण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करणे हे काम लोकनियुक्त सरकारल नेहमीच करणे भाग असते. लोक लोभी, संधी मिळाल्यास भ्रष्ट असणारच. नागरी समाज आणि सरकार यांचे कर्तव्य हे असते की ह्या संस्थांना उत्तम चेक्स आणि बॅलन्सेस देणं, व्यवस्थेला बळकटी देणं. भ्रष्टांना भ्रष्टाचार करण्याची संधी मिळू नये अशी व्यवस्था निर्माण करणे हे सतत चालणारे काम आहे आणि ते लोक आणि सरकार यांच्या सतत चालणार्‍या वाद संवादातूनच व्हावे. संविधानाने दिलेल्या व्यवस्थेला न मानण्याचे, संस्थांचा, कायद्याचा अनादर करण्याचे कॉस्टस हे व्यवस्थेतील कमतरतांमुळे येणार्‍या कॉस्टसच्या तुलनेत भयानक असतात. तेव्हा, इथे कायद्याचेच राज्य चालणार, झुंडीचे नाही हे पुनःपुन्हा प्रतिष्ठापीत करणे सरकारचे कर्तव्य आहे.
नी संविधानाचं रक्षण करायचं तेच भ्रष्ट असले तर कोणाकडे दाद मागायची?
आपली न्यायव्यवस्था(विशेषत: उच्च व सर्वोच्च न्यायमंडळे) स्वतंत्र, कमी भ्रष्ट आणि जास्त पारदर्शक आहे. त्यांच्याकडे दाद मागितल्यास न्याय मिळण्याची शक्यता अधिक आहे. आतापर्यंत संविधानाचे रक्षण ह्यांच्याच highest level of professional excellence मुळे झाले. विशेषतः आणीबाणी व नंतरच्या काळात संविधानावर लोकनियुक्त सरकारने जो घाला घातला त्याचा न्यायमंडळाने प्रतिकार केला त्यामुळेच आपले संविधान अक्षय्य राहिले. अर्थात न्यायव्यवस्था सुद्धा सतत अधिकाधिक पारदर्शक होत राहीलीच पाहिजे.

सौरा,
त्यासाठी लोकशाहीत संस्था निर्माण करणे, त्यांना पुरेसे स्वातंत्र्य देऊन सक्षम करणे, कायद्याची अंमलबजावणी निर्भयपणे करण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करणे हे काम लोकनियुक्त सरकारल नेहमीच करणे भाग असते.
ही कामं होईस्तोवर नक्षलवादी देश ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावतील. भ्रष्ट व्यवस्थेचा गैरफायदा देशद्रोह्यांना घेऊ द्यावा का, असा प्रश्न आहे. देश टिकवण्यासाठी देशतोड्यांना बडवलं तर त्यात चुकीचं ते काय? आ.न., -गा.पै.

काही जणांना त्या विशीष्ट उद्गारांची खिल्ली उडवणे रुचले नाही तरीपण बर्‍याचशा खिल्ली अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या कक्षेत व्यवस्थीत बसतात. त्यांच्या वाक्यासहीत त्या वाक्याची खिल्ली उडवणारी वाक्ये विकिक्वोट या विकिपीडिया बंधू प्रकल्पाच्या कक्षेत येतात इंग्रजी विकिपीडियाने गुरमेहेर कौर यांच्यावरचा लेख वगळला नाही. तेव्हा विकिक्वोट प्रकल्पानेही खिल्ली उडवणार्‍या वाक्यांची यादी करुन दखल घेण्यास हरकत नसावी. खिल्ली उडवणार्‍या वाक्यांची कोण म्हणाले आणि संदर्भ यासहीत यादी मिळाल्यास तसा विकिक्वोटवर लेख बनवताअ येऊ शकेल. "This comment is not written by me, its written by my key board" हे उद्गार बहुधा कुणातरी मिपाकराचेच होते, कुणाचे होते ? हि कॉमेंटे बहुधा याच धाग्यावर अथवा मिपावर वाचली पण त्या प्रतिसादाला पंख लागले का काय माहित पण गुगलवरुन शोधता दिसत नाही.

PAKISTAN DIDN’T KILL MY DAD “WAR” DID !!
हे वाक्य 'गन्स डोन्ट किल द पिपल, पिपल किल द पिपल' या वाक्याच्या समकक्ष आहे. किंवा ' अपराध वाईट असतात, म्हणून अमुक तमुक ला वाईट अपराधास जबाबदार धरु नका" हे वाक्य अशीच एक फॉलसी दर्शवते. या फॉलसीचे वर्गीकरण नेमके कोणकोणत्या प्रकारात करावे ह्याची स्वतंत्र चर्चा व्हावी म्हणून बद्दल एका चर्चा धाग्यासाठी टंकन केले पण ते मिपा सॉफ्टवेअर ऐनवेळी रागावल्याने जतन झाले नाही. पुन्हा तेवढे सगळे लिहिणे होणार नाही पण जिज्ञासूंनी या विषयावर आपली मते द्यावीत असे वाटते