Skip to main content

रोकडरहित व्यवहारांसाठी भीम अ‍ॅप कसे वापरावे याची मराठीत माहिती.

लेखक कौशिक लेले यांनी शनिवार, 31/12/2016 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
कॅशलेस अर्थात रोकडरहित व्यवहार अधिक सहज व्हावेत या दृष्टीने कालच (३० डिसें २०१६) माननीय पंतप्रधानांनी "भीम" अ‍ॅपची घोषणा केली. यूपिआय अ‍ॅपचीच ही सुधारित आवृत्ती आहे आणि वापरायला अधिक सोपं आहे. पेटीएम प्रमाणे मोबईल नंबर वापरून पैसे पाठवणे, क्यूआर कोड वापरून समोरच्याचा नंबर घेणे अशा सुविधा यात दिल्या आहेत.माझ्या मोबाईल वर अ‍ॅंड्रॉईड ६.०.१ आहे आणि त्यात ते यशस्वीरित्या इन्स्टॉल झालं आणि काम करत आहे. हे भीम अ‍ॅप कसे वापरावे याची सोपी प्रक्रिया समजून घ्या मराठीतून. मी लिहिलेल्या या सचित्र ब्लॉगपोस्ट मधून http://kaushiklele-learnmarathi.blogspot.in/p/marathi-instructions-to-u… तुम्ही वाचा; इतरांनाही सांगा, नक्की शेअर करा. आणि ब्लॉगपोस्ट कशी वाटली तेही सांगा. धन्यवाद, कौशिक लेले

वाचने 6225
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

हे अ‍ॅप कालच इन्स्टॉल केले. हे इतर अ‍ॅप्सपेक्षा जास्त सुलभ आणि युजर फ्रेंडली आहे. मात्र एका बँकेतल्या एकापेक्षा जास्त अकाऊंटसाठी एकच मोबाईल फोन क्रमांक नोंदलेला असल्यास ते त्या बँकेसाठी वापरता येत नाही. ही कमी दूर करणे आवश्यक आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एका पेक्षा जास्त खात्यांना एकाच नंबर दिला असेल तर सगळी खाती दिसतात त्यातील हवे ते खाते निवडता येते.

In reply to by कौशिक लेले

यादी दिसत नाही. फक्त, "एकापेक्षा जास्त अकाऊंट या नंबरशी जोडलेले आहेत असा संदेश येतो" आणि पुढे जाता येत नाही.

In reply to by कौशिक लेले

मला बँकांची यादी दिसली... खात्यांची यादी दिसली नाही. १. सद्या एका फोनवर एकाच बँकेचा एकच खातेक्रमांक वापरता येतो. म्हणजे दर खात्याला वेगळा फोन वापरावा लागेल, जे गैरसोईचे आहे. २. एकाच फोनवरचे अ‍ॅप लॉगइन केल्यावर (अगोदर निवडलेल्या) अनेक बँकाची यादी ---> त्यातून बँक निवडल्यावर त्या बँकेतील (अगोदर निवडलेल्या) आपल्या अनेक खातेक्रमांकांची यादी दिसायला हवी ---> त्यातून हवा तो अकाऊंट निवडून व्यवहार पुरा करता यायला हवा. असे झाले तरच, एकाच फोनवरून हवा तो अकाऊंट वापरून व्यवहार करणे सोपे होईल. ३. असे झाल्यासच, (अ) दिवसाभरात अनेक बँकखाती वापरून अनेकदा आर्थिक व्यवहार करणारे व्यावसायिक आणि (आ) कुटुंबातील सर्व खात्यांचे व्यवहार सांभाळणारे ग्राहक, यांना हे अ‍ॅप सोईचे होईल आणि हे अ‍ॅप आणि इ-व्यवहार व्यवहारात येण्यास जोराची मदत मिळेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माझा एक बँकेतला एकच अकाउंट फोनशी जोडलेला आहे, त्याला भीमवर घेण्यास समस्या आली नाही. पण दुसर्‍या बँकेच्या अकाउंटसाठी दुसरा फोन घेणे व्यावहारीक नसेल !

In reply to by प्रकाश घाटपांडे

संगणकावर प्ले स्टोअर वर पाहिले तर एनपीसीआयचे दिसते पण इनकॉम्पॅटिबल टु ऑल युवर डिव्हाईस असे दिसते. माझ अ‍ॅन्ड्रॉईड ४.०.४ आहे

भीम अ‍ॅप वापरायला अतिशय सोपे आहे आणि पेटीएम वगैरे वॅलेटसचा बाजार बसवण्याची पुरेपूर क्षमता याच्यात आहे. सरकारने याचा अधिकाधीक प्रचार प्रसार करावा. म्हात्रेकाका म्हणतात तसे एकच मोबाईल नंबर दोन किंवा अधिक खात्यांना दिलेला असेल तर अ‍ॅड करता येत नाहीत हा प्रॉब्लेम आहेच याशिवाय हे अ‍ॅप सर्वदूर पोचण्यात खालील अडचणी येऊ शकतात. १. आयएमपीएस चार्जेस : जवळजवळ सर्वच बँकांचा ठरावीक imps transactions charge आहे. जसे, एचडीएफसी साठी ५ रु. आकार आहे. १० रु. जरी पाठवले तरीही ५ रू. जातात. पेटीएम मध्ये असा चार्ज ग्राहकाकडून वसूल केला जात नाही. तेव्हा एका ठरावीक रकमेच्या transactions(उदा. १०००) करीता कुठलाच चार्ज असू नये. अर्थात बंकांना settlement करीता परतावा मिळायला हवाच, तेव्हा अश्या सर्व बंकांना या खर्चासाठी सरकारने सबसीडी द्यावी, लकी ड्रॉ सारख्या योजनांत पैसा खर्च करण्याऐवजी हे होऊ शकेल. जेणेकरून लोक भाजी खरेदीसाठीदेखील यूपीआय वापरू शकतील. २. पेटीएम प्रमाणे इथेदेखील पेमेंट झाल्याचा मेसेज लगेच आला पाहीजे, मी चचणी म्हणून मित्राला ५० रू. पाठवले त्याला तसा मेसेज आला नाही. तेच त्याने मला पैसे पाठवल्यानंतरदेखील झाले.

In reply to by पुंबा

आयएमपीएस चार्जेस : मी आयसीआयसीआय आणि पंजाब नॅशनल बँक यांच्या मधून देवघेव करून बघितली (१०/-). मला कुठलाही चार्ज लागला नाही. मी आज (२ जानेवारीला ) पण ट्राय केले. चार्जेस लागले नाहीत. असं कसं ? पेटीएम प्रमाणे मला मेसेज लगेच आला आणि खात्यात पैसे पण लगेच दिसले.

खूप महत्वाचे काम करत आहात असेच सुरू ठेवा.

In reply to by स्वधर्म

धन्यवाद. असं प्रोत्साहन मिळालं कि हुरूप वाढतो. ब्लॉगपोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रमंडळीशी लिंक शेअर करा.

भीम वापरलं आत्ताच. एका मित्राला पाठवले पैसे. १००र चाचणी म्हणून. चार्जेस पडले नाहीत असं दिसतय. दोन सेकंदात बँकेत आल्याचा/गेल्याचा मेसेज आला. पेटीएमपेक्षा लैच भारी आहे.

In reply to by अनुप ढेरे

ICICI and PNB. no charges. माझा स्वतःचा अनुभव.

भीम डाउनलोड केल्यावर पुढे जातच नाही. काय कारण असावे? दोन वेळेस डाउनलोड करून झाले. बाकी पे टी एम चिल्लर आणि पे झॅप पण मोबाईल वर आहेत त्यामुळे त्यांच्यात काही भांडण तर होत नाही?