मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अरेंज्ड मॅरेज! हे स्त्रीचे वस्तुकरण नाही काय!!!!

टर्बोचार्जड फिलॉसॉफर · · काथ्याकूट
अरेंज मॅरेज हा आपल्याकडील एक व्यवस्थीत स्थापीत झालेला प्रकार आहे.इतका की लग्नाचा जोडीदार शोधायचा हाच सर्वोत्तम प्रकार आहे हे आपल्या मानसिकतेत घट्ट रुजले आहे.मी नुकताच जेव्हा वयात येत होतो तेव्हा मला हे अरेंज मॅरेज प्रकरण फार रोमॅण्टीक वाटायचे.मुलगा मुलगी एकमेकांना बघतात,एकमेकांशी बोलतात ,एकमेकांना समजुन घेतात हे भारी वाटायचे . पण हा भ्रमाचा भोपळा फुटला ,जेव्हा मी माझ्या मावसभावाच्यावेळी " बैठकीला " गेलो होतो.बैठक होती संगमेश्वरला.आम्ही मुलीच्या घरी गेलो होतो.इकडतिकडच्या गप्पाटप्पा झाल्यावर उपवर मुलगी पोहे आणि चहा घेऊन आली.ती आल्यावर् आमच्या बाजूचे सगळे बायाबाप्ये तिच्याकडे बघायला लागले.तिचे नजर खाली झुकली.मावसभावाचे वडील तिला बस म्हणाले,तेही तिला ऐकायला गेले नाही इतकी ती कावरीबावरी झाली होती.आमच्या बरोबर जे पुरुष मंडळी होती ते तिला अगदी नखशिकांत स्कॅन केल्यासारखी बघत होती.मावसभाऊ तर हे ' मटेरीयल' आपल्याला सुट होईल का या नजरेतून बघत होता.तिने नंतर चेहरा वर करुन नुसतेच हसल्यासारखे केले.काय न्हवतं तिच्या नजरेत? आपण बाजारात ठेवलेली वस्तु आहोत इथपासुन ते आपले झालेले / होत असलेले "वस्तुकरण या सर्व भावना तिच्या डोळ्यात दिसत होत्या.मलाच ते बघुन कसे तरी वाटायला लागले.काहीतरी निमित्त करुन मी बाहेर गेलो. पण विचारात पडलो . ही कसली पद्धत लग्न ठरवायची? अरेंज मॅरेज या प्रकारात लगेच लग्न ठरत नाही.असे अनेक " दाखवायचे "कार्यक्रम उपवर मुलिंना पार पाडायला लागतात.काय वाटत असेल त्यांच्या मनाला? कुणीतरी तरी अनोळखी लोक बघायला येणार आहेत,त्यांच्यासाठि नैसर्गीक लाज,विनय,स्वत्व बाजुला ठेऊन त्यांच्यासमोर परफेक्ट वाईफ मटेरीयल आहोत हे दाखवण्यासाठी आटापीटा करायचा.की स्त्री जन्मा तुझी ही कहाणी ' म्हणत गप्प वडीलधार्यांच्या ईशार्यावर स्वतःचे वस्तुकरण करुन घ्यायचे? हे कुठे तरी थांबायला पाहीजे असे वाटते.यात प्रमुख अडसर जातीव्यवस्थेचा आहे हे मान्य.तरुण तरुणींनी ही असली रानटी पद्धत फाट्यावर मारुन सर्रास लव मॅरेज करावे.ज्यांच्यात गट्स नाहीत व जातीतच लग्न करायचे आहे अश्यांनी फक्त एक्सक्लुजीव तरुण तरुणीचे मेळावे भरवावेत ,तिथे कटाक्षाने म्हातारी खोंड असु नयेत.अश्या मेळाव्यांद्वारे मैत्री व्हावी ,पुढे आपआपल्या पसंतीच्या मुला मुलीशी आपणच जमवावे व मग लग्न करावे.हे मला जास्त संयुक्तीक वाटते. आपल्याला काय वाटते??

वाचने 14024 वाचनखूण प्रतिक्रिया 58

गॅरी ट्रुमन Fri, 12/09/2016 - 17:34
तरुण तरुणींनी ही असली रानटी पद्धत फाट्यावर मारुन सर्रास लव मॅरेज करावे.
तुमची आज्ञा शिरसावंद्य मानून मी नेमके हेच केले होते :)

हा हा हा टर्बोचार्ज्ड फिलॉसॉफर राव , तुम्ही काय नायट्रो बुस्टर लाऊन घेतला की काय ? काय एक से एक अफलातुन धागे येत आहेत ! एकच नंबर =)))) बाकी आम्हाला तर वाटते की लग्नसंस्था ही मुळातच अत्यंत रीडंडंट संस्था आहे , लग्न ही भानगडच नको ! लग्नविधीची मुळ संहिता काढुन पाहिलीत तर त्यातील क्लॉजेस किती भयानक रित्या बायंडिंग आहेत हे लक्षात येते. (अन वाईट म्हणजे इथे स्टॅट्युटरी वॉर्निंगही नसते अशी Mutual Fund investments are subject to market risk. Please read the offer document carefully before investing'. ) प्रजोत्पादन व्यक्तीगत कन्सेंटने व्हावे प्रॉपर लीगल & कॉन्ट्रॅक्चुअल. मुलांची जबाबदारी ही म्युचुअल कन्सेंट्नेच ठरावी आणि वारसा हक्क ही वैयक्तिक इच्छेने ठरावा . राजसत्तेने आणि धर्मसत्तेनेही लोकांच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करु नये ! आमच्या ओशो सरांचा मॅरेज & चिल्ड्रेन हा व्हिडीयो नक्की पहा , त्यांच्या मताला आमचे १००% अणुमोदन आहे !

संदीप डांगे Fri, 12/09/2016 - 18:56
अर्र... कल्ल्ला धागा! आपल्यालापण हे दाखवण्याचे आयटम पहिल्यापासून पटत नाहीत. स्त्रियांचे वस्तुकरण अगदी योग्य शब्द आहे ह्याला. पुरुषांचेही 'काहीतरीकरण' (गिर्हायकीकरण?) होतेच. फालतूपणा दोघांनाही झेलावा लागतो आहेच. धागा वधुवरांच्या अपेक्षा ह्या धाग्याच्या वळणावर जाउ देऊ नका मंडळी...

विवेकपटाईत Fri, 12/09/2016 - 19:20
म्हणून मी मुलगी पहिली नाही, आईने ठरवलेल्या मुलीशी लग्न केले. ३० वर्ष झाले संसार सुखाचा आहे. बाकी आमच्या घरात अर्थात नवीन अर्थात पुढच्या मुलांनी स्वत: वर/वधु निवडले. हिमाचल ते गुजरात, जैन ते गुजर, सुनार सर्वांशी नाते जुळले. खर्या अर्थाने भारतीय परिवार झाला. अर्थात हिंदी हि भाषा आपसूक घरातली भाषा झाली.

In reply to by विवेकपटाईत

आदूबाळ Fri, 12/09/2016 - 19:36
यू आर मिसिंग द पॉईंट, काका. तुम्ही नाही तरी तुमच्या आईने मुलगी 'बघितली'च ना? किंबहुना त्रयस्थाने मुलगी बघण्यामध्ये वस्तुकरण जास्तच होईल.

In reply to by आदूबाळ

चित्रगुप्त Sat, 12/10/2016 - 00:32
तुम्ही नाही तरी तुमच्या आईने मुलगी 'बघितली'च ना?
आता मुलगी कुण्णी कुण्णी अज्जिबात बघायचीच नाही, तर मग 'लव मैरिज' तरी कसे होणार ???? पण आहे, यावरही तोडगा आहे, आपल्या महान पूर्वजांनी हा देखील प्रश्न अत्यंत कल्पकतेने आणि यशस्वीपणे सोडवलेला आहे. जन्मांध धृतराष्ट्राला मुलगी 'बघणे' शक्यच नव्हते. त्याच्यासाठी भीष्माने गांधार देशी जाऊन, शुल्क देऊन गांधारीला आणले. तिने सुद्धा हा न बघण्याचा फंडा पाळता यावा, म्हणून आजन्म डोळ्यांस पट्टी बांधून घेतली. विवाहाचा मुख्य हेतु जो संतानोत्पत्ती, त्यात तर त्यांनी विश्वविक्रम स्थापित केला... धन्य ती आर्य संस्कृती, आणि तिचे पाईक. .

गामा पैलवान Fri, 12/09/2016 - 21:15
टफि, मुलगी बघणे या प्रकारचा रचितविवाहाशी (अॅरेंज्ड मॅरेज) सुतराम संबंध नाही. दोन्ही एकत्र घडंत असल्या तरी दोहोंचा एकमेकींशी काहीही संबंध नाही. बायको करायला सोबत दुनियेस निमंत्रण कशास हवं? आ.न., -गा.पै.

In reply to by सतिश गावडे

खटपट्या Sat, 12/10/2016 - 00:06
मुलाच्या घरी सगळ्या ताया, काकवा, मावश्या जमल्या आहेत आणि त्यांच्यासमोर मुलगा चहा आणि पोहे घेउन येतोय. असे चित्र डोळ्यासमोर तरळून गेले. :) खरं तर असा कार्यक्रम करायला हरकत नसावी. रच्याकने - आजकाल हे सर्व दाखवादाखवी चे कार्यक्रम औपचारीक असतात. चेपू आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या जमान्यात व्हर्च्यूअल बघाबघी आधीच होत असते. कीत्येकदा बाहेर एकमेकांना भेटूनसुध्दा होते.

"आयडीचे अतीड्युआयडिकरण" आणि "धाग्यांचे अतीप्रसवीकरण" हे पण निषेधार्ह आहे ! आधिच एकामागोमाग इतके धागे काढले आहेत तर या विषयांवरही धागे काढा. मिपा आहे घर्च, होऊ द्या खर्च ! ;)

साहना Sat, 12/10/2016 - 04:53
अरेंज मॅरेज हे स्त्रीचे वस्तूकरण आहे ह्यांत शंका नाही पण त्यात गैर काय आहे मला समजत नाही. तुम्हाला त्यांत नैतिक दृष्ट्या काही वाईट वाटत असेल तर तुम्हाला (कुठल्याही वधू पित्याला) तुमच्या मुलीचे लग्न करायला कुणीही जबरदस्ती केलेली नाही. तुम्ही स्वतःहून तुमच्या आणि तुमच्या मुलीच्या स्वार्थासाठी तिचे वस्तूकरण करून लग्न लावून देत आहात. तुम्हाला दाखवायचा वगैरे प्रोग्रॅम नको असेल तर आपल्या मुलीपेक्षा ५०% कमी कमावणाऱ्या, शिक्षण कमी असणाऱ्या पण निर्व्यसनी अश्या गरीब मुलाला मुलीचे स्थळ न्या. दाखवायचा वगैरे प्रोग्रॅम होणार नाही असे ठणकावून सांगा. तुम्हाला तुमची मुलगी पसंद करणारा एक तरी गरीब मुलगा १००% मिळेल. पण बहुतेक वाढू पिता आणि त्यांच्या मुली स्वार्थी असतात. त्यांना गब्बर पैसे कमावलेले मोठ्या घरांतील मुलगे हवे असतात. म्हणून मुलीचे वस्तूकरण करण्याची त्यांची हौस असते. वधुपिते आपण जणू काही अलोक नाथ आहोत असा आव आणतात पण प्रत्यक्षांत ह्यांना गरीब, प्रामाणिक मुलां पेक्षा भरपूर पैसा असणाऱ्या मुलांसाठी स्पर्धा करायची असते त्यामुळे ह्या स्पर्धेत हे वस्तूकरण साहजिकच आले. *** वस्तूकरणांत वाईट काय आहे ? **** हे मला अजून समजत नाही. IT आउटसोर्सिंग मध्ये असलेल्या लोकांना "रिसोर्स" म्हणून संबोधले जाते. हे वस्तूकरण नाही का ? आपल्याला रिसोर्स संबोधिले म्हणून कुणी कधी नोकरी सोडून गेलीय का? गर्भ लिंग निदानावर बंदी घातलीय. कारण काय तर म्हणे लिंग-प्रमाण कमी होते. इथे सर्व स्त्री जातीला फक्त एका आकड्यातील "numerator" म्हणून संबोधित करणे अतिशय खालच्या पातळीचे वस्तूकरण नाही का ? सरकारी आणि इतर सामाजिक जाहिरातीत ढासळत्या लिंग-प्रमाणाचे धोके सांगितले जातात: धोका क्रमांक एक : "हे असच चालू राहिलं तर लग्नाला स्त्रिया मिळणार नाहीत" धोका क्रमांक २: "स्त्रिया नाहीश्या झाल्या तर पुरुषांना जन्म कोण देणार ? " थोडक्यांत संपूर्ण स्त्री जातीचे "लग्नाला वधू" आणि "मुले (ती सुद्धा पुरुष) जन्माला घालण्याचे मशीन" असे समाजमान्य पद्धतीने वस्तूकरण करताना सरकारी लोकांचा आणि इतर स्त्रीमुक्तीवादी लोकांचा धर्म कुठे चरायला जातो ? चुकूनच एखादी जाहिरात अशी येते कि लहान मुलीला नर्स, डॉक्टर, शास्त्रद्न्य वगैरे व्हायचे आहे तिची स्वप्ने पूर्ण करण्याची तिला संधी देणे हि समाजाची जबाबदारी आहे म्हणून कदाचित भ्रूण हत्या चुकीची आहे (गर्भ पुरुष असला तरी सुद्धा हि हत्या तितकीच चुकीची आहे). बहुतेक सर्व महिला आपला फायदा होतो तेंव्हा वस्तूकरण स्वखुशीने करून घेतात. पण आपले नुकसान होताना मात्र समाजाला पुरुषप्रधान म्हणून नाव ठेवून ठेवून मोकळी होतात. भरूपर बोल्ड सिन आणि अंगप्रदर्शन करून रग्गड पैसा आणि प्रसिद्धी कमावलेल्या तारका आणि मॉडेल्स वृद्धापकाळी मात्र "स्त्री-हक्क", "वस्तूकरण" असल्या गोष्टीविषयी बोलायला लागतात. प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या शुक्रवार असताना पामेला अँडरसन (प्रसिद्धीच्या शिखरावर असताना ती काय करत होती हे इथे लिहीत नाही) pamela पॉर्न उद्योगविरोधांत बोलणारी पामेला pamela "वस्तू-करण" हा शब्द स्त्री हक्का साठी लढणार्या लोकांनी आणलेला नाही तर त्या उलट स्त्री सुधारणांचा आव आणणाऱ्या डाव्या सोशलाईट लोकांनी आणलेला आहे. आपल्या सारख्या सामान्य लोकांनी असल्या प्रोपोगांडा कडे दुर्लक्ष केलेलेच बरे. स्त्री ला जे काही वाईट सहन करावे लागते त्या सर्वांत पुरुषांचाच दोष आहे किंवा पुरुषप्रधान संस्कृती जबाबदार आहे किंवा इतर लोकांचा दोष आहे असे सर्रास काही स्त्री हक्क वादी दाखवतात. "वस्तूकरण" हा अश्याच लोकांचा एक बागुलबुवा आहे. आणि हे वस्तूकरण जणू काही फक्त स्त्रियांनाच लागू होते पुरुषांना लागू होत नाही. left हि आहे रोज मेकगावं हि अचानक स्त्री-मुक्ती साठी स्त्री-वास्तुकरणाच्या विरोधांत काम करतेय Rose कारण ? साधय ती अशी दिसतेय rose cancer कॉस्मोपॉलिटन मॅगझीन cosmopolitan हिच्या दृष्टीने मरणारे तरुण कोवळ्या पुरुषांची काहीही किंमत नाही. स्वतः च्या फायद्या साठी काहीही hillary

In reply to by साहना

थोडासा बोल्ड पण खूप छान प्रतिसाद! खरंच फायद्यासाठी सरसकट सगळीकडे "पुरुषी मानसिकता" यावर बोट ठेवणाऱ्यांची कीव येते.

In reply to by साहना

सुबोध खरे Sat, 12/10/2016 - 10:17
साहना ताई हा असा प्रतिसाद देणं म्हणजे बुर्ज्वा, प्रतिगामी, स्त्रीस्वातंत्र्य विरोधी म्हणून स्वतःवर शिक्का मारण्यासारखे आहे.

In reply to by साहना

थोडक्यांत संपूर्ण स्त्री जातीचे "लग्नाला वधू" आणि "मुले (ती सुद्धा पुरुष) जन्माला घालण्याचे मशीन" असे समाजमान्य पद्धतीने वस्तूकरण करताना सरकारी लोकांचा आणि इतर स्त्रीमुक्तीवादी लोकांचा धर्म कुठे चरायला जातो ? चुकूनच एखादी जाहिरात अशी येते कि लहान मुलीला नर्स, डॉक्टर, शास्त्रद्न्य वगैरे व्हायचे आहे तिची स्वप्ने पूर्ण करण्याची तिला संधी देणे हि समाजाची जबाबदारी आहे म्हणून कदाचित भ्रूण हत्या चुकीची आहे (गर्भ पुरुष असला तरी सुद्धा हि हत्या तितकीच चुकीची आहे).
ह्या साठी एक कडकडीत सॅल्यूट!

गामा पैलवान Sat, 12/10/2016 - 13:10
साहना,
"वस्तू-करण" हा शब्द स्त्री हक्का साठी लढणार्या लोकांनी आणलेला नाही तर त्या उलट स्त्री सुधारणांचा आव आणणाऱ्या डाव्या सोशलाईट लोकांनी आणलेला आहे.
प्रतिसाद दणकून आहे. :-) बहुतेक तुम्हाला सोशलाईटच्या जागी सोशालिस्ट म्हणायचं होतं. अशांना फेमिनाझी म्हणतात. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

साहना Mon, 12/12/2016 - 14:57
नाही हो. मला `सोशलाईट` च म्हणायचे होते. आपला तर्क अगदीच चुकीचा नाही सोशालिस्ट लोक सुद्धा अनेकदा फेमिनाझी वर्गांत मोडतात. so·cial·ite > a person who is well known in fashionable society and is fond of social activities and entertainment. म्हणजे थोडक्यांत शोभा डे सारखी लोक.

अफगाण जलेबी Sun, 12/11/2016 - 14:33
त्यामुळे वस्तूकरण हे होतंच. पण ते arranged marriage मध्येच होतं आणि Love Marriage मध्ये सगळं काही उदात्त असतं हा गैरसमज आहे. Arranged marriage मध्ये मुलगा/मुलगी आणि त्याच्या/तिच्या घरचे सगळे बघतात. Love Marriage मध्ये फक्त मुलगा/मुलगी बघतात एवढाच काय तो फरक आहे. आणि वस्तूकरण होतं म्हणजे नक्की काय? समोरच्या व्यक्तीचा एक माणूस म्हणून विचार केला जात नाही, एवढंच ना? लग्न करुन घरात जाणारी मुलगी सुद्धा ' इथे माझा फायदा झाला पाहिजे ' असाच विचार करत असते. जेव्हा सगळेच जण market मध्ये आल्यासारखा विचार असतील तर कुणा एकाचा विचार चुकीचा आहे असं कसं म्हणता येईल?

कायरा Sun, 12/11/2016 - 14:58
सगळ्याच मुली मनाजोगा वर निवडून त्याला पटवण्याइतक्या हुशार नसतात. काहींना हवा असणारा मुलगा मिळतसुध्दा नाही.त्यांचे प्रयत्न चालू असतात पण त्यात त्या यशस्वी ठरत नाहीत. कुठेतरी वडीलांना असणारा कमी पगार, स्लम वस्तीत असलेले घर, कमी उत्पन्नामुळे चेहर्‍यावर आलेला फिकटपणा, चांगले ड़्रेस अप नसल्यामुळे आलेला गबाळेपणा या गोष्टींचासुध्दा लग्न करताना विचार होतोच. अस जरी असले तरी त्या मुलीलाही लग्न करायचे असते. मग अशांनी जायचे कुठे? त्यामुळे मुलींनाही आपल्यासाठी कुणी एखादे चांगले स्थळ आणावे असे वाटणे स्वाभाविक आहे. इथेच अरेंज मॅरेजची सुरवात होते. कुणाला लग्न करायचे आहे, कुणाला नाही हे रस्त्यावर उभे राहून कसे काय कळणार? मग त्यासाठी घरी एकत्र येऊन बघून जाणे यात गैर काय आहे? सगळ्यांसाठी कांदेपोहे केले आणि एवढे करूनही लग्न नाही जमले म्हणून त्यात वाईट वाटण्यासारखे काय आहे? पुन्हा दुसर्‍या मुलाला पाहण्यासाठी कांदेपोहे करायचे. कांदेपोहे हे नेहमीच स्वस्त पडणार पण निर्णय चुकला तर तो खूप महाग पडणार म्हणून जोपर्यंत मनाजोगा मुलगा मिळत नाही तोपर्यंत बघण्याचा कार्यक्रम करणे हे जरी अप्रिय असले तरी अटळ आहे.

In reply to by कायरा

संदीप डांगे Sun, 12/11/2016 - 15:22
वधुवर मेळावे भरतात आजकाल, तिथे फक्त मुलगा व मुलगी यांनाच प्रवेश असावा, भेटू देत एकमेकांना तिथेच. पटलं तर घरी गोष्ट न्यायची, घरी दाखवण्याचे कार्यक्रम बंद व्हायला हवेत

In reply to by संदीप डांगे

अफगाण जलेबी Sun, 12/11/2016 - 15:47
अापला प्रामाणिकपणा वेगळा सिद्ध करावा लागत नाही. मुलगी/मुलगा स्वतःच्या घरी जास्त comfortable असतात. विचार करा - एक क्ष मुलगी मेळाव्यात एका य मुलाशी बोलते आहे आणि दुस-या क या मुलाने ते पाहिलं. नंतर क्ष आणि य यांचं काही कारणाने जमलं नाही अाणि क आणि क्ष भेटले. क अाणि क्ष यांनी एकमेकांना नाकारण्याची शक्यता जास्त. घरी येणारे पर्याय हे बाहेर एखाद्या मेळाव्यात भेटणाऱ्या पर्यायांपेक्षा कमी असतात आणि तिथे निवड करुन बोलणी पुढे जाण्याची शक्यताही जास्त असते. जेव्हा जास्त पर्याय उपलब्ध असतात तेव्हा गोंधळ उडून कुठलाही निर्णय न घेतला जाण्याची शक्यता जास्त असते.

In reply to by संदीप डांगे

अप्पा जोगळेकर Tue, 12/13/2016 - 15:40
वधुवर मेळावे भरतात आजकाल, तिथे फक्त मुलगा व मुलगी यांनाच प्रवेश असावा, भेटू देत एकमेकांना तिथेच. पटलं तर घरी गोष्ट न्यायची, छे. तेदेखील वस्तूकरणच आहे. शॉपिंग मॉल मधे जाऊन शर्ट घेण्यासारखेच. लौ मेरेज पण बर्यापैकी वस्तूकरणातच मोडते. त्यापेक्षा काही आदिवासी जमातींमधील 'एकत्र राहून पाहा' आणि 'पसंत करा' हा दॄष्टीकोन जास्त प्रागतिक आहे. निदान या बाबतीत, खर तर त्यांना आदिवासी न म्हणता रुढ नागर समाजालाच आदिवासी म्हणायला पाहिजे.

In reply to by अप्पा जोगळेकर

संदीप डांगे Tue, 12/13/2016 - 15:46
आपल्याला तर ते आदिवासी पद्धतच पटते पण जौदे, नै झेपत आधुनिक नागर समाजाला. बाकी लौ मेरेज वस्तुकरणात कसे मोडतं ते कै कल्लं नै? (काडी रहेगा तो रेन्दो)

अफगाण जलेबी Sun, 12/11/2016 - 15:55
सगळे प्रेमविवाह हे चांगले आणि arranged marriages हे सगळे रानटी आणि वाईट हे दाखवण्याचा जो चंग बांधलेला आहे त्यालाच विरोध आहे. सर्व प्रेमविवाह उदात्त नसतात आणि सर्व रचितविवाह राक्षसी नसतात. स्वतःला आलेल्या एका अनुभवावरून ' हे असंच होत असणार सगळीकडे ' म्हणून आरडाओरडा करणारे पुरूष आणि साहनाताईंनी भंडाफोड केलेल्या फेमिनाझी स्त्रिया यांच्यात गुणात्मक फरक काहीही नाही. आततायी extrapolation हा दोघांमधला सामायिक मुद्दा आहे.

वरुण मोहिते Sun, 12/11/2016 - 16:50
अश्या समतोल प्रतिसादांसाठी. बाकी वधू वर मेळ्यांमध्ये लोकांच्या नजरा अत्यंत चांगल्या असतात का?? जाता जाता बुद्धिमान लेखकांचे आभार . चर्चा होत आहे हे हि नसे थोडके .

In reply to by वरुण मोहिते

संदीप डांगे Sun, 12/11/2016 - 17:21
वधू वर मेळाव्यांचा कै अनुभव नै, वाईट नजर असणे जागेवर अवलंबून नसते भौतेक! ;) :) बाकी, आजच्या पुढारलेल्या काळात जे लोक स्वतःचा जीवनसाथी स्वतः शोधू शकत नाहीत त्यांच्याबद्दल फार वाईट वाटतं. 'अनेक (ठिसूळ) कारणं देऊन तसं होण्याला समर्थन मिळू नये' असंच वातावरण कायम राहावं अशा विचारात मंडळी दिसतात. परदेशात हे दाखवण्याचे कार्यक्रम होतात काय?

In reply to by संदीप डांगे

रेवती Mon, 12/12/2016 - 08:24
अगदी होतात. आपल्याकडे असते तसे सगळेजण मुलीकडे, मुलाकडे पहातही असतील पण असे वाटत नाही की पापणीही लवत नसतील. आईवडीलांनी, काकाकाकूंनी किंवा कोणीही ओळख करून देणे व यातून भविष्यात काही होऊ शकेल का हे त्या मुलगा व मुलीला ठरवू देणे असे स्वरुप मी तरी ऐकून आहे. आर्थिक उलाढाल फारशी नसावी म्हणून लोकांचे इंटरेस्ट मर्यादित रहात असावेत.

In reply to by वरुण मोहिते

अप्पा जोगळेकर Tue, 12/13/2016 - 15:34
बाकी वधू वर मेळ्यांमध्ये लोकांच्या नजरा अत्यंत चांगल्या असतात का?? चांगल्या नजरेने मुलगी किंवा मुलगा पसंत कसा करणार ? मुळात चांगली नजर म्हणजे काय ?

वरुण मोहिते Sun, 12/11/2016 - 17:31
चर्च च्या माध्यमातून .. जेवढ्या जाती तेवढ्या प्रथा . असो मला पण वधू वर मेळाव्याचा अनुभव नाही:)))आम्ही लव्ह मॅरेज करणारे:)

बोका-ए-आझम Mon, 12/12/2016 - 09:17
टफीभौंचा भडास टच आहे. गेल्या काही दिवसांपासून फक्त भडास काढताहेत. मिडास टचने कुठलीही गोष्ट सोन्याची व्हायची. इथे या भडास टचने गंभीर मुद्देही हास्यास्पद होताहेत.

पाटीलभाऊ Mon, 12/12/2016 - 13:36
माझ्या चुलत भावासाठी मुलगी बघायला गेलो होतो तेव्हाहि थोडेफार असे जाणवत होते. वधू-वर मेळाव्यात गेलो होतो पण तोही प्रकार काही पचला नाही. आमच्यावरही सध्या तीच वेळ येणार आहे. सध्या परदेशात असल्याने ठीक आहे...पण परत आल्यावर हि फालतुगिरी करायची अजिबात इच्छा नाहीये. त्यामुळे काही झाले तरी ह्या बघण्याच्या कार्यक्रम फाटा देण्याचे ठरवले आहे. बघूया किती यशस्वी होतो त्यात ते.

In reply to by पाटीलभाऊ

संदीप डांगे Mon, 12/12/2016 - 14:07
वधुवर मेळाव्याचा अनुभव सांगा की राव. अरेंज मॅरेज करत असाल तर कितपत फाटा देउ शकाल याबद्दल साशंकता आहे.

In reply to by संदीप डांगे

पाटीलभाऊ Mon, 12/12/2016 - 14:23
वधुवर मेळावा मला एकप्रकारचा बाजारच वाटला... :( म्हणजे जे कोणी उपवर मुले-मुली असतील त्यांनी स्टेजवर जाऊन आपली माहिती द्यायची...एकंदरीत स्वतःची जाहिरात करायची. त्यानंतर जर त्यातून कोणी आवडलं तर तिथे आजूबाजूला बसलेले मुलं-मुली आणि त्यांचे पालक वधुवर सूचीमध्ये त्यांची माहिती बघतात आणि मग पुढची प्रक्रिया सुरु होते.(सूची हि अशी पुस्तिका ज्यात सगळ्या उपवर मुला-मुलींची माहिती असते.) मी मेळाव्यात गेलो होतो...पण तो प्रकार न पचल्याने स्टेजवर गेलो नाही.
अरेंज मॅरेज करत असाल तर कितपत फाटा देउ शकाल याबद्दल साशंकता आहे.
हो तेही आहेच. पण एक ठरवलं आहि कि...बघण्याचा कार्यक्रम करण्याआधी जी कोणी मुलगी असेल तिला १-२ वेळा बाहेर भेटून सविस्तर चर्चा करायची आणि जर दोघांना एकमेकांसोबत कम्फर्टेबल (मराठीत योग्य शब्द सुचला नाही) वाटलं तरच मग पुढची बोलणी करायची. जेणेकरून जेव्हा बघायला जाणार तेव्हा आधीच भेटलेले असल्याने टफीभाऊंनी सांगितल्याप्रमाणे तरी मुलीची अवस्था होणार नाही. सध्या तरी हाच विचार आहे. अजून कोणाकडे काही चांगले पर्याय असतील तर स्वागत आहे.

In reply to by पाटीलभाऊ

संदीप डांगे Mon, 12/12/2016 - 15:22
आपला विचार उत्तम आहे. पण वर अफगाण जिलेबी म्हणतात तसे हे बाहेर भेटतांना अमुक-तमुकने पाहून मुलीच्या चारित्र्याबद्दल गहजब केला तर? लग्न व इतर कौटुंबिक कार्यांमधे लग्नोत्सुक मुला-मुलींची उपस्थिती असली तर जरा अनौपचारिक वातावरणात ओळखी-पाळखी होऊन गोष्टी पुढे सरकतात-सरकू शकतात. सामान्यपणे असे होत असावे. तरी घरी दाखवण्याचे कार्यक्रम होतात, एकमेकांना भेटणे, समजून घेणे, आवडनिवड, प्रेफरेन्सेस जाणून घेणे हे घरी पूर्वग्रहरहित वातावरणातसुद्धा होऊ शकतं. पण वर लेखात जे वातावरण सांगितलंय ते असू नये असे वाटते. जाऊ दे, आपण खूप आदर्शवादी बोलतो. प्रत्यक्षात असे काही घडेलच असे नसते. वस्तुकरण फक्त मुलींचेच होते असे नाही. मुलांनाही भोगावं लागतंच. साहना यांनी सांगितल्याप्रमाणे ही बाजारव्यवस्था आहेच, आयदर ब्रेक इट ऑर गेट अलॉन्ग विद इट.

In reply to by संदीप डांगे

पाटीलभाऊ Mon, 12/12/2016 - 15:40
पण वर अफगाण जिलेबी म्हणतात तसे हे बाहेर भेटतांना अमुक-तमुकने पाहून मुलीच्या चारित्र्याबद्दल गहजब केला तर?
अण्णा आपण दुसऱ्यांची मानसिकता बदलू शकत नाही... :(
जाऊ दे, आपण खूप आदर्शवादी बोलतो. प्रत्यक्षात असे काही घडेलच असे नसते.
हो हीच तर आपली अडचण असते...आपण समोरच्या व्यक्तीकडूनसुद्धा तसेच आदर्शवादी विचारांची अपेक्षा ठेवतो :D वैतागवाणं काम आहे हे सगळं...बऱ्याच वेळा तर विचार येतो...ह्या लग्ना-बिग्नाच्या फंद्यात न पडलेलंच बरं...एकटा जीव सदाशिव...!

सप्तरंगी Mon, 12/12/2016 - 20:48
वस्तूकरण / बाजारीकरण , लग्नाचा बाजार हे शब्दच लग्नाचे बाजारीकरण करतात. काय वाईट आहे arrange marriage मध्ये, तुम्ही एकाच दृष्टिकोनातून बघताय म्हणुन तुम्हाला तसे वाटत असेल. मुलगाच मुलगी पाहायला जातो असे काही नाही मुली पण मुलांच्या घरी मुलगा पाहायला ( खर तर घर, घरातील लोक , मुलगा यांना भेटायला ) जातात. मग तेंव्हा काय मुलगा बाजारात ठेवलेली वस्तू आहे असे म्हणाल का? नाही कारण असे 'शब्द पाडणे' अजूनही फक्त मुलींच्या बाबतीतच केले जातात. practically काय सोईचे असेल याचा विचार नाही केला जात. २० वर्षांपूर्वी मी ५-६ मुलांना पाहायला गेले , खर तर भेटले (हो हाच शब्दप्रयोग चपखल बसतो कारण आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो) तेंव्हाही वस्तूकरण / बाजारीकरण अशी भावना नव्हती. मनात होते ते एवढेच कि जर प्रेमविवाह शक्य नाही तर हाच मार्ग योग्य आहे, आणि ओळख नसलेल्या व्यक्तीला कुठे बाहेर भेटण्यापेक्षा secured वातावरणात आई-वडिलांसोबत भेटणे , तिथेच थोडे वेगळे भेटणे योग्य. तेंव्हाही कधी चहा-पोहे घेऊन गेले नाही, आजकालहि कुणी अशा चहा-पोहे घेऊन जायच्या प्रथा पळू नयेत. आणि बिनधास्त मुलगा- मुलगी भेटण्याच्या (बघण्याच्या नव्हे ) प्रथा प्रथमतः घरापासूनच सुरु ठेवाव्यात असे वाटते, अर्थात स्वतःचा स्वतः ठरवू शकत नसाल तर !