देशातील एक रुपयाही स्विस बँकेत नाही.
In reply to फाउल फाउल फाउल by संदीप डांगे
In reply to कर्जरोख्यांवर सहा टक्केच by कंजूस
तरीही नवीन लॅाट विक्रीस काढल्यावर धडाधड विक्री का होते हा प्रश्न कुणाला पडला नाही का?याला दोन तीन प्रमुख कारणे (मला अर्थशास्त्र कळत नाही, तरीही एक पुणेकर म्हणून या विश्वातील कुठल्याही गोष्टीवर मत प्रदर्शन करू शकतो ) १. भारताची निर्मिती झाल्यापासूनच अनेक लोकशाही पक्षांची भारतीय सरकारे यांची शांतताप्रियता यामुळे या देशा बद्दल जगात शान्तिप्रिय देश म्हणून प्रतिमा (परदेशस्थ गुंतवणूकदारांचा ओढा) २. १९९३ पासूनचा आर्थिक सुधारणा ३. निर्मितीपासूनच रिजर्व बँकेची दर्जेदार कामगिरी व सचोटी त्यामुळे भारत सरकारने हमी दिलेले रोखे हे जवळ जवळ शून्य रिस्क गुंतवणूक साधन मानले जाते. बाहेर जरी व्याज दार जास्त असले तरी, मागील दाराने टी डी एस /इनकम वेल्थ टॅक्स रूपाने सरकार पैसे परत काढून घेते. अमेरिकन फेड्रल पेक्शा आप्ल्या रोख्यन्चा परतावा जस्त आहे.
In reply to बाहेर म्हणजे कुठे ? by पगला गजोधर
In reply to त्यांना बाहेर म्हणजे इतरत्र by संदीप डांगे
In reply to कर्जरोख्यांवर सहा टक्केच by कंजूस
कर्जरोख्यांवर सहा टक्केच व्याज देते सरकार.बाहेर अधिक व्याज मिळते तरीही नवीन लॅाट विक्रीस काढल्यावर धडाधड विक्री का होते हा प्रश्न कुणाला पडला नाही का?
तुम्हाला बाहेर म्हणजे नक्की कोठे म्हणायचे आहे ? सद्या भारतातले कर्जरोख्यांचे व व्याजाचे दर विकसित देशांपेक्षा अनेक पटींनी जास्त आहेत.
१. कालचे युएस ट्रेझरी बॉड्सचे दर १ महिन्यासाठी ०.२३% ते ३० वर्षांसाठी २.२३% टक्के इतके कमी होते.
२. स्विस नॅशनल बँकेचा सद्याचा वार्षीक व्याजदर -०.७५% आहे म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट ठेवायचे तर ग्राहकाला बँकेला दरवर्षी ०.७५% च्या दराने पैसे मोजावे लागतात. दर उणे आहे, टंकनचूक नाही.
वेळोवेळी Standard & Poor's, Moody's व Fitch यांनी देशाला दिलेल्या रेटिंग्जची ची माध्यमांत चर्चा केली जाते हे पाहिले असेलच. या संस्थांच्या रेटिंगवर देशाची पत ठरते व त्या देशांच्या रोख्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात उचलले जाईल की नाही आणि त्याकरिता काय व्याजदर द्यावा लागेल हे ठरते. पूर्वानुभवामुळे (करारात ठरलेल्या व्याजासह, ठरलेल्या वेळी पैसे परत करणे); सद्य भक्कम परकीय चलन गंगाजळी, आणि देशाच्या चांगल्या आर्थिक स्थितीमुळे भारत सरकारच्या रोख्यांची स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली प्रत आहे. अर्थात त्यांना चांगली मागणी आहे. भारताची आर्थिक स्थिती सुधारू लागल्यावर १९९० व २००० च्या दशकांत भारताने कमी व्याजाचे नविन कर्जरोखे विकून आलेल्या पैशाने अधिक व्याजाची जुनी कर्जे फेडल्याचे वाचले असेलच.In reply to कर्जरोख्यांवर सहा टक्केच by कंजूस
In reply to काळा पैसा, पांढरा पैसा... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आता मिपावाले आपलेच आहेत म्हणुन..... by इरसाल
In reply to वरती सांगीतल्या प्रमाणे तुमचा पैसा by नाखु
In reply to नाखुसायेब by इरसाल
In reply to काळा पैसा आणि पांढरा पैसा . by मृगनयना
In reply to तुमच्या उदाहरणात थोडासा गोंधळ by संदीप डांगे
In reply to मी सांगितलेल्या उदाहरणात फक्त ABC चा रोल CLEAR केलाय. by मृगनयना
खरोखरच उद्या स्विस बँकेतील पैसा भारतात पांढरा बनून आला तर काय होईल? आपल्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. शीर्षकात म्हटल्या प्रमाणे आपल्या देशातील एकही रुपया बाहेर गेलेला नाही . स्विस बँकेतून मिळणार पैसा हा विदेशी चलनात असणार.त्यामुळे विदेशी चलनाचे रुपयात रूपांतर करण्यासाठी बाजारातला पैसा वापरावा लागेल. ती अशक्य कोटीतील गोष्ट आहे. परकीय गंगाजळी भरमसाठ फुगल्यामुळे रुपया व डॉलर/पौंड ह्याच्या विनिमय दरावर परिणाम होईल. रुपया मजबूत झाल्यामुळे निर्यात परडवणार नाही. परदेशी गुंतवणूक होणार नाही. म्हणजे धरलं तर चावतंय व सोडलं तर पळतंय अशी गत होईल.समजा हा पैसा भारतात पांढरा बनून आला, तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडणार नाही. हा पैसा असा असून असून किती असणार आहे? भारताच्या GDP च्या किती टक्के असेल हा पैसा? शिवाय तो पांढरा बनून आला तर RBI कडचा परकीय चलनाचा साठा वाढेल आणि त्यामुळे डाॅलर्सची किंमत कमी होईल (परकीय चलनाचा पुरवठा वाढल्यामुळे त्याची किंमत कमी होईल)आणि भारतीय रूपया वधारेल पण त्यामुळे निर्यात परवडणार नाही हे चुकीचं आहे, कारण आपण आपल्या एकूण इंधनाच्या गरजेपैकी ८५% आयात करतो आणि डाॅलर्स प्रामुख्याने त्याच्यासाठी लागतील. हे वाढलेले डाॅलर्स RBI तेल कंपन्याना उपलब्ध करुन देईल, जेणेकरून रूपया आपली निर्यात घसरण्याएवढा वधारणार नाही. परदेशी गुंतवणूक किंवा FDI वर तर याचा अजिबात परिणाम होणार नाही. सर्व मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतातले व्याजदर आजही जास्त आहेत. राजन जेव्हा governor झाले तेव्हा आपली परकीय चलनाची गंगाजळी घसरली होती आणि परिणामी रुपयाही घसरला होता. त्याचा परिणाम किंमतपातळी (price level) वरही झाला होता. चलनफुगवटा किंवा inflationary pressure निर्माण झालं होतं. राजन यांनी रूपया स्थिर करण्यासाठी व्याजदर वाढवले आणि आता परकीय चलनाची गंगाजळी वाढूनही दर कमी केलेले नाहीत. त्यांच्यावर सुब्रम्हण्यम स्वामींनी हाच तर आरोप केला होता. पण दर कमी न केल्यामुळे किंमती आटोक्यात आहेत हे स्वामींनी सोयीस्कररीत्या दुर्लक्षित केलं होतं. जर परकीय चलनाची गंगाजळी वाढली, तर RBI रोजगार निर्मिती आणि महागाई नियंत्रण या दोन्हीही उद्दिष्टांना साध्य करु पाहणारे मध्यममार्गी व्याजदर ठेवेल. त्यामुळे परकीय गुंतवणूक होईल. शिवाय आंतरराष्ट्रीय परिस्थिती काय असेल, कुणी सांगावं. जगभर मंदीचा सामना करण्यासाठी व्याजदर कमी केले जाताहेत पण भारतात ते स्थिर आणि जास्त आहेत. एक प्रकारे इथे परकीय गुंतवणूक येण्यामागे तेही कारण आहे.
In reply to चूक ४ by बोका-ए-आझम
In reply to @बोका-ए-आझम by मार्मिक गोडसे
In reply to रिव्हर्स हवाला by बोका-ए-आझम
In reply to रिव्हर्स हवाला by बोका-ए-आझम
म्हणजे आपल्या देशातील पैसा देशाबाहेर काढणं असा जर अर्थ घ्यायचा असेल तर त्याचं उत्तर नाही असं आहेमी असं म्हटलंच नाही. रिव्हर्स हवाला पुर्ण होताना आपल्या देशातून एखादे चलन बाहेर् देशात जाते का? असे विचारले आहे. पुढे तुम्ही म्हणता.
स्पष्टच सांगायचं तर आपल्या रूपयाला अमेरिकन डाॅलर किंवा ब्रिटिश पाऊंड किंवा स्विस फ्रँक्सएवढं मूल्य नाहीये. त्यामुळे भारतीय रूपये का कोणी बाहेर काढेल?मग रिव्हर्स हवाला पुर्ण करण्यासाठी भारतातून कुठलेतरी विदेशी चलन देशाबाहेर गेलं असं तुम्हाला म्हणायचं आहे काय?
स्विस बँक्स किंवा इतर tax havens मध्ये ठेवण्यासाठी बाहेर काढला जाणारा पैसा हे भारतीय नागरिकांचं भारतात किंवा भारताबाहेर मिळवलेलं उत्पन्न असतं - ते कायदेशीरपणे किंवा बेकायदेशीरपणे मिळवलेलं असू शकतं.कसं बोललात?
मला विमानांचे स्पेअर पार्ट्स (अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रे यानंतरचा सर्वात मोठा बेकायदेशीर व्यवसाय) बेकायदेशीररीत्या विकून काही लाख डाॅलर्स मिळालेले आहेत.वरील उदाहरण हे भारतीय नागरिकाने भारतात व्यवहार करुन लाखो डॉलर मिळवले आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का? ते स्पष्ट झाले तर पुढे चर्चा करता येईल.
अशा कार्यक्रमांचे आयोजक हे पैसे कुठून आणतात याचा हिशोब साधासरळ आहे. अर्थातच हे पैसे बेकायदेशीररीत्या कमावलेले असू शकतात. आयोजक money laundering चं काम करतात. पण हे सिद्ध करणं प्रचंड अवघड आहे कारण कायद्याने दिलेल्या सवलतींचा इथे फायदा घेतला जातो.नक्की का? कारण असे कार्यक्रम कॅनडा, लंडन व अमेरीकासारख्या देशातही होत असतात. money laundering बाबत हे देश दक्ष असतात.
In reply to रिव्हर्स हवाला कसा पुर्ण होतो by मार्मिक गोडसे
In reply to मुळात भारतातील पैसा बेकायदेशीर पद्धतीने बाहेर काढणं by बोका-ए-आझम
त्यामुळे रिव्हर्स हवाला होत असेल असं मला वाटत नाही. कारण त्यात हवाला आॅपरेटर्सना फायदा नाहीये.रिव्हर्स हवालाशिवाय हवालाचा व्यवहार पुर्णच होऊ शकत नाही. हवाला एजंट धर्मार्थासाठी ठेवलेले नाहीत.
In reply to फसलेला प्रतिसाद. तुम्हाला by मार्मिक गोडसे
In reply to ठीक आहे. by बोका-ए-आझम
In reply to हवालाच्या तुम्हीच दिलेल्या by मार्मिक गोडसे
In reply to हवालाच्या तुम्हीच दिलेल्या by मार्मिक गोडसे
In reply to एक कन्फ्यूजिंग शंका. by आनंदी गोपाळ
In reply to एक कन्फ्यूजिंग शंका. by आनंदी गोपाळ
In reply to भारतिय व्यक्ती/संस्था परदेशात by डॉ सुहास म्हात्रे
माई मोड ऑन