नमस्कार,
गेले काही दिवस वारंवार कार्ड पेमेंटच्या २ टक्क्यांबद्दल काही प्रतिक्रिया वाचत आहे. हे पैसे सरकारने द्यावेत, ते सबसिडाईज व्हावेत पासून पेमेंट बँकांच्या २ % कमिशनसाठी नोटा बंद झाल्या वगैरे प्रतिसाद वाचले. एका धाग्यावर मोदकशी चर्चा करताना यासंदर्भात १-२ प्रतिसाद दिले होते. ते कॉपी -पेस्ट करुन इथे चिकटवत आहे. सविस्तर लिहिण्यासाठी तूर्तास वेळ नाही त्याबद्दल दिलगीर आहे. माझी माहिती अपूर्ण असू शकते. त्यात कोणी भर घातल्यास आवडेल.
या धाग्याचा 'माहिती' यापलीकडे अन्य कोणताही उद्देश नाही.
हे चार्जेस शून्य करता येत नाहीत. कारण ते सरकारकडे जात नाहीत.
नेटवर्क कंपनीने फुकटात सेवा द्यावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.
१. जयंत कुलकर्णी - Mon, 28/11/2016 - 16:52
आत्ताच गॅससाठी क्रेडीटकार्डने पैसे भरले. जवळजवळ १ % जास्त भरावे लागले. ट्रान्झॅक्शन चार्जेस म्हणून १ %. म्हणजे एचपी गॅस डिलिव्हरीच्या अगोदर पैसे घेणार व त्यासाठी जास्त पैसे घेणार. कॅशलेस हा माझ्यासाठी आतबट्याचा व्यवहार आहे... :-(
२. मोदक - Mon, 28/11/2016 - 17:05
८०० रूपयांचा सिलेंडर असेल तर १% पैसे म्हणजे ८ रूपये जास्त जातील.
सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक मनीला प्रोत्साहन म्हणून सरकार बहुदा हे ही चार्जेस कमी किंवा शून्य करेल. असा माझा अंदाज आहे.
३. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 17:43
सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक मनीला प्रोत्साहन म्हणून सरकार बहुदा हे ही चार्जेस कमी किंवा शून्य करेल.
हे चार्जेस शून्य करता येत नाहीत. कारण ते सरकारकडे जात नाहीत.
नेटवर्क कंपनीने फुकटात सेवा द्यावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.
४. मोदक - Mon, 28/11/2016 - 17:54
आप्पा.. सरकार असे मार्ग वापरणार्याला सबसिडी देईल.. किंवा खर्चाच्या रकमेची आणखी काहीतरी सवलत देईल.
बरोबर..?
५. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 18:15
नाही. तसे वाटत नाही. देत असल्यास देऊ नये. सबसिडी घेऊन धंदा करणे मला तत्वतः चूक वाटते.
पेमेंट बँकिंगचे बिझनेस प्रिन्सिपल 'माझ्या मते तरी उधार मिळते म्हटल्यावर लोक पटकन खरेदी करतात' या ग्रूहीतकावर अवलंबून आहे. म्हणून जगातले पहिले पेमेंट बँकिंग डायनर्स क्लब आणि अमेरिकन एक्स्प्रेस च्या क्रेडीट कार्डांपासून सुरु झाले. हे ग्रूहीतक शॉपिंग मॉल्/डीपार्टमेंटल स्तोअर येथे य्शस्वीपणे चालताना आपण पाहतोच. नंतर 'क्रेडीट कार्ड' साठी नेटवर्क अव्हेलेबल आहे आणि सोय म्हणून डेबिट कार्ड साठी सुद्धा पेमेंट बँकिंग सुरू झाले असावे असे वाटते.
आमचे नेटवर्क तुम्ही वापरा (का वापरा तर धंदा वाढेल) आणि नेटवर्कची फी द्या असे हे गणित आहे.
शिवाय चेक पेमेंट मधे चेक बाउन्स होऊ शकतो. पेमेंट बँकेत कस्टमरने डिफॉल्ट केले तरी मर्चंटचे पैसे बँकेला द्यावेच लागतात. (बहुधा व्याजासकट. तो वेगळा फायदा.)
आपण एखाद्या बँकेचे एटीम वापरतो तेव्हादेखील नेटवर्कची फी द्यावी लागते. दुसर्या बँकेचे एटीएम असेल आणि ५ + ट्रान्जाकश्नस असतील तर चार्ज पडतो.
पेमेंट बँकिंग वर बहुधा आरबीआय ची रेगुलेशन असावीत असे वाटते.
या सगळ्यात सरकार आलेच कुठे ? येऊ नये. देशात पेमेंट बँकिंग वाढावे असे सरकारला वाटत असेल तर असले निर्बंध किंवा सबसिडी देऊ नयेत.
६. डॉ सुहास म्हात्रे - Mon, 28/11/2016 - 20:35
सबसिडी हा शब्द तितकासा बरोबर नाही असे वाटते व कोणत्याही सबळ आणि चांगल्या अर्थव्यवस्थेत सबसिडी एक तात्पुरती तडजोड म्हणूनच वापरलेली असते, काही काळाने ती नष्ट व्हावी हाच उद्येश असला पाहिजे.
पण, ट्रांझॅक्शन्सची संख्या मोठा प्रमाणावर वाढली की, इंफ्रास्ट्रक्चरवरील खर्च त्याच्या समप्रमाणात वाढत नसल्याने, दर ट्रांझॅक्शनमागचा खर्च कमी होईल (इकॉनॉमी ऑफ स्केल) आणि ती बचत पूर्ण किंवा त्यातला काही भाग ग्राहकापर्यंत पोचेल.
७. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 17:40
काका, हा जो काही वाढीव टक्का आहे तो गॅसवाल्याने भरला पाहिजे. उगाच सरकारच्या नावे टाहो फोडून काय होणार मर्चंट (गॅसवाला) --> अक्वायरर कंपनी (अक्सिस बँक वगैरे) --> नेटवर्क कंपनी (विसा/मास्टर कार्ड्/अमेक्स वगैरे) --> कार्ड इश्युअर बँक (आय्सीआय्सीआय वगैरे).
उद्या गाळ्याचे भाडे वाढले म्हणून गॅसवाल्याने अडिशनल पैसे घेतले तर तुम्ही द्याल का ?
असे वाढीव पैसे देणे चूक आहे. यापेक्षा चेकने पेमेंट करू शकता.
८ रुपये हा मामुली दर आहे हा वेगळा भाग आहे.
वाचने
104047
प्रतिक्रिया
582
मिसळपाव
प्रतिक्रिया
सांगा
In reply to यात काय नवीन आहे? असा चार्ज by संदीप डांगे
काहींना कम्पलसरी चार्ज बसतोच.
In reply to सांगा by संजय क्षीरसागर
आक्ख्या धाग्यावर हाच विषय होता !
In reply to काहींना कम्पलसरी चार्ज बसतोच. by संदीप डांगे
माझ्याकडे पावत्या किंवा
In reply to आक्ख्या धाग्यावर हाच विषय होता ! by संजय क्षीरसागर
हे बरोबरे !
In reply to माझ्याकडे पावत्या किंवा by संदीप डांगे
सर, एवढा गदारोळ घालून अजून
In reply to सांगा by संजय क्षीरसागर
आता मात्र हद्द झाली !
In reply to सर, एवढा गदारोळ घालून अजून by हतोळकरांचा प्रसाद
खरंच हद्द झाली असावी आता! असो
In reply to आता मात्र हद्द झाली ! by संजय क्षीरसागर
त्यांच्या खिशातून जातात आणि
In reply to खरंच हद्द झाली असावी आता! असो by हतोळकरांचा प्रसाद
माझ्या खिशातून कुठलेही चार्जेस जात नाहीत....
In reply to खरंच हद्द झाली असावी आता! असो by हतोळकरांचा प्रसाद
हो नक्की! २०० रु.ची वस्तू
In reply to माझ्या खिशातून कुठलेही चार्जेस जात नाहीत.... by संजय क्षीरसागर
स्वतः हट्टाने चुकीचे पर्याय
In reply to सांगा by संजय क्षीरसागर
हे विषेश स्किल् आहे. आम्हाला
In reply to स्वतः हट्टाने चुकीचे पर्याय by डॉ सुहास म्हात्रे
आप्पानी पुरावा मागितला होता तो दिला
In reply to हे विषेश स्किल् आहे. आम्हाला by डॉ सुहास म्हात्रे
बँकेत न ठेवता खिश्यात कॅश
In reply to आप्पानी पुरावा मागितला होता तो दिला by संजय क्षीरसागर
सेविंगमध्ये असले तर ४%,
In reply to बँकेत न ठेवता खिश्यात कॅश by डॉ सुहास म्हात्रे
फारच विनोदी !
In reply to सेविंगमध्ये असले तर ४%, by डॉ सुहास म्हात्रे
?????????
In reply to आप्पा, हा घ्या पुरावा ! by संजय क्षीरसागर
कॅशलेस ची आरती ओवाळायची म्हटली तर ?
In reply to ????????? by रॉजरमूर
नुसतं बरोबर आहे म्हणून
In reply to कॅशलेस ची आरती ओवाळायची म्हटली तर ? by संजय क्षीरसागर
जरूर !
In reply to नुसतं बरोबर आहे म्हणून by हतोळकरांचा प्रसाद
याबद्दल आज बातमी आली आहे